Login Here Join Now

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मी आणि माझं ‘सुशि’ प्रकरण….

    माझ्याप्रमाणे, माझ्यासारख्या लाखो वाचकांच्या मनावर अजूनही राज्य करणारे शब्दप्रभू. स्वर्गीय लेखक , साहित्य गंगेच्या प्रवाहात वाचकांना न्हाऊ घालणारे शब्दशिरोमणी.

      January 31, 2023


  • पाकिजा – हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दंतकथा

    कमाल अमरोही- मीनाकुमारी यांचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य- करुण काव्य आहे.

      February 11, 2018


  • सहस्त्र ‘सूर्य’दर्शन

    १९६४ पासून ते आजपर्यंत दिडशेहून अधिक नाटकांमध्ये व दोनशेहून अधिक चित्रपटांतून व हेमामालिनी निर्मित ‘तेरा पन्ने’ व मराठी मालिका ‘महाश्वेता’ मध्ये त्यांनी काम केले आहे.

      October 16, 2021


  • जपानी पेहराव (जपान वारी)

    पारंपारिक जपानी पोशाख

    ज्या ठिकाणी संस्कृती जपलेली आहे अशा ठिकाणी पारंपारिक पद्धती आणि रूढी परंपरा अगदी मनापासून जपल्या जातात. पेहराव हा प्रत्येक संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
    भारतात पोशाखांचे अनेक प्रकार आहेत. इंडो-वेस्टर्न असा मेळ आजकाल ट्रेंडिंग असला तरी मुळ भारतीय पारंपारिक लुक ला तोड नाही! ग्लोबल होत आज जग जवळ आलंय परंतु पाश्चात्य देशातील संस्कृती आणि आपली भारतीय संस्कृती ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
    भारतात भाषेतील विविधते प्रमाणे कपड्यांमध्ये देखील विविधता असली तरी साधारणपणे साडी आणि धोतर हे दोन प्रकार त्यातल्या त्यात कॉमन आहेत. विविध राज्यांप्रमाणे साडी आणि धोतर नेसण्याच्या पद्धतींमध्ये व तेथील स्थानिक भाषेप्रमाणे त्यांच्या नावात फक्त बदल होतो.
    त्यामुळे आपल्याला “तुमचा ट्रॅडिशनल ड्रेस कोणता?” असे कुणी विचारले तर आपण “महिलांचा पोशाख साडी व पुरुषांचा धोतर” असे सांगतो.जपान देशाने सुद्धा परंपरा आणि संस्कृती मध्ये वेगळेपण जपलेले आहे.

    चिनी लोकांच्या कडून भाषा आणि संस्कृतीचे बाळकडू जपान्यांनी घेतलेले असले तरी जपानची स्वतःची समृद्ध संस्कृती जग भरात नावारूपास आलेली आहे. आपण जपानचे प्रसिद्ध पारंपारिक खाद्यपदार्थ मागील भागात पहिले तसेच ह्या भागात पारंपरिक पोशाख ह्यांच्याविषयी माहिती घेऊया.

    जपानचा पारंपारिक म्हणून प्रसिद्ध असणार्‍या पोशाखाला किमोनो असे म्हणतात. किमोनो म्हणजे अंगाबरोबर मापाचा पायघोळ अंगरखा!
    अंगाबरोबर असे म्हणण्याचे कारण ह्या अंगरख्याला घेर नसतो. जाड, बारीक अशा कोणत्याही ठेवणीच्या माणसाला योग्य प्रकारे बांधल्यास (टेलर कडे खेपा घालून फ़िटटींग साठीचे वेगळे कष्ट न घेता) अगदी व्यवस्थित बसतो.

    स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळे किमोनो असले तरी रचना व प्रकार साधारण एकसारखाच असतो.

    भारतात साडी म्हटले की अनेक प्रकार पटकन डोळ्यासमोर येतात. साधं फक्त मराठमोळ्या महाराष्ट्रीय नऊवारी साडीचे किती प्रकार आहेत. जसे ब्राह्मणी नऊवारी, काष्टा ते अगदी आजकालची फेमस पेशवाई/मस्तानी नऊवार इत्यादी. तसेच जपान मध्ये सुद्धा महिलांच्या किमोनोचे काही विशिष्ठ प्रकार आहेत. जे सिझन किंवा ऑकेजन नुसार वापरले जातात.

    लांब बाह्यांचे किमोनो (जास्त लांब-रुंद बाह्यांचे किमोनो तरुण मुली वापरतात), प्लेन किंवा सिझनल नक्षीकाम केलेले किमोनो, कॉटन चे किमोनो इत्यादी. किमोनो हा साधारणपणे सॅटिन कापडाचा असतो. मऊसूत फॅब्रिकचे सुंदर नक्षीकाम केलेले हे किमोनो अतिशय महाग असतात.

    आपल्या इथे स्त्रियांच्या ‘साडी खजिन्यात’ जसे पैठणी, शालू असतात, पुरुषांकडे सफारी सूट, भरजरी कुर्ते, शेरवानी वगैरे असतात. तसे जपान मध्ये प्रत्येक घरी किमोनो नक्कीच असतो. पिढी जात वापरात असलेले किमोनो एक पिढी ते दुसरी पिढी असा प्रवास करत मोठ्या मानाने कपाटाच्या कप्प्यात विराजमान झालेले आढळतात.

    किमोनो लेयर्ड ड्रेस म्हणूनही प्रसिद्ध आहे. किमोनो घालताना एकावर एक वेगवेगळ्या कपड्यांचे थर (अंगरखे) घातले जातात. उत्तम रीतीने किमोनो घालण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी स्पेशल क्लास घेतले जातात. किमोनो घालून पूर्ण होण्यासाठी किमान ३० मिनिटे लागतात असे ऐकले आहे.

    ह्या किमोनोचे थोडे लाईट व्हर्जन म्हणजे युकाता. हा प्रकार मुख्यतः उन्हाळ्यात वापरतात. युकाता कॉटन कापडाचे असतात. सुंदर रंगात आणि निरनिराळ्या डिझाईन मध्ये युकाता पाहायला मिळतात. ड्रेसचा प्रकार म्हणाल तर सेमच, किमोनो चा छोटा भाऊ. पण किमोनो पेक्षा युकाता घालायला सोपा असतो. जपानी पद्धतीच्या पारंपरिक रयोकान (लॉजिंग बोर्डिंग हॉटेल) मध्ये युकाता रिलॅक्सईंग नाईट ड्रेस म्हणून सुद्धा वापरतात.ह्या पायघोळ अंगरख्यांना बटण, चेन/झीप किंवा हुक वगैरे काही नसते. ड्रेसना असलेली नक्षीदार कड कॉलर सारखी उठुन दिसते. युकाता व किमोनो घालताना डावी बाजू उजव्या बाजूवर घेऊन बांधला जातो. ओव्हरलॅप झालेली बाजु/ फ्लॅप ची कड उजव्या बाजुला दिसायला हवी, असा नियम आहे. उजवी बाजु वर असेल तर ही कड डाव्याबाजूला दिसते, ह्या पद्धतीने फक्त मृत व्यक्तींना किमोनो घातला जातो.
    किमोनो किंवा युकाता एका कापडी बेल्ट ने बांधतात त्याला ओबी असे म्हणतात. या लहान मोठ्या कापडी बेल्ट म्हणजे ओबी चे सुद्धा विविध प्रकार आणि रंग रूप पाहायला मिळते.
    हे पोशाख घालतात तेंव्हा त्या सोबत पांढर्‍या रंगाचे पाय मोजे (सॉक्स) घालण्याची पद्धत आहे त्याला ताबी असे म्हणतात.आता पारंपरिक कपडे म्हणलं की त्याला शोभा देणारे असे फुटवेअर सुद्धा वेगळे हवे नाही का? ह्या किमोनो व युकाता ड्रेस वरती झोरी किंवा गेता अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या चपला वापरतात. गेता म्हणजे लाकडी बेस असलेली उंच टाचेची चप्पल! लाकूड जमिनीवर घासले जाऊन येणार एक विशिष्ट पद्धतीचा आवाज पारंपरिक पेहरावात विशेष भर टाकतो. ह्या गेता वापरणे सहज सोपे नसले तरी सवयीने हळुहळु जमते.
    किमोनो किंवा युकाता घालून चालताना पाऊल उचलून टाकणे (अंगाबरोबर फिट नेसण्याच्या पद्धतीमुळे) अवघड जाते. त्यामुळे पाऊल न उचलता जमिनीवर पाय घासत चालवे लागते. अर्थात ह्यात सुद्धा अनेक फॅशनेबल गोष्टी निघाल्या आहेत जेणेकरून कसली गैरसोय होत नाही. परंतु घरंदाज जपानी स्त्रिया पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा अदबीने पाळताना दिसतात.असे म्हणतात पूर्वीच्या काळी किमोनो घालून रस्त्यावरून चालताना खडबडीत किंवा असमान असणार्‍या रस्त्यांचा अंदाज येणे कठीण जात असे.
    किमोनो घालून वावरताना रस्त्यांवरून चालणे बरेच धोकादायक असे (खास करून गेशा व्यवसायातील स्त्रिया). गेशा म्हणजे पारंपरिक जपानी संगीत व नृत्य पारंगत असणार्‍या, लोकांचे मनोरंजन करणाऱ्या सुंदर स्त्रिया! (हा एक वेगळा सविस्तर लिखाणाचा विषय आहे)
    गेता वापरल्याने अशा स्त्रियांना जड किमोनो घालून सहज वावरणे शक्य होत असे.
    याबरोबर सर्रास वापरला जाणारा प्रकार म्हणजे झोरी. ह्या साध्या टाचा (हिल) नसलेल्या चपलांसारख्या असतात. ज्याचा बेस वेता पासून विणलेला किंवा कापडाचा असतो.पुरुषांच्या किमोनो मध्ये एक प्रकार आहे. प्लेटेड स्कर्ट (निऱ्यांसारखा), किमोनो च्या वरून बांधतात त्याला हाकामा असे म्हणतात. स्त्रिया सहसा हाकामा फक्त कॉलेज च्या पदवीदान सोहोळ्याला वापरतात. हाकामा सामुराई (योध्ये) व काही जपानी ट्रॅडिशनल खेळाडूंचा पोशाख म्हणून ओळखला जातो.किमोनो किंवा युकाता वापरताना त्या वरून घातल्या जाणाऱ्या जॅकेट्सचे बरेच पारंपरिक प्रकार प्रचलित आहेत. जसे हाओरी, हानतेन, हाप्पी कोट इ. जे ऋतु नुसार वापरले जातात.
    असे हे नव्या संस्कृती बरोबरीने आपलं वेगळेपण टिकवून ठेवलेले, जपानी संस्कृतीचे पाईक असणारे पारंपरिक पोशाख.

    -- © प्रणाली मराठे

    लेखनाद्वारे जपानी पोशाखांची माहिती देण्याचा मी पुरेपुर प्रयत्न केला आहे तरी अजून कल्पना येण्याकरिता ह्या पोशाखांचे फोटो दिलेल्या व्हिडीओ लिंक वरती जरूर पहा!

    https://youtu.be/-WnzTEOwMRg

      May 16, 2021


  • खेड्यातले येडे

    लहानपणापसुन गण्या खेड्यातच राह्यलेला आसते.त्यालं त्या खेड्याच्या बाहिरच कायबी माहीत नसते…….त्यानं आयुष्यात कव्हा त्याच्या गावच्या बाहिर गेलेला नसते.गण्या नेमकाच मॅट्रिक पास झालता.त्याच्या गावातले बरेच जनं मॅट्रीकनंतर शहरात कामधंद्यासाठी जायाचे,पिर्‍या,मव्हण्या,सुरश्या,संज्या,ज्ञान्या आसे बरेचजनं मॅट्रीकनंतर शहरात गेलते.ते गावाकडं आले कि शहरातल्या लय गप्पा टप्पा सांगायचे.शहरातले लोकं आसे राहतातं,तसे राहतातं.

      February 2, 2026


  • सफर लंडनची

    माझ्या ७५०व्या कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनेक मोठ्या वर्तमानपत्रांनी या कार्यक्रमाची दखल घेतली. डॉ. आशा मंडपे यांनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये ‘कोहिनूर ऑफ थाने’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला. त्या स्वतः उत्तम व्हायोलिन वादक असल्याने त्यांना गाण्याची उत्तम जाण आहे. अशा व्यक्तीने पाठ थोपटल्यास विशेष आनंद होतो.

      August 7, 2022


  • मुंगी आणि टोळ (संक्षिप्त रूपांतरीत कथा २३)

    जेव्हा मी लहान होतो, तेव्हां मला कांही नीतीकथा पाठ करायला लावल्या होत्या आणि त्यांचे तात्पर्य नीट समजावून सांगण्यात आलं होतं.
    त्यांतलीच एक कथा होती, ‘मुंगी आणि टोळ.’ ह्या अपूर्ण जगांत जो उद्योगी राहतो त्याला बक्षिस मिळतं आणि आळशी किंवा मौज करत रहाणा-यांस शिक्षा मिळते, हा धडा मुलांच्या मनावर ठसवण्यासाठी ही नीतीकथा.
    ही कथा सर्वांना माहिती असणारच तरी मी सांगतो की ह्या कथेत एक मुंगी उन्हाळ्यांतला प्रत्येक दिवस खूप मेहनत करून पावसाळ्यासाठी भरपूर अन्नाची बेगमी करत असते तर एक टोळ गवतावर बसून गाणी गात असतो.
    पावसाळा येतो.
    मुंगीकडे भरपूर अन्न असल्यामुळे ती आरामात असते तर टोळाकडे कांहीच खायला नसल्याने तो मुंगीकडे जातो आणि थोडं खायला मागतो.
    मग मुंगी तिचं ते सुप्रसिध्द उत्तर देते,
    “उन्हाळ्यांत काय करत होतास?”
    टोळ म्हणतो, “मी गवतावर बसून गात होतो.”
    मुंगी म्हणते, “मग जा आता नृत्य कर.”
    मी स्वत:ला विकृत समजत नाही तरीही लहानपणी मला समज कमी असल्यामुळे असेल, मी ह्या गोष्टीशी कधीही सहमत झालो नाही.
    माझी टोळाला सहानुभूती होती.
    कांही काळ तर मी मुंगी दिसली की पायाखाली चिरडत असे.
    अशा पध्दतीने ही गोष्ट व तिचे तात्पर्य न आवडल्याचा रोष मी प्रगट करत असे.
    मी त्या दिवशी रामला एका हॉटेलमधे एकटा बसलेला पाहिलं तेव्हा मला ह्या गोष्टीचीच साहजिक आठवण झाली.
    त्याच्या चेहरा म्लान दिसत होता.
    सर्व जगातलं दु:ख त्याच्या डोक्यावर असावं असं भासत होतं.
    मला त्याची कींव आली.
    मला वाटलं की त्याचा कमनशिबी भाऊ लखन ह्याने त्याच्यासाठी पुन्हा कांहीतरी घोटाळा करून ठेवला असणार.
    मी त्याच्याजवळ जाऊन बसलो.
    मी विचारले, “राम कसा आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी कांही मजेत नाही.”
    मी विचारले, “परत लखनचा कांही घोटाळा?”
    तो सुस्कारा सोडत म्हणाला, “हो. लखनचीच नवी भानगड.”
    मी म्हणालो, “आजवर तू त्याला एवढी मदत केली आहेस तर आता त्याची जबाबदारी घेणं बंद कर.”
    मला वाटते प्रत्येक कुटुंबात एखादं चुकांवर मेंढरू असतंच!
    लखन गेले वीस वर्षे भारभूत होऊन बसला होता.
    त्याने आयुष्याला सुरूवात चांगली केली, लग्न केलं, दोन मुलं झाली, धंदा करू लागला.
    त्यांच उपाध्याय कुटुंब खानदानी होतं, सुरतमधे प्रसिध्द होतं आणि लखनही यशस्वी आणि प्रतिष्ठीत होईल ह्याची सर्वांना खात्री होती.
    पण एक दिवस त्याने जाहिर केलं की त्याचं धंद्यात व संसारात मन रमत नाही.
    तो गृहस्थीसाठी लायक नाही असं सांगून बायको आणि धंदा दोन्ही सोडून निघून गेला. कोणाचं कांही ऐकलं नाही. लखनकडे थोडे पैसे होते.
    दोन वर्षे चक्क वेगवेगळ्या शहरांमध्ये, काही काळ परदेशीसुध्दा, फिरत तो पैसे कसेही उडवत राहिला.
    त्याच्या उधळपट्टीच्या आणि व्यसनांच्या गोष्टी उपाध्याय कुटुंबाच्या कानावर येत.
    सुरूवातीला त्यांना वाटे की हा पैसे संपले की परत येईल.
    पण तसं कांही झालं नाही.
    त्याची उधळमाधळ चालूच राहिली.
    मग त्यांना कळले की तो पैसे कर्जाऊ घेत होता.
    तो उमदा आणि धूर्त होता.
    ज्याने कर्ज मागितल्यावर ‘नाही’ म्हणणं जड जाईल असा त्याच्याइतका समोरच्यावर छाप टाकणारा दुसरा कुणी मला ठाऊक नाही.
    तो आपल्या मित्रांकडून सहज पैसे उकळत असे आणि नवे नवे मित्रही सहज जोडत असे.
    तो नेहमी म्हणे की गरजेसाठी खर्च करण्यात ती मजा नाही जी चैन करण्यासाठी खर्च करण्यात आहे.
    ह्या मोठ्या खर्चासाठी लखन, त्याचा मोठा भाऊ राम, याच्यावर अवलंबून असे.
    त्यासाठी तो आपला प्रभाव वगैरे कांही वापरत नसे. राम अतिशय रूक्ष होता आणि त्याच्याकडे ह्या गोष्टींना थारा नव्हता.
    राम समाजात एक आदरणीय व्यक्ती होता.
    एकदा दोनदा तो लखनच्या सुधारण्याच्या वचनांना भुलला पण जेव्हां त्या मोठ्या रक्कमेतून त्याने कार आणि उंची सूट खरेदी केले, तेव्हा रामने पैसे द्यायला नकार दिला.
    मग लखन त्याला ब्लॅकमेल करू लागला.
    राम एक यशस्वी वकील होता.
    लखन त्याच्या ऑफीसच्याबाबेर टॅक्सीचालक म्हणून उभा राही.
    लखन म्हणे, “टॅक्सीचालक होण्यांत काय वाईट आहे?”
    कधी कधी राम ज्या हॉटेलात जाई, नेमका तिथेच वेटर म्हणून येऊन लखन समोर उभा राही. आपला भाऊ ज्याला सर्व ओळखतात, तो ह्याच शहरांत तोही वेटर किंवा टॅक्सी ड्रायव्हर असणं रामला परवडण्यासारखं नव्हतं.
    त्याऐवजी लखनला पैसे देणंच त्याला ठीक वाटे.
    एकदा तर लखन अगदी तुरूंगातच जाणार होता.
    राम खूप अस्वस्थ होता. त्याने झाल्या प्रकाराची माहिती घेतली.
    लखनने सा-या मर्यादा ओलांडल्या होत्या.
    तो उधळ्या, स्वार्थी, चैनी होता पण कायद्याचे उल्लंघन करणारा नव्हता.
    ह्यावेळी मात्र त्याने ती मर्यादा मोडली होती. जर त्याच्यावर खटला भरला असता तर तो नक्कीच तुरूंगात गेला असता.
    पण रामला आपला एकच भाऊ तुरूंगात गेलेला कसं चाललं असतं.
    कानजीभाई नांवाच्या सूडबुध्दीने वागणा-या माणसाला लखनने ५०,००० रूपयांचा गंडा घातला होता आणि तो वसुलीसाठी कोर्टात जाणार होता.
    कानजीभाई म्हणाला, “लखनसारख्याला धडा शिकवलाच पाहिजे. त्याला तुरूंगात जावं लागलं की तो शुध्दीवर येईल.”
    रामने कानजीभाईला समजावण्यासाठी मध्यस्थ गांठून, खूप खटपट करून आणि त्याचे पन्नास हजार देऊन, ते प्रकरण कसंबसं मिटवलं होतं.
    दोन दिवसांनी रामच्या खात्यांतून त्याने कानजीभाईला दिलेल्या पन्नास हजारांच्या चेकचे पैसे वजा झाले, त्याच वेळी त्याच्या कानावर आलं की तोंच कानजीभाई आणि लखन दोघे मिळून मुंबईला जुगार खेळायला गेलेत. तेव्हां तो भयंकर चिडला होता.
    इतका क्रोध कुणाला कधी आलेला मी पाहिला नव्हता.
    वीस वर्षे लखन रेस, जुगार, मुली, महागडी हॉटेल्स आणि छानसे कपडे ह्यावर लखन पैसे खर्च करत राहिला.
    तो अगदी सुटाच्या जाहिरातीतला माणूस वाटे.
    त्याचं सत्तेचाळीसावं वर्ष चालू होतं पण पहाणा-याला तो पस्तीशीचा वाटे.
    तुम्हाला जरी माहिती असलं की लखन असा छंदीफंदी आहे तरी तुम्हाला त्याची सोबत आवडली असतीच, असे त्याचे वागणे/बोलणे असे.
    तो नेहमी प्रसन्न असे, उत्साही असे आणि झोकातही असे.
    मलाही त्याच्या जगण्याला मदत म्हणून कांही वेळां चार-पांचशेची फोडणी बसे, त्याचं मला कांही वाईट वाटत नसे.
    मी जेव्हा त्याला पांचशे रूपये उसने (ते परत कधीच मिळत नसत.) देत असे, तेव्हा मलाच वाटे की मी त्याच्या ऋणांत आहे.
    सगळे मोठे लोक लखन उपाध्यायला ओळखत आणि लखनही सगळ्यांना ओळखत असे.
    तुम्ही त्याचं वागणं योग्य म्हणू शकत नव्हता पण तरीही तो तुम्हाला आवडत असे.
    आणि बिचारा राम उपाध्याय.
    त्याच्या अवलक्षणी भावापेक्षा फक्त एका वर्षाने मोठा पण आताच बिचारा साठीचा वाटू लागला होता. गेल्या पंचवीस वर्षांत त्याने कधी सुट्टी घेतली नव्हती.
