(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पतंगावर जबरदस्त नियंत्रण…..

    पतंगावर जबरदस्त नियंत्रण…..

    एकाचवेळी तीन पतंग आणि तेसुद्धा एखादा बॅले डान्स केल्यासारखे आकाशात फिरवायचे म्हणजे काही सोपं काम नाही.

  • एक निरागस मुल

    “मामाचं गाव” “आजोळ” अशी नावं रिसॉर्टला दिली म्हणजे एक विशिष्ट, टिपीकल ग्राहकवर्ग हुकमी आकर्षित होतोच होतो...कोकण किंवा विदर्भ-खानदेशातील गावं सोडून जमाना झालेली, मुंबई-पुण्यात सेटल झालेली, वीकऐंडला हाफपॅन्ट घालून फिरणारी मंडळी...आपल्या मुलांना आपल्या बालपणीच्या आठवणी सांगून त्या अनुभवाच्या जवळपास नेण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी, तुटलेल्या नात्यांचे धागे जोडण्यासाठी धडपडणारी अशी ही निरागस मंडळी असतात...अशा रिसॉर्टवर जाण्यासाठी हजारो रुपये भरुन बुकींग करतात...

    तिथे गेल्यावर शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसतात, धाप लागली तरी विहीरीचं पाणी शेंदतात...श्वास वरखाली झाला तरी “तुला सांगतो अश्विनी, आमच्या लहानपणी माणगावला मामाकडे गेलो की मी दहा दहा बादल्या पाणी काढायचो विहीरीतून” असं सांगत असतो. चि.अश्विनी मात्र How to fetch water from well? चा व्हिडीओ युट्यूबवर शोधत असते.

    सकाळी मऊभात-तूप-मेतकुट खाताना त्याला त्याची अलिबागची इंदूमावशी आठवत असते. तिच्या हातच्या मऊभात मेतकुटाची चव तो इथे शोधण्याचा एक निष्फळ प्रयत्न करुन बघतो..ब्रेकफास्टला पास्ता नसल्याने किंचित नाराज झालेलं त्याचं पोरगं, बापाला बरं वाटावं म्हणून मनाविरुध्द मऊभात गिळत असतं.

    इको-टुरिझमच्या अद्ययावत गोठ्यातल्या देशी गायी बघून त्याला बाबूकाकांचा जुना गोठा आठवतो, गायीच्या मानेची पोवळी खाजवत तो पोरांना बाबूकाकांची “यमुना” गाय त्याकाळी पाच शेर दूध कशी द्यायची हे आठवून सांगतो. पोरं शेणामुताच्या वासाने गुदमरत उसने हास्य आणून माना डोलवत असतात.

    दुपारी कॉटेजमधे चटई टाकून तो पडतो आणि शहरात आयुष्य घालवलेल्या बायकोला जुन्या आठवणी सांगत बसतो. ती जांभया देत ऐकत बसते..

    इथला सूर्यास्त त्याला चौल रेवदंड्याची आठवण करुन देतो. नानाकाकांनी अशाच एका सूर्यास्ताच्या वेळी “समुद्राला रत्नाकर का म्हणतात?”ती त्याला ऐकवलेली गोष्ट मुलांना चौथ्यांदा सांगतो....

    सकाळी निघताना याचा पाय तसा निघत नसतो आणि मुलं बॅगा भरत असतात. त्याच्या नकळत त्याच्या बायकोला…“ममा नेक्स्ट टाईम अॅटलिस्ट मेघालय किंवा उटी तरी बघ हं...प्लीज” असं मुलीने बजावलेलं असतं.

    “कसं वाटलं मामाचं गाव?” या त्याच्या प्रश्नावर मुलं अबोलपणे मान डोलावतात...तो खुशीत येउन गाडी रिसॉर्टबाहेर काढून मार्गस्थ होतो... कारण, खरंतर मुलांपेक्षा त्यालाच गरज असते आजोळची, मामाच्या गावाची...त्याच्या मुलांना मामाचं गाव म्हणजे त्याचा हिरानंदानी मधला फ्लॅट इतकंच माहिती असतं. त्यांच्या अनुभवविश्वाच्या टप्प्यात तेच असतं... पण यालाच खरी गरज असते जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...काळाच्या ओघात तुटलेले सांधे कृत्रिम वंगण घालून जोडता येतायत का ते बघण्याची...भुतकाळात गेलेलं मन साधारण कोपरखैरणे आलं की वर्तमानात येतं..उद्याचं प्रेझेंटेशन डोळ्यासमोर नाचू लागतं. HR चे ईमेल्स, परवाची VP सोबतची मिटींग...आणि एक निरागस मुल पुन्हा डांबरटपणाचा बुरखा घेऊ लागतं...

  • न्यू मेसेज…..

    सफरचंद गोड असायला पाहिजे ,‘लाल’ तर 'आडवाणी' पण आहेत।

    मुलगा द्रविड सारखा पाहिजे,‘राहुल’ तर 'गांधी' पण आहेत|

    मुलगा हँडसम दिसायला पाहिजे,‘स्मार्ट’ तर 'फोन' पण आहेत।

    माणसाच मन मोठ असायला पाहिजे,‘छोटा’ तर 'भीम' पण आहे।

    मुलीला अक्कल असली पाहिजे,‘सूरत’ तर 'गुजरात' मधे पण आहे।

    रिप्लाय हा मस्त करता आला पाहिजे,‘Hmmm’ तर 'म्हैस' पण करते!

    माणसाला समजूतदार असायला पाहिजे,‘सेंसेटिव’ तर 'टूथपेस्ट' पण आहे।

    फिरायला तर हिल स्टेशन वर गेले पाहिजे ,‘गोवा’ तर 'पान मसाला' पण आहे।

    औषध आजार ठीक करणारे असायला पाहिजे,‘टँबलेट’ तर 'सैमसंग' चा पण आहे।

    मोबाइल जनरल मोडवर असायला पाहिजे ,‘साइलेंट’ तर 'मनमोहन' पण आहे।

    फोन तर OPPO असायला पाहिजे,'S1, S2...S4' तर 'ट्रेन चे डब्बे' पण असतात।

    याला म्हणतात न्यू मेसेज..नाहीतर न्यू तर दिल्ली पण आहे।

  • लग्नं मुलांची … चिंता पालकांची

    ‘घर’ आणि ‘लग्न’ या दोन शब्दांशी ‘चिता’ नावाची गोष्ट जोडूनच येते. आणि माणसाच्या जीवनात या दोन्ही गोष्टींना सहसा

    पर्याय नसतो. या दोन गोष्टींबद्दल चिता वाटणं हीसुद्धा एक ‘समाजमान्य’ गोष्ट आहे. त्यामुळेच विवाहसंस्था चालवत असताना

    काही प्रमाणात का होईना, पालकांच्या चिता कमी करण्यात आम्हाला मदत करता येते, हा आनंदाचा भाग वाटतो.

  • माझे मन तुझे झाले !

     

  • गाण्याच्या कहाण्या – झनन झनझना के अपनी पायल

    १९६२ साली ‘आशिक’ नावाचा एक सिनेमा आला होता. त्या काळच्या परंपरेनुसार या सिनेमाची पण गाणी श्रवणीय होती. तुम्हास यातील ‘ मै आशिक हू बहारोंका —‘ . ‘तुम आज मेरे संग गेलो —-‘ , ‘तुम जो हमारे मीत न होते —-‘ हि गाणे आठवत असतील . त्याच सिनेमातलं हे गाणे. ‘झनन झनझनके अपनी पायल, चली मै आज मत पूछो काहा ‘

  • आत्महत्येचे नाटक (नशायात्रा – भाग २१)

    माझ्या लाडक्या जँकी कुत्र्याला देखील मी हळू हळू गांजा च्या धुराची सवय लावत होतो , अर्थात त्यामागे माझा फक्त कुतूहल हाच हेतू होता त्याला त्रास देणे हा हेतू कधीच नव्हता तरीही ते अतिशय निंद्य कृत्य होते हे मान्य करायला मला संकोच वाटत नाहीय एका नशेबाज व्यक्तीच्या डोक्यात काय येऊ शकेल हे सांगता येत नाही याचाच हा नमुना आहे .

  • आरं आरं आबा !! काय झालं बाबा !!

    आरं आरं आबा …..!!! काय झालं बाबा …..!!! ही वात्रटिका नसून मयुर टिका आहे……!!! वास्तविका आहे……!!!

  • कैलास मानसरोवर यात्रा

    देवाधिदेव महादेव श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवास स्थान म्हणजेच कैलास पर्वत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या धार्मिक पवित्र स्थळांमध्ये …..

  • चुशुल – REzangla pass ची लढाई

    संकटे एकामागून एक पाठोपाठ देशावर चालून येत आहेत. करोनापासून ते लडाखचा चिघळलेला प्रश्न, व आर्थिक मंदी या सर्वांवर मात करण्याची वेळ आज भारताकडे चालून आलेली आहे. देशापुढे आव्हानं तर आहेतच पण आपला इतिहासही तितकाच उज्वल आहे. त्यातीलच घडलेली ही एक सत्य घटना.