(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जाणती मुलं माझी

    माझे विद्यार्थी खूपच समजूतदार होती म्हणून मला अजिबात त्रास झाला नाही. कुणी आलं की ऑफिसात जावे लागले तरी मुलं शांत बसून अभ्यास करायची. कधीच रागवाव लागलं नाही. जाणती होती ती. त्यांना शिवरायांचे चरित्र म्हणून एक विषय होता. आणि आवडीने मनापासून ऐकायची शिवाजी महाराजांचे चरित्र. आणि एकदा एक पालक बाई म्हणाल्या की बाई माझा मुलगा अबोल लाजाळू आहे पण त्याला तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नुसते उभे केले तरी चालेल पण मला एकदा डोळे भरून त्याला रंगपचावर पहायच आहे. दरम्यान मी मा. बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा हे पाहिले होते आणि विचार चक्र सुरु झाले. ठरविले माझी मुले पण जाणतीच आहेत याच्यातूनच जाणता राजा सादर करायचा.

      June 28, 2022


  • स्थानबध्द

    माधव ! गाडी वेगात धावतेय. डोंगर, शेतं, झाडं सगळे मागं पळत आहेत. त्यांच्याबरोबर माझं मन ही मागंच पळतंय. शरीर गाडीबरोबर पुढं, मन मात्र मागं, कोल्हापूरच्या त्या माझ्या वाड्यात. त्या शाळेत, त्या देवळात, त्या तलावावर. खरंच, माधव, मन अजून तिथंच रेंगाळतंय रे. वयाची बावीस वर्षं तिथंच काढली ना मी. लग्नानंतर तुझ्याबरोबर तिथून आले. नंतरही अधूनमधून मी जायचे ना तिथं. तूही असायचाच बरोबर कधी कधी. नागपूरला आपला संसार थाटला होता. नागपूर-कोल्हापूर अंतरच किती मोठं रे ! इतक्या लांब सारखं सारखं नाही जमायचं. आपल्या पहिल्या बाळाच्या, हर्षदच्या वेळी मी माहेरी म्हणून आले होते. तेव्हा सलग तीन महिने राहिले, तोच माहेरचा मोठा मुक्काम अन् शेवटचाही.

      June 5, 2026


  • देव ही संकल्पना

    अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना …..

      October 7, 2017


  • विचार आणि मी

    व्यक्ती आणि वृत्ती ह्या नेहमीच वेगळ्या असतात, वृत्ती या सतत बदलत असतात का एका व्यक्तीच्या , हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे देता येतील.

      September 16, 2021


  • रिव्हर्सिंग फॉल्स’ची किमया

    उलट्या दिशेने वाहत असलेला पाण्याचा प्रवाह कोणी पाहिलाय ? त्याचे उत्तर कदाचित नाही, असेच असेल. परंतु मी मात्र त्याचे उत्तर ‘हो’ असेच देईन. उंच भागाकडून सखल प्रदेशाकडे वाहत जाणे हा पाण्याचा गुणधर्म ! मग माझे उत्तर ‘हो’ कसे ? असा प्रश्न सर्वांनाच पडणे स्वाभाविक आहे. सेंटजॉन शहराजवळच सेंटजॉन नदीत हा चमत्कार पहायला मिळतो. हा प्रकार पाहिल्यानंतर कोण्या जादुगाराने केलेला नजरबंदीचा; खेळ वाटावा; परंतु तसे कांही नाही, तर ती निसर्गाची किमया आहे.

      May 9, 2021


  • स्वर-मंच’ची जडणघडण

    या नंतरचा काही काळ मात्र मी स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीच्या जडणघडणीसाठी दिला. सुगम संगीताचे सर्व प्रकार मी शिकवत होतो. पण रागदारी संगीत, हार्मोनियम, तबला, गिटार अशी अनेक वाद्ये शिकण्यासाठी लोक चौकशी करायला लागले. माझ्या काही निपुण विद्यार्थ्यांनाच मी शिक्षक बनवले. अल्पावधीतच श्रीरंग टेंबे, सागर टेमघरे, प्रज्ञा टेंबे, मनिषा शहा, मनोज कांबळे, समीर टेमघरे, अमेय ठाकूरदेसाई, कुलकर्णी असे अनेक शिक्षक हे सर्व प्रकार शिकवायला लागले.

      July 23, 2022


  • या ‘देवा’वर या ‘चिरतरूणा’वर शतदा प्रेम करावे

    सुरुवातीला ढगाळ्या पॅन्टमधला, केसांचा कोंबडा ठेवलेला देव, काळानुरूप बदलत गेला.

      October 3, 2021


  • आंबेटाकळीची आमराई

    माझे मूळ गाव खामगाव तालुक्यामधील आंबेटाकळी आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झालेले असून गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे, नावाप्रमाणे आंबेटाकळी शिवारात आमराई होत्या. त्या लोप पावल्या असल्या तरी आठवणी मात्र कायम आहेत. याविषयी…

      February 13, 2019


  • प्रेमात? वाट्टेल ते! (लघुकथा)

    वाट पहाणं किती त्रासदायक असत, हे समीरला आज पुन्हा जाणवलं. ‘साल, या पोरींना वेळच महत्वच नसत!’ त्याने सातव्या वेळेला आपल्या मनगटावरील घड्याळातवर नजर टाकली. आख्खे वीस मिनिट, तो या प्रेमदान हॉटेलच्या लॉन वर अंजलीची वाट पाहत होता! धिस इज टू मच! वेटर दोनदा ऑर्डरसाठी घुटमळून गेला होता.

      January 21, 2021


  • आगे भी, जाने न तू.. पीछे भी, जाने न तू..जो भी है, बस इक ‘यहीं पल’ है..

    तिचाच गाजलेला ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट गणपतीच्या दिवसांत रस्त्यावर गर्दीत बसून पाहिला होता. ‘नीलकमल’ चित्रपटात ती होती. शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात तिने अविस्मरणीय भूमिका केल्या.

      March 30, 2022