(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जिंगल्स आणि बरेच काही

    गाणे हा एक योग असतो, हे विलासचे म्हणणे मला पटले. कारण अजून दोन उत्तम योग यापुढील काळात आले. मुंबई विभागाच्या संस्कृत विभागासाठी पं. वेलणकर यांनी लिहिलेले आणि संगीतकार प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेले माझ्या आयुष्यातील पहिले संस्कृत गीत गायलो. रेकॉर्डिंगच्या वेळी पं. वेलणकर यांना भेटलो. पत्रावर पत्ता लिहिताना आपण जो पिनकोड नंबर लिहितो, त्याचे जनक पं. वेलणकर आहेत, असे प्रभाकर पंडितांनी सांगितल्यावर मी अवाकूच झालो. माझ्या गाण्यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या किती नामवंत व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली, याची यादी केली तर एक वेगळेच पुस्तक लिहावे लागेल. संगीताच्या आराधनेमुळे झालेल्या अगणित फायद्यांपैकी एकही फायदा गाणे शिकायला सुरवात करताना मला माहीत नव्हता.

    आर्टिग ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. उजगरे यांच्यामुळे अजून एक योग आला. त्यांनी काही जाहिरातींसाठी गाण्याची ऑफर दिली. जाहिरातींच्या मागे जे गाणे असते त्यांना 'जिंगल्स' असे म्हणतात. नामवंत गायिका कविता कृष्णमूर्तीला अनेकदा स्टुडिओत मी जिंगल्स गाताना पाहिले होते. या क्षेत्रातील ती आघाडीची गायिका होती. एक जिंगल ही जास्तीत जास्त वीस ते तीस सेकंदाची असते. पण स्टुडिओत त्याचे काम कित्येक तास चालते. कारण इतक्या कमी वेळात परिणाम साधायचा असतो. जाहिरातीचे व्यावसायिक रेकॉर्डिंग असल्यामुळे जिंगल्सचे मानधन बरेच जास्त असते. आर्टिग अॅडव्हर्टायझिंगने स्टारडस्ट इमर्जन्सी बॅटरीजूच्या जाहिरातीचे काम घेतले होते. या बॅटरीच्या वेगवेगळ्या नऊ जिंगल्स माझ्या आवाजात रेकॉर्ड झाल्या. या सर्व जाहिराती भारताबाहेर दुबई आणि इतर आखाती देशात वाजणार होत्या. त्यामुळे आपल्या टीव्ही किंवा रेडिओवर ऐकू येणार नव्हत्या. पण या जिंगल्समुळे जाहिरातीच्या क्षेत्रात माझा शिरकाव झाला. या जिंगल्सचे रेकॉर्डिंग ऐकून काही संगीतकारांनी मला काम दिले.

    यानंतर गवाणकर ट्रस्टसाठी साईबाबांची दोन भजने मी गायलो. सुरेश वाडकर, अनुपमा देशपांडे आणि त्यागराज खाडिलकर असे मान्यवर गायकही या कॅसेटमध्ये गायले होते. विशेष म्हणजे या कॅसेटचे प्रकाशन शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिरात झाले आणि शिर्डीत या गाण्यांचा एक कार्यक्रमही झाला. त्यामुळे शिर्डीला जाण्याचा योग आला.

    एके दिवशी सकाळी माझी काकू दीपा जोशीचा फोन आला. तिने सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. नागराज राव यांना तातडीने भेटायला सांगितले. रावसरांनी Geeta's witness या नावाचे छोटे पुस्तक लिहिले होते. संकल्पना अशी होती की, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जेव्हा गीता सांगितली, तेव्हा त्याचा एकच साक्षीदार होता, तो म्हणजे अर्जुनाच्या रथावरील ध्वजाशेजारी बसलेला मारुती. भक्त मारुतीरायांना विनंती करतो की, गीता समजायला जड जाते. त्याचा अर्थ नीट उमगत नाही. तू गीतेचा एकमेव साक्षीदार आहेस. तरी ही गीता सोप्या शब्दात मला समजावून सांगा. सुप्रसिद्ध लेखक श्री. विद्याधर गोखले यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले. 'गीतेचा तो साक्षी वदला'ची एकूण २६ गाणी झाली. आता या गाण्यांचे रेकॉर्डिंग करून त्याची कॅसेट करण्याचा प्रोजेक्ट होता. यासाठी माझ्याबरोबर तरुण संगीतकार कौशल इनामदार याला बोलावण्यात आले होते. रावसरांनी ही संकल्पना आम्हा दोघांना सविस्तरपणे समजावून दिली. रावसरांची हातोटीच अशी होती की, नकळत त्यांनी आम्हाला या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतले. या पुढील दीड महिन्याचा काळ रावसरांच्या सान्निध्यात आम्ही चक्क गीता शिकलो. कौशलने सर्व गाण्यांना अतिशय छान चाली लावल्या. आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओत पोहोचलो. गाण्यांचे वाद्यवृंद संचालन कमलेश भडकमकरने केले. सुरुवातीची दोन गाणी गायक अजित परब याने, तर मारुतीवाणीची चोवीस गाणी माझ्या आवाजात रेकॉर्ड झाली. 'गीतेचा तो साक्षी वदला' या कॅसेटचा प्रकाशन समारंभ ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये संपन्न झाला. कॅसेटबरोबर त्यातील गाण्यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमात कॅसेटमधील काही गीते आम्ही सादर केली. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि रसिकांचा भरपूर प्रतिसादही मिळाला. या आगळ्या-वेगळ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी केल्याबद्दल मी दीपा जोशी आणि नागराज राव या दोघांचाही कायम ऋणी राहीन. यानंतर कौशलने आणि मी अनेक कार्यक्रम आणि रेकॉर्डिंग्ज एकमेकांबरोबर केली.

    यानंतर जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे खेड-मंचर येथील अधिवेशनात माझा गझलचा कार्यक्रम झाला. इंद्रधनूतर्फे अनिल मोहिले यांनी वाद्यवृंद संचालन केलेल्या विविध संगीतकारांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात संगीतकार कल्याणजी-आनंदजी, श्रीनिवास खळे, यशवंत देव, माझे गुरू श्रीकांत ठाकरे, भूपेन हजारिका अशा अनेक मान्यवर संगीतकारांसमोर त्यांनीच स्वरबद्ध केलेली काही गाणी मी सादर केली. या कार्यक्रमात माझे गाणे ऐकून संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात मला गाण्यासाठी बोलावले. या कार्यक्रमात संगीतकार अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेले आगामी मराठी चित्रपटातील गाणेही मी सादर केले.

    टेलिव्हिजनवरही माझे कार्यक्रम सुरू होतेच. दूरदर्शनच्या निर्मात्या किरणताई चित्रे यांनी माझ्यावर खूपच विश्वास टाकला. विलास डफळापूरकरच्या 'शब्दांच्या पलीकडले'मध्ये मी गायलो. त्यानंतर काही महिन्यातच संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या शब्दांच्या पलिकडले या कार्यक्रमासाठी मी गीतकार सुधीर मोघे यांचे गीत गायले. या गाण्याने त्या काळात मला बरीच लोकप्रियता दिली. 'संगीतावली' या नॅशलन नेटवर्कवरील दीपावलीच्या खास कार्यक्रमासाठी लोकप्रिय गायक हरीहरन यांच्याबरोबर गाण्याची संधी मला मिळाली. गीतकार शंकर वैद्य यांचे गाणे मी गायलो. यानंतर निर्माते शरण बिराजदार यांच्या 'सूरसंगम' या कार्यक्रमात मी काही गाणी सादर केली.

    १९९८ हे वर्ष माझ्यासाठी एक नवे क्षितीज घेऊन अवतरले. बऱ्याच वेळा आपल्याला कल्पनाही न देता नशीब आपल्याला एक सुखद धक्का देते. डॉ. विजय बेडेकर हे ठाण्यातील एक प्रथितयश डॉक्टर होतेच, पण त्याचबरोबर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड या बँकेचे अध्यक्षही होते. बेडेकर परिवाराशी माझ्या वडिलांपासून आमचे घरगुती संबंध होते. या बँकेशी आमच्या कंपनीचे व्यवहार होते. त्यामुळे डॉक्टरांची भेट वरचेवर होऊ लागली. डॉक्टरांचा कामाचा झपाटा, त्यांची सामाजिक कामांबद्दलची तळमळ याचा विलक्षण प्रभाव माझ्यावर पडला. एक दिवस त्यांनी घरी बोलावले.

    “अनिरुद्ध आता बँकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तुला बँकेच्या डायरेक्टर पदासाठी निवडणूक लढवायची आहे."

    डॉक्टरांच्या शब्दांवर माझा विश्वासच बसेना. एक ग्राहक आणि भागधारक म्हणून व्यक्तिगत आणि कंपनीचे बँकेबरोबर व्यवहार करणारा मी कधी या बँकेचा डायरेक्टर होईन, असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. केवळ डॉक्टरांच्या प्रेरणेने हे नवीन आव्हान पेलायला मी तयार झालो. मला निवडणूक लढवावी लागली नाही. आमचे पॅनल बिनविरोध निवडून आले. मी ठाणे भारत सहकारी बँक लि. या सहकारी बँकेचा डायरेक्टर झालो. आमचे अध्यक्ष श्री. मा.य. गोखले, तर उपाध्यक्ष श्री.. उत्तम जोशी होते. त्यांच्याबरोबरच इतर डायरेक्टर्स श्री. माधव नातू, श्री. चंद्रशेखर परांजपे, श्री. महाजन, श्री. मिलींद गोखले, डॉ. रणदिवे, श्री. वसावडा अशी सर्वच ठाणे शहरातील नामवंत मंडळी होती. यांच्यापेक्षा सर्वार्थाने मी लहान होतो. त्यावेळी मी फक्त ३६ वर्षांचा होतो. इतक्या कमी वयात इतकी मोठी मानाची पोझिशन मला मिळाली होती. या सर्वांकडूनच त्या काळात मला भरपूर शिकायला मिळाले. बँकेच्या अनेक कार्यक्रमात गायक म्हणूनही मी सहभाग घेतला. बँकेमुळेच मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या भेटीचा योग आला. फक्त या वाढीव जबाबदारीमुळे माझे कामाचे वेळापत्रक जास्तच व्यस्त बनले.

    त्या वर्षी राजभवनावर आणखी एक कार्यक्रम मी केला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त 'भजन प्रभात' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्याबरोबर ऑस्ट्रेलिया, केनिया, झांबिया आणि बांग्लादेश यांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते. सरस्वती विद्या मंदिराच्या क्रीडासंकुलातील लोकमान्य टिळक सभागृहाचे उद्घाटन लोकमान्यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमती कर्वे यांनी लिहिलेल्या लोकमान्यांवरील एका खास गाण्याचे गायन मी केले.

    -अनिरुद्ध जोशी

      July 20, 2022


  • भय (अलक)

    दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. माझ्यासाठी दार उघडून, कांही तरी पुटपुटत, मोकळे केस सोडलेली, आई देवघराकड़े जात होती.

      February 5, 2026


  • आणखी एक गुड्डी

    माझ्या ३५ वर्ष्याच्या प्रदीर्घ पोलीस सेवेत असंख्य बक्षिसे व प्रशस्ती पत्रे मिळाली पण नताशाच्या वडिलांनी कृतज्ञतेचे गाळलेले दोन अश्रुंचे मोल त्या सर्वांहून माझ्यासाठी फार मोठे आहे.

      September 1, 2014


  • तांबोपाटा जंगलातला निवास – पेरू

    दक्षिण अमेरिकेचा विचार मनात आला की ऍमेझोनची आठवण हमखास येते. नुसत ऍमेझोन म्हटल तरी तिचा सागरासारखा भासणारा विस्तार,त्यातले विविध प्रकारचे जलचर, प्रचंड उंचीची झाडे, दाट जंगल,तिच्या काठावरचे अजस्त्र कीटक, आणि त्यात उगवणा-या कमळांपेक्षाही जवळपास तीन फूट व्यास असणारी त्यांची पाने हे सर्व आठवायला लागते.त्यामुळे दक्षिण अमेरिकेला जायचे ठरवल्याबरोबर ऍमेझोन बघण्याचे आकर्षण होते.

      December 14, 2019


  • बाबासाहेब उपाख्य बमो….

    मी पाहताक्षणी त्यांना ओळखले- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ! पुढे आलेल्या व्यक्तीजवळ एक पिशवी होती आणि तिने अजीजीने सर्वांना विनंती करायला सुरुवात केली – ” अहो, यांना ओळखलं कां ? हे बाबासाहेब पुरंदरे ! पुण्याला निघाले आहेत. कृपया त्यांना बसायला जागा देता कां ?”

      November 25, 2021


  • ज्ञानेश्वरांचें साहित्यिक रूप : एक विविधांगी चिंतन : भाग – १

    ज्ञानेश्वर मोठे संत होते, तसेच ते मोठे दार्शनिक (तत्वज्ञानी) सुद्धा होते. आणि ( त्यांच्या रचना वाचून असें जाणवतें की) ते विविधरंगी साहित्यिकही होते. ज्ञानेश्वरांचा विचार करायचा तर त्यांचें तत्वज्ञान, अध्यात्म वगैरे पुढें येणें अपरिहार्य आहे . मात्र , या क्षेत्रातील प्रस्तुत माझें ज्ञान ‘शून्य के बराबर’ आहे. त्यामुळे अध्यात्म-तत्वज्ञान वगैरे विषयांवर सखोल चर्चा करायची धृष्टता मी करूं शकत नाहीं, कारण ( हिंदीत म्हणतात, त्याप्रमाणें ), ती ‘अनधिकार चेष्टा’ (प्रयत्न) होईल. आपली चर्चा मुख्यत: साहित्यिक अंगानें जाणार आहे . तिच्यात, अध्यात्म-तत्वज्ञान यांचें जें कांहीं विवरण येईल, त्यासाठी मी (अर्थातच) ज्ञानवंतांचा आधार घेललेला आहे. त्यात, जें कांहीं ज्ञान असेल, त्याचें ‘क्रेडिट्’ त्या-त्या ( नेम्ड् ऑर् अन्-नेम्ड् ) ज्ञानवंतांचें ; आणि रेफरन्स् च्या, अर्थाच्या, व इंटरप्रिटेएशनच्या ज्या कांहीं चुका असतील , त्यांची जबाबदारी माझी, हें सांगायला नकोच.

      February 23, 2018


  • श्रीमान बाळासाहेब खुशालराव – ऐसपैस

    बाळासाहेब खुशालराव ऐसपैस हा गृहस्थ गावांत सर्वांना माहीत आहे. हे गृहस्थ माहीत असण्यासारखेच आहेत. गावांत ज्यांना बाळासाहेब माहीत नाहीत, त्यांना छत्रपति शिवाजीमहाराज कोण हेही माहीत नाही असे खुशाल समजावे. या गावातल्या लोकांना एक वेळ गांधी माहीत नसले तरी चालेल.

      March 25, 2026


  • इंद्रधनू नभातले…. रंग माझ्या मनातले…

    संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात नुकताच पावसाचा शिडकावा पडून गेल्यावर आल्हाददायक गारवा निर्माण झालाच होता, स्वच्छ सुंदर वातावरणात परत उन्हाची कोवळी किरणे पसरू लागली आणि काय आश्चर्य! छान इंद्रधनुष्य आकाशात उमटले, तसे कावेरीबाईं आनंदीत झाल्या अनेक वर्षांनी आज असा योग आला होता. आकाशातील इंद्रधनू पाहाणे त्यांना फार आवडत असे. तसेच आजही त्या मोहीत झाल्या आणि खिडकीतून बाहेर निरखून बघू लागल्या. हल्ली त्यांच्याकडे वेळचं वेळ असे. उमा त्यांची सून अतिशय लाघवी, त्यांना काही करु देत नसे, त्यामुळेच त्या निवांत असतं.

    इंद्रधनुष्याचा लालीमा आकाशात दूर-दूर पसरला होता. हिरव्या वनराईत त्याचे रुप एखाद्या मनमोहक शोडषे सारखं दिसत होतं. पानांवरचे पाण्याचे चकाकणारे थेंब सर्व आसमंत परावर्तीत करीत होते, चाफ्याचा, गुलाबाचा ओला सुगंध हवेवर दरवळत होता. पक्षांच्या ओल्या पंखांची फडफड, गुंजारवही मधूनच कान तृप्त करीत होता. या वातावरणातला रंग कुठे आणि कसा साठवुन ठेवावा असे त्यांना वाटले, मुळची गाण्याची आवड त्यांना होती पण बर्‍याच दिवसांत सराव नव्हता. आज ह्या मनोहर दृष्याचा आनंद घेत ते बघत..बघत..... " ता..ना..पि..हि..नि.. पां.. जां.. " असे शब्द आपसुकच त्यांच्या ओठावर आले ते म्हणताना त्या विचारांमध्ये गढल्या........

