नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

“तुमची मानव जमात अगदी भांडखोर, क्षुद्र आणि कोत्या मनोवृत्तीची आहे. हेवा, दावा, स्वार्थ मत्सर शी. हे सगळे वाईट गुण आम्हाला आमच्या ग्रहावर नको होते. या गुणांची लागण आमच्यातल्या काही कमकुवत देवांनाही झाली. ते कोपिष्ट होऊ लागले. ज्याला त्याला शाप देऊ लागले. शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलं की तुम्हा मानवांचा सहवासच टाळला पाहिजे. म्हणून एकूण एक मानवप्राणी शोधून काढला आणि पृथ्वीवर पाठवून दिला. बसा भांडत. आम्ही तुमच्यावर नजर ठेवून होतो. किती तन्हांनी भांडता येतं. किती तन्हांनी मानवा मानवात भेद पाडता येतात आणि लोकांना आणि स्वतःलाही कष्टी करता येतं हे तुमच्यावरून आमच्या लक्षात येत होतं. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आणि शक्ती नुसती भांडणात आणि दुसऱ्यांचं वाईट करण्यात जाते
December 19, 2025
मला एक आठवतं, माझ्या आईनं सांगितलं
होतं की वर्षा-दीड वर्षाचा असताना
तू खूप छान दिसायचा. त्यावेळचं माझं एक छायाचित्र मी कोपरगावच्या एका स्टुडिओमध्ये पाहिलं. खरं म्हणजे आईनं सांगितलं म्हणून तो मी होतो, अन्यथा त्या प्रतिमेकडे मी पाहिलंही नसतं. त्या फोटोच्या प्रेमात पडलो मी; पण स्वतच्या प्रेमात नाही पडलो. आजही आठवणींचे गाठोडे सोडताना, लग्नाचे अल्बम पाहताना किंवा सहलीतले मित्र पाहताना आपली नजर जाते ती आपल्या प्रतिमेवर. तो मी असं आपण सांगतो. कारण आज तो मी राहिलेला नसतो. ज्याला आपण हा मी असं म्हणत असतो तो खरोखरच मी असतो का? आपण कोणाला भीत नाही, असं छातीठोकपणे सांगणारी माणसं किती भित्री असू शकतात, हे तुम्हाला थोडं डोळसपणे पाहिलं तरी सापडेल. `आपल्याला कधी राग येत नाही अन् आला तर आपण म्हणजे अगदी हे' असं म्हणणारा माणूस बायकोच्या भुवईच्या धाकावर आवाज बदलताना आपण पाहतो. थोडक्यात काय तर आपण आपलीच आपल्याला हवी तशी प्रतिमा सुखावली तर आपणही सुखावतो. एखाद्या प्रतिमेत आपण स्वतला पहायला लागलो की आपलं स्वतच असं व्यक्तिमत्त्व तयार होतं. खरं तर हे व्यक्तिमत्त्व त्या-त्या क्षणाचं असतं. माणूस हा काही एक माणूस नसतो, तो म्हणजे विविध व्यक्तिमत्त्वांची साखळी असते. या साखळीतल्या एखाद्या कडीत आपण स्वतला अडकवून नव्या व्यक्तिमत्त्वाचा आनंद घेत नाही. ते व्यक्तिमत्त्व अनुभवत नाही. तो मी काल होतो, आज नाही याचं दुःख आज केलं जातं. उद्या मी असा असेल याचंही दुःख वाटू लागतं. जीवन हा एक अनुभवाचा प्रवास आहे. तो करायचा असेल तर वर्तमानात जगायला हवं. आजच्या स्वतला स्वीकारणं त्यासाठी आवश्यक आहे. भूतकाळाच्या प्रतिमा आणि भविष्यकाळाच्या कल्पनांना विश्राम देऊन आजचा अनुभव घ्यायला हवा. जो वर्तमानात जगतो त्याला स्पर्श करायला दुःखालाही दोनदा विचार करावा लागेल. वर्तमानात जगण्यासाठी स
वतला पाहणं, जाणून घेणंही तितकच महत्त्वाचं आहे. एकदा माझा मी जसा आहे तसा स्वीकारला की मग इतरांनाही तो जसा आहे तसं स्वीकारण्याचं भान येतं. एकदा माणूस, व्यक्ती, घटना किंवा परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याची वृत्ती, प्रवृत्ती आली की मग दुःखाची बातच येत नाही.
-- किशोर कुलकर्णी
April 13, 2006
सुरुवात जेव्हा सरळ रस्त्यावरुन होते तेव्हा फक्त भावी जीवन, आणि त्याच्या सुखसोयींच्या सुंदर कल्पनाच घोळत असतात मनात! त्या आनंदाला मग हव्या प्रसंगांचे नवे नवे धुमारे फुटतात. आणि मग डोळ्यांना मनाला तेच मनोहारी देखावे भुरळ घालीत राहतात. मनावर ही अशी सुखाची साय धरत असतांना, जीवन किती सुंदर आहे याचीच अनुभुती होत असते सतत. सगळंच कसं हवहवसं संपू नये असं वाटणारं असतं ना?
November 17, 2019
याही गोष्टीला ११ पेक्षा जास्त वर्षे झाली. सध्या आमच्या लग्नाला ५१ हून जास्त वर्षं झाली. ही दागिने गमावल्याचं दु:ख विसरली. मी अजून नलूला विसरूं शकत नाहीं.
June 11, 2018

ह्या राजा जेवढा विनोदप्रिय होता, तेवढी विनोदप्रियता असलेल्या दुस-या कुणा व्यक्तीबद्दल मी कधी ऐकलं नव्हतं. त्याचे जगणंच विनोदासाठी होतं असावं. त्याची मर्जी कमवायची असेल तर विनोदी गोष्ट त्याला ऐकवायची. त्यामुळे त्याचे जे सात मंत्री होते ते सगळे उत्तम विदूषक होते.
June 5, 2022
आज १२ जानेवारी २०१८. स्वामी विवेकानंदांची १५५ वी जयंती. १२ जानेवारी २०१२ ला त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू झाले. त्यादिवशी एका कार्यक्रमांत मी वक्ता म्हणून त्यांच्या जीवनावर दीड तास बोललो. ४० मिनिटे बोलायचे होते पण माझे बोलणे पूर्ण होईना.
December 7, 2023
चंदेरी दुनियेत कारकिर्द करताना, अनेकजण संपर्कात येतात. मग ते नायक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ कोणीही असू शकतं. त्यांच्याशी पाऱ्यासारखं अलिप्त रहाणं ज्याला जमलं, तोच खरा! अन्यथा जीवनात नैराश्य येतं. दोघींच्याही जीवनात तशा गोष्टी घडलेल्या आहेत. वहिदानं त्या गोष्टींवर पडदा टाकलाय. दिप्ती विसरण्याचा प्रयत्न करतेय.
March 5, 2022
एका पावसाळ्यात मी माझ्या घराच्या दारात उभा होतो, मुसळ्धार पाऊस कोसळ्त होता, एक सत्तरीच्या वयाचं वृध्द जोडप पावसात भिजत जात होतं तर पावसापासून वाचण्यासाठी ते आमच्या दारा समोरच्या आडोशाला थांबल, त्यातील आजीबाईना घरी जायची घाई होती त्या आजोबांना भिजत चलण्यासाठी आग्रह करीत होत्या, नेमकी त्याच दिवशी मी एक नवीन छत्री विकत घेतली होती.
July 13, 2014
बाईंनी माईकवर जाहीर केल “सर्व अलौंन्समेंट म्हराटित होतील तवा समद्यांनी हित ध्यान द्यायाचय. पुन्ह्यांदा सांगन होनार न्हाई. डोईवरच प्यँनल घट लावा नाहीतर तुमच्या बँगा खाली घरंगळतील आनी कुनाची पन टकुर फुटतील. ” माझ्या प्रमाणे ईतरही उठले आणि भितीपोटी पँनल घट्ट बंद असल्याची खात्री करुन घेतली.
July 8, 2019
एस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू लागलो. भर उन्हातही अंगाला गार गार स्पर्श करणारी हवा तिथे सुटली होती. त्या गार गार हवेचा आनंद घेत उल्हसित होत चालता – चालता आम्ही ज्या तरुणींचा पाठलाग करण्याचे ठरविले होते त्यांच्यापासून कधी दुरावलो ते कळलेच नाही.
June 16, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti