नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
चमत्कार रहस्य यांची सरमिसळ असले या असलेल्या या संदीप दांडेकर यांच्या कथा आहेत एकूण तेरा कथांचा हा संग्रह अतर्क्य मांडून वाचकांची भयकथा नची भूक भागवतो मात्र या कथा लिहिताना लेखकाने विज्ञान मानसशास्त्र इतिहासाचा अभ्यास केला आहे.
February 27, 2024
बाळू शिंदे, हुसेन आणि मटकर हे त्रिकूट पोलिसांच्या दफ्तरात नोंदलेलं होतं.
तिघेही लहान सहान गुन्ह्यांसाठी तुरुंगवास भोगून आले होते.
तिथेच त्यांची दोस्ती झाली होती.
त्रिकूट आता मोठे दरवडे घालायला मागेपुढे पहात नसे.
मटकर हा खरं तर इलेक्ट्राॅनिक्स इंजिनीअर.
तो आपल्या ज्ञानाचा उपयोग ह्या चोऱ्यांची आंखणी आणि अंमलबजावणी दोन्हीसाठी करत असे.
तिघे बाईकवरून फिरत असत.
July 15, 2022
त्या नंतर काही दिवसांनी माझा आवाज फुटायला लागला. म्हणजे लहानपणी मुलगे स्त्रियांच्या पट्टीत गातात. पण नंतर मुलांची पट्टी बदलते. त्यावेळी असे होते की, कोणत्याही सुरात नीट गाता येत नाही. सगळ्या मुलांना या अवस्थेतून जावे लागते. आपल्याला बहुतेक आता गाणे गाता येणार नाही की काय अशी गोंधळलेली अवस्था निर्माण होते. यावेळी नशिबाने एक अतिशय उत्तम घटना माझ्यासाठी घडवली. सुप्रसिद्ध कविवर्य पी. सावळाराम माझ्या वडिलांचे मित्र होते. अनेकदा ते आमच्या घरी येत असत. एकदा रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचा फोन आला आणि थोड्याच वेळात सुप्रसिद्ध गायक श्री. सुधीर फडके यांना घेऊन ते आमच्या घरी आले. ठाण्यात एका कार्यक्रमासाठी बाबूजी आले होते. घरात एकदम गडबड उडाली. झोपण्याच्या तयारीत असलेले आमचे घर खडबडून जागे झाले. मी तर झोपलोच होतो. आईने मला उठवून ही बातमी दिली. मला अत्यंत आनंद आणि अतिशय दुःख झाले. आनंद यासाठी की, मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ख्यातनाम अशा संगीतकाराला आणि गायकाला आता आपण प्रत्यक्ष भेटणार आणि दुःख यासाठी की, त्यांना आपण चार ओळीदेखील गाऊन दाखविण्याच्या परिस्थितीत नाही. तसाच धावत जाऊन त्यांना नमस्कार केला. पी. सावळाराम दादांनी मला गाणे येत असल्याचे सांगितले आणि बाबूजींनी लगेच एखादे गाणे म्हणायला सांगितले. मी काय गाणार? रडायलाच लागलो. आईने माझा आवाज फुटायला लागल्याचे सांगितले. बाबूजींनी मला जवळ बसवले. ते म्हणाले, “काळजी करू नकोस. माझाही आवाज त्या वयात फुटला होता. आता मी छान गातो की नाही? फक्त या काळातही जमेल त्या सुराच्या पट्टीत ‘सारेगमपधनीसां'चा रियाज सुरू ठेव. तुझा आवाज बदलला आहे. त्यावर ताण देऊ नकोस, पण रियाज मात्र करीत राहा. हळूहळू आवाज एका सुराच्या पट्टीत स्थिर होईल. एक लक्षात ठेव, आत्तापर्यंत केलेला रियाज फुकट जाणार नाही. किंबहुना त्यामुळेच पुन्हा चांगले गाता येऊ लागेल. तेव्हा रियाज सुरू ठेव." माझ्या गोंधळलेल्या अवस्थेतील मनामध्ये त्या महान गायकाने पुन्हा उत्साह भरला. त्यांची साधी राहणी, अत्यंत नम्र बोलणे माझ्या मनावर विलक्षण परिणाम करून गेले.
- अनिरुद्ध जोशी
June 25, 2022
ती गाडीतून खाली उतरली पाठोपाठ दोन मुले आणि एक म्हातारी बाई पण उतरली,ती तिची सासू असणार असा मी अंदाज केला होता , ती सासूच होती. ते सर्वजण जवळ आले तेव्हा ती सून हसली माझ्याकडे बघून, मी पण हसले. पण तिच्या सासूला जेव्हा बघितले तेव्हा लक्षात आले ह्या बाईना कुठेतरी आधी, पूर्वी पाहिले आहे, ती सासूपण हसली ,
ती पण माझ्याकडे बघत होती.
April 18, 2020
” ओ मेरे सनम ——– ” शिवरंजनी मधील ही श्रवणीय रचना कायम लक्षात राहिली आहे ती अनेक कारणांनी ! मोडतोड झालेलं नातं ( गुपित फुटल्यानंतरचं) सांधण्यासाठी वैजयंती सहारा घेते शिवरंजनीचा ! शैलेंद्रचे घायाळ आणि नेमके क्षमायाचना करणारे शब्द ! कधी नव्हे ते शिवरंजनीच्या सुरावटीला सतारीची साथ ( तेथे व्हायोलिन वगैरे अधिक जुळलं असतं कदाचित), वैजयंतीचे नृत्य आणि लताचा स्वर. तिची सुरुवातीची आलापी जीवघेणी आणि येऊ घातलेल्या प्रसंगाचा मूड सेट करणारी.
January 11, 2021
कोणे एके काळी सूर्य आणि पाणी खूप चांगले मित्र होते. पृथ्वीवर सूर्य आणि पाणी गुण्या गोविंदाने रहात होते. पाण्याला भेटायला सूर्य नित्यनेमाने येत होता. परंतु पाणी कधीच सूर्याला भेटायला जात नव्हते. एके दिवशी गप्पांच्या ओघात सूर्याने पाण्याला विचारले, ‘मित्रा मी नेहमी तुझ्याकडे येतो.
November 15, 2025
एक उत्साही, विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. हरिश्चंद्र कोळी, एक कवी म्हणूनही ज्ञात आहेत. अध्यापनाच्या कार्यात कवितांना चाली लावून शिकविणे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करून त्यांना कविता लिहिण्यास प्रवृत्त करणे, शाळेची उत्कृष्ट हस्तलिखिते तयार करणे, अनेक नाटिका बसवून त्या मुलींकडून करवून घेणे वेगैरे कार्यामधून त्यांनी आपल्या प्रतिभा शक्तीचा अवकाश वाढवला आहे. ‘काव्यसुमनांजली’ या कवितासंग्रहाच्या माध्यमातून ते आता सर्व वाचकांपर्यंत पोहचत आहेत. त्यांच्या या सेवेला मन:पूर्वक धन्यवाद!
हरिश्चंद्र कोळी हे मुळात शिक्षक असल्यामुळे शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, शाळा, सुट्टी, बालमन, सर्वधर्म समभाव, स्वच्छ भारत, साक्षरता, शिक्षकदिनासह, निरोपसमारंभ गीता पर्यंतचे सर्व विषय त्यांच्या कवितांमधून आलेले आहेत. सावित्रीबाई फुले यांनी रुजवलेले शिक्षण प्रमाणभूत मानल्यामुळे सामाजिक मूल्ये त्यांच्या कवितांमधून आलेली दिसतात. म्हणूनच, ‘शाळा माझी माऊली’ या कवितेत ते म्हणतात -
‘शाळा आपुली माय माऊली
तिच देते तुम्हां साऊली
हसा, खेळा, पडा, धडपडा
राखा देशाचा मान
वेचा कण-कण ज्ञान’
हसत खेळत शिक्षण घेण्याचे मूल्य रुजतांनाच देशाचा मान राखण्याचा संस्कार ही ते मुलांवर करतात. साने गुरुजींचा आदर्श जपण्याचा ते प्रयत्न करतांना दिसतात.