    सकाळी साडेनऊला तो आपल्या कचेरीत हजर असे आणि संध्याकाळ उलटल्यानंतरच घरी परत येई.
    तो प्रामाणिक होता, उद्योगी होता आणि त्याची योग्यताही मोठी होती.
    त्याची सुशील पत्नी होती आणि तो कधी मनानेही पत्नीशी बेइमान झाला नव्हता.
    त्याला तीन मुली होत्या.
    त्याने त्या तिघींचे लालन पालन, शिक्षण मनापासून केले होते.
    तो आपल्या उत्पन्नाचा एक तृतीयांश भाग बचत करत असे कारण त्याची इच्छा होती की साठीनंतर काम करत न राहतां गांवी छोटसं घर घ्यायचं आणि बागकाम करायचं.
    त्याच्या आयुष्यात नाव ठेवण्यासारखी गोष्ट नव्हती.
    त्याचं वय वाढत होतं, त्याचाही त्याला कांही वाटत नव्हतं कारण लखनचही वय वाढत होतं.
    तो नेहमी म्हणत असे, “आता चार वर्षांत लखन पन्नाशीचा होईल.
    तरूणपणीचे रूप आणि रूबाब त्याला पन्नाशीत सोडून जातील.
    मग त्याला कोण विचारणार आहे?
    पैसे नसतांना कोण त्याच्याशी मैत्री करणार आहे?
    त्यावेळी माझी बचत कित्येक लाखात असेल आणि लखन गटारांत लोळत असेल.
    तेव्हा त्याला ते आवडेल कां?
    मग त्याला कळेल की उद्योगी असणे चांगले की नुसतीच मौजमजा करणे चांगले ते!”
    बिचारा राम! मी विचारांत पडलो.
    लखनने आणखी कांहीतरी भानगड नक्कीच करून ठेवली असणार.
    आता आणखी असं काय केलं असावं, ह्याचाच मी रामच्या बाजूला बसून विचार करत होतो.
    राम खूपच उदास आणि विमनस्क दिसत होता.
    रामने मला विचारले, “आता त्याने काय केले माहित आहे?”
    लखनने अगदी वाईटात वाईट गोष्ट केली आहे, असं आता ऐकावं लागणार, अशी मी मनाची तयारी केली.
    बहुदा लखन तुरूंगात तरी असावा किंवा लौकरच जाणार तरी होता असावा.
    रामच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. जेमतेम धैर्य गोळा करून तो बोलू लागला, “माझं संपूर्ण आयुष्य मी प्रामाणिकपणे मेहनत करत राहिलो, सर्वांचा आदर मिळवला, संयमाने वागलो. मेहनतीचं, शिस्तीचं आणि काटकसरीचं जीवन मी नेहमी जगत राहिलो, तेव्हा कुठे मी समाधानी निवृत्तीचं जीवन जगण्याचं स्वप्न पाहिलं. दैवाने माझ्या वाट्याला आलेली आयुष्यातली सर्व कर्तव्यं मी नीट पार पाडली.”
    मी म्हणालो, “खरं आहे.”
    राम पुढे म्हणाला, “आणि तू हे नाकारणार नाहीस की लखन हा आळशी, अप्रामाणिक, निरूद्योगी जीवन जगला. जगांत जर न्याय असेल!”
    मी म्हटलं, “हे ही खरं आहे.”
    पुढे बोलतांना राम लालबुंद झाला व म्हणाला, “दोन महिन्यांपूर्वी निरूद्योगी लखनने त्याची आई शोभेल अशा वृध्द बाईशी लग्न केलं आणि आतां ती वारली. मरण्याआधी तिने आपली सारी इस्टेट, ज्यांत एक इथला एक बंगला, एक मुंबईचा वरळीचा फ्लॅट, एक गावाकडचं घर, बॅंकेतले पन्नास लाख रूपये आणि वीस लाखांचे शेअर्स आहेत.”
    असं म्हणून रामने टेबलावर मूठ आपटली.
    “हाच ईश्वरी न्याय आहे कां? हे योग्य आहे कां? नाही हा तर माझ्यावर अन्याय आहे.”
    मी स्वत:ला आवरू शकलो नाही.
    मी हंसत सुटलो, अगदी जोर जोरांत. (लखनला मदत करणारा भाऊ राम, लखन अचानक श्रीमंत होतोय हे ऐकून मत्सराने दु:खी कां व्हावा? ख-या आयुष्यांत निरूद्योगी टोळाची मजा झाली होती. मला हंसू येणारच ना!)
    मी हंसलो ते रामला आवडलं नाही. तो आता माझ्याशी बोलत नाही.
    लखन मला अधून मधून बंगल्यावर मेजवानी देतो.
    कधी कधी तो माझ्याकडून उसने पैसेही मागतो पण ते केवळ संवयीमुळे आणि पन्नास रूपयांहून अधिक नाही.
    -- अरविंद खानोलकर.
    मूळ कथा - ॲंट ॲंड ग्रासोफर
    लेखक - डब्ल्यू. सॉमरसेट मॉम ( १८७४-१९६५)

      June 8, 2022


  • आठवणीतले अण्णा..

    जेव्हा नाटक चित्रपटांची डिझाईन करु लागलो तेव्हा अण्णांचे फोटो काढून डिझाईन करण्याची संधी मिळाली. भक्ती बर्वेच्या ‘डबल गेम’ नाटकाची डिझाईन करीत होतो. तेव्हा सर्व कलाकारांचे फोटो काढून अनेक डिझाईन्स केली. तेव्हा अण्णांशी खूप जवळून संपर्क आला. नाटक तुफान गाजले. दरवेळी मी नाटक पहात होतो, अण्णांच्या संवादफेकीत मला कधी सुईचाही फरक जाणवला नाही, त्यांचं टायमिंग आणि बेअरिंग हे प्रत्येकवेळी अचूकच असायचं.

      November 26, 2022


  • दक्षिण आफ्रिकेतले दिवस – प्रास्ताविक

    ….. तोपर्यंत दक्षिण आफ्रिका म्हणजे नेल्सन मंडेला ही व्यक्ती तसेच, जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, डर्बन आणि केप टाउन या शहरांची नावे, इतपतच माहिती होती. माझी नोकरी पिटरमेरीट्झबर्ग शहरात होती. हे शहर कुठे आहे, याबाबत संपूर्ण अनभिज्ञ होतो. 

      August 14, 2018


  • मानसकोंड – शापवाणी

    मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता .
    वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती .

      December 15, 2022