(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विजय’स्तंभ

    १९७३ साल उजाडलं आणि ‘जंजीर’ चित्रपटाद्वारे अ‍ॅंग्री यंगमॅन म्हणून त्याचं ‘बारसं’ झालं! या चित्रपटाने त्याला जीवनसाथी, ‘जया’ मिळाली. ‘अभिमान’ व ‘नमक हराम’ मधून त्याच्या अभिनयाचा कस लागला. ‘शोले’ चित्रपटाने इतिहास निर्माण केला. अब्जावधीची कमाई करणारा हा एकमेव चित्रपट ठरला.

      October 11, 2021


  • हे चित्र कधी बदलणार ?

    गोष्ट एका सर्व सामान्य गरीब बाईची आहे. ती इंडोनेशियामध्ये केळीच्या बागेमधून काम करायची. एकदा बागेच्या मालकाने तिला केळी चोरताना पाहिले. त्याने तिच्या विरुध्द कोर्टात दावा गुदरला.

      June 19, 2024


  • प्रेमाच्या वाटेवर – भाग ४

    रमा नुकतीच पदवीधर झाली होती आणि एका वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून नुकतीच रुजू झाली होती. ती तिच्या वर्तमानपत्रासाठी एका मुलाखतीच्या शोधात होती.

      September 4, 2021


  • अनोखा अनुभव

    कुणाचा विश्वास असो वा नसो. माझ्या अनुभवानुसार माझा विश्वास आहे. माणूस गेला की सगळे संबंध संपतात असे म्हटले जाते. पण त्यांचा जीव कुणात तरी गुंतलेला असतो. माझी काकू शेवटच्या काळात बरीच वर्षे माझ्या कडे रहात होती. मूलबाळ नव्हते म्हणून आम्हालाच तिने आईच्या मायेने वाढवले होते. खूप कष्ट घेतले होते आमच्या साठी. शेवटी तिचे सोवळे ओवळे शहरात नीट सांभाळले जात नाही आणि माझ्या मोठ्या मुलीला सांभाळायला म्हणून आली ती इकडेच राहिली. किती वेळा सांगूनही ऐकायची नाही. कामं करत असायची. माझ्या लहानबहिणीचे पूर्ण कुंटुब अपघातात गेले. हा धक्का सहन झाला नाही. ती खचून गेली आणि तिला बसलेली उठताच आले नाही. तशा अवस्थेतही सरकत सरकत काम करत होती. आणि एकदा रागाने तिला म्हटले की तुला कामे करावेसे वाटतात ना मग या कोपर्‍यात बसून माझी कामं बघून समाधान मानत जा. आपण दोघी गप्पा मारत जाऊ. आणि तशीच बसून ती माझ्या सगळ्या हालचाली बघून समाधानी होती. ती गेली त्याच दिवशी एक कुत्र्याचे पिल्लू मला गटारात वहात असलेले दिसले म्हणून त्याला बाहेर काढले. मुलांनी ते पाळायचे ठरवले. ती जिमी मोठी झाली. ती स्वयंपाक घरात आलेली मला आवडत नसायची. त्यामुळे मी एकदा तिला रागावून सांगितले या कोपर्‍यात बसून रहा. आणि एक पोत्याचा तुकडा दिला बसायला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खरच ती तिथे बसून माझ्या हालचाली कडे इकडे तिकडे मान वळवून बघत असताना मला वाटायचे की काकूच बघत आहे. म्हणून मी तिच्या बरोबर बोलत रहायची. खूप वेळ झाला तरी उठायची नाही. माझे काम संपले की बाहेर जायची...
    असाच अनुभव माझ्या मुलीचे सासरे फेब्रुवारी महिन्यात गेले. पण त्यांचा जीव नातवावर होता. तो खोडकर होता म्हणून लेक सारखी त्याला रागवायची अभ्यासावरून ओरडायची. या वर्षी तो दहावीला गेला. म्हणून जास्तच सूचना मिळायच्या. एकदा आई ओरडली म्हणून तो गॅलरीत उभा होता. एक पोपट आला. हा जवळ गेला तरी उडाले नाही म्हणून तो आत गेला व गहू आणून हातात धरून खाऊ घातले. बहिण जवळ आली तरीही ते तिथेच खात राहिले. हे पाहण्यासाठी आई व आज्जी आल्यावर ते त्यांच्या कडे पाहून उडून गेले. मुलींनी हे सांगितल्यावर मी सहजच बोलून गेले होते की त्याच्या आजोबांना याची काळजी वाटत असेल म्हणून ते आले असतील. सगळ्यांना पटले की नाही माहित नाही पण मला मनापासून वाटते ते असे अचानक तोंडून बोलून जाते मी.... हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. विश्वास ठेवायचा की नाही तो.पण इतरांच्या भावना दुखावल्या जातील असे मत व्यक्त करु नये कृपया.
    धन्यवाद.
    -- सौ. कुमुद ढवळेकर.

      June 3, 2022


  • शेतकऱ्याची मूर्ती (अलक)

    प्रदर्शनाला अलोट गर्दी झाली होती. तशी ती रोज होत होती .लोंढेच्या लोंढे येत होते आणि , वॉव , क्युट , एक्सलंट असे चित्कारत बाहेर पडत होते. बाहेर पडण्यापूर्वी मात्र सगळी गर्दी अचंब्यानं थांबत होती . कारण तिथे प्रदर्शनार्थ ठेवलेली वस्तू सूक्ष्मदर्शकानं पहावी लागत होती .

      October 31, 2020


  • “वय” इथले संपत नाही

    “आपल्या खऱ्या वयापेक्षा कमी वयाचं दिसायचंय ?? कुठल्याही वयात असताना योग्य जोडीदार मिळवायचाय ?? .. नियमित “योग” करा , फीट रहा… “योग” केल्याचा असाही एक फायदा… “

      February 4, 2026


  • कोण बुद्धू कोण शहाणा

    सकाळपासून तो मुख्य रस्त्याच्या कडेच्या भुसभुशीत जमिनीमध्ये खड्डे खणण्याच्या उद्योगाला लागला होता. कुदळ मारून मारून आता तो अगदी थकला होता. थोडा वेळ विश्रांतीसाठी म्हणून तो बाजूला बसला. तेव्हाच राज्याचे एक मंत्रीमहोदय तेथून जात होते.

      December 25, 2023


  • निरोप्या!

    उंच्यापुऱ्या भारदस्त विष्णुपंतांनी शेजारच्या तांब्याच्या पेल्यातले पाणी, तोंड वर करून नरड्यात ओतले. पांढऱ्याशुभ्र धोतराच्या सोग्याने, ओल्या मिश्या साफ केल्या. गरमागरम चहा बशीत ओतून मन लावून पिला. चहा पिताना, अभिमानाने आपल्या वाडलोपार्जीत, भव्य दगडी तटबंदी असलेल्या वाड्यावरून समाधानाने नजर फिरावी. हत्तीवर अंबारीत बसून त्यांचे पूर्वज, या समोरच्या वीतभर रुंद भरीव लोखंडी दाराच्या कमानीतून येत असत!

      March 5, 2021


  • युरोपायण पाचवा दिवस – रोटरडँम – अँमस्टरडँम – कोलोन

    रोटरडँम, म्हणजेच हॉलंड किंवा नेदरलँडमधील, डच लोकांच्या शहरात येता येताच नदी, त्यावरील ब्रिज आणि बाहेरुन विशिष्ट बारीक बारीक टायलींग असलेल्या 8-10 मजली इमारती पाहून खूप छान वाटल; लंडन, पँरीस, ब्रुसेल्सहून डचांच वेगळेपण नक्कीच जाणवल. बहुतेक घरांना बाल्कनी किंवा टेरेस होत्या. रस्तेही भव्य आहेत. ब्रेकफास्ट आवरुन हॉलंडच मिनी व्हर्शन, मदूरोडँम, बघायला जायच ठरल.

      October 6, 2019


  • गरीबी आणि जिद्द

    विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.

      May 12, 2017