नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सतराव्या-अठराव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाण-घेवाणीतून केले जात. सोन्या-चांदीच्या नाण्यांचा उपयोग मुख्यत: व्यापारी आणि राजांपुरता मर्यादित असे. आजच्या प्रमाणे प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे, सेवेचे मोल पैशांत करण्याची पद्धत नव्हती.
November 26, 2010
“…मला बोलता येतं नाही , पण झरा मात्र माझा आदर्श आहे इतकंच सांगतो . शक्य असेल तर डोंगरातल्या पाण्याचा आदर्श घ्यायला हवा . आपण कृतीतून झरा होऊ या .
February 4, 2026
कायद्याने स्त्रियांना कितीही अधिकार दिलेले असले तरी पुरुषांकडून स्त्रियांवर होणारे अन्याय काही कमी झालेले नाहीत. स्त्रियांवर अन्याय न करणारे पुरुष समाजात तुरळक आहेत हे उघड सत्य आहे.
September 5, 2021
अनपेक्षितपणे तो बुटका टकलू ढाब्यातून वेगाने धावत हायवे कडे पळत होता, त्याच्या मागे राघव होता. क्षणात त्या बुटक्याला चिरडून तो राक्षसी ट्रक निघून गेला होता. रुद्राला हे नाट्य तो उभा होता तेथून दिसत होते. मेंदूने या सर्वांचा अर्थ लावेपर्यंत काहीवेळ तो एका जागी स्तब्ध उभा राहिला. या अपघातून तो बुटका वाचणे शक्यच नव्हते.
March 31, 2019
गुलजार यांचा हा लेख ललित-लेख आहे, असें जर जाहीर केलें गेलें असतें, तर मग त्यांच्या या कल्पनाविष्काराबद्दल कांहीं तक्रार असायचें कारणच नव्हतें. मात्र, तसें न केल्यानें, वास्तविक परिस्थिती काय होती अथवा काय होती-असेल , याचा ऊहापोह करणें क्रमप्राप्त झालें. या मंथनातून, गालिबबद्दल योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोचेल अशी आशा.
April 6, 2019
कधी मित्रांबरोबर लोणावळ्याला फिरायला गेलेलो असताना तिथे मगनलाल चिक्कीचं मोठं दुकान पाहिलं. आवडणाऱ्या चिक्कीची पॅकेट्स खरेदी केली आणि ती खाताना पुन्हा बालपण आठवलं.
October 17, 2021
रविवार सकाळ असूनही काळ्यांच्या स्वयंपाक घरात बरीच गडबड चालू होती. डायनींग टेबलावर डिझायनर प्लेट्स, मोतीचुर लाडूंचा बॉक्स, मलई बर्फी आणि कट्यावर पोह्याची तयारी. एकीकडे गॅसवर दूधही गरम होत होत.
April 18, 2022
पुस्तके असतात सोबती-एकाकी असताना ! अबोलपणे खुणावत असतात-मी आहे. केव्हढा धीर येतो मग. घरातल्या पुस्तकांनी ओथंबून चाललेल्या कपाटांकडे अभिमानाने नजर टाकता येते खरी पण त्याचवेळी सकाळी टीव्ही वर पाहिलेली दिवाळी अंकांच्या संचाची जाहिरात खुणावते, मित्रांच्या पुस्तक-प्रकाशनाची आवतणे येत असतात, प्रदर्शनांकडे पावले वळतात आणि काही काळाने कपाटांची “श्रीमंती” अधिक वाढते.
October 15, 2022
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण । धृ. ।।
गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण ! ।॥१॥।
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचें रान ! ।।1२॥।
वहिनीशी गटद्टि होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान ! ।।1३।।
June 13, 2026
“ अरे ,पोलिस आला रे पोलीस, पळा पळा पळा” दामूआण्णानं गल्लीत गोट्या खेळत असलेल्या पोरांना जेच आरोळी दिली तशी पोरं चिंगाट ज्याच्या त्याच्या घरी पळू लागली. खाक्या कपडेवाला सायकलला काठी अडकवून आलेला पोलीस पोरं भिंतीच्या आडून पाहू लागली. रामला या गोष्टीचा खूप नवल लागलं. तो त्याच्या मित्रांबरोबर तिथेच दबा धरून आडोशाला उभा होता. दामू अण्णानं दिलेली आरोळी खूपच घाबरून सोडणारी होती म्हणून पोरं हातातली दप्तरं तशीच पारावर सोडून पळाली!
February 27, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti