नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सोयीसाठी लावलेली वस्तू नेहमी उपयोगीच राहील असं नाही आणि बायको हा जीव फोन वर बोलताना नवऱ्याचा आवाज कमी आणि बॅकग्राऊंड चा आवाज जास्त ऐकत असतो. त्यामुळे वेळ काळ आणि परिसर बघून थाप मारावी.
September 10, 2022
विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघात रोज संध्याकाळी पेन्शनर मंडळी जमायची. त्यातील आठ दहाजणं नियमित यायची. त्या ग्रुपमध्ये नाना न चुकता हजेरी लावायचे…..
December 2, 2021
एके दिनीं मी निघून जाईन निरोप घेवून ह्या जगताचा
प्रवास माझा अनंतात तो कसा असेल त्या वेळेचा
आकाशाच्या छाये खालती विदेही स्थितींत फिरत राहीन
'तू' आणि 'मी' च्या विरहीत मी गत कर्माचे करिन मापन
बाल्यातील चुका उमगल्या तरूणपणाच्या उंबरठ्यावरी
सळसळणारे यौवन रक्त वृधावस्तेतील खंत ठरी
पूनर्जन्म तो घेण्याकरितां गर्भाची मी निवड करीन
गत जन्मींच्या चुका टाळूनी आदर्शमय ते जीवन जगेन
शंकेची परि पाल चुकचुके राहील का स्मृति गत जन्माची
नसतां पूनरपि चक्र फिरेल विस्मृति होतां गत कर्माची...५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 12, 2018
खऱ्या अर्थाने ” मॅनॅजमेन्ट गुरु ” म्हणता येईल अशा चार व्यक्ती व्यवस्थापन क्षेत्रात मला भेटल्या ज्या पूर्णतया उर्जावान, ज्ञानी, तपस्वी अशा आहेत- सर्वप्रथम भेटले शारू रांगणेकर, त्यानंतर शेजवलकर, नंतर व्ही. व्ही. देशपांडे आणि सर्वात शेवटी जी. नारायणा उर्फ गुरुजी ! पहिली तीन नांवे आता काळाच्या पडद्याआड गेलीत.
January 29, 2022
मार्केटला जाण्यासाठी मी घराबाहेर पडलो, खाली रस्त्यावर आलो आणि रिक्षाही पकडली. सहजच माझं लक्ष रिक्षा चालकाकडे गेलं. आणि मी चपापलोच!
आमच्याच कॉलनीत राहणारे परब रिक्षा चालवत होते!
"साहेब, नमस्कार," परब आरशातून माझ्याकडे पहात उद्गारले.
"नमस्कार, परब हे काय नवीन? " मी विचारलं.
"हो, हल्लीच हा एक नवीन उद्योग सुरु केला आहे."
"चांगलं आहे," परबांच्या आवाजातल्या मजबूरीच्या सूराला दूर सारण्यासाठी मी म्हणालो.
रिक्षातून उतरत असताना परबांनी त्यांचं रिक्षा पुराण मला सविस्तर ऐकवलं. आपण रिक्षा का चालवतो याचं परबांनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकून मी हबकूनच गेलो.
"तुम्हाला माहितच आहे साहेब मी रिटायर होऊन घरीच असतो. सकाळच्या वेळी आमच्या घरात नुसती धांदल उडालेली असते. मुलाला आणि सुनेला कामावर जायचं असतं, नातवडांना शाळेत जायचं असतं, बायको किचनमध्ये कामात गर्क असते. या सगळ्या गडबडीत मीच एकटा घरात निरुद्योगी असतो. त्यात आमची वनरुम किचन. सगळे घराबाहेर पडण्याच्या धांदलीत असताना मी तिथे लोळत पडणं म्हणजे इतरांना अडचण. थोडक्यात सकाळच्या वेळी आपल्यामुळे घरच्यांना अडचण भासते हे माझ्या ध्यानात आलं तेव्हाच मी काहीतरी उद्योग करण्याचं ठरवलं.
परबांचं रिक्षापुराण रंगात आलं होतं. मीही कान देऊन ऐकू लागलो. परब आपली कथा विस्तारने पुढे सांगू लागले.
"सकाळच्या वेळी घरातून बाहेर पडण्यासाठी मी सरळ रिक्षा चालविण्याचं नक्की केलं. आता घरातले उठण्याआधी सकाळी सहालाच मी घराबाहेर पडतो. सकाळी सहा ते दुपारी अकराबारापर्यंत रिक्षा चालवतो. चार पैसे हातात येतात. दुपारी घरी जाऊन जेवतो आणि ताणून देतो. आपण कुठे आणि कधी इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं आणि त्याप्रमाणे तिथून दूर राहिलं की आपल्याही डोक्याला ताप नसतो आणि इतरांच्याही."
शेवटच्या वाक्याला खदखदून हसत परब रिक्षा घेऊन निघून गेले. मी अवाक् होऊन परबांचं तत्वज्ञान जिरवू लागलो. आपण कुठे आणि कधी इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं की आपल्या डोक्याला ताप होत नाही आणि इतरांच्याही ! साध्या भोळ्या परबांनी सहजीवनाचं सार अगदी मार्मिक शब्दात मांडलं होतं. आयुष्यात अनेक वाद निर्माण होतात ते आपल्या अनाठायी वास्तव्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची आपल्याला सवयच जडलेली असते. अनेकांना फुकटचे सल्ले देण्यात आपण बाकबगार असतो. पण ते सल्ले दुसऱ्यांना हवे आहेत का, आपण सर्व विषयांवर मत व्यक्त करणं गरजेचं आहे का आणि मुख्य म्हणजे आपण सर्व ठिकाणी उपस्थित राहणंही आवश्यक आहे का याचा विचार करणं खरोखरच गरजेचं असतं. दुसऱ्यांच्या कामात आपल्यामुळे व्यत्यय येत असेल, दुसऱ्यांना आपली अडचण भासत असेल तर तिथून शहाणपणानं वेळीच दूर जाणं उत्तम हे परबांचं तत्वज्ञान मला मनोमन पटलं.
सामाजिक कार्यात वावरतानाही अशी नको असलेली अनेक मंडळी आपल्याला भेटतात. ही मंडळी एखाद्या मिटिंगला अथवा सभेला आली की डोकेदुखी आली असेच भाव अनेकांच्या चेहऱ्यावर उमटतात. स्वतःच्या अक्कलहुशारीने समस्या उभ्या करुन इतरांना हैराण करणे हा मंडळींचा स्थायिभाव. एकदा एका संस्थेत एका महिलेने सर्वांनाच असं भंडावून सोडलं होतं. दरवेळी संस्थेच्या मिटिंगला हजर राहून नाना प्रकारचे प्रश्न विचारुन ही महिला सर्वांना गोत्यात आणण्याचा उपद्व्याप करी. सर्व काही मलाच समजतं आणि तुम्ही सर्व मुर्ख आहात अशा पवित्र्यानेच ही महिला सभेत वावरे.
गंमत म्हणजे त्या सभेचे अध्यक्ष त्या महिलेचा सर्व उच्छाद शांतपणे सहन करीत. अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्या महिलेला कधीच झापण्याचा प्रयत्न केला नाही की दरडावण्याचा. शेवटी भांडून भांडून स्वतःच ती महिला रागाने सभात्याग करुन निघून जाई. एकदा मी त्या महिलेचा त्रास तुम्ही सहन तरी कसा करता असा प्रश्न त्या अध्यक्षांना केला. त्या प्रश्नाला अध्यक्षांनी दिलेलं उत्तर मासलेवाईक होतं. शांत चेहऱ्यावरची सुरकुतीही न हलवता अध्यक्ष उद्गारले-
'मी मनातल्या मनात त्या बाईच्या नवऱ्याचं स्मरण करतो आणि शांत राहतो."
"नवऱ्याचं स्मरण? ते कशासाठी? " मी आश्चर्याने अध्यक्षांना विचारलं.
'मी मनात विचार करतो, तो बिचारा नवरा त्या बाईला आयुष्यभर सहन करतो आहे, तर आपण तासदोनतास तिचा धुडगुस सहन करायला काय हरकत आहे? "
अध्यक्षांच्या त्या उत्तराने मला अनेक गोष्टींचा खुलासा झाला. स्वतःच्या उपस्थितीने इतरांसमोर अडचणी उभ्या करणाऱ्या मंडळींविषयी इतरांच्या मनात कशाप्रकारचे भाव उमटतात याचा प्रत्यय अध्यक्षमहोदयांनी आपल्या उत्तरातून घडविला होता. आपण कुठे नको आहोत ते समजलं नाही की लोक आपली काय किंमत करतात याचं सुंदर विश्लेषण अध्यक्षांनी केलं होतं.
प्राचीन काळी वानप्रस्थाश्रम असे. इहकर्तव्य बजावून मंडळी वानप्रस्थाला जात म्हणजेच संसारातून निवृत्त होत. सर्व कारभार नव्या पिढीच्या हाती सोपवून निवृत्त होणं या संकल्पनेचा आजही गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आज माणसाचं आयुष्यमान वाढलं आहे. ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत माणसं ठणठणीत असतात आणि अनेक कामांत सक्रीयाही राहू शकतात.
गंमत म्हणजे सर्व जगात आपल्या देशातच युवकांची संख्याही टक्केवारीने सर्वाधिक आहे.
दुसऱ्या कुठल्याही देशापेक्षा आपल्या देशात युवा पिढीची संख्या अधिक आहे. म्हणजेच आयुष्यमान वाढल्याने आधीच्या पिढीची मंडळीही सुखनैव नांदत आहेत आणि कारभार हाती घेण्यासाठी युवा पिढीही मोठया संख्येने पुढे सरसावते आहे.
या विचित्र सामाजिक समस्येवर उपाय म्हणजे आधीच्या पिढीने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारुन पुढच्या पिढीच्या हाती कारभार सोपवणं. प्रत्यक्ष वानप्रस्थात जाणं कालबाह्य झालं असलं तरी संसारात राहूनच निवृत्तीची पथ्ये पाळणं. वयस्कांच्या तब्येतीच्या दृष्टीनेही हे बाजूला होणं लाभदायक असतं. आजकाल बहुतेक आजार उद्भवतात ते मानसिक ताणांमुळे. रोगजंतूंमुळे उद्भवणारे बहुतेक आजार आता अॅन्टीबायोटिक्स औषधांमुळे कह्यात आले आहेत. मात्र मनातल्या किंतूंमुळे उद्भवणाऱ्या आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. दुसऱ्याने आपला सल्ला ऐकला नाही की आपलं ब्लडप्रेशर वाढतं आणि त्रास आपल्यालाच होतो. थोडक्यात परबांच्या तत्वज्ञानानुसार आपण कधी आणि कुठे इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं की आपल्या डोक्याला ताप होत नाही आणि इतरांच्याही. इतरांच्या डोक्याला होणाऱ्या तापाचा विषय बाजूला ठेवला तरी आपल्या डोक्याला ताप होऊ नये म्हणून परबांचं तत्वज्ञान वागणूकीत रुजवणं केव्हाही उत्तम.
-सुनील रेगे
September 3, 2022
सन सेट ‘पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते . रिसॉर्ट पासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर होता . संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत जात . रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता . मध्ये खूप झाडी होती पण रात्री सात -आठ पर्यंत माणसांची वर्दळ चालू असे . पाचव्या मजल्यावरून साक्षी ग्राउंड फ्लोअरला अली तेव्हा तिच्या लक्षात आले कि मोबाईल रूम मधेच विसरलाय . ती परत लिफ्ट कडे गेली तर लिफ्ट बंद होती . लाईट गुल झाले होते ! . आता पुन्हा पाच मजले चढायचे आणि उतरायचे तिच्या जीवावर आले .’ तासा दीड तासांचा तर प्रश्न होता . साडे सहाला जरी परत निघालोतरी सात सव्वासात पर्यंत रिसॉर्टला परतु . मग निवांत ग्यालरीत बसून कोल्डकॉफी एन्जॉय करू . इथली कॉफी मात्र भन्नाट असते !’ असा काहीसा विचार करत साक्षी झाडीच्या रस्त्याला लागली .
March 2, 2018
अर्थात वर वर्णन केलेले ‘मिसळखाऊ’ आणि अशी ‘मिसळ’ मिळणारी हॉटेल तुम्हाला पुण्यात, कोल्हापुरात किंवा नाशकात नाही मिळणार. हा, ऊपनगरात मिळाली तर मिळतील. पण गावाकडे मात्र तुम्हाला हमखास अशी ‘प्रसिद्ध मिसळ’ची हॉटेल मिळतीलच मिळतील. हे झाले मिसळपुराण. पण हे मिसळ वाले ‘भाऊ’ ‘तात्या’ ‘रामा’ हे एक वेगळेच आणि त्यांच्या मिसळसारखेच चटकदार प्रकरण असते. आमचा मिसळवाला रामाही त्याला अपवाद नाही.
May 15, 2019
कपड्या बद्दल तर एवढी मोठी क्रांती झाली आहे की एक स्वतंत्र ग्रंथ होईल. वारेमाप कपडे. पण धुण्याचा अजिबात त्रास नाही. वॉशिंगमशिन तयार आहेच. डाग काढायला सोयीचे झाले आहे. त्यामुळे दाग अच्छे है असे म्हणत आई हसतमुखाने लेकराचे कपडे धुते. शिवाय हे लेस ते लेस सगळेच यूजलेस असलेले तोकडे कपडे पाहून वाटते की मूलभूत गरज आहे की मूलभूत सुविधा आहे. आणि एक फायदा म्हणजे जीन्स. टिशर्टस कुणीही कुणाचे घालू शकतात. म्हणजे हे मला नक्की माहीत नाही पण ऐकले आहे म्हणून लिहिण्याचे धाडस केले आहे.
June 10, 2022

मैलोगणिक पसरलेल्या रेल्वे रुळांच रक्षण करुन ते व्यवस्थित ठेवायचे. म्हणजे ऊन-पावसात मैलोगणिक चालण्याची शारिरिक क्षमता हवी. इतकं चालणार कोण ? दिवसाकाठी दहा मैल डोंगरकपारी तुडवणारा आदिवासी या कामाला योग्यच होता. पण शहरापासून बिचकून राहणारा हा लाजाळू माणूस गँगमन म्हणूनकाम करायलाकसा तयार झाला कुणास ठाऊक.
May 9, 2022
हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणजे चित्रपटांचा आत्मा असतो. अनेक नायिकांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चित्रपटांवर अधिराज्य गाजवले. अशाच काही तारकांची ओळख सदानंद गोखले यांनी या पुस्तकातून करून दिली आहे.
March 1, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti