(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ती सध्या काय करते

    निवांत बसलो होतो तर खालील माझ्या बाबतीतला, काँलेजमधिल किस्सा आठवला, नीट शब्दबध्द केला आणि नाव न लिहिता पाठवतोय, तात्पर्या समवेत..

    एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो.
    तो तीला प्रेमपत्र लीहीतो व तीच प्रेम असेल तर दुसर्या दिवशी लाल रंगाचा ड्रेस घालून यायला सांगतो. ते प्रेमपत्र तो एका पुस्तकात टाकून ते पुस्तक तीला देतो.
    दुसर्या दिवशी ती पीवळ्या रंगाचा ड्रेस घालून येते व त्याच पुस्तक त्याला परत करते.
    तो मुलगा ऊदास राहू लागतो.
    नंतर तीच लग्न होत.

    काही दिवसांनी ते पुस्तक खाली पडत व त्यातून एक चीठ्ठी...
    त्या चीठठीत तीने लीहीलेल असत....
    माझ तुझ्यावर प्रेम आहे. घरच्यांना येऊन भेट. आणि माझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस नाही. Sorry..

    वाचून मुलगा आपल्या कपाऴावर हात मारतो.

    तात्पर्य : वर्षातून किमान एकदातरी अभ्यासाचे पुस्तक ऊघडून पहावे अन्यथा ती सध्या काय करते म्हणायची वेळ येते.

    -- एसके..

  • चारोळी

  • सोने आणि वीट (झेन कथा)

    एकदा एक तरुण संन्यासी प्रवास करीत असताना, त्याला असाच एक प्रवासासाठी बाहेर पडलेला संन्यासी भेटतो. दोघे एकमेकांना अभिवादन वगैरे करतात आणि पुढचा प्रवास एकत्र करायचा ठरवतात. दुसऱ्या संन्याशाच्या झोळीमध्ये काहीतरी जड वस्तू असते. तो ती झोळी सतत सांभाळतो आहे असे पहिल्या संन्याशाच्या लक्षात येते. रात्री झोपताना सुद्धा तो ती झोळी दूर ठेवायचा नाही. याचे पहिल्या संन्याशाला राहून राहून आश्चर्य वाटत राहते.

    त्यांचा प्रवास चालूच राहतो आणि पहिल्या संन्याशाला जाणवते की याचे जास्त अवधान त्या झोळीवरच आहे. एकदा सायंकाळी दोघे एका विहरीपाशी हातपाय धुवायला थांबतात आणि तीच संधी पाहून पहिला संन्यासी त्याच्या झोळीत काय आहे ते पाहतो. त्यात एक सोन्याने भरलेली लहान पेटी असते. ती पेटी तो तिथेच टाकून देतो आणि एक त्या आकाराची वीट झोळीत ठेवतो.

    ते पुढे जायला निघतात, तर दुसरा म्हणतो,"आता संध्याकाळ झाली आहे आणि पुढे जंगल आहे. चोराचिलटांची भीती आहे आपण येथे कुठेतरी मुक्काम करू." त्यावर पहिला संन्यासी म्हणतो,"अरे आपण संन्यासी! आपल्याला काय फरक पडतो?" फार आग्रह केल्यावर शेवटी दुसरा जंगलातून पुढे जायला तयार होतो. जंगलात रात्री मुक्काम करताना तो झोळी अगदी स्वतःच्या जवळ ठेवून झोपतो. अधुनमधुन चाचपून खात्री करून घेत असतो.

    दुसऱ्या दिवशी सकाळी पहिला संन्यासी त्याला, झोळीची इतकी काळजी का वाटते ते विचारतो. त्यावर तो सांगतो की त्यात सोने भरलेले एक पेटी आहे आणि तो ती पेटी जपत आहे. काय जाणो संन्यासी असलो तरी कधीकाळी ते सोने उपयोगाला येईल? त्यावर पहिला संन्यासी म्हणतो,"अरे सोन्याचा मोह आपण का ठेवावा? आणि तसेही तू काल सायंकाळपासून जे वागवतो आहेस, इतक्या काळजीने जे सांभाळतो आहेस, ज्यापायी तू रात्रीची झोप निवांतपणे घेऊ शकला नाहीस, ते सोने नसून एक वीट आहे. पाहा."

    वरील कथा मी जेव्हा वाचली तेंव्हा माझ्यावर तिचा फारच परिणाम झाला. मला ती गोष्ट वाचून असे जाणवले की सोने म्हणून इतके दिवस जवळ बाळगलेले असे बरेच काही आपल्याकडे असू शकेल, की जे जपण्यासाठी आपण जीवापाड धडपडतो, खूप मानसिक ऊर्जा त्यापायी व्यस्त करतो, जे वास्तवात सोने नसून बदललेल्या परिस्थितीमध्ये मातीच असू शकेल. आपण थोड्या थोड्या अंतराने आपल्याला तपासून पाहणे, आपले 'पान रिफ्रेश' करणे हेच हितावह आहे. वर्तमानात जगण्याचा जो उपदेश आपल्याला तत्त्वज्ञ देत असतात, त्याकडे जाण्याचा हा एक चांगला उपायच आहे असे मला वाटले.

    -- दीपक गायकवाड

  • भक्तीयोग

    देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
    गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.
    मोदकच का ?
    गणेशांना आवडतो म्हणून !
    का आवडतो ?
    गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.

    देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
    पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार...... फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.

    नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!

    वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !

  • आजा आजा मै हूँ प्यार तेरा : पंचमदा

    काही माणसांमध्ये समोरच्या व्यक्तीचे अंतर्भूत् गूण ओळखण्याची एक विशेष दृष्टी असते. एकेकाळचा कॉमेडी किंग मेहमूद याच्याकडे ती दृष्टी होती. बरं नुसती दृष्टी असूनही भागत नाही त्या गुणानां संधी कशी व केंव्हा देता येईल याचाही ते विचार करतात. आज चित्रपटसृष्टीतल्या ज्या दिग्गजानांवर आपण मनापासून प्रेम करतो त्यात अमिताभ, आर.डी.बर्मन व राजेश रोशन यांचाही समावेश आहे. आणि या तिघानांही मेहमूदने मूख्य संधी दिली आणि या तिघानाही आपला अमीट ठसा उमटविला. आर.डी. बमर्न खरं तर खूप मोठ्या संगीतकाराचा मुलगा. वडील एस.डी.बमर्नची अनेक गाणी खरं तर स्वत: आरडीने कंपोज केली आहेत. मनात आणले असते तर त्यांनी कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडे शब्द टाकून आरडीच्या कारकिर्दीची वाट मोकळी केली असती पण ‘स्वत:च्या कर्तृत्वावर काय हवे ते करा’ असं मानणाऱ्या लोकांचा तो काळ असल्यामुळे सचीनदांनी शब्द टाकला नसावा.

    मेहमूद हा फक्त एक कॉमेडियनच नाही तर निर्माता-दिग्दर्शक होता. स्ट्रगल करणाऱ्या कलावंताचे कलागूण हेरणारा मोठ्या मनाचा माणूसही होता. त्याने आरडीतले टॅलेंट बरोबर ओळखले. १९६१मध्ये मेहमूदने ‘छोटे नवाब’ नावाचा चित्रपट काढला व त्यात आरडी ला पहिली संधी दिली. यात विविध मूडची ९ गाणी होती. मॉर्डन डान्स, विरह गीत, कॉमेडी गीत, कव्वाली, कब्बडी खेळावरील गीत पैकी अशा सर्व प्रकारची गाणी त्यात होती. पैकी “घर आजा घीर आए….” हे लताचे अप्रतिम क्लासिकल ढंगाचे गाणे आजही ओठावर सहज येते. या चित्रपटा पासून या दोघांच्या मैत्रीस सुरूवात झाली जी शेवट पर्यंत टिकली. पूढे आर.डी. बर्मनने चित्रपटसृष्टीत आपल्या आगळ्या रंगाने व ढंगाने चित्रपट संगीतात धूमाकूळ घतला. गमंत म्हणजे याच आरडीच्या बासू देव चक्रवर्ती व मनोहारी सिंग( बासू मनोहारी) या सहाय्यकानां मेहमूदने आपल्या ‘सबसे बडा रूपैय्या’ या चित्रपटात स्वतंत्र संधी दिली.( आठवा… ना बिबी ना बच्चा, ना बाप बडा ना मैया..द होल थिंग)

    १९६१ ला सुरू झालेला हा संगीतमय प्रवास १९९४ ला संपला. ३०० च्या आसपास गाणी देणारे आर.डी बर्मन चिऋपटसृष्टीत पचंम या नावाने ओळखले जात. संगीतातल्या सात सुरात सा आणि प हे दोन स्वर शुद्ध मानले जातात तर बाकीचे पाच स्वर दोन प्रकारात गणले जातात तीव्र आणि कोमल. संगीतातला प अर्थात पचंम ही आरडी ओळख ठरली. लहानपणी त्यानां टुबलू या नावाने सर्व हाक मारीत. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांनी एका गाण्याला चाल लावली ज्याचा पूढे सचिनदानी फंटूश या चित्रपटात वापर केला….”ये मेरी टोपी पलटके आ” हे ते गाणे. तसेच प्यासा ममधील “सर जो तेरा चकराये” याची चाल पण त्यानीच बांधली होती. परदेशी वाद्यां इतकाच देशी वाद्यांचा अप्रतिम वापर पचंम दा करीत असत. पूढे ते, आशाताई, किशोर व गुलजार यानीं चित्रपटसृष्टीला अप्रतिम गाणी दिली………………‘घर आजा घिर आई बदरिया सावरिया’ (छोटे नवाब- लता) मुजरा शैली व सेमी क्लासिकल असलेले हे गाणे मेलडीचेउत्तम उदाहरण आहे……….. ‘दइया ये मैं कहां आ फंसी’ (कारवां-लता) यात हास्य निर्मितीसाठी ऑर्केस्ट्राचा उत्तम वापर केला आहे……….’चुनरी संभाल गोरी’ (बहारों के सपने- मन्नडे व लता) पाश्चीमात्य संगीताचा छाप म्हणून ओळखले जाणाऱ्या पंचमदानी या गाण्यात अस्सल बिहारी मातीचा दरवळ दिलाय. यातील ताल वाद्यांचा मेळ ऐकण्या सारखा आहे…………’पल दो पल का साथ हमारा’(बर्नींग ट्रेन- रफी व आशा) साहिरची ही कव्वाली पचंमदानी केदार रागाचा मुलायम मुलामा देऊन किती सुंदर बांधली आहे…………….’अ आ इ ई मास्टर जी की आ गई चिट्ठी’ (किताब) या गाण्यात तर चक्क मुलांच्या डेस्कच्या ध्वनींचा वापर करून घेतला आहे……………….’मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है’ (इजाज़त- आशा भोसले) हे गाणे जेव्हा गुलजार यांनी पचंमदाकडे पाठवले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती- ‘मला ही सामानाची यादी कशाला पाठवलीत. याला कशी चाल लावायची?’ पण गुलजार यानां माहित होते पचंमदाच याला चाल लावू शकतात आणि झालेही तसेच. या गाण्याने इतिहास रचला…………………………..’तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं’ (आंधी- किशोर लता) यातील मधून मधून पेरलेले संजीव कुमारचे संवाद आणि लता किशोरचा आवाज म्हणजे पचंमदाच्या प्रतिभेचे सर्वोच्च शिखर…………’चांद मेरा दिल’ (हम किसी से कम नहीं)या गाण्यात पाच सहा छोटीछोटी गाणी होती. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचा अनोखा मेळ म्हणजे हे गाणे……………’दम मारो दम’(हरे कृष्ण हरे रामा- आशा) या गाण्यातल्या सुरूवातीच्या गिटारच्या सुरांनी ७० च्या दशकातील पिढी पार वेडी झाली होती……………..’रैना बिती जाए’( अमर प्रेम- लता) हे गाणे जेव्हा मदन मोहन यांनी ऐकले तेव्हा त्यांनी सचिन देव बर्मन यानां फोन केला -‘’हे गाणे तुम्ही अप्रतिम रचले आहे,शुभेच्छा’’ म्हणाले. पण सचिनदा म्हणाले हे मी नाही पचंमने केले आहे तेव्हा मदन मोहन देखिल चकीत झाले………………………………बिती ना बिताई (परीचय- भूपेंद्र व लता)…………पचंमदाच्या गाण्याची यादी खूपच मोठी आहे…

    रसिक प्रेक्षकातील प्रत्येकाला त्यांचे किमान एक तरी गाणे हे आवडतेच. ते स्वत: उत्कृष्ट हार्मोनिका व माऊथ ऑर्गन वाजवित असत. सामता प्रसाद या विख्यात तबलजी कडून तबला वादनाचे धडेही त्यांनी गिरवले होते.शोले मधील चल धन्नो अशी साद घालून वसंती जेव्हा टांगा पळवते तेव्हा तबल्याचे कडाडणारे बोल आठवा ते पचंमदानी वाजवले होते. तसेच शोले मधील गब्बर जेव्हा जेव्हा येतो त्यावेळचे पार्श्व संगीत आठवून बघा….काचेच्या ग्लासाने या ध्वनीची निर्मिती त्यांनी केली होती…..त्यांनी स्वत:च्या वेगळ्या आवाजाचा देखील छान वापर करून घेतला………चित्रपट विश्वातील अनेक गुणी कलावंत कमी वयात आपल्याला सोडून गेले. शुद्ध स्वराचे प्रतिक असलेला ‘पंचम’ सूर वयाच्या ५५ व्या वर्षी कोमल होऊन कायमचा विसावला.….

    -दासू भगत (२७ जून २०१७)

  • गोडधोड खा, पण विचाराने

    दिवाळीसाठी विविध वस्तूंच्या खरेदीबरोबर तयार मिठाईला मागणी असते. शिवाय गोडधोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. साहजिकच दूध, दही, चक्का, खवा यालाही मोठी मागणी असते. या परिस्थितीचा गैरफायदा उठवत बाजारात भेसळयुक्त खवा बाजारात आणला जात आहे. राज्यात आतापर्यंत भेसळयुक्त खव्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे यावेळी दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाताना जरा विचारच करायला हवा.

  • नागरिक पत्रकार – विश्वासार्हतेची एक नवी वाट

    न्यू मिडीया या एका महत्त्वाच्या संकेतस्थळावर ठळकपणे लिहिलेले हे वाक्य एका नव्या पत्रकारितेच्या आश्वासक प्रवासाची नांदीच स्पष्ट करत आहे. नागरिक पत्रकार म्हणजेच सिटीझन जर्नालिस्ट हा सध्याच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञान युगात एक अभिनव आणि बर्‍यापैकी विश्वासार्ह असा जनतेचा थेट सहभाग असणारा पैलू समोर येऊ लागला आहे.

  • तो मराठी मुलगा असतो…!!

    ओर्कुट वर अनेक मुले असतात,पण जो मित्रांना स्क्रॅप मध्ये (प्रेमाने) शिवी घालुन,मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो , तो मुलगा मराठी असतो…!!

  • बँक कर्मचारी – विशेषतः कॅशियर्स यांची देशसेवा

    देशहितासाठी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला पण त्याच्या अंमलबजावणीत अमूल्य योगदान दिले बँक कॅशियर्सनी !

    प्रचंड गर्दी, ताणतणाव, चिडलेल्या, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे ग्राहक - ग्राहक नाहीत तर अनोळखी माणसं यांच्या लांबच लांब रांगा , यात काळजीपूर्वक , जबाबदारीचे काम - थोडीशी चूक की ती न निस्तरता येण्याजोगी - डायरेक्ट खिशालाच चाट -

    अशा परिस्थितीत अविरत, मान खाली घालून तासन तास, तेच आणि तसेच काम - बरं तेही एका दिवसापुरते नाही तर तब्बल ५० दिवस करायचे, अचानक हक्काच्या सुट्ट्या रद्द करून !

    मान लिया ! ??

    देशसेवा ही अजून ती वेगळी काय ? आपल्याकडे माहिती असलेली देशसेवा / देशभक्ति म्हणजे सीमेवर शत्रूशी लढणे.
    - बँक कर्मचारी आत्ता करत असलेले काम म्हणजे तशीच देशसेवा नव्हे काय ?

    याची आपण सर्व लोकांनी जाणीव ठेवू या ! यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्याशी सौजन्याने वागू या ! बँका बंद होण्याच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी जाऊन नंबर लावू या कारण या लोकांचे रेल्वे तिकीट खिडकी सारखं नसतं की वेळ झाल्याबरोबर खिडकीच बंद! - उलट, तेव्हा आत आलेल्या शेवटच्या व्यक्तिला सेवा द्यावी लागते - त्यासाठी अधिकचे खूपच काम पडते !

    शेवटी बँक कर्मचारी ही सुद्धा माणसंच आहेत याचे भान आपण सर्वांनी ठेवले तरी पुरे !

    बघा पटलं तर ! हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे ही विनंती !

  • परिस्थितीशी जुळवून घेणे ( बेवड्याची डायरी – भाग २९ वा )

    खरे तर निसर्गाशी ..कुटुंबियांशी ..नातलगांशी ..समाजाशी ..परिस्थितीशी जुळवून घेण्यातच माणसाचे भले असते ..त्रासदायक असलेल्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्यासाठी भावनिक पातळीवर संतुलित राहून..सर्वांच्या हिताचा विचार करून प्रयत्न केले तरच आपण परिस्थिती बदलण्यासाठी स्वता:ची ताकद वाढवू शकतो ..त्यामुळे माणसाचा नेहमी जुळवून घेण्याकडे कल असला पाहिजे .