    की जशी ही निसर्गात रंगांची मुक्तपणे केलेली ऊधळण माणसाच्या आयुष्यातही असतेच की......विधात्याने या रंगांची उधळण मानवी आयुष्यात किती समर्पक केली आहे...

    बालपणीचा गोंडस तांबडा व नारंगी यांचा मिलाफ एकत्र होऊन गुलाबी रंग सुरुवातीपासून मुलं तारुण्यात असे पर्यंत असतोच की, लहानपणीचे दिवस अनेक गोष्टींसाठी आई वडीलांकडे लाडेलाडे हट्ट पुरवून घ्यायचे, छोट्या छोट्या सवंगड्यांसोबत लुटूपुटूचा अबोला धरायचे, गुलाबी गोबर्या गालाचे दिवस आईवडिलांच्या पंखाखाली चिऊ-काऊ करत भुर्रकन उडून जातात.

    नुकतीच तारुण्याची चाहुल लागते. कोवळ्या वयात डोळ्यात गुलाबी स्वप्न असतात. आयुष्यात काहीतरी ध्येय असते. शिक्षणासाठी कष्ट करायचे असतात, याच वयात मैत्र जीवांचे मिळतात, आयुष्याची दिशा ठरवायची असते, पुढील आयुष्याची झोकून देऊन पायाऊभारणी करायची असते. गडद गुलाबी रंग देहबोलीतूनही दिसत असतोच. हळूहळू व्यक्तीमत्व आकार घेते.

    तडफदार ऐन तारुण्यात अनेक गोष्टी करायच्या असतात. अनेक अपेक्षांची पूर्ती करण्यासाठीचा योग्य काळ.....खरेतर आयुष्यातील ऊन्हाळे-पावसाळे बघायचा काळ, आयुष्यातील कोवळा गुलाबी रंग ओसरून हिरवा रंग पांघरण्याचा काळ हा ऐन तारुण्याचा. अनेक जबाबदार्या समर्थपणे पेलण्याचा काळ आयुष्यात येणारे बरे-वाईट अनुभव याच वयात येतात. तारुण्याची ऊर्मी असते, स्वभाव धाडसी बनतो, जगाचे अनुभव मिळतात, मित्र-नातेवाईक, व्यवहारातील फायदे-तोटे, चांगले-वाईट अनुभव... हा काळ बराच मोठा असतो व अनेक अनुभवही देतो, आयुष्याची ही शिदोरीच पुढे शेवटपर्यंत उपयोगी पडते. याच वयात कधीतरी दोनाचे चार हातही होतात, नव्या नवलाईच्या आयुष्यातील नवलाई ही हिरव्या रंगाचे प्रतिक तर वाईट अनुभव हे आयुष्यातील ऊन्हाळे - पिवळ्या रंगाचे प्रतिक. ऊन-पाऊस सोसत दिवस सरत असतात..

    त्यानंतरची येणारी अवस्था म्हणजे ऐन तारुण्य ओसरून मध्यम वय, तारुण्यातील जोश जरा शांत होऊन समजुतदारपणाने मार्ग काढण्याची प्रवृत्ती वाढण्याचा काळ. आयुष्यात डोके थंड ठेवून मार्गक्रमण करण्याचा काळ, निळ्या रंगाची थंड प्रकृती अनुकरण करण्याचा काळ, कारण याच वयात तडतड केली तर हजार दुखणी मागे लागु शकतात, तरुण मुलं, सहकारी, मित्र यांच्याशी वागताना त्यांच्याशी शांतपणे जमवुन घेण्याचा काळ. निळ्याशार जलाशयासारखा सखोल विचार करण्याचा काळ. ज्याप्रमाणे थेंब थेंब साचत अथांग शांत निळा जलाशय बनतो तसेच आपल्या बरोबर समोरच्याची प्रगती साधायचा काळ व आपल्या सभोवताली एक एक करीत आपला मित्रसंग्रह वाढवण्याचा काळ.
    या काळात शांततेनेच मार्ग काढणे अपेक्षित असते...
    हाही काळ तसा बराच मोठा असतो, हळुहळू मुलांना हाताशी घेण्याचा काळ..

    नंतर येणारा वृद्धापकाळ, सर्व गात्र हळुहळू शिथील होण्याचा काळ या अवस्थेत कोणतीही स्वप्न नसतात, कोणत्याही प्रकारच्या ईच्छा जवळजवळ संपलेल्या असतात, ईच्छारहित अवस्था म्हणून पांढरा रंग. निर्मोही अवस्था, आयुष्यातील अनेक रंग उपभोगून "रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा...." हे अनुभवण्याची अवस्था, परमेश्वरी दरबारातील चैतन्य मय अवस्था, आयुष्याचा लेखा-जोखा मांडतानाची शुध्द अवस्था ईथे कोणत्याही रंगाला स्थान नाही, फक्त श्वेत-शुभ्र रंग.

    व शेवटी परत पाण्याशी संबंध म्हणून जांभळा रंग....

    असे इंद्रधनू माणसाच्या आयुष्यातही रंगांची मुक्त उधळण करीत असते. असे माणसाचे आयुष्यही मनमोहक मोरपंखी रंगाचेच असते. माणूस त्यात निर्व्याज र्प्रेम, आनंद, माया, वात्सल्य यांची किनार देऊन जीवन चित्र आणखी मोहक बनवु शकतो....

    कावेरीबाई विचारातून बाहेर आल्या. आज त्यांचा चेहेरा या विचारांनी एकदम खुलला होता. अचानक बघितलेले इंद्रधनू त्यांना कमालीचा आनंद देऊन गेले. मनप्रसन्न अवस्थेत त्यांनी रियाजासाठी तंबोरा काढला....

    -- सौ. शिवानी श्री. वकील

      July 7, 2020


  • संधीचं सोन! – Part 2

    ‘मी शेजारच्याच गल्लीतला ताई हॉल साखरपुड्यासाठी बुक करून आलोय. शंभर माणसांची खानपान व्यवस्थाही करुन आलोय. संध्याकाळी पाच पासून हॉल आपल्याला मिळेल. आपण फक्त जावईबापूंना घेऊन तिथं जायचं, बाकीचं सगळं आमचे बाबूकाका आणि नवी विटी नवा दांडू पक्षाची महिला ब्रिगेड पाहून घेईल.’

    ‘काय सांगता बाळाभाऊ? अहो हा नसता उपद्व्याप सांगितला कोणी तुम्हाला? आम्ही घरगुतीच करणार आहोत सांगितले ना तुम्हाला?’

    ‘हे पहा आई, आता बोलण्यात वेळ नाही घालवायचा. तायडी ताईंचा साखरपुडा दणक्यात करा असं कुमारसाहेब म्हणाले ना? मग दणक्यातच होणार! तुम्ही फक्त त्या पन्नास साठ सीटची बस सांगून ठेवली आहे. सगळ्यांना तयार रहायला सांगा.’ ‘काय? पन्नास मतांची जबाबदारी सांभाळा. मी दुपारी चार वाजता एक पन्नास साठ सीटची बस? ती कशाला? अहो इथं पलीकडच्या गल्लीतच तर आहे मतदान केंद्र, त्याला बस काय करायची?’

      March 17, 2022


  • युगांतर – भाग ९

    सुमंत जयंत परचुरे. 

    रवींद्रची पाण्यातली हालचाल मंद होऊ लागली होती. त्याचा श्वास कमी कमी होत चालला होता. तो वाचवायला आला होता खरा त्या बाळाला, पण पाण्यात उडी मारल्या पासून तो जणू काही स्वप्नातून सत्यात उतरला होता. त्या बाळाला आणि त्या अण्णांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला त्या काळोखात शोधत होता. पण तो सोडून त्या पुष्करणी मधे बाकी कोणाचंही नामोनिशाण नव्हतं. तो आता स्वतःला वाचवायच्या स्थितीतही नव्हता, त्याचा श्वास खूपच मंद होत होता आणि तो जणू आता जलसमाधी मिळणार या स्थितीत त्या पुष्करणी च्या तळाशी त्या काळोख्या रात्री बुडत होता. तळाशी बऱ्याच वेली होत्या, गाळ बसून झालेला चिखल होता. त्याचे डोळे हळूहळू मिटत होते, हात आणि पाय आता सैल झाल्या सारखे स्तब्ध झाले होते.

      October 30, 2021