(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्त्री: विविध अनुभूतींनी परिपूर्ण एक अजूबा

    स्त्री म्हणजे काय आहे?’ या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देता येईल. स्त्री म्हणजे एक ‘अजूबा’ आश्चर्य आहे. परमेश्वराची अजोड निर्मिती आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या परिचक्रातील पहिली महत्त्वाची गोष्ट. उत्पत्ती – म्हणजे एखादी गोष्ट निर्माण होणे. स्थिती – म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या गोष्टीचे अस्तित्व आणि तिसरी स्थिती – लय म्हणजे एखादी गोष्ट संपून जाणे, विलय पावणे, मृत्यू. सर्व सृष्टी या परिचक्राला बांधलेली आहे. परंतु यातील – निर्मिती, उत्पत्तीची ताकद महत्त्वाची आहे.

      July 26, 2023


  • कोरडाच राहिलो सदा

      

      May 28, 2013


  • प्राजक्त

    मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला…तो काही माणूस नाही नं.

      July 25, 2017


  • मला देव दिसला – भाग ३

    परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जावून त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. पूजाअर्चा, पौराणीक ज्ञानकथा, देवस्थाने देवालयांच्या भेटी, भजनकिर्तन, नामस्मरण, मन-विचार आणि भावनांची शुध्दता, धार्मिक ग्रंथाचे वाचन, ध्यान साधनेचा सराव, त्या परमात्म्याच्या सगुण वा नंतर निर्गुण दिव्यतेची ओढ हे सारे मार्ग हलवले जात होते.

      March 18, 2021


  • विदारक सत्य

    काही केल्या रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्याला थोडेसे तेल लावून झाले. एक जपाची माळ ही करुन झाली पण डोळा काही मिटत नव्हता. कधी ह्या कुशीवर तर कधी त्या कुशीवर करत करत रात्र कुठे संपली हेच समजले नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे रोजंदा व्यवहार सुरु झाले.

      November 25, 2025


  • माझी कथा – भाग ८

    आमच्या कंपनीतील कारागीर जाधव आणि मी आमच्यात अनेक विषयांवर चर्चा व्हायची एकदा त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक सत्य घटना कथन केली होती त्यांचे वडील वारले त्याच दिवशी त्यांच्या शेतात नांगर बांधला होता.

      August 26, 2021


  • सुटीतले घर आणि घरातली सुटी

    सुटीची चाहुल लागू लागली की घरात दोन प्रकारचे वारे वाहू लागतात. एक, अरे बापरे! आता दिवसभर ही घरात असणार. आता यांना बिझी कसं काय ठेवायचं? दोन,व्वॉव! या सुटीत काहीतरी वेगळीच धमाल करुया. यातले 'पालक वारे' कुठले व 'मूल वारे' कुठले हे तुम्ही ओळखलंच असेल. 'सुटीत करायचं काय?' असा प्रश्न अनेक पालकांना पडतो आणि मग मुलाची इच्छा असो वा नसो त्याला कुठल्यातरी शिबिरात किंवा छंदवर्गात डांबून ठेवलं जातं. जे पालक मुलांवर विश्वास ठेवायला कचरतात तेच पालक असा आततायी निर्णय घेऊ शकतात. आपलं मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आपल्या मुलाच्या आाशा, आकांक्षा किंवा त्याच्या आवडी निवडी या आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात. म्हणूनच आपण कुठलीही कृती करू तेव्हा त्यातून आपल्या मुलाचा आत्मगौरव आपणच राखला पाहिजे व त्याचा आत्मसन्मान जपला पाहिजे. सुटी ही एक संधी आहे,मुलांना वेगवेगळ्या माध्यमांची ओळख करुन देण्याची, नवनवीन गोष्टी शिकण्यास त्यांना प्रवृत्त करण्याची पण सक्तीने शिकविण्याची नव्हे. विनोबांनी म्हंटलं आहे,'शाळा घरात गेली पाहिजे आणि घर शाळेत आले पाहिजे.' मुलांच्या शिकण्यासाठी आपण हेच सूत्ररुपात वापरणार आहोत. मुलांना चाळीस दिवस सुटी आहे असं समजून मुलांसाठी कुठल्या वेगवेगळ्या उफमांची आखणी करणे शक्य आहे ते पाहुया. पण एक लक्षात ठेवा, यासाठी आपण ही मुलांना आपला थोडा वेळ द्यायला हवा आणि तो ही न चिडचिडता. हे सगळे उफम मुलांना शिकविण्यासाठी नाहीत तर त्यांना त्यातून काही नवं शिकायला मिळावं म्हणून आहेत. मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ देत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रयत्न करु दे. यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेऊ दे. आणि आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो हा विश्वास ही त्यांच्या मनात रुजू दे. तुमच्या मुलांना नवीन चुका करण्याची संधी तर द्याच पण चुकांतून शिकण्याची उमेद ही त्याच्या मनात चेतवा. पण कृपया.. .. तुमच्या इच्छे खातर व तुम्ही ठरवले आहे तेच तुमच्या मुलांना 'शिकविण्याचा प्रयत्न' करू नका किंबहुना तसा अट्टाहास ही करू नका.

    1. आपण स्वयंपाकघरापासून सुरुवात करुया. स्वयंपाकघरात मिसळण्याचा डबा असतो. यातील प्रत्येक पदार्थाचे नाव मुलांना माहित असू शकते पण ते कधी व का वापरायचे याची त्यांना ओळख करुन द्यायला हवी. उदा. फोडणी करताना मोहरी व जिरे कधी घालायचे? का? भाजी शिजताना तिखट घालायचे? की शिजल्यावर? की त्याआधीच? फोडणीचे प्रकार किती? तडका म्हणजे काय?

    2. कोणकोणत्या पदार्थांसाठी फोडणी करताना हळद वापरतात? का? ताकाची कढी करताना एकदा फोडणीसाठी हळद वापरून व एकदा न वापरता केली तर चवीत काय फरक पडतो?

    3. भाज्यांचे मुख्य चार प्रकार आपण वापरतो. फळभाजी, फूलभाजी, पालेभाजी व कंदमुळे. हे प्रकार मुलांना ओळखता येतात का? त्याचा एखादा तक्ता तयार करता येईल का? त्या तक्त्यात कोणकोणत्या प्रकारची माहिती भरता येईल?

    4. आपण ज्या भाज्या घरात आणतो 'त्या ताज्या आहेत व चांगल्या पण आहेत' हे ओळखण्यासाठी आपल्या अनुभवावर आधारित आपण काही कसोट्या तयार केलेल्या असतात. त्या कशा केल्या? का केल्या? त्यात काही सुधारणा कराविशी वाटते का? यासाठी मुलांना त्या कसोट्या दाखवा. त्यांना त्याचा अनुभव घेऊ दे. त्यात त्यांना काही सुधारणा सुचवाव्यासा वाटतात का? याबाबत त्यांच्याशी चर्चा करा. त्यांचं म्हणणं जरी चुकत असेल तरी लगेच त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना समजून घ्या. त्यांना पुन्हा पुन्हा सुधारण्याची संधी द्या. उदा.ताजी पालेभाजी कशी ओळखावी? नारळ घेताना तो हलवून व वाजवून ही पाहतात? यापैकी कुठलीही एकच ा*ीया करुन चालेल का?का? बाजारात ताजी भाजी महाग असते व शिळी भाजी स्वस्त असते. पण नवीन बटाटे स्वस्त असतात व जुने बटाटे महाग असतात,असे का? (नविनच्या मानाने जुने बटाटे लवकर शिजतात.)

    5. निरनिराळ्या फळांची वेगवेगळ्या तऱ्हेने ओळख करुन देणे. उदा. प्रत्येक फळ कापण्याच्या विशीष्ट पध्दती असतात. पपई, कलिंगड, फणस, पपनस, अननस, टरबूज अशी फळे मुलांना आवर्जून कापायला द्या. त्यांच्या चुका होतील ही ,पण त्यातूनच त्यांना शिकायला प्रोत्साहित करा.

    6. वेगवेगळ्या फळांच्या बिया जमवा. त्या साफ करून ठेवा. त्याचं वर्गीकरण करा. पावसाळ्यात सहलीला जाल तेव्हा या बिया डोंगरावर रुजवण्याचा प्रयत्न करा.

    7. फळ ताजे च चांगले कसे ओळखावे? याबाबत मुलांशी चर्चा करा. संत्र व आंबा हातात घेतल्या नंतर त्याचा ताजेपणा व चांगलेपणा ओळखण्यासाठी काय काय कसोट्या असू शकतात याची एक तौलनिक यादीच तयार करा. वेगवेगळ्या फळांसंदर्भात अशा याद्या करणं सहज शक्य आहे.

    8. काही फळांची चव ओळखण्यासाठी त्यांचा आधी वास घ्यावा लागतो. अशी फळे कोणती? त्याची सूची बनवा. वास नेमका कुठे घ्यायचा असतो? फळाच्या सर्वच ठिकाणी सारखाच वास येतो का? उदा. आंब्याच्या डेखाजवळ, मध्यभागी व त्याच्या टोकाजवळ सारखाच वास येतो का? अजिबात वास न येणारी फळे कोणती याची पण एक यादी तयार करा.

    9. फळांचा एक तक्ता तयार करा. यातील रकाने असे ही असू शकतील : 1.फळाचे चित्र. 2.फळाचा रंग.. बाहेरुन. 3.फळाचा रंग.. आतून. 4.चव. 5.खाताना सालीसकट खाता येते का? 6.फळात बी दिसत नाही असे फळ. 7.एकच बी असणारे फळ. 8.अनेक बिया असणारे फळ. 9.फळाबाहेर बी असणारे फळ. 10.वर्षभर सहजी उपलब्ध असणारे फळ. 11.फळाचा हंगाम. 12.फळाचा ताजेपणा ओळखण्यासाठीच्या कसोट्या. 13.फळाचा चांगलेपणा ओळखण्याच्या कसोट्या. 14.फळाचे पान. 15.फळाचे अंदाजे वजन. 16.फळाचा औषधी उपयोग. 17.फळापासून तयार होणारे विविध गोड पदार्थ. 18.फळाचा रस काढून तो पितात का? 19.फळाचा उपयोग लोणची किंवा चटणी अशांसाठी होतो का? 20.घरातल्या कुणाकुणाला हे फळ आवडतं? इत्यादी. यापुढील रकाने तुमचे.

    10. निरनिराळी फळे, भाज्या व कंदमुळे यांच्या पासून आपणास वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार करता येतात.उदा. आंबा, जांभूळ, बीट, पालक, कोथिंबीर,चिंच इत्यादी. या संदर्भातला एक सुंदर रंगीत तक्ता तयार करता येईल.

    11. नैसर्गिक रंग वापरुन वेगवेगळी चित्रे रंगविता येतील.

    12. सकाळपासून ते रात्रीपर्यंत स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रक्रीया घडत असतात. अशा प्रक्रीयांची एक यादी तयार करायला हवी. उदा. कापणे, चिरणे, मळणे, तिंबणे, उकडणे, वाटणे, कुटणे, उलथणे, परतणे, घोळवणे, भिजवणे, उपसणे इत्यादी.

    13. स्वयंपाकघरातील विविध प्रक्रीयांचा प्रत्यक्ष अनुभव मुलांना मिळालाच पाहिजे. हे अनुभव मिळत असताना जशा मुलांच्या काही चुका होतील तशाच काही गोष्टी वाया जाण्याची पण शक्यता आहे. पण आपले मूल शिकण्यासाठी हे आवश्यकच आहे याची कृपया नोंद घ्यावी. कणिक मळणे,पोळी लाटून बघणे, पापड भाजणे, कच्चा व उकडलेला बीट किसणे, नारळ खवणणे, तव्यावरचे ऑम्लेट, पोळी किंवा घावन उलथणे इत्यादी.

    14. मुलांसोबत गप्पा मारत भाजी निवडणे, भाजी चिरणे सहज शक्य आहे. गप्पा मारताना हळू-हळू मुलांनाही भाजी निवडण्यासाठी/चिरण्यासाठी सहभागी करुन घेता येईल. आई/बाबां सोबत हा अनुभव घेताना त्यांना ही आनंद होईल,

    15. कुठलाही एक पदार्थ जर तयार करायचा असेल तर त्यावेळी किती प्रक्रीया घडत असतील याची एक यादी तयार करायला हवी. उदा. भेंडीची भाजी करायची आहे किंवा चहा करायचा आहे तर क्रमवार घडणाऱ्या प्रक्रीया कोणत्या? याचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घ्यावा आणि मगच लिहावे.

    16. रविवारी किंवा सुटीच्या दिवशी मुलांनी मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पदार्थ तायर करावा. उदा. भेळ, गाजराची कोशिंबीर, कांदा पोहे, दही पोहे, चिकी इत्यादी.

    17. आपल्या घरात एका महिन्यासाठी किती किराणा सामान लागते याची यादी मुलांनी करावी. शक्य असल्यास, मुलांनी घरातल्या कुणा मोठ्या माणसासोबत बाजारात जाऊन ते खरेदी करावे. सर्व सामानांचे बाजारभाव टिपून ठेवावेत.

    18. आई/बाबांच्या मदतीने 'आमच्या रेसिपी' नावाचे छोटे रेसिपी पॉकेट बुक तयार करावे. त्याचप्रमाणे काका/काकू किंवा मामा/मामी यांच्या मदतीने 'मामाज् रेसिपी बुक' किंवा 'अंकल्स रेसिपी' अशी पुस्तकांची मालिका पण तयार करता येईल.

    19. घरातला फ्रीज स्वच्छं करणे. त्यातील शेल्फची रचना बदलून पाहाणे. (अशावेळी घरातल्या मोठ्या माणसांची मदत अपेक्षित आहे. 'मदत याचा अर्थ सहवास'; सहभाग नव्हे.)

    20. घरातील कुठल्याही कामाबद्दल घृणा किंवा तिटकारा वाटणे योग्य नाही. श्रममूल्य व श्रमानंद याची जाणीव असणे गरजेचे आहे. एखाद दिवशी आई/बाबांसोबत घरातील भांडी घासण्याचा / कपडे धुण्याचा अनुभव सुध्दा मुलांनी घ्यायला हवा.

    21. थोडेफार सामान इकडे तिकडे हलवून स्वयंपाकघरातील किंवा घरातील रचना बदला येईल का? जर अशी रचना बदलायची असेल तर, ती का बदलायची? याबाबत चर्चा करता येईल. ही रचना बदलण्याअगोदर ज्या वस्तू सरकवायच्या असतील त्यांची मापं घ्यावी लागतील. मापं घेण्यासाठी काही वेळा दोऱ्याचा, काठीचा किंवा पट्टीचा उपयोग करावा लागेल. मुलांच्या सल्ल्यानुसार रचना एकवेळ बदलून पाहायला काहीच हरकत नाही.

    22. घरातील सर्वांनी मिळून सर्वांचे कपड्यांचे,पुस्तकांचे खण आवरणे.

    23. खण आवरत असताना बटण शिवणे, हुक शिवणे, फाटलेला कपडा शिवणे, उसवलेल्या ठिकाणी टिप घालणे यासाठी मुलांची मदत घ्यावी.

    24. कपड्याचा खण आवरत असताना प्रत्येक कपड्याचा पोत कसा वेगळा असतो याची मुलांना ओळख करुन द्यावी. उदा. सिल्क साडी, कॉटन साडी, टी शर्ट, टॉवेल या गोष्टी आपण डोळे बंद करुन केवळ स्पर्शाने ओळखू शकतो कारण या कपड्यांचा पोत आपल्याला स्पर्शाने समजतो. घरातच असणारे वेगवेगळे 80 पोत ओळखायला मुलांना मदत करा. त्यांची एक यादी बनवा. उदा. सनमायका, लाकूड.खिडकीची काच, बाथरुमच्या दरवाज्यावरची काच, ओटा, सिंक, आरसा, जमीन, भिंत इ.

    25. तसेच कपड्यांचे वेगवेगळे रंग व डिझाइन्स याबाबत ही मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारा. प्रत्येक घरात किमान वेगवेगळ्या प्रकारच्या चार ते पाच साड्या असू शकतात. हे प्रकार नेमके कशामुळे पडले? त्यांची खासियत काय आहे? हा प्रकार कुणापेक्षा स्वस्त व कुणापेक्षा महाग असू शकतो? आणखी कुठले प्रकार असू शकतात? याबाबत मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारा.

    26. एखाद्या संध्याकाळी मुलांना साडीच्या दुकानात घेऊन जा. तेथील निरनिराळ्या साड्या,त्यांचे रंग, काठ, पोत, डिझाइन्स, त्यांची अनोखी खासियत याची मुलांना ओळख करुन द्या. (यासाठी त्यावेळी नवीन साडी विकत घेण्याची गरज नाही. हे तुम्ही ओळखले असेलच.)

    27. त्याचप्रमाणे पॅण्ट,शर्ट व ब्लाउज यांना कशाप्रकारे इस्त्री करावी लागते याचा मुलांना प्रत्यक्ष अनुभव देणे. प्रत्येक कपड्याची घडी करण्याची पध्दत वेगवेगळी असते याची त्यांना जाणीव करुन द्यावी. घड्या करण्याचा सराव द्यावा. त्यातील बारकावे दाखवावेत. उदा. साडीची घडी करताना आधी हातात फॉल धरावा लागतो. साडीच्या निऱ्या कशा करतात? याबाबतची त्यांची उत्सुकता चाळवावी. त्यांना प्रयत्न करू द्यावा.

    28. कपडे धुतल्यानंतर हँगरवर लावायची पध्दत व कपड्यांना इस्त्री केल्यावर ते हँगरवर लावायची पध्दत वेगवेगळी आहे,याबाबत त्यांना सजग करणं.

    29. दोन मोठे ड्रॉइंग पेपर एकमेकांना चिकटवावेत. घरातल्या सर्वांनी मिळून त्यावर एक चित्र काढावे व सर्वांनी मिळूनच ते रंगवावे. भिंतीवर किंवा कपाटावर हे चित्र लावून ठेवावे. चित्राचा विषय हा निसर्गचित्र,डिझाइन किंवा सर्वांना आवडेल व सोपा वाटेल असा असावा.

    30. '100 टक्के कॉपी चित्रांचे प्रदर्शन.' सुटीच्या दिवशी मुलांनी घरातल्या मोठ्या माणसांच्या समोर बसून त्यांचे चित्र काढावे. त्यानंतर मोठ्या माणसांनी लहान मुलांसमोर बसून त्यांचे चित्र काढावे. चित्र कुणाचे आहे याचे चित्राखाली नाव लिहू नये;पण चित्रकाराच नाव अवश्य लिहावे. अशा 100 टक्के कॉपी चित्रांचे घरातच प्रदर्शन लावावे.

    31. वेगवेगळ्या प्रकारची शुभेच्छा पत्र तयार करण्यासाठी या सुटीचा उपयोग करता येईल. उदा. रंगात भिजवलेला दोरा वापरुन, ठसेकाम करुन, पाकळ्या किंवा पेन्सिलीची सालं चिकटवून, कोलाज, सुलेखन, स्प्रे पेंटिंग, जलरंग इत्यादी.

    32. रविवारचे दोन तास भटकंती व शोधाशोध. आजपर्यंत आपण आपल्याच गावातल्या किंवा जवळच्या गावातल्या ज्या रस्त्यावरुन गेलो नाही किंवा जो रस्ता वा जो विभागच आपल्याला माहित नाही अशा ठिकाणी जाणे. नवीन रस्त्याचा/विभागाचा मुलांच्या सोबत शोध घेणे. मुलांसोबत शिकण्याची/शोधण्याची प्रक्रीया सुरू ठेवणे.

    33. आपल्या घरापासून स्टेशन पर्यंत / घरापासून शाळेपर्यंत / घरापासून एस टी डेपो पर्यंत चालत जाण्यास उपयुक्त ठरेल असा नकाशा काढणे. वाटेत बँक, लोहमार्ग, देऊळ, मशीद, चर्च, मेडिकलचे दुकान, हापशी अशा आणि इतर गोष्टी असू शकतात. यासाठी विशिष्ट खुणांचा वापर करणे. शक्य असल्यास प्रमाणित स्केलचा वापर करणे. (पावलांनी अंतर मोजणे. पन्नास पावले म्हणजे एक सें.मी. यापध्दतीने स्केल घेऊन नकाशा काढणे.)

    34. फक्त एक महिना घरातल्या सर्वांनी रोज झोपण्याच्या आधी 'रोजनिशी' लिहिणे. किमान एक ओळ तरी रोज लिहिलीच पाहिजे असा संकल्प करुन तो तडीस नेणे. (आपण आपल्या कामाची व आपण जे काही नवीन शिकलो त्याची नोंद ठेवता येणे गरजेचे आहे. रोजनिशी हा त्यासाठी उत्तम सराव आहे.)

    35. आपल्याला पत्त्यांचे वेगवेगळे खेळ येत असतात. हे खेळ मुलांसोबत खेळावेत. आजी आजोबांच्या किंवा इतर कुणाच्या मदतीनेसुध्दा मुलांना पत्त्यांचे नवनवीन खेळ शिकवावेत. उदा.बदाम सात, गुलाम चोर, नॉ ऍट होम, लॅडीज, झब्बूचे वेगवेगले प्रकार, मुंबरी, मेंढीकोट, तीनशे चार, पाच तीन दोन, सात आठ इ.

    36. मनोरंजक पण तरीही डोक्याला चालना देणारे अनेक खेळ बाजारात मिळतात. बाजारातून नुसते खेळ विकत आणून ते मुलांसमोर टाकले (म्हणजे गुरांसमोर चारा टाकतात तसे) तर मुले अशा खेळांशी फारवेळ खेळत नाहीत. आपणाला मुलांसोबत खेळावे लागते. वेळप्रसंगी हरावे लागते. तेव्हांच आवडीने मुले त्या खेळाशी खेळू लागतात. उनो, स्पेलो फन, ब्रेनव्हिटा, चायनीज टॅनग्राम असे काही खेळ चांगले आहेत.

    37. विज्ञानाचे सोपे प्रयोग समजावून सांगणारी अनेक मराठी व इंग्रजी पुस्तके आता उपलब्ध आहेत. मुलांच्या मदतीने जर का त्याचे वाचन केले तर त्यातील सोपे प्रयोग मुले स्वत:हून करू शकतील.

    38. एखादा खेळाडू किंवा आपली आवडती व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या अनुशंगाने सर्व माहिती गोळा करून त्याचीच एक स्वतंत्र चिकट वही तयार करता येईल. उदा. सानिया मिर्झा, सचिन तेंडुलकर, राष्ट्रपती कलाम, आंबेडकर, गांधी, डॉ.अभय व राणी बंग, मेधा पाटकर, नानाजी देशमुख, जे.के.रोलींग इत्यादी.

    39. काही समारंभाच्या निमित्ताने किंवा सहल, वाढदिवस अशावेळी काढलेले खूप फोटो घरात असतात. काहीवेळा ते नुसतेच पाकीटात कोंबलेले असतात. सगळे फोटो अल्बम मधे लावणे.प्रत्येक फोटोच्या मागे तारीख घालणे. तारीख आठवत नसल्यास शोधून काढणे. व प्रत्येक फोटोच्या खाली,सर्वांनी मिळून एक गोड गोड, किंवा चमचमित वा झणझणित कॉमेंट लिहिणे.

    40. गणितातल्या अपूर्णांकाविषयी काही मुलांना भीती असते. किंवा त्याचा मुलांनी धसका घेतलेला असतो. सुटीचा उपयोग अपूर्णांकाची भीती पूर्णपणे घालविण्यासाठी करता येईल. आपल्या घरातच कितीतरी पूर्णांक अपूर्णांक असतात. त्यापासूनच खेळायला सुरुवात करता येईल. हाफ पॅण्ट व फूल पॅण्ट. खिडकीचा पडदा हा दाराच्या पडद्याच्या अर्धा असतो. खिडकी व दरवाजा. मुख्या दाराची कडी व बाथरुमची कडी यातील फरक. हाफ बनियन व फुल बनियन. टी पॉय,छोटे टेबल व मोठे टेबल. पाण्याची अर्धा लिटरची व एक लिटरची बाटली. एक किलोची व अर्ध्या किलोची बरणी. छोटी बादली व मोठी बादली अशी उदाहरणे घेऊन मुलांना पूर्णांक व अपूर्णांकाचा प्रत्यक्ष अनुभव देता येईल. प्रयोगातूनच मुले शिकतील,समजून घेतील.

    41. घरात (व शेजाऱ्यांकडे) येणाऱ्या वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका त्यांचे काम झाल्यावर फेकून न देता साठवून ठेवाव्यात. सुटीत त्यापासून विविध आकारांचे बुकमार्कस् करता येतील.

    42. काही निमंत्रण पत्रिकांचा कल्पकपणे वापर करुन सुंदर शुभेच्छा पत्रे तयार करता येतील.

    43. एका पोस्टकार्डच किंमत पन्नास पैसे आहे. चाळीस दिवस सुटी आहे असे जर गृहित धरले तर आपणास चाळीस पोस्टकार्ड लागतील. म्हणजे खर्च फक्त वीस रुपये. मुलांनी रोज एक पोस्टकार्ड लिहायचे आहे. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना. एखादी बातमी किंवा लेख वाचून वर्तमानपत्राला, साप्ताहिकाला, मासिकाला. पुस्तके वाचून आपल्या आवडत्या लेखक/लेखिकेला. मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षकांना.

    44. वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मस् मुलांकडून भरून घेतले पाहिजेत.मनीऑर्डरचा फॉर्म. रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करण्याचा फॉर्म. बँकेत पैसे कसे भरावे, चेक कसा भरावा, पैसे कसे काढावेत यासाठी भराव्या लागणाऱ्या स्लीपस् .

    45. घराजवळच्या बँकेत मुलाच्या नावाने खाते सुरू करता येते. त्यासाठी मोठ्या माणसांनी त्याच्या सोबत बँकेत जावे. खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारी प्रा*या मुलानेच पार पाडावी. अगदी आवश्यकच असेल अशा ठिकाणी पालकांनी मुलांना मदत करावी. मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून प्रत्येक महिन्याला थोडीफार बचत करावी.

    46. घरातील टेलीफोनच्या जवळ एका रफ वहीची गरज असते.पटकन पत्ता लिहून घ्यायला किंवा एखादा नंबर टिपून ठेवायला त्याचा उपयोग होतो. शाळेतल्या वापरलेल्या वह्यांमधील कोरे कागद काढून, ते एकत्रितपणे शिवून रफ वही तयार करता येईल. थोड्याशा सरावाने चांगली वही पण तयार करता येईल.

    47. घराजवळ जर एखादा ओळखीचा व्यावसायिक असेल तर त्याच्या दुकानात जाऊन काही बाबतीत प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि काही गोष्टी स्वत:हून शिकणे. यासाठि त्या व्यावसायिकाची परवानगी घेणे, त्याच्या सोयीनुसार आपली वेळ जुळवून घेणे गरजेचे आहे. उदा. शिंपी कपड्यांची मापे कशाप्रकारे घेतो. कापड कसे बेततो. शिलाई मशीन, काजे मशीन व ओव्हरलॉक मशीन यातील नेमका फरक काय. एखादे जुने कापड घेऊन कुठल्याही मापाचा एखादा शर्ट शिवण्याचा घरी प्रयत्न करणे. (हा प्रयत्न म्हणजेच भूमिती व अंकगणिताचा प्रत्यक्ष अनुभव घेणे.)

    48. त्याचप्रमाणे घराजवळील किराणामालाचे दुकान, लॉन्ड्री, बेकरी, डेअरी, औषधाचे दुकान, दवाखाना अशा ठिकाणी रोज दिवसांतून एक तास मुलांनी मदत करण्यासाठी जावे. अशावेळी परवानगी मिळविण्यासाठी,कामाचे स्वरुप ठरविण्यासाठी, वेळ निश्चित करण्यासाठी घरातील मोठ्या माणसांनी मुलांना मदत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी घरी आल्यावर 'आज काय नवीन शिकलास?' असे त्यांनी मुलांना विचारणे ही अपेक्षित आहे. (कृपया एक गोष्ट लक्षात घ्या. 'दुकानात एक तास जाणे म्हणजे पुड्या बांधायला जाणे' असा गैरसमज करुन घेऊ नका. काहीही काम न करता सुध्दा मुलाने एक तास दुकानात बसणे हे ही शिकणे आहे.)

    49. गावातील प्रत्येक दुकानाची पाटी ही वेगळी असते. म्हणजे त्यावरील अक्षरलेखन, रंगसंगती, आकार, त्यावरील चित्रे इ. याचे मुलांनी कालजीपूर्वक निरीक्षण करावे. त्याप्रमाणे वर्तमानपत्रातील जाहिराती, लेखांची शीर्षके पण काळजीपूर्वक पाहावित. विशिष्ट वस्तूचा किंवा गोष्टिंचा अर्थ शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सुलेखन. मुलांनी एक सुलेखन वही तयार करावी. त्या वहीत प्राणी, पक्षी, फळे, फुले, निरनिराळ्या वस्तू यांची नावे वेगवेगळ्या पध्दतीने लिहावित. म्हणजेच 'जीराफ' ज्या प्रकारे लिहिले असेल त्यापेक्षा 'ससा' वेगळ्याप्रकारे लिहिलेले असेल.

    50. रोज घरासमोर वेगळे सुशोभन. सुशोभन करण्यासाठी शक्यतो टाकाऊ वस्तूंचाच वापर करायचा आहे. सुशोभन करण्याच्या विविध पध्दती आहेत. घरासमोर एखाद्या फरशीवर किंवा मातीत कुठलेही चित्र काढावे / आकृती काढावी / ठिपक्यांची रांगोळी काढावी व त्यात रंग न भरता त्याऐवजी रंगीत टाकाऊ वस्तूंचा उपयोग करावा. उदा. बांगड्यांच्या काचा, फळांच्या साली, रंगीत कागदांचे तुकडे, निर्माल्य, रानटी फुले, गवत, सुकलेल्या फुलांच्या पाकळ्या, बीया, रंगीबेरंगी चिंध्या, प्लास्टीकचे तुकडे, लाकडाचा रंगीत भुसा, शेंगांची टरफले, पालेभाज्या निवडून झाल्यावर उरणारी मुळे बारीक चिरुन, चहाचा चोथा इत्यादी.

    51. तुमच्या परिसरातील काही दुकानदारांकडे तुमच्या ओळखी असतील. दुकानदाराच्या आणि तुमच्या मुलाच्या सोयीने, दिवसातील दोन तास मुलाने दुकानात काम करायला हरकत नाही. मुलाने त्याला आवडेल ते काम करावे व नवीन काम ही शिकावे.

    52. आपल्या घरात पंखा, इस्त्री, मिक्सर, टेपरेकॉर्डर अशा वस्तू असतात. या वस्तूंच्या आत काय असतं? त्या कशा काम करतात? याबाबत मुलांना प्रचंड कुतुहल असतं. ज्या दुकानात अशा वस्तू रिपेअर केल्या जातात अशा दुकानात मुलांना घेउन जावं. दुकानदाराच्या परवानगीने मुलांना निरीक्षण करण्याची व प्रश्न विचारण्याची संधी द्यावी.

    53. याचप्रकारे मुलांना जवळच्याच गॅरेज मधे घेऊन जाता येईल.

    54. आंबा, फणस, अननस, पपई, कलिंगड, सिताफळ, रामफळ ही फळं कापण्याची पध्दत वेगवेगळी आहे. मुलांना त्याचा अनुभव मिळणे जरुरीचे आहे. मुलांसोबत फळं कापण्याचा अनुभव घ्या.

    55. गाजर, मुळा, काकडी, टॉमेटो किंवा बीट यांची कोशिंबीर करणे मुलांना जमू शकते. आठवड्यातून दोन दिवस मुलांनी कोशिंबीर करावी यासाठी पालक मुलांना मदत करतील. (मुलांनी केलेली कोशिंबीर,पालक आनंदाने खातील)

    56. महिन्यातल्या एखाद्या संध्याकाळी घरातल्या सगळ्यांनी मिळून भेळ तयार करावी. कुणी कुठले काम करायचे याचे नियोजन मुलांनी करावे.

    57. 'चटकदार भेळेची रंगीत तालीम' झाल्यावर, पालकांनी आपल्या मुलांच्या मित्रांना घरी बोलवावे व त्यांना भेळ खिलवावी.

    58. मुलांना गोष्टीची पुस्तके किंवा वर्तमानपत्रातील वेगळ्या बातम्या, पुरवणी मधील एखादा लेख अवश्य वाचून दाखवा.

    59. या सुटीत खाल्लेल्या फळांच्या बिया जमवा. सुटी संपल्यावर पावसाळ्यातल्या पहिल्या रविवरी मुलांसोबत गावाबाहेर जा. मुलांच्या मदतीने छोटे-छोटे खड्डे खणून या बिया त्यात पसरुन टाका.

    60. गावाबाहेर जंगल करण्यासाठी आपल्या नातेवाइकांकडून, शेजाऱ्यांकडून, बाजारातून किंवा जिथून मिळतील तिथून बिया गोळा करा. मुलांच्या मदतिने घरात 'बी बँक' तयार करा.

    61. सुटीतल्या एका रविवारी घरातल्या सर्वांनी 'आपले कपडे आपणच धुवायचे' असं ठरवा. कपडे धुण्याचं तंत्र व मंत्र मुलांसोबत शिका. मुलांसोबत पाण्यात थोडा दंगा पण करा.

    62. महिन्यातून एक दिवस मुलाने आईसोबत स्वयंपाकघरात काम करायचे आहे.

    63. फक्त सुटी पुरती घरातली काही रचना बदलता येईल का? कॉट, कपाट किंवा शोकेस सरकवून घराची रचना बदलता येते. याबाबत मुलांकडे काही कल्पना असू शकतात. त्याचा विचार करा. मुलांच्या मदतीने घराला वेगळा चेहरा द्या.

    64. घरातील लाकडी स्टूल किंवा दरवाजा घासून ते रंगवणे मुलांना आवडते. तसे करण्याची मुलांना मुभा द्या. काम सुरू करण्याअगोदर ते काम मुलांना नीट समजावून सांगा. पण मुले काम करत असताना त्यांना हज्जारवेळा सूचना देऊ नका. (नाहीतर मुले वैतागुन काम अर्धवटच सोडतील) त्यापेक्षा त्यांच्या सोबत काम करा. रंगवताना मुलांसोबत रंगून जा.

    65. आपले नातेवाईक व ओळखीचे यांचे पत्ते व फोन नंबर असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वह्या मुलांच्या मदतीने तयार करा. या वहीत मुलांच्या मित्रांचे पत्ते व फोन नंबर असतील याची काळजी घ्या

    66. घरातील शिवणाचा डबा यासाठी एक दिवस राखून ठेवा. बटण लावणे, हूक लावणे, शिवणे, टीप घालणे, धावदोरा घालणे याचा अनुभव मुलांना घेऊ दे.

    67. आपल्या परिसरात काही खास वेगळी मुले असतात. अंध, अपंग मुले असतात. शाळा सुरू असताना या मुलांना देण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. सुटीच्या दिवसात त्यांच्यासाठी थोडावेळ देता येईल. त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना पुस्तकं वाचून दाखवणं किंवा त्यांना बागेत घेऊन जाणं अस करता येईल.

    68. मुलांनी आणि पालकांनी मिळून एक गट तयार करावा. या गटाने मिळून एखाद्या रविवारी गावातील बाग स्वच्छं करावी. किंवा नगर वाचनालयातील पुस्तके आवरुन, साफ करुन द्यावीत.

    69. मुलांच्या वहीतील कोरे कागद फाडून घ्यावेत. मुलांच्या मदतीने हे कागद शिवून त्याची वही करावी. रफ वही म्हणून ही वापरता येते.

    70. घरी येणाऱ्या निमंत्रण पत्रीका, किंवा काही जाहिराती जमवाव्यात. हे पाठकोरे कागद एका आकारात कापावेत. वरच्या बाजुने शिवावेत किंवा स्टेपल करावेत. पटकन काही लिहिण्यासाठी या पॅडचा चांगला उपयोग होतो.

    ही यादी आणखी पण वाढविता येईल, पण त्यासाठी मुलांची सुटी वाढविता येणे शक्य नसल्याने आता इथेच थांबावे म्हणतो. मी जरी तुम्हाला सत्तर गोष्टी सुचविल्या असल्या तरी यातूनच तुम्हाला आणखी शंभर गोष्टी सुचतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि यासाठी काहीही मदत हवी असल्यास मला अवश्य कळवा. मी तुमच्या सोबतच आहे.

    मी तुमच्या शंबर नंबरी पत्रांची वाट पाहतोय. कळावे.

    मुलांवर लोभ असावा हीच एक विनंती.

    ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

    राजीव तांबे.

      July 6, 2015


  • नारायण भंडारीचं काय झालं ? – भाग ४

    मी त्याच्याकडे बघत राहिलो. आणि डोळ्यासमोर न्यूज चॅनल्सचे पडदे आले.. कोरोना , परदेशातील बातम्या , व्हायरल व्हिडिओचा तपास , राजकारण , क्षुल्लक गोष्टींवरच्या चर्चा या व्यतिरिक्त भारतीयांना दुसरं जीवन नसावं असं सगळं चित्रण माथी मारलं जात होतं आणि देशापुढचा धोका जनतेसमोर येऊ दिला जात नव्हता .

      February 4, 2026


  • हिरव्या रंगाची ब्रोकोली

    ब्रोकोलीमध्ये खूप प्रमाणात क जीवनसत्व आणि के जीवनसत्व, चांगल्या प्रमाणात ब जीवनसत्वाचे अनेक प्रकार आणि कॅलशियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त ही खनिजं व चोथा असतात. ब्रोकलीमध्ये बीटा केरोटीनच्या स्वरुपात अ जीवनसत्वही असतं.

      October 8, 2021


  • मित्र! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १२

    कोणी नाही तर, तू नक्की येशील याची मला खात्री आहे!’ असा मित्र असेल तर त्याला सांभाळा. कारण जेव्हा सगळे दूर जात असतात, तेव्हा फक्त मित्र जवळ येत असतो!

      December 23, 2020