(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मती आखूड आखूड (सुमंत उवाच – ४२)

    सुमंत जयंत परचुरे. 

    एखाद्याच गोष्टीचा सतत विचार केला की बुद्धी म्हणजेच विचार कोंडतात, तिथेच घुटमळत रहातात.

      October 3, 2021


  • प्राणीमित्र

    मैत्री फक्त माणसा-माणसांमध्येच असते असे नाही तर मनुष्य आणि प्राणी यांचीही मैत्री असू शकते. ही मैत्री इतकी जीवापाड होऊ शकते प्रसंगी तो प्राणी किंवा तो माणूस आपल्या मैत्रीसाठी काय करतील याचा नेम नसतो. एका अरबाला घोडेस्वारीचे अतिशय वेड होते. मात्र तो खूपच गरीब ०८००० घोडा विकत घेण्याची त्याच इच्छा तशीच राहिली होती. शेवटी १-१ जमा करून त्याला अखेर मनासारखा घोडा मिळाला. त्याच्यावर तो अगदी मित्रासारखे प्रेम करू लागला. त्याचा रोज खरारा करी, चांगले चुंगले खायला देई आणि मग रपेट मारून येई. घोड्यालाही तो अरब म्हणजे मालक थोडा जरी दूर राहिला तरी करमत नसे. काही दिवसांनी त्या अरबाची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची झाली. घोड्याला पहिल्यासारखे आपण चांगले खायला देऊ शकत नाही याची खंत त्याला टोचत होती. तशातच तो अरब घोड्यावर बसून एकदा बाजारात गेला असता तेथील एका सौदागराला त्याचा घोडा आवडला. त्यामुळे त्याने घोड्याची किंमत विचारली. अरबाने प्रारंभी घोडा विकणार नाही असे सांगितले. त्यावेळी त्या सौदागराने तू मागशील ती किंमत देईन असे त्याला सांगितले. अरबाला वाटले नाही तरी आपण या घोड्यास चांगला दाणापाणी घालत नाही. त्या बिचार्‍या घोड्याला या सौदागराकडे चांगले खायला तरी मिळेल. घोड्यावरील मैत्रीपोटीच त्याने त्याला विकण्याचा निर्णय घेतला होता. अखेर सौदा झाला. घोड्याची किंमत म्हणून त्याने मागितलेल्या मोहरा सौदागराने अरबाला दिल्या. निरोप घेण्यासाठी म्हणून अरब मोहरांची थैली घेऊन आपल्या घोड्याजवळ आला. पाहतो तो घोड्याच्या डोळ्यांतून असू ओघळत होते. ते असू पाहून अरबाला खूप वाईट वाटले. त्याचक्षणी तो त्या सौदागराकडे परत गेला व मोहरांची थैली त्याला परत करून त्याने सौदा रद्द केला. माझा जीव गेला तरी चालेल पण हा घोडा मी विकणार नाही, असा निर्धार करून तो घोड्याजवळ परत आला. त्याला पाहताच घोडाही आनंदाने फुरफुरला. दृढ मैत्रीमुळे ते पुन्हा एकत्र आले होते. त्या आनंदातच अरबाने घोड्यावर मांड ठोकली व तो निघून गेला.

      March 6, 2017


  • एक परीस स्पर्श ( भाग – ५२)

    भविष्य कोणालाही बदलता येत नाही. त्याने ते बदलण्यासाठी लाख भर रुपये खर्च केले तांत्रिक आणि मांत्रिकाकडे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्या राहत्या जागेत दोष होता. त्यांनी ती जागा वेळीच सोडायला हवी होती. पण माणसाचा मोह त्याच्या भावभावना आडव्या येतात. त्यात त्याच्या कुटूंबात कोणीही देवाधर्माचे काहीही करत नव्हते. फक्त संकट आले म्हणून त्यांना देवाची आठवण येत होती. त्याच्याकडून कधीही कोणताही दानधर्म घडलेला नव्हता. त्यात त्याच्या कुटुंबात आलेल्या सुना त्याही नास्तिक होत्या.

      August 30, 2022


  • मीना व्हर्सेस प्रभात !!

    १९७५ साल खऱ्या अर्थाने गाजवलं दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी ! त्याकाळी “कोटी ” कॅटॅगरी नव्हती. सोलापूरच्या मीना टॉकीज ला ” शोले ” आणि रस्ता ओलांडून शंभर फुटांवर प्रभात मध्ये ” जय संतोषी माँ “. दोघांचा प्रेक्षकवर्ग वेगळा पण सोलापूर मुळातच चित्रपट प्रेमी शहर असल्याने माझ्या सारख्या भुसावळहून गेलेल्या पांढरा पडदा प्रेमीसाठी ती पर्वणी होती.

      May 30, 2021


  • श्रावणबाळ

    श्रावण नदीवर आला. त्याने लोटा धुतला आणि तो पाण्यात बुडविला. लोट्यात पाणी भरताना त्याचा आवाज झाला. दशरथ राजाने तो आवाज ऐकला. त्याला वाटले, हत्तीच पाणी पिऊ लागला आहे. आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि “आई ग!” अशी आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. घात झाला असे वाटून तो घाईघाईने नदीवर आला. श्रावणाच्या बरगडीत बाण घुसल्याचे त्याला दिसले. रक्त भळाभळा वहात होते. धावत जाऊन त्याने श्रावणाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.

      November 25, 2025


  • ती पाहताच बाला

    लग्नाची बेडी’ या नाटकातील पद्मा चव्हाण यांची ‘रश्मी’ ज्यांनी पाहिली ते खरंच भाग्यवान!! ‘ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला..’ या काव्यपंक्तीनुसार त्यांच्या प्रवेशाला प्रेक्षकांचा ‘कलिजा’ शब्दशः खलास होत असे.. म्हणूनच आचार्य अत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राची ‘मर्लीन मन्रो’ व ‘सौंदर्याचा ॲ‍टमबाॅम्ब’ ही उपाधी दिली होती..

      July 10, 2022


  • स्वर प्रवासातील पुढचे पाऊल

    या दोन-तीन महिन्यानंतर मी गाण्याचे काम पुन्हा सुरू केले. विवेक देशपांडे यांच्या ‘निष्पाप’ या मराठी चित्रपटासाठी विश्वास पाटणकर यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये मृदुला दाढे-जोशी बरोबर एक द्वंद्वगीत मी रेकॉर्ड केले. याचवेळी विश्वास पाटणकर यांचा मुलगा मिथिलेश पाटणकर याने कवी ग्रेस यांच्या गाण्याला त्याने बांधलेली अतिशय सुंदर चाल ऐकवली. मिथिलेश त्यावेळी शाळेत होता. सातवी-आठवीत असेल. पण उत्तम संगीतकाराचे गुण वडिलांकडून जन्मजातच त्याने घेतले होते

      July 15, 2022


  • छोटा सरकसवाला

    सरकसवाला,
    मी मोज दावितो सकला ! ।।धृ.।।
    “पदके' मिळवियली गाठीची,
    माझी कामे नवलाईची !
    साधतील ती इतरा कैची ?
    सरकसवाला,
    मी मौज दावितो सकला ! ।।१।।

    घेतो गादीवर कोलांटी,
    दादाच्या मग खांद्यावरती,
    चढुनि उडी मी घेतो उलटी
    सरकसवाला,
    मी मोज दावितो सकला ।।२।।

    बाजा तोंडाचा बहु वाजे,
    घोडा काठीचा हा साजे,
    घाली रंगण त्या आवाजे,
    सरकसवाला,
    मी मौजे दावितो सकला ! ।।३।।

    छातीवर मोटार चढे ही, .
    सरकस बघुनी बोले आई !
    की मी डोक्यावर घर घेई' !
    सरकसवाला,
    मी मौज दावितो सकला ! ।।४।।

    हत्ती हा काळ्या मातीचा,
    बंगाली वाघहि रबराचा,
    साखरि छावा हा सिंहाचा !
    सरकसवाला,
    मी मौज दावितो सकला ! ।।५।।

    ऐसे प्राणी जमवुनि नाना,
    बसवुनि एका ताटी त्यांना
    खातो मीही त्यासह खाना !
    सरकसवाला,
    मी मौज दावितो सकला |! ।।६।।

      June 18, 2026


  • मी N.C.C. मध्ये जातो

    मी नवव्या इयत्तेत गेलो. या वर्षी आम्हाला NCC कॅम्पला जावं लागणार होतं. बरं कॅम्प ठरला तो ही दिवाळीच्या आधी देवळाली नाशिकला. NCC कॅम्प म्हणजे काय असतं काहीच कल्पना नव्हती.

      January 11, 2022


  • शाळेचा रस्ता

    शाळेस रोज जाताना ।
    मज विघ्ने येती नाना !

    किती पक्षी गाती गाणी
    झाडावर म्हणती बसुनी

    “ये मुला, खेळु या मिळुनी !”
    परि उशीर टाळायाला ।
    मी निघे तडक शाळेला ।।१।।

    टोळ कसे गवतावरती
    आनंदे टुणटुण उडती !
    खेळाया बोलाविती
    परि उशीर टाळायाला ।
    मी निघे तडक शाळेला ।।२।।

    गारुडी वाजवुनि पुंगी
    बोलावी झणी मजलागी !
    बहु जमती जन त्या जागी
    परि उशीर टाळायाला ।
    मी निघे तडक शाळेला ।1३॥।

    बाजूस खेळणीवाला
    वाखाणुनि अपुल्या माला
    वेधितसे नकळत बाळां
    परि उशीर टाळायाला ।
    मी निघे तडक शाळेला ।।४।।

    वाटेतिल झाडें वेली,
    हालविती पानें अपुली,
    बोलाविती मजला जवळी !
    परि उशीर टाळायाला ।
    मी निघे तडक शाळेला ।।५।।

      June 24, 2026