स्वतंत्र भारतात आपण स्वतंत्र आहोत का? ‘स्वातंत्र्या नंतरही’ या कवितेमध्ये आजच्या भ्रष्ट समाजाचा आरसा तर ते दाखवतातच पण आपण या स्वतंत्र राष्ट्रात सुरक्षित आहोत का? असा प्रश्नही विचारतात. आणि मुलांना सांगतात -
‘एक दिलाने गाऊ आपण
देशाचे गुणगाण रे
श्रमातुनी आणि त्यागातुनी
घडवू भारत छान रे
घडवू भारत छान’
श्रम आणि त्यागाचे मूल्य सांगतानाच ‘कुठलंही व्यसन न करण्याचा’ आदर्श व्यक्त करतात. जीवन म्हणजे काय? जगणं म्हणजे काय? सुख - दु:ख म्हणजे काय? याची सुंदर व्याख्या ‘जीवन’ या कवितेमध्ये त्यांनी केलेली आहे. ते म्हणतात -
‘जीवन म्हणजे केवळ जगणं नसतं तर
सुख - दुःखाच्या दरम्यान
श्वास आणि उच्छवास
यातील अंतर
म्हणजे खरं जीवन’
जीवनाची अशी व्याख्या त्यांच्या विचारांचा पोत ठरवते. ‘महिला दिन’ या कवितेमध्ये इतिहासातील अनेक क्रांतिकारी स्त्रियांचे दाखले देत असतांनाच... आजच्या स्त्रीला प्रेरणा देण्यासंबंधी भाष्य करून तिचा पाय मागे न ओढण्याची विनंती करतात.
‘शाळेतील मुलांना मला शिकवायचे आहे
समाजात जगण्यालायक बनवायचे आहे’
(आदर्श शाळा)
त्यासाठी श्रमप्रतिष्ठा, नैतिकमूल्य, अंधश्रद्धेचे उच्चाटन, साक्षरतेचा प्रसार करण्याचा मार्ग ते सुचवतांना दिसतात -
‘एका जागी राहून उभा
आला असेल वीट
विठ्ठला s s s सोड तुझी वीट’ (वारकरी)
असे विठ्ठलाला अगदी सहजपणे सांगतात. ‘उन्हं पाहून पाठ फिरवणारी माणसं’ त्यांना नको आहेत. ‘भाकरीचा चंद्र शोधणारी माणसं हवी आहेत.’ ‘मी अडाणी कसा’ या कवितेमध्ये नैतिकता ही शिक्षणावर अवलंबून नसते तर ती नैतिक वागण्यावर अवलंबून असते. हे सांगताना कवी म्हणतात, ‘निरक्षर माणसाला लिहिता वाचता येत नाही पण बाकी सगळा व्यवहार समजतो. मान - अपमान समजतो. भ्रष्ट्राचार लक्षात येतो. पाहुणचार करता येतो’ मग असा माणूस अडाणी कसा? भ्रष्ट वागणारे साक्षर शहाणे कसे?... विचार करायला लावणारा प्रश्न कवीने उपस्थित केला आहे.
‘आम्ही सालस प्रेमळ
निर्व्यसनी माणसं पेरली
पण निरक्षर, लाचार
पण हावरट माणसंच जन्मली’ (निर्दयी माणसे)
या काव्यसंग्रहातील ‘भारती’ ही भारत मातेची आजची अनावस्था दाखविणारी कविता मुळातूनच वाचायला हवी. शिवाय ‘गर्दी’, ‘जगणं’, ‘कलियुग’, ‘बाप’, ‘चेंडू’, ‘पोर वयात आली’, ‘विटंबना’, ‘वादळ’ सारख्या कवितांनी कवी बद्दलच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. साध्या - सोप्या सरळ भाषे मधील कविता गेय, गझल, मुक्तछंद, चारोळ्या, लावणी वगैरे प्रकारातील असून काही कविता गीतांच्या चालीवर लिहिलेल्या आहेत.
हरिश्चंद्र कोळी यांचा लिहिता हात आहे. विचारांची झेप आहे. ती अधिक खोल व व्यापक व्हावी. त्यांना त्यांची लय सापडावी. भविष्यातील अधिकाधिक कसदार लेखनासाठी त्यांना अनेकानेक हार्दिक शुभेच्छा! आणि ‘काव्यसुमनांजली’ या पहिल्या कविता संग्रहाचे मन:पूर्वक स्वागत!
- नीलम माणगावे,
कवयित्री व लेखिका, जयसिंगपूर
Title - Kavyasumananjali (काव्यसुमनांजली)
Poet - Harishchandra Mahadev Koli (हरिश्चंद्र महादेव कोळी)
Edition - First Edition
Price - Rs. 100/- (मूल्य 100/- रुपये)
Publisher - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील)
Publication - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन)
Contact - 02322 - 225500, 09975873569
Email - kavitasagarpublication@gmail.com
March 7, 2016
आई बाबांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं … चेहऱ्यावर समाधान आणि दोघांच्याही डोळ्यात एकंच भाव … आपला चिंटू मोठा झाला …. “मार्कं आणि गुण” … या दोन्हीच्या परीक्षेत यशस्वी झाला …….
February 4, 2026
तो निश्चल आहे. परोपकारी आहे. हिरवा, पिवळा, तपकिरी, काळसर रंगाचा आहे. उंच आहे. सखल आहे. बाजूला निवडूंग, सीताफळाची जाळी. हेकळा-टाकळा बहरलेल्या. शेळ्या, मेंढय़ा, म्हशी, गुरं-ढोरं अंगाखांद्यावर घेऊन करतो पालनपोषण . अनेक वाटा येऊन मिळतात त्याला.. पांदीच्या, कच्च्या, वळणी, पाऊलवाटा . डोक्यावर चिंचेचं झाड डेरेदार. चिंचेखाली एक बाल आहे. पसरट मोठा दगड़. त्यावर बसून गारमस्त हवा घ्यायची. तो निर्जीव आहे . पण सजीवागत बोलतो. गप्पा करतो गुराख्यांशी. डावात सहभागी होतो. विटी-दांडू, गोट्या, लोकरीचा खेळ, नसता चिर्रऽ घोडी. गुरं रानोमाळ पांगलेली. गच्च फुगलेली. तिथेच आम्ही घेतो कागद आणि कागदावर उतरत जातात कविता. अभिव्यक्त होणं. गाव टप्प्यात असतंय. वस्ती नजरेत भरते. झाडात हरवलेलं.. बारीक सुंदर नक्षी दिसते रानाची. नदीची. बगळे रांगेत बागडतात. साप, सरडे, पाली, उंदीर, घोरपड हे घेतात आनंद. तसे हरण, ससा, साळिंदर, उदमांजर सर्वच बोलतात एकमेकांशी. तो आहे डोंगर. त्याचं नाव डोबीचा डोंगर. कृषकांचा, पशुपक्ष्यांचा आवडता. तसा माझाही आवडता. उन्हाळा, पावसाळा येतो. ऋतू बदलतात. तो अढळ असतो. साहित्य निर्माण झाले तिथे. भरभरून उतरवल्या कथा, कविता कागदावर तशा मनात. तो कलाटणी देऊन गेला. स्थिर उभा राहा माझ्यासारखा, असाच संदेश देत असतो मला. आता फिरकत नाही सहसा तिकडे मिळेल वेळ तसा दूरवरूनच पाहतो त्याला. तो जसा होता तसाच आहे नक्षीदार. आठव असतो सोबतीला त्या दिवसांचा..
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
मो.9421442995
November 20, 2016
मला हे जगायचे आहे, मला हे करायचे आहे म्हणून त्यासाठी मला काय काय करावे लागेल? ह्याचा विचार करून तसे वागणे म्हणजे स्वार्थ होतो का? आणि एखाद्या गोष्टीला जुगारून त्यापलिकडे काही करणे याला स्वार्थ म्हणतात का?
November 18, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti