(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • इंग्लिश स्कूलचं फॅड

    प्राथमिक शिक्षणाची परवड

      June 25, 2017


  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ७

    ती दोघं आता त्या चढाच्या वळणावर पोहोचली होती….  तेवढ्यात त्यांना परत एका चारचाकी गाडीचा उजेड दिसला….. आता मात्र दोघंही त्यांचे हात हलवत मोठमोठ्यांदा हेल्प, हेल्प म्हणत रस्त्याच्या थोडे पुढे आले…..

      April 7, 2020


  • मजुरांचा बाजार (आठवणींची मिसळ २५)

    मी सकाळी फिरायला जातो, तिथे वाटेत एक नाका लागतो. मी फिरून परतत असतांना तिथे रोजंदारीवर काम करणारे अनेक स्त्री-पुरूष बसलेले असतात. ते गटागटाने बसतात. त्यांचा कलकलाट चालू असतो. रस्ता अडवून मात्र बसत नाहीत. त्या दिवशी त्यांना कुठे काम करायला जायचय हे त्यांना ठाऊक नसतं. पण मनाशी आशा बाळगून ते मजूर तिथे बसलेले असतात.

      September 13, 2022


  • RUB ने बना दी जोडी

    “याला” त्याच्या desk वरून “ती” दिसायची … department वेगळं होतं म्हणून कामानिमित्त कधी बोलायची वेळ नाही आली … पण जाम आवडायची … ती सुद्धा अधून मधून डोकवायची … थोडा अंदाज तिलाही आला होता … हा मात्र बुजरा … कधी बोलू – कसं बोलू ?…या विचारात दिवस संपून जायचा

      February 4, 2026


  • पाठलाग

    लग्नाचा वाढदिवस संपला. पार्टी आणि पाहुणे हे सोडून ते दोघे आज एकमेकांशी काहीही वेगळं बोलले नव्हते. इतका खास दिवस पण तोही रोजच्यासारखा आला आणि गेला. सईला झोप येईना. ती हॉलमध्ये आली…. मागची सारी वर्षे आज तिच्यापुढे उभी राहिली होती. ती विचार करत किती तरी वेळ बसुन राहिली.

      February 4, 2026


  • अनोखा अनुभव

    कुणाचा विश्वास असो वा नसो. माझ्या अनुभवानुसार माझा विश्वास आहे. माणूस गेला की सगळे संबंध संपतात असे म्हटले जाते. पण त्यांचा जीव कुणात तरी गुंतलेला असतो. माझी काकू शेवटच्या काळात बरीच वर्षे माझ्या कडे रहात होती. मूलबाळ नव्हते म्हणून आम्हालाच तिने आईच्या मायेने वाढवले होते. खूप कष्ट घेतले होते आमच्या साठी. शेवटी तिचे सोवळे ओवळे शहरात नीट सांभाळले जात नाही आणि माझ्या मोठ्या मुलीला सांभाळायला म्हणून आली ती इकडेच राहिली. किती वेळा सांगूनही ऐकायची नाही. कामं करत असायची. माझ्या लहानबहिणीचे पूर्ण कुंटुब अपघातात गेले. हा धक्का सहन झाला नाही. ती खचून गेली आणि तिला बसलेली उठताच आले नाही. तशा अवस्थेतही सरकत सरकत काम करत होती. आणि एकदा रागाने तिला म्हटले की तुला कामे करावेसे वाटतात ना मग या कोपर्यात बसून माझी कामं बघून समाधान मानत जा. आपण दोघी गप्पा मारत जाऊ. आणि तशीच बसून ती माझ्या सगळ्या हालचाली बघून समाधानी होती. ती गेली त्याच दिवशी एक कुत्र्याचे पिल्लू मला गटारात वहात असलेले दिसले म्हणून त्याला बाहेर काढले. मुलांनी ते पाळायचे ठरवले. ती जिमी मोठी झाली. ती स्वयंपाक घरात आलेली मला आवडत नसायची. त्यामुळे मी एकदा तिला रागावून सांगितले या कोपर्यात बसून रहा. आणि एक पोत्याचा तुकडा दिला बसायला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खरच ती तिथे बसून माझ्या हालचाली कडे इकडे तिकडे मान वळवून बघत असताना मला वाटायचे की काकूच बघत आहे. म्हणून मी तिच्या बरोबर बोलत रहायची. खूप वेळ झाला तरी उठायची नाही. माझे काम संपले की बाहेर जायची...
    असाच अनुभव माझ्या मुलीचे सासरे फेब्रुवारी महिन्यात गेले. पण त्यांचा जीव नातवावर होता. तो खोडकर होता म्हणून लेक सारखी त्याला रागवायची अभ्यासावरून ओरडायची. या वर्षी तो दहावीला गेला. म्हणून जास्तच सूचना मिळायच्या. एकदा आई ओरडली म्हणून तो गॅलरीत उभा होता. एक पोपट आला. हा जवळ गेला तरी उडाले नाही म्हणून तो आत गेला व गहू आणून हातात धरून खाऊ घातले. बहिण जवळ आली तरीही ते तिथेच खात राहिले. हे पाहण्यासाठी आई व आज्जी आल्यावर ते त्यांच्या कडे पाहून उडून गेले. मुलींनी हे सांगितल्यावर मी सहजच बोलून गेले होते की त्याच्या आजोबांना याची काळजी वाटत असेल म्हणून ते आले असतील. सगळ्यांना पटले की नाही माहित नाही पण मला मनापासून वाटते ते असे अचानक तोंडून बोलून जाते मी.... हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. विश्वास ठेवायचा की नाही तो.पण इतरांच्या भावना दुखावल्या जातील असे मत व्यक्त करु नये कृपया.
    धन्यवाद.
    -- सौ. कुमुद ढवळेकर.

      June 3, 2022


  • भाकित

    तसं पाहिलं तर रभाजीच्या विहिरीला जेमतेमच पाणी होतं. यावर्षी बऱ्याच दिवस पावसानं दडी मारल्यामुळे गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची पंचायत झाली होती. जून महिना संपत आला तरी काळे ढग तोंड दाखवायला तयार नव्हते. त्यानं अन् रखमीनं सगळं यावर्षीच बी भरान कधीच तयार करून ठेवलं होतं फक्त त्यांना पावसाची वाट होती.

      January 19, 2024


  • तीन चिंतन कथा !

    डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या लेखणितून आलेल्या या तीन चिंतन कथा…

      February 5, 2026


  • पानसुपारी

    कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात किंवा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम होणार म्हटले की अगोदर पानसुपारी आणणे आवश्यक असते. आणि तो विधी सुरू होण्यापूर्वी पानसुपारी देवापुढे ठेवून घरातील वडील धाग्यांना नमस्कार करुनच पुजेला बसायचे असते. दोन पान म्हणजे भक्ती आणि भाव तर सुपारी म्हणजे ज्ञान. सत्यनारायण. मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीची पुजा. मंगळागौर. संक्रांतीला पानसुपारी आवश्यकच असते. त्यामुळे लग्नात आणि हळदीकुंकूवाला अगोदर हळदीकुंकू लावले की लगेच दोन पाने आणि त्यावय सुपारी देवून मगच इतर. इथे मैत्री व प्रेम याचे प्रतिक म्हणून दोन पाने त्यावर आगत्याची सुपारी याचा शिक्कामोर्तब झालाच असे. म्हणूनच काही जणांकडे सुपारी फुटली की लग्न ठरले असे समजतात....
    मग पानसुपारी हे हळदीकुंकूवाला आणणे आणि पूर्ण सुपारी ऐवजी सुपारीचे तुकडे. नतंर म्हैसूर सुपारीच्या पुड्या ही प्रथा सुरू झाली. असे आलेली पाने स्वच्छ धुवून घरातील वृद्ध मंडळी खात असत पानदानात ठेवून. नाहीतर जे कुणी खात असतील त्यांना देत. आता तर पानसुपारी कुणी देत नाहीत. सणासुदीला. कार्यात जेवणाची पंगत उठली की विडा दिला जायचा. आता काही हॉटेल मध्ये ही प्रध्दत आहे. आणि घरातून तांबूल देतात. तुळजापूरला देवीला पानाची प्रभावळ असते. रेणुका मातेला दररोज तांबूल असतोच. पण पुढे पैजेचा विडा. खून करण्याची दिलेली सुपारी. बैठकीत पानाला महत्त्व आले. मात्र हे क्षेत्र आपल्या संस्कृतीत बसत नाही. पान औषधी वनस्पती आहे. त्यामुळे बाळंतपणात रोज दोन वेळा जेवणानंतर विडा देतात. बाळाचे पोट गुबार झाले की एरंडेल तेल लावून किंचित गरम करून पोटावर ठेवले की कमी होते ( हे आमच्या काळी होते. आता नाही) पानाची चंची पुढे केली की झाली मैत्री. गेट टु गेदर याच पद्धतीने करतात शेतकरी कामकरी. नुसते भजे करणे अशुभ समजले जाते तेव्हा घरातील दोन तीन पाने हाताने तुकडे करून भजी केले तरी चव छान येते. काही ठिकाणीची पाने विडे प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की कुणी विडा दिला तर तो अगदोर उकलून पाहून मग खावे. आणि पानाने भिंती रंगवू नये. अजून बरेच काही आहे पानमहात्म्य...
    मग या पानसुपारीला धन्यवाद

    –सौ. कुमुद ढवळेकर.

      August 31, 2022


  • पैज

    अंधारी रात्र, थंडी पडली होती. पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका हिवाळी रात्री आपण दिलेल्या पार्टीची आठवण करत राष्ट्रियीकृत बँकेचा सीनियर मॅनेजर धनानंद शतपावलीच्या येरझाऱ्या घालत होता. बुध्दिमान म्हणून गणले जाणारे बरेच मित्र होते त्या पार्टीत. गप्पागोष्टी, चर्चा होत होत्या त्याही गंमतीदार, लालित्यपूर्ण अशा. मृत्युदंड असावा की नसावा हा एक अहमहमिकेच्या वादविवादाचा विषय होता.

      June 22, 2022