नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कंटाळून महेशचे आई वडील मोठ्या मुलीसाठी अमेरिकेला गेले. सहा महिन्यांनी परत आल्यावर महेशसाठी नांदेडसिटीत पाॅश फ्लॅट घेतला. त्याच्यासाठी पुण्यात राहिले. तो बंगलोरला गेल्यावर गांवी गेले. आता शेतीचे काम बघताहेत. आमची भेट झाल्यावर दोघंही आपली खंत बोलून दाखवतात.
November 21, 2021
लोकराज्यचे 1956 पासूनचे अंक मी ग्रंथालयात अनेकवेळा चाळले होते. मात्र त्यापेक्षाही जुने प्रारंभीचे अंक मिळणार म्हणून मी जरा जास्तच आनंदात होतो. मनात विचारांची गर्दी जमली होती. लोकराज्यची मोठी परंपरा नजरेसमोर येत होती. लोकराज्य हे केवळ नियतकालिक नाही तर तो आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे. गेल्या सहा दशकात लोकराज्यने खूप काही अनुभवले आहे.
October 26, 2015
बिथोवन हा एक जगातील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक. त्याच्या संगीत रचनांनी असंख्य रसिकांना अक्षरश: वेड लावले.
बिथोवन ने एकदा एका अंध मुलीला पाहिले. त्याने सहज तिची चौकशी केली, तेव्हा ती जन्मापासूनच अंधळी असल्याचे समजले. थोडक्यात तिच्या जीवनात पहिल्यापासून अंधार होता. कारण ती उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊ शकत नाही वा सूर्यास्तही पाहू शकत नव्हती. पांढरेशुभ्र चांदणे म्हणजे काय असते हे त्या मुलीला माहीत नव्हते किंवा कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य ती पाहू शकत नव्हती. बिथोवनला तिची ही अवस्था पाहून फारच वाईट वाटले परंतु एक संगीतकार म्हणून आपण तिच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. असा विचार त्याच्या मनात घर करून राहिला. या विचाराच्या पूर्ततेसाठी त्याने निसर्गसौंदर्य ओसंडून जाणारे एक काव्य मधुर शब्दात गुंफले व ते अतिशय सुंदर संगीतात स्वरबद्ध केले. 'मूनलाइट सोनाटा' म्हणून हे गाणे सर्व जगभर गाजले व लाखो रसिकांनी ते गाणे ऐकून बिथोवनला अक्षरशः डोक्यावर घेतले. ज्या अंध मुलीसाठी बिथोवनने हे गाणे तयार केले होते. त्या अंध मुलीने ते गाणे ऐकताच तिलाही स्वर्गीय सुखाचा भास झाला. ते पाहून बिथोवन ला साहजिक आपले जीवन कृतार्थ झाल्याची भावना झाली असेल. संगीत आणि सुरांतील सामर्थ्य त्याने सिद्ध करून दाखविले होते.
March 5, 2017
आम्ही फक्त आमची वडिलोपार्जित जमीन गुंठा, गुंठा करुन विकणार आणि चारचाकी घेऊन चार टाळक्यांबरोबर ऐश करणार. वाढदिवसाचे मोठ्ठे फ्लेक्स बोर्ड झळकवणार. जयंतीनिमित्त मिरवणुका काढणार. अनुदान मागणार, मोर्चे काढणार आणि शेवटी आत्महत्या करुन ‘अमर’ होणार.
December 17, 2021
वृद्धापकाळी आईवडिलांचा सांभाळ करणाऱ्या मुलांना व्यवसायानिमित्त त्यांच्या पासून दूर राहण्याची गरज पडते. वृद्ध आईवडिलांची खरोखरीच मुलांनी काळजी घेतली तर “वृद्धाश्रम” चालवण्याची गरजच भासणार नाही. पण अशी मुले किती? स्वतःची मुले घरापासून दूर राहत असली की आईवडील त्यांची काळजी करत असतात, “काय करत असेल माझे मूल? अनोळखी गावी कुठे राहत असेल?” अशी चिंता आईवडील करतच असतात. परंतु मुले स्वतःच्या आईवडिलांची काळजी करतात का? संत पुनित महाराजांनी तर असे म्हटले आहे की, “बाकी सगळे विसरा, पण आईवडिलांना विसरू नका”.
November 30, 2016
“शाळेचा शोध कुणी लावला?” हा प्रश्न माझ्या सहावीत जाणार्या बंड्याला सिनीयर केजीत गेल्यापासून भेडसावतो आहे. खेळणी, कार्टुन आणि छोट्या भीमच्या जगात सुखी असता असता इवल्याशा लहान जीवाच्या मागे हा शाळा नावाचा प्रकार कशासाठी असतो हा त्याचा रास्त प्रश्न आहे.
December 2, 2018
पुण्याच्या प्रभात चित्रपट गृहात (आताचे किबे थिएटर) मी पत्नीसह “उंबरठा ” पाहायला गेलो होतो ,प्रामुख्याने स्मिता पाटीलसाठी ! जब्बारचा चित्रपट, संगीत हृदयनाथांचे आणि एका स्त्रीवादी कथानकाचा वृत्तपत्रांनी गाजावाजा केला म्हणून! तिकिटांच्या रांगेत असताना आधीच्या शोमधील “सुन्या सुन्या मैफिलीत ” कानांवर पडत होते. इतक्या सुंदर गाण्याबाबत वर्तमानपत्रात काहीसा विरोधी सूर कां अशा विचारात मी पडलो.
June 25, 2022
नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की "दृष्य " सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच व तसेच म्हणून केव्हांच दिसले नाही. दिसू शकणार नव्हते. रंग संगतीची सतत उधळण होत असे. विविधते मधला तो आनंद टिपला जाई. ज्यांत केव्हांच नव्हती स्थिरता. तोच तोपणा. अस म्हणतात की "आनंद " हेच फक्त ईश्वरी सत्य आहे. आनंद म्हणजेच ईश्वरी दर्शन. आनंद हा भावनेचा सर्वात उच्य असा अविष्कार असतो. त्यांत इतर भावने प्रमाणे कोणताही विरोधाभास नसतो. आनंद हा चेतना स्वरुपांत व्यक्त होतो. कोणत्याही सभोवतालच्या दृष्य अदृष्य वस्तूमधून जाणीव देणाऱ्या, मन उल्हासीत करणाऱ्या चेतनेमध्ये आनंद असतो. कोलीडोस्कोप मधून क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या परंतु प्रत्येक प्रक्षेपित दृष्यामध्ये आनंद समावलेला आहे. बदलते स्वरुप ही चिंतेची बाब वाटते. कारण ज्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित होते. आनंदाचा ठेवा हाती लागतो. ज्याच्यात आनंद अर्थात ईश्वरी रुप बघीतले जाते. तो ढगांच्या हालचालीप्रमाणे स्वरुप बदलत जातो. मग स्थिरता समोर नसेल तर एकग्रता कशी होणार. ह्यातच त्याला समजले पाहीजे. कारण "आनंद " याचे स्वरुप लहरी, लाटा, छटा ह्यानी अनुभवण्याचा, जाणण्याचा प्रकार आहे. ज्यांत बदलणारी संकल्पना आहे. परमेश्वरला जेव्हां निर्गुण रुपांत समजले जाते. त्याच वेळी कोणतेही रुप, कोणताही आकार, कोणते ही मोजमाप, कोणतेही वर्णन त्याला लागु पडत नाही. ज्या ठीकाणी असा प्रयत्न होतो तो निर्णय केलेला विचार असतो. असत्यात तो जाऊन बसतो. म्हणूनच असे मान्य झालेले आहे की परमेश्वर अनुभव येणे, जाणीव होणे हे शक्य आहे. परंतु प्रत्यक्ष बघणे कदापीही, केव्हांही सत्य असून शकत नाही. कारण तो फक्त आनंदमय आहे. सतत बदलणाऱ्या छटांत, गुणधर्मांत, एक उर्जा शक्तीच्या रुपांत
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 8, 2017
तुमचे नाम संकीर्तन ।
हेचि माझे संध्या-स्नान ।।
तुमच्या पायाचे वंदन ।
हेचि माझे अनुष्ठान ।।
तुमच्या पायाचा साक्षेप ।
हा चि माझा काळ क्षेम ।।
तुमच्या प्रेमे आली निद्रा ।
हीच माझी ध्यान-मुद्रा ।।
एका जनार्दनी सार ।
ब्रह्म रुप हा संसार ।।
June 11, 2026
मी घरी आलो तेंव्हा खूप उशीर झाला होता. आईला काळजी वाटत होती. आप्पांना (माझ्या व़़डलांना)ही काळजी वाटत असावी. मी आईला सांगून गेलो होतो असं म्हणट्ल्यावर त्यांचं समाधान झालं.
June 4, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti