नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म महान व श्रेष्ठ ही संकल्पना मनांत द्रढ झालेली जाणवत होती. तसा त्यांचा मित्र परिवार मोठा असल्याचे दिसून येत होते. कोणीही धर्माबद्दल वेडा वाकडा शब्द उच्चारला तर ते मिळून त्याच्यावर हल्ला करीत. धर्म रक्षण व देवाची सेवा हे जणू त्यांचे ब्रिद होते. सारे ज्ञान फक्त कुणाकडून ऐकलेले, वा साधारण पुस्तके वाचलेले. अनुभव संपन्नता त्यांत मुळीच नव्हती. कोणतेही धर्माचे ग्रंथ वा अध्यात्म यांचा अभ्यास नव्हता.
एकदा कुणीतरी चित्रकाराने देवीचे चित्र रंगवले. त्यांत त्याने देवीला माकडाच्या पाठीवर बसून जात असल्याचे दर्शविले. अर्थांत हे अत्यंत अयोग्य व विक्षीप्त होते. झाले ते चित्र बघतांच या दोन्ही मित्रांचे टाळके फिरले. त्यानी मित्रांचे टोळके जमवून ते भितीचित्र काढून फाडून टाकले. शिवाय त्या चित्रकाराचा मागवा घेत त्याची पिटायी पण केली. पोलिसांना त्यात लक्ष घालावे लागले.
आम्ही सोसायटीची मंडळी एकत्र जमून जवळच असलेल्या एक तिर्थक्षेत्री सहलीला गेलो होतो. आमच्या सोबत भास्कर व अविनाष दोघेही होते. सहल छान झाली. एक गोष्ट मात्र खूपच खटकली. तिर्थक्षेत्राजवळ एक मोठे कुंड होते. जे पाण्याने भरलेले होते. परंतु अनेक वर्षे त्या पाण्याला उपसाच नसल्यामुळे पाणि स्थिर झालेले होते. परिणामी अत्यंत दुर्गंदीयुक्त वाईट स्थितीत होते. सर्वानी फक्त ते पायावर घेतले. दोन थेंबे डोक्यावर शिंपडले. मात्र कुणीही ते तिर्थ म्हणून समजून प्राशन केल नाही. भास्कर व अविनाष यानी तर तिथे कुंडाच्या पाण्याला स्पर्श देखील केला नाही.
कोणत्या धार्मिक भानाना ते प्रभावित करु बघत होते. कोणत्या धार्मिक तत्वाना ते साथ देत होते. धार्मिक संकल्पने मधील कोणत्या अनिष्ठ गोष्टीवर आपली उर्जाशक्ती वापरुन त्यांत सुधारणा करुं इच्छीत होते. सत्य आणि मनातील विचार यांची सांगड कोणती, ह्याचा गंभीरपणे विचीरच केलेला जाणवत नाही. फक्त मलाच वाटते ते सत्य असावे. ह्या वैचारीक व भावनेंत गुंतलेली ही मंडळी. आणि अशीच विचारसरणी बाळगणारी व्यक्ती फक्त भावनिक लाटेत वाहात जातात.
वाईट व विक्षीप्त चित्रकला ही केंव्हाही निषीद्ध. ह्यास सर्वांचीच सहमती असेल. त्याला समजदारीने, विचारानीच विरोध केला पाहीजे. त्याच प्रमाणे जर ते तिर्थकुंड समजले गेले असेल तर त्याची स्वच्छता, उपसा, सभोवताल, ह्यावर खुप विचार व्हावा. कांही माणसे कुणीतरी धर्माची, देवाची थट्टा केली हा समज करुन घेऊन आग्रेसर होतात. तोडमोड करुन सामाजीक स्वास्थ बिघडवतात. जसे आमच्यातले भास्कर वा अविनाश. अशा ठिकाणी अशानी उर्जा खर्च करण्याची खरी गरज वाटते. कोणतेही धर्म स्थळ असो तेथे स्वच्छता, टापटीपपणा नैसर्गिक आकर्शकता, प्रसन्न वातावरण याचा खूप अभाव जाणवतो. अत्यंत दुर्भाग्य व निराशजनक बाब म्हणजे त्यांच्या व्यवस्थापनेकडे लक्ष्य देण्यास कुणासच फुरसत नसते. ह्याचे कारण देवत्वाविषयी गैरसमज व अज्ञान.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 16, 2017
सातपुड्याच्या पायथ्याशी येळकोटवाडी नावाचं गाव व्हतं. साधारण दीड दोन हजार वस्तीचं गाव.. गाव तसं लहानच… गावाला खंडूबा प्रसन्न व्हता… गावात शिरताच म्होहर च खंडूबाचं देवुळ व्हतं …या खंडूबाच्या देवळाच्या रावळात एक माणूस बशेल असायचा… दिसा तो नसायचा पण रातीला तो तिथंच गवसायचा… त्याचं नाव पांडबा…
August 13, 2023
सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.! त्याच्या हातून चार शेंगा जास्त सुटायच्या.त्यालं कुठं,कव्हा आण कसे हात मोकळे सोडायचे,ही कला अवगत व्हती.आवळा देऊन कोव्हळा काढण्याच्या बाबतीत तेव लय पटाईत व्हता.सोंडू पाटलाच्या घरी चोवीस घंटे लक्ष्मी पाणी भरायची.घरची गडगंज संपत्ती,दोन चार वेगळाले धंदे,शेतजमीन,चार पाच बैलगाड्या,दहा पंधरा दुभती जनावरं,संगटच शेतात ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,थ्रेशर सारखे आधुनिक यंत्रबी दिमतीलं व्हतेच. दोन पोर्ह आणि जीव ववाळणारी पाटलीन हे त्याचं विश्व व्हतं. दिलदार मनाचा हा माणूस नावासारखाच रांगडा व्हता.उंच धिप्पाडं शरीर,तुर्रैबाज फेटा,आकडेदार लांब लांब जाड्या मिश्या अन भेदक नजरं असा पाटलाचा रूबाब व्हता.पाहताच क्षणी कोणालंबी जरब बसावी असा हा सोंडू पाटील…!! पंचक्रोशीत एक वजनदार आसामी म्हणून परसिध्द व्हता.तसं तरुणपणातं पाटीलं पंचक्रोशीतला एक नावाजलेला पैलवानं मनून वळखला जायचा.पाटलांनं लय गावचे आखाडे मारले व्हते.शंकरपट,कबड्डी, कुस्तीसारख्या अस्सलं मातीतल्या खेळायबरोबरचं पाटील तमाशाचाबी लयचं नांदिक व्हता.आजबी कुठंपण शंकरपट,कबड्डी,कुस्ती किंवा तमाशाचा फड पडल्याची जराशी जरी खबर कानावर आली की पाटलाची डमनी जुपलीच मनुन समजायचं….! तर आसा हा सोंडू पाटील जेवढा दिलदार तेवढाच बेरकीबी व्हता.
January 20, 2026
सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या , दोन शिळ्या भाकरी ,बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे, असा ‘अल्प ‘ नाश्त्याचा मुडदा पाडून ,मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते . अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते . मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत . अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते.
April 5, 2018
आपल्या गाजलेल्या पंधरा वर्षांतील चित्रपटांतील गाणी ऐकली की, मन प्रसन्न होतं.. मन भूतकाळात जातं.. ते रमणीय दिवस आठवतात.. मरगळलेल्या मनाला पुन्हा उमेद मिळते… ही फक्त आपल्या अभिनयाची ‘जादू’ आहे.
October 12, 2021
नियमितपणे सकाळी फिरावयास जाणे हे ठरून गेलेले होते. निवृतीच्या काळात अत्यंत सोपा व चांगला शरीराच्या सर्व अवयवांना पोषक असा हा …..
November 5, 2013

घरातली मुलांची भांडणं हा काही नवीन प्रकार नाही. पण त्यातला विशेष प्रकार म्हणजे पालकांची मुलांसोबत भांडणे. या सेक्शन मधे अनेक उपप्रकार आहेत. आज त्यातलाच एक पाहू. काहीवेळा पालकच मुलांशी भांडण उकरुन काढतात.
मुलांशी मस्त भांडतात. पण नंतर त्यांना असं वाटतं की मुलेच आपल्याशी भांडत होती. अशावेळी त्या मुलांची फार पंचाईत होते. कारण आपल्या मनातील राग किंवा आपल्याला पालकांची न आवडलेली गोष्ट ही मुले आपल्या भांडोर्या पालकांना स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. पालकांचा अभिनिवेश पाहून ही मुले एकतर एकदम चुप्प बसतात किंवा भोकांड पसरतात. आणि मग त्या पालकांची खात्रीच पटते की,‘आपलं वागणं योग्य असल्यामुळेच, मुलाची ही नाटकं सुरू आहेत.’
June 7, 2010
थोरला मुलगा पाचवीला असताना त्याची आई आजारपणात गेली. मास्तरांनी आपल्या मुलांना सावत्र आईचा जाच नको म्हणून दुसरं लग्न केलं नाही. कळता थोरला व मास्तरांनी स्वयंपाक, घरकाम करीत मुलांना मायेनं वाढवलं. शिक्षकांची नोकरी करताना वर्गात व घरात मास्तरांनी मुलांवर चांगलेच संस्कार केले.
October 22, 2021
मनाला शांत करणाऱ्या या भजनाच्या ओढीने जेंव्हा ज्ञानमंदिराकडे मन धाव घेते तेंव्हा, अंगात चिंध्यांचा अंगरखा, एका कानात फुटक्या बांगडीची काच आणि डोक्यावर मडके घेतलेल्या एका पुरुषसिंहाचे दर्शन घडते… ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज अर्थात संत गाडगेबाबा ….
March 12, 2020
… म्हणून ज्या पद्धतीने आपण घरातील लोकांना आपलं म्हणून माफ करतो त्या पद्धतीनेच या समाजाला देखील आपल्याला माफ करता आलं पाहिजे.
December 4, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti