(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुण्यनगरी काशी – भाग ३ 

    धर्मचक्रप्रवर्तनाचे स्थान – सारनाथ

    गौतम बुध्दाच्या जीवन प्रवासातील महत्त्वाचे स्थान म्हणजे सारनाथ.वाराणसीहून ९ किमी.अंतरावर आहे. हिंदु आणि बुध्द असे दोन महान धर्म 2500 वर्षापासून एकत्रीतपणे या परिसरात रूजले गेले आणि गुण्यागोविंदात त्यांची वाटचाल पुढे चालत राहिली. नेपाळच्या सीमेवरील लुंबीवन हे जन्मस्थान. बिहार मधील पाटलीपुत्र जवळील जागा ही त्याला झालेल्या साक्षात्काराची. मुख्य धर्मचक्रप्रवर्तनाचे स्थान सारनाथ कुसीनारा हे गोरखपूर जवळील स्थान जेथे जीवनयात्रा संपली.

    बुध्दानी आपल्या पाच शिष्याना एकत्र पहिले प्रवचन दिले ती जागा सारनाथ. सारनाथ अथवा सारंगनाथ हरणांच्या वास्तव्याची जागा त्या काळात या भागात जंगलात हरणांचे कळप असत व बुध्दाला हरणांबद्यल फार प्रेम होते. बुध्दाच्या स्मर्णार्थ श्रीलंकेच्या धर्ममालीनी या शिष्यानी मुलगंध कृती विहार बांधला. पुढे याच देशाचे बुध्द धर्म प्रसारक डॉ.संपूर्णानंद यानी अथक परिश्रम करून या विहाराचे नंदनवनच केले त्यामुळे याला जगनमान्यता मिळाली. विहाराचे देवळासारखे कळस चारी बाजूनी सुरेख उद्यान गाभाऱ्यात सोन्याचा फुलांच्या माळानी श्रृंगारीत धीर गंभीर उदात्त चेहऱ्याचा बुध्दाचा पुतळा मंत्र जप पठण नाही की उदबत्ती धूपाचा धूर नाही शांत धीरगंभीर वातावरण उल्लेखनिय आहे.

    मुख्य विहाराच्या बाजूनी अनेक देशानी बांधलेले विहार त्यातले चीन जपान व ब्रम्हदेशचे प्रेक्षणिय आहेत. बुध्दगया येथिल प्रसिध्द बोधीवृक्षाची फांदी या उद्यानात आणून लावली त्याचा झालेला प्रचंड मोठा डेरेदार वृक्ष व त्याच्या असंख्य फांद्याा लक्ष वेधून घेतात. राजा अशोकाने धर्मप्रसाराकरता चार भव्य स्तुप बांधले त्यातील एकच शिल्लक आहे. स्तुपाची उंचीच 150 ते 200 फूट व त्याचा परिघ डोळयात न मावणारा त्यावरील नक्षीकाम बनारसी साडीवर जसे असते तसे व कोपऱ्या कोपऱ्यांवर डोके टेकवणारे चीनी जपानी प्रवासी .

    अशोकस्तंभ ज्या जागी उत्खननात मिळाला त्याचे अवशेष त्याच जागी जाळीच्या पिंजऱ्यात सुरक्षित ठेवले आहेत. त्याच्यासमोर जैन मंदिर असून तेथे अशोकस्तंभाची 11 मीटर उंचीच्या मार्बलच्या दगडाची प्रतिकृती आहे गुळगुळीतपणा इतका की आपले प्रतिबिंब पडते. सारनाथ वस्तूसंग्रहालय हे वर्ल्ड हेरीटेज बोर्ड मान्यता दिलेले स्तुपापासून 1 किमी. अंतरावर असून परिसर इतका सुंदर व स्वच्छ व भव्यता याने आपण भारावूनच जातो. मुख्य प्रवेश दालनात अशोकस्तंभ विराजमान झालेला त्यावरील चक्रांचे नक्षीकाम हत्ती घोडा व वृषभ अगदी खरेच उभे आहेत असा भास होतो. आपले राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता अतिशय योग्य शिल्पास मिळालेली आहे याची बालंबाल खात्री पटते. पुढे अनेक दालने बुध्दाच्या विविध मुर्ती देवदेवता नक्षीकाम व कोरीव काम केलेल्या कमानी दरवाजे अशा हजारो वस्तुंचे व्यवस्थित वर्गीकरण केलेले हया सर्व गोष्टींचा अभ्यास करणारे अनेक परदेशी पर्यटक दालनात ठाण मांडून बसलेले पाहिल्यावर वाराणसीच्या प्रेमात भारत व जगातील लोक का पडतात हे उमजते. रामनगर हे छोटे गाव वाराणसी पासून 35 किमी.अंतरावर गंगेच्या पलीकडील तीरावर वाराणसीचे राजा नरेष यांचे वास्तव्य रामनगर किल्ल्यात असे.गंगेवर मोटार व रेल्वेचे दोन भव्य पुल पाहिल्यावर गंगेच्या पात्राच्या भव्यतेची कल्पना येते. गावात सायकल व रिक्षा जाणारा पिंपानी केलेला पुल व त्यावरचा रस्ता एक अनोखा अनुभव आहे. तो केंव्हां व कसा बांधला त्याची निगराणी कशी करतात याबद्यल कुतहुलता होती पण बरोबर माहिती मिळण्याचे भाग्य नव्हते. किल्ला तीराला लागून चांगला 1 किमी लांब बुरूज 200 ते 300 फूट उंच आत अनेक दालने व वस्तुसंग्रहालय 17 व्या शतकातील तलवारी बंदुका राजघराण्यातील वापरले जाणारे उंची बनारसी सिल्कचे भरजरी कपडे भांडी कुंडी व्यवस्थित ठेवलेली त्याला साजेसा झुंबरांचा महाल आजकाल फिल्म शूटींगसाठी दिला जातो. एका भुयारी रस्त्याने तळघरात उतरलो तेथून 20 ते 30 उंच पायऱ्या चढून एका देवळापाशी आलो.लागूनच एक गच्ची होती समरा संथ वाहाणारे गंगचे पात्र मध्यात डुलणारा पिंप पूल पात्रातून डुलत चाललेल्या छोटया होडया खडया शिपायांसारखे ताठ उभे असलेले बुरूज वातावरणातील नीरव शांतता मनमुराद आनंदात बुडून गेलो. दसऱ्याला फुलांची सजावट व दिव्यांच्या रोषणाईत किल्ला उजळून निघतो. रामनगर ते वाराणसी प्रवास टॅक्सीने करत होतो इतका बेजबाबदार व अक्कलशुन्य ड्रायव्हर ज्या सुसाट वेगाने गाडी चालवत होता ते पाहून तो आम्हाला थेट मनकर्णिका घाटाचा र्स्वगाचा रस्ता दाखविणार असे वाटू लागले होते.

    अशा बहुढंगी शहरात विविध उद्योग चालतात. पक्षांची निर्यात व पैदास करण्याचे मोठे केंद्र विविध लोणची विविध खाण्याच्या पानांची उत्पादन केंद्रे माती व धातूची नक्षिकामाची भांडी याबरोबर कथ्थक नृत्यकेंद्रे शास्त्रिय संगिताची घराणी हे सगळे अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक शहराला भेट देत असतात ताजमहाल खालोखाल सर्वात ज्यास्त परदेशी पर्यटक वाराणसीत येतात. काही जण महिनेचे महिने अनेक कला शिकतात पुस्तके लिहीतात.

    रांड सांड सिरी सन्यासी इनसे बचे तो सैवे कासी अशा बहुढंगी शहरात बिस्मीलॅांखाँचे वास्तव्य होते तानसेन ते तुलसीदास कबिर या सर्वांचे हे माहेरघर नवरात्रीची रामलीला नौटंकी रात्र रात्र जागविणाऱ्या नाचगाण्याच्या मैफीली वेश्याव्यवसायातील दर्जा जोपासणाऱ्या कलावंतिणी अशा बहुढंगी कलांचा साज गंगेला लाभलेला आहे. सकाळच्या कोवळया सुर्यकिरणात चमचमणारे घाट मोहून टाकतात व हजारो या्रत्री गंगास्नानानी पापमुक्त होतात आणि जिवंतपणी स्वर्गमुक्तीचा मार्ग दिसल्याची प्रचिती येते. अशी आहे पुण्यनगरी काशी.

    डॉ अविनाश वैद्य

  • मन

    मन

  • बालपण

    सौ. अलका वढावकर यांची बालपण ही कविता......

    आवाज - पूजा प्रधान

  • ऐरणीच्या देशा

    प्रत्येक व्यक्ती ही कुटुंब, गाव / शहर व देश यांची घटक असते. आपले दैनंदिन जीवन व्यतित करीत असताना आपण काही नियमांनी या तिन्ही पातळींवर बांधलेले असतो. आयुष्यात संधी तसेच समस्या, अडचणी प्रकट होत राहतात. परिस्थितीचे आकलन करून आपण संधीचा वापर करतो तर अडचणींचे निराकरण करतो. हे करत असताना नियमांच्या चौकटीत राहावे लागते. कुटुंबाचे नियम असतात, शहर व देश यांचे कायदे असतात. स्वतः व कुटुंब या पातळीवर, बाधित घटक व निर्णय घेणारे घटक मर्यादित असतात. पण गाव / शहर आणि देश या पातळीवर जेव्हा समस्या उद्भवतात, तेव्हा अनेक अंगांनी विचार करावा लागतो. उपायांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करावी लागते.

    समस्यांचे निवारण करताना आपण योग्य तेथून मदत घेतो. उदाहरणार्थ, आजार, दुखणे यासाठी डॉक्टरांची मदत, दुरुस्तीसाठी तंत्रज्ञाची मदत आपण घेत असतो. दृष्टीदोष बारा करण्यासाठी आपण हृदयरोगतज्ञाकडे जात नाही, तो डॉक्टर असला तरी. आपल्याला डोळ्यांनी नीट दिसत नाही ही समस्या वैयक्तिक पातळीवर ओळखणे सोपे असते. पण शहरापुढील अडचणींचे मूळ कशात आहे हे सहजासहजी समजू शकत नाही. व्यापक विचार करून ते शोधावे लागते. एकदा ही निश्चिती झाली की उपाय ठरविता येतात. आपल्या देशात समस्या अगणित आहेत. त्यामुळे गुंतागुंत जास्त आहे. काही बाबतीत समस्येचं मूळ शोधणं सोपं नाही. जिथे समस्या व तिचे मूळ सुस्पष्ट आहे तिथे तरी उपाय लागू पडल्याचे दिसले पाहिजे. पण पुष्कळ ठिकाणी अंमलबजावणी तोकडी पडते. कारणे काहीही असोत. उत्तरदायीत्व न जुमानणारे हे अशा उपायांना बाधा आणतात.

    जिथे समस्या व तिचे मूळ याविषयी संदेह असतो तिथे, थातुरमातुर उपायांची मलमपट्टी केली जाते. काहीतरी कृती घडते आहे असे भसविले जाते. यामुळे अशी परिस्थिती काही काळाने पुन्हा उद्भवते. मराठी पत्रकारितेत याची, "... प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे" अशी बातमी बनते. ही ऐरण अनेक प्रश्नांना आपल्या पाठीवर वागवीत असते. रंगमंचावर जसा संवाद म्हणणार्‍या कलावंतावर प्रकाशझोत पडतो, तसा वेगवेगळा प्रश्न प्रकाशझोतात येत राहतो. आपली भूमिका झाली की कलाकार मंचावरून 'Exit' घेतो. पण ऐरणीवरच्या प्रश्नांना 'Exit' चा दरवाजा सहसा दिसत नाही.

    'ऐरण' या शब्दाचा जोडीदार आहे 'घण'. हे दोघे एकमेकावाचून निरुपयोगी. ऐरणीवर असलेल्या प्रश्नावर योग्य जागी घण पडला तर उपाय यशस्वी होऊ शकतो. पायाला गँगरीन झाले असताना हात कापणे हा उपाय असु शकत नाही. तसे झाले तर घाव भलत्याच ठिकाणी पडला असे म्हणावे लागेल. 'आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी’ हा वाक्प्रचारही पत्रकारितेत खूप प्रसिद्ध आहे. आपल्या देशात या दोन वाक्प्रचारांचा वापर करता येण्यासारखी परिस्थिती वारंवार उद्भवते. उदाहरणार्थ, '... घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे', '... बुडून झालेल्या मृत्यूंमुळे जलपर्यटन पुन्हा ऐरणीवर आले आहे', '... पेपरफुटीमुळे बोर्डाच्या क्षमतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे'. अशा असंख्य घटना सर्व क्षेत्रांना स्पर्शून जातात. घण व ऐरण यांची जिथे भेट होते तिथे समस्येचं योग्य कारण असलं तरच उपयोग असतो. समस्या तशीच राहण्याची कारणं पुढीलप्रमाणे असु शकतात.

    १. समस्येचं मूळ समजलेलं नाही, त्यामुळे घावही नाही (अज्ञानात आनंद).

    २. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपाय शोधण्याची इच्छा नाही (वैचारिक दारिद्र्य).

    ३. समस्येचं मूळ समजलेलं आहे, उपाय करण्याची इच्छा आहे, पण घाव वर्मी बसत नाही (सदोष अंमलबजावणी).

    ४. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपायाचं नाटक करायचं आहे. समस्या ऐरणीच्या एका बाजूला व घाव दुसरीकडे पडत आहे (उपायाचा आभास).

    पावसाळ्यात मुंबईत ठराविक ठिकाणी पाणी साचणे, रेल्वे रुळ पाण्याखाली जाणे या गोष्टी दरवर्षी घडाव्याच लागतात. बोअरवेलमधे लहान मूल अडकणे, सेलिब्रिटीजना विशेष सवलती मिळणे यांची बातमी व्हावीच लागते. त्यांना ऐरणीवर यावेच लागते. काही प्रश्न सोडविण्यासाठी नसतात. तसे झाले तर काम काय राहील घण मारणाराला?

    अव्यवस्था दूर केली तर सामान्याचे जीवन सुखी होईल, पण अव्यवस्थेमुळे ज्यांना रोजगार मिळत होता ते बेकार होतील. गुटका खाउन कितीही मेले तरी चालतील, पण गुटक्याचा कारखाना बंद झाला तर जे बेकार होतील त्यांचे काय? रस्ते चांगले झाले तर गॅरेज कशी चालतील? गाडीचे सुटे भाग बनविणारांनी काय करायचं? शाळेतच शिक्षण मिळालं तर क्लासवाले उपाशी राहतील त्याचं काय? अशा प्रकारे एक प्रश्न सोडवताना दुसरा उद्भवेल. म्हणजे प्रश्न आहेच. ‘मग आहे तो प्रश्न तसाच राहिला तर काय बिघडले’ ही वृत्ती बळावते आहे. अशा परिस्थितीत गळ्याशी आल्यावर धावाधाव करणे आले. आपल्या देशापुढील समस्या कोणत्या क्रमाने व कशा सोडवायच्या हा मोठा प्रश्न आहे. सुजाण नागरिकत्व अंगी बाणल्याशिवाय कोणतेही उपाय निरुपयोगी ठरतील, आणि हेच सर्वात कठीण आहे.

    खूप वर्षांपूर्वी ‘साधी माणसं’ या मराठी चित्रपटातील एक गीत प्रसिद्ध झाले, ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे ...’. पण आता, ‘ऐरण, घण व समस्या’ यांचा समन्वय साधता आला नाही तर म्हणावे लागेल, ‘ऐरणीच्या देशा तुला प्रश्न प्रश्न पडू दे ...’.

    - रवि गांगल

  • साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015

    साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 संपादकाच्या नजरेतून वाचकांसाठी...

    आमचा साहित्य उपेक्षिताचे दीपावली विशेषांक 2015 अवघ्या 52 पृष्ठांचा आहे. त्या 52 पृष्ठात आंम्ही सर्व वसाहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 संपादकाच्या नजरेतून वाचकांसाठी...

    आमचा साहित्य उपेक्षिताचे दीपावली विशेषांक 2015 अवघ्या 52 पृष्ठांचा आहे. त्या 52 पृष्ठात आंम्ही सर्व वयोगटातील वाचकांचा त्यांच्या आवडीचा विचार करुन साहित्याची निवड केलेली आहे.

    आमच्या दीपावली विशेषांक 2015 च्या मुखपृष्ठावर डॉ.शांताराम कारंडे यांचे छायाचित्र आहे ते पाह्ताच वाचकांच्या भुवया उंचावतील विशेषता स्त्री वाचकांच्या कारण दीपावली विशेषांक म्ह्टला की त्यावर सुंदर दिसणार्याभ स्त्रियांचे छायाचित्र पाह्ण्याची आमच्या वाचकांना सवयच जडलेय ! असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. डॉ.शांताराम कारंडे हे एक उत्तम साहित्यिक आहेत त्यासोबत साहित्यिकांचे सच्चे मित्रही आहेत. मला व्यक्तीशः नेहमी वाटायचं की दीपावली विशेषांकाच्या मुखपृष्ठावर साहित्यिकांचे छायाचित्र का नसतात ? कदाचित ते दिसायला सुंदर नसतात हे कारण असेलही. पण डॉ.शांताराम कारंडे त्याला अपवाद आहेत हे मी खात्रीने सांगू शकतो. कदाचित दीवाळी अंकांच्या संपादकाना लेखकांच्या चेह्र्याआतील सौंदर्य कधी दिसलेच नसावे. डॉ.शांताराम कारंडे आमचे मित्र, मार्गदर्शक आणि प्रसंगी गुरु असले तरी आमच्या दीपावली विशेषांकाच्या मुखपृष्ठावर त्यांचे छायाचित्र असावे ही कल्पना माझ्याच सुपिक डोक्यातून बाहेर आली होती. कारण मला व्यक्तीशः कोणत्याही मासिकांच्या मुखपृष्ठांवर साहित्यिकांची छायाचित्रे पाहायला आवडेल कारण त्यामुळे सामान्य वाचकही लेखकांना चेहर्यापने ओळखू लागतील.

    आमच्या दीपावली विशेषांकाची सुरुवात माझी संपादकीय सोडली तर डॉ.शांताराम कारंडे यांच्या मॅरेथॉन मुलाखतीने झालेय पण माझ्या एका पत्रकार मित्राने ती मुलाखत मॅरेथॉन कशी नाही हे मला पटवून देण्याचा प्रयत्न केला जो योग्यही होता. पण मी साहित्याची निर्मिती अतीशय सामान्य वाचकांसाठी करतो हे ही त्याला मान्य करावे लागेल. मला लेखकांचा लेखक व्हायचं नाही तर मला सामान्य वाचकांचा लेखक व्हायचंय. आमचा दीपावली विशेषांक सामन्य वाचकालाही वाचायला आवडेल याची आंम्हाला खात्री आहे.

    आमच्या दीपावली विशेषांकात डॉ.शांताराम कारंडे यांची ‘आत्मह्त्या’, अशोक कुमावत यांची ‘वनदेवीची कृपा’, वर्षा किडे – कुळकर्णी यांची ‘मनिनी’ आणि माझी ‘एक रुपया’ हया चार कथा वाचकांना काहीतरी संदेश देताना दिसतील याची आंम्हाला खात्री आहे. डॉ.शांताराम कारंडे यांचे लेख वाचकांना मार्गदर्शन करतील तर सहभागी कविंच्या कविता वाचकांच्या मनावर हळुवार फुंकर घालतील. जयेश मेस्त्री यांची ‘टर्निंग पॉईंट’ ही एकांकीका फक्त तरुणांनीच वाचावी अशी आमची अपेक्षा आहे.

    आमचा हा साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 लहान मुलांपासून जेष्ठांपर्यत सर्व वाचकांचा विचार करून तयार केलेला आहे. विकत घेऊन वाचलात तर आनंद आहे आणि नाही वाचलात तरी तो आपल्या पर्यंत मोफत पोहचविण्याची आमची तयारी आहे कारण वाचनसंस्कृती जपणे हेच आमचे स्वप्न आहे....

  • शेतकर्‍यांच्या विवंचना

    आज आपण पाहता सगळीकडे दुष्काळ पसरला आहे. पाण्याविना पशु, पक्षी आणि मानव हैराण झाले आहेत. कधी निसर्ग कोपतो तर कधी राजकारणी कोपतात. कधी नैसर्गिक आपत्ती येते तर कधी मानवाने घडवलेली आपत्ती त्रास देते. एकूणच सर्व आनंदी आनंद आहे. सगळीकडे मर्यादेचे उलंघन होत आहे.

  • इतर टोळभैरवांचे काय ?

    अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर राज्यातील काही बेकायदेशीर टोलनाक्यांना स्थगिती देण्यात आली. पण, या कारवाईनंतरही काही प्रश्न कायम राहतात. ते कोणी विचारतही नाही आणि विचारलेच तर समाधानकारक उत्तर मिळत नाही अशी परिस्थिती आहे. असा प्रकार केवळ टोलनाक्यांबाबतच नव्हे तर अन्य ठिकाणीही सुरू आहे. अशा चुकीच्या प्रघाताबद्दल सरकार गांभीर्याने पावले उचलू इच्छिते का हा खरा प्रश्न आहे.

  • गुळगुळीत आणि खडबडीत

    एखाद्या पदार्थाकडून जेव्हा त्याच्यावर पडणार्‍या प्रकाशकिरणांच्या ऊर्जेचं शोषण होतं तेव्हा त्याला मिळालेली वाढीव ऊर्जा नेहमीच उष्णतेच्या रुपात प्रकट होते असं नाही.

  • कुटील अमेरिका व दोस्त राष्ट्रांचे स्वार्थी हल्ले

    अमेरिकेला लोकशाही किवां तत्सम मानवीय मुल्यांवर फार मोठा विश्वास आहे, असे समजण्याचे कारण नाही.अमेरिकेची व तत्सम पाश्चात्य राष्ट्रांची अर्थव्यवस्था ही अरब राष्ट्रांच्या तेलाच्या भरवश्यावर जीवंत आहे. आर्थिक मंदीच्या खाईतून बाहेर निघण्यासाठी अनावश्यक बाब पुढे करून तेल उत्पादक राष्ट्रांना वेठीस धरणे सुरु केले आहे.पर्यायाने जगातील इतरही राष्ट्रे बाधित होतीलच.

    भारतीय उपखंडात तणाव तसेच शस्त्रास्त्र स्पर्धेचे वातावरण निर्माण करण्याचे महापातक अमेरिकेकडेच जाते. शस्त्र विक्रीच्या भरवश्यावर अमेरिकेची अर्धी अर्थव्यवस्था चालत असते,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

  • प्रेमकवी सावरकर

    एकदा आचार्य अत्रे आणि प्रा. फडके यांच्यात प्रचंड वादविवाद झाले तेव्हा फडके म्हणाले, अत्रे नेहमी फडकेंच्या साहित्यावर टीका करताना म्हणतात की त्यात अश्लील, बिभत्स प्रसंग रगविलेले आहेत, पण ते सावरकरांच्या साहित्यातील तशा वर्णनाच्या वाटेला जात नाही. त्यावर अत्रे म्हणाले, फडके यांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली की त्या वाचकाला आपणही असा बलात्कार करावा असे वाटू लागते.