(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्युटशी गोष्ट – भाग २

    रविवार सकाळ असूनही काळ्यांच्या स्वयंपाक घरात बरीच गडबड चालू होती. डायनींग टेबलावर डिझायनर प्लेट्स, मोतीचुर लाडूंचा बॉक्स, मलई बर्फी आणि कट्यावर पोह्याची तयारी. एकीकडे गॅसवर दूधही गरम होत होत.

      April 18, 2022


  • रातराणी

    पहाट झाली.
    काळपट आकाश उजळू लागलं.
    गार वारा भिरभिरू लागला.
    पाखरांचा किलबिलाट सुरू झाला.
    पाने सळसळली.. .. झाडांची झोप उडाली.
    फुलं हळूहळू फुलू लागली.. .. वाऱ्यावर डोलू लागली.
    आणि...

    एका झाडाला वाटलं, 'छे! हे आता रोजचंच झालंय.
    रोज-रोज का सकाळी फुलायचं आणि वाऱ्यावर डोलायचं?
    हे सारं बदललंच पाहिजे.

    रोज पहाट आणि रोज रोज किलबिलाट.
    नको हा सकाळचा गोंगाट.
    सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा सूर्याचा रखरखाट.
    ते गरमागरम वारे आणि खरबरीत धुळीचे फवारे.
    दिवसभर या पक्षांची किरकिर आणि माणसांची चिरचिर.
    यापेक्षा....

    सकाळी मस्त आराम करावा.
    पानं मिटून फुलांनी शांत झोपावं, कळीतल्या कळीत.
    सूर्य मावळला की आरामात उठावं.
    संध्याकाळी गार वारे सुरू झाले की फांद्या ताणून आळस झटकावा.

    अलगद सळसळावं.

    मग..
    एकेक पान जागं व्हावं.
    एकेक फूल उमलत जावं.
    प्रत्येक फुलातून सुवासाचं सुंदर कारंजं उसळत यावं.
    आणि..
    रात्रीची वेळ असल्याने... अंधार गडद असल्याने...फूल सुध्दा पांढरं असावं.
    काळोखात सुध्दा इतरांच्या डोळ्यात भरावं.
    घमघमीत वासानं त्यांना झपाटून टाकावं.
    त्यांचा दिवसभराचा थकवा त्यांना विसरायला लावावं.
    तेव्हा किती मजा येईल!'

    आणि खरंच..
    दुसऱ्या दिवशी सकाळी
    ते झाड उठलंच नाही.

    आनंदाने सळसळलंच नाही.
    त्याची फुलं फुललीच नाहीत.
    वाऱ्यावर ती डोललीच नाहीत.

    दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळला.

    दिवेलागण झाली.
    अंधार गडद होऊ लागला.
    सकाळी कामावर गेलेली माणसं, थकून-भागून घरी परत येऊ लागली.

    इतक्यात....
    फुलांचा घमघमाट सुटला...
    थकलेल्यांचा थकवा पळाला!
    थकलेली माणसं ताजीतवानी झाली!!
    एकदम रिचार्ज झाली!

    माणसे आनंदाने म्हणाली,
    “अरे व्वा! आमची रातराणी बहरली वाटतं!!”

    - राजीव तांबे.

      July 24, 2015


  • चित्रकाराचे चातुर्य

    एक चित्रकार होता. फारच सुंदर अशी चित्रे काढायचा तो. त्याची चित्रे पाहून लोक अत्यंत प्रभावीत होत असत. दूरवर त्याची ख्याती पसरली होती. त्यानं काढलेलं चित्र प्राप्त करण्यासाठी लोकांची नेहमी धडपड चालत असे. या प्रतिभावान कलावंताचे चित्र मिळविण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी लोक दाखवीत.

      November 25, 2025


  • एक परीस स्पर्श (भाग – ४०)

    सध्या ! विजय काय विचार करतोय ? हे त्याच्याच शब्दात … काही दिवसांपासून मी टी. व्ही. वर पिंकीचा विजय असो ! ही नवीन मालिका पाहतोय ! त्यातील नायिका म्हणजे पिंकी कोणताही विषय तिच्या लग्नापर्यत नेण्यात तरबेज असते…तसेच काहीसे माझ्या घरातील लोकही तरबेज झालेत, कोणताही विषय ते माझ्या लग्नापर्यत अगदी सहज नेतात …आज सकाळी – सकाळी बाबांचा प्रश्न…गावची तिकीट काढायला सांगू ना ? त्यावर नेहमी प्रमाणे मी नाही म्हणालो,” का ?

      August 4, 2022


  • किसन’ नावाचं अजब ‘रसायन’

    किसनरावांच्या प्रत्येक भेटीत त्यांना असलेली सांस्कृतिक विषयांची आवड दिसून येत होती. साहित्य, संगीत, कला, नाट्य, चित्रपट, इत्यादी विषयांवर आमच्या गप्पा होत असत. भेटी होत होत्या. दरम्यान अप्पा बळवंत चौकात माईंनी ‘संस्कृती प्रकाशन’ची मुहूर्तमेढ रोवली.

      February 23, 2022


  • मीच एव्हढा शहाणा कसा – मनोगत

    आपण मोठेपणी लेखक व्हावं, असं सर्वसाधारणपणे कोणालाही वाटत नाही किंवा आपल्या मुलाला, मुलीला लेखक होण्याची इच्छा व्हावी असं कुठल्या पालकांनाही वाटत नाही. लेखकच काय, गायक, संगीतकार, चित्रकार व्हावं असंही लहाणपणी कोणाला वाटत नाही किंवा वाटू दिलं जातही नाही. शाळेच्या दिवसांपासूनच या सर्व गोष्टींना ‘एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटीज’ असं गोंडस नाव दिलेलं असतं.

      April 29, 2024


  • शेवटी जातीने घात केला ….

    सूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट झाली कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले .

      August 19, 2018


  • भयानक स्वप्न !

    रात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी. पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज.

      December 2, 2018


  • श्र्वास आणि इतर कथा

    Shwaas-Front-300'श्यामची आई' या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ठ सिनेमाचा 'कमळ' पुरस्कार 'श्र्वास' या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची 'श्र्वास' ही कथा माधवी घारपुरेंची.

    श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्र्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह.

    श्र्वास आणि इतर कथा
    लेखिका : माधवी घारपुरे
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य : १६०/- रुपये
    पाने : १४२

      October 18, 2016


  • मेक बिलीव्ह – बरंच भ्रामक, किंचित खरं !

    माझा मित्र म्हणाला होता- ” अरे, एकच प्याला जुनं झालं पण कोणी दारू पिणं सोडलं का?” सगळंच मेक बिलिव्ह !

      May 22, 2021