(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी माध्यमात शिकल्याने काय कमावले? न शिकल्याने काय गमावले?

    ठाणे येथे डिसेंबर २०१० मध्ये होत असलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक परिसंवाद होणार आहे. आपलेही या विषयावर काही मत असेल आणि आपल्यालाही ते लोकांसमोर मांडायचे असेल. ही सोय आता आपल्याला उपलब्ध आहे. आपले मत खुशाल मोकळेपणाने मांडा. ते परिसंवादाच्या वक्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल.

      November 18, 2010


  • मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

    रमय ते बालपण

      April 27, 2010


  • पुणेरी पाट्यांचे आक्रमण मॅकडोनाल्ड्सवर झाले तर काय होईल बरे?

    अस्सल पुणेरी भाषेत असलेली ही मॅकडोनाल्ड्सची पाटी

      November 10, 2012


  • विज्ञानाचे अध्यात्म

    जिथे विज्ञान थांबते,,,,तिथे म्हणे

      June 7, 2010


  • माह्या गुरजीची गाडी

    फेसबुकवरुन आलेली ही अस्सल कथा भावनाविवश करणारी...... फारच सुंदर वाटली म्हणून शेअर केलेय. अवश्य वाचा....


    तो एक नवयुवक.... डीएड झालेला... गुरुजीची नोकरी लागली... पण दूरच्या जिल्ह्यात.... एका पारधी समाजाच्या तांड्यावर.... जिथं शिक्षण आणि शाळा पिढ्यानपिढ्यापासून कशाशी खातात हेच माहित नाही अश्या ठिकाणी... पण तोही अस्सल गुरुजी.... नव्या पिढीचा.... नव्या विचारांचा... अर्थात तुमच्या-माझ्या सारखा.... ज्या दिवशी रुजू झाला तो दिवस शाळा नावाच्या वास्तूला समजून घेण्यातच गेला. दिवसभर एकही पोरगं शाळेकडं फिरकलं नाही.... पण त्याने हार मानली नाही. तो रोज पालावर जायचा. पोरांच्या आई-बापांना पोरांना शाळेत पाठवायला सांगायचा. हळूहळू त्या अडाणी लोकांना पटायला लागलं आणि वेगवेगळ्या वयाची कधीही शाळेत न गेलेली ती रानफुलं शाळा नावाच्या तुरुंगात येवून बसू लागली.... रानावनात लीलया फिरणारी ती मुलं शाळेत मात्र अवघडल्यासारखी बसत... पण आपला मित्रही काही कमी नव्हता. त्याने अशी काही जादू केली कि त्या पोरांना गुरुजी आवडू लागला.... अन् रानात, काट्याकुट्यात ससा, तितर सहज पकडणारे हात ग म भ न गिरवायला लागले.

    नोकरी मिळाल्यावर आपल्या मित्राने त्याची ड्रीम बाईक घेतली. रोज सकाळी तो स्वतः आंघोळ करण्यापूर्वी गाडीला साफ-सुफ करायचा... मगच शाळेची तयारी. नव्या कोऱ्या बाईक वरून शाळेच्या ठिकाणी जावून-येवून करण्य्यात तो रोज थ्रिल अनुभवायचा. ती गाडी त्याची जिवाभावाची मैत्रीणच बनून गेली होती जणू... एक साधा ओरखडा किंवा थोडीशी धूळही गाडीवर पाहून अस्वस्थ व्हायचा तो.... रोज शाळेच्या समोर एका झाडाखाली गाडी लावून शाळा सुरु व्हायची....

    आनंददायी शिक्षण पद्धती वापरल्यामुळं गुरुजीवर मुलांना रागवायची पाळीच कधी येत नव्हती. पोरं रोज गुरुजीची गाडी यायची वाट बघत शाळेजवळ येवून थांबत आणि गाडी गेल्यावरच घरी जात....

    पण............भर झोपेत मोठा आवाज झाल्यावर दचकून झोप मोडावी अन् सुंदर स्वप्न सहज भंग पावावं तसं झालं त्या दिवशी.... रोजच्याप्रमाणे तो गाडीजवळ गेला आणि त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसेना... गाडीच्या टाकीवर कुणीतरी टोकदार दगडांनी काहीतरी कोरलं होतं. त्याच्या आवडत्या गाडीच्या टाकीवर ओढलेले ओरखडे पाहून तो प्रचंड संतापला. पोरं समोरचं उभी होती. कधीही न सुटलेला त्याचा तोल गेला. तो त्या पोरांना अद्वा-तद्वा बोलू लागला. त्याच्यातील सदसद्विवेकबुद्धी पार हरवून गेली. फक्त राग आणि राग.... पोरं घाबरून गेली. त्यांनी आपल्या गुरुजींना कधीही एवढं रागवलेलं पाहिलं नव्हतं. नेहमी प्रेम करणारा त्यांचा गुरुजी.... पण आज मात्र प्रचंड संतापून त्यांना शिव्या-शाप देत होता आणि एकच विचारात होता.... सांगा कुणी गाडी खराब केली? माझ्या गाडीवर ओरखडे कुणी ओढले?

    पण या रागाच्या प्रसंगी कोण पुढं येणार... . सगळी पोरं भयचकित होऊन एकमेकाच्या तोंडाकडं बघत होती....

    इतक्यात एक चिमुरडी पुढं आली आणि होणाऱ्या परिणामांची काळजी न करता म्हणाली, ‘ गुरजी, मी लिव्हलं तुझ्या गाडीवर..."

    तो खूप चिडला आणि विचारू लागला का पण....? शेवटी ती बोलू लागली "काल गावातून अशीच एक गाडी चोरीला गेली. मला वाटलं, गुरजीची गाडी कुणी चोरून नेली तर...? . म्हणून मी गाडीवर लिव्हलं..... इतका वेळ फक्त स्वार्थी अविचारी रागाने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता.... पण त्या पोरीचे शब्द ऐकले अन् एकदम भानावर आला तो.... तेव्हा कुठं बारकाईनं पाहिलं गाडीकडं त्यानं... गुरुजींनी शिकवलेल्या बाळबोध अक्षरात त्या चिमुरडीनं गाडीच्या टाकीवर कोरलं होतं....

    "माह्या गुरजीची गाडी "

    टचकन पाणीच आलं त्याच्या डोळ्यात.... इतका वेळ आरोपी सापडला कि त्याला शिक्षा करायला शिव-शिवणाऱ्या हातात त्याने ते चिमुकले हात घेतले आणि त्यांच्यावर ओठ टेकवले............

    अश्रूंना वाट मोकळी करून देण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्यापुढे..... मुलं बिचारी गोंधळून गेली... गुरुजी अचानक का रडतायेत... हेच कळंत नव्हतं त्यांना..... पण गुरुजींना मात्र सर्वकाही कळलं होतं.... शब्दांच्या पलिकडलं....

    त्यानंतर गुरुजींनी गाडीवरचे ओरखडे तसेच ठेवले... आजही आपला तो मित्र मोठ्या दिमाखात तीच गाडी वापरतोय... अन् तशीच वापरतोय.. तो जेव्हा गाडीवर बसतो.... त्याची छाती गर्वाने फुगलेली असते....

    कुणी विचारलंच तर तो अभिमानाने सांगतो कि, हा मला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार आहे.....!!!

    कथा आवडली तर नक्की सांगा

      October 22, 2016


  • तरुणांच्या कलागुणांना डिजिटल व्यासपीठ

    तरुणांना आपली कला सादर करण्यासाठी आता उत्तमोत्तम व्यासपीठ मिळत आहेत. त्याचप्रमाणे डिजिटल व्यासपीठाचा विचार करता फेसबुक, युटयूबसारखे सामाजिक माध्यमं आपल्यासमोर येतात. तरुणाई या सोशल मीडियाचा व्यासपीठ म्हणून कसा वापर करते यावर थोडीशी नजर टाकू या.

    youtubeगेल्या अनेक वर्षात मनोरंजनाची साधने बदलत गेली आहेत. चित्रपट, मालिका, नाटके आदी साच्यातून बाहेर येऊन आता वेब सिरीज प्रचलित झाली. यू टयूबच्या उदयानंतर वेब सिरीजने मनोरंजन क्षेत्रात उडी मारलेली पाहायला मिळते. विविध विषय ज्यामध्ये कोणत्याही सेन्सॉरचा आक्षेप नसतो, भाषाशैलीला मर्यादा नसतात, असे कोणतेही अटी नसलेले वेब सिरीज सध्या प्रचंड हिट होतायत. हे वेब सिरीज पाहण्यामध्ये तरुणाई अधिक पुढाकार घेताना दिसते. संध्याकाळी ६ ते १०.३० पर्यंत महिलांनी मालिका विश्वात आपलं अढळ स्थान केलं आहे; त्यामुळे या फावल्या वेळात आपण काय करायचं? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच तरुणांना वेब सिरीजचं उत्तर मिळालं आहे.

    १९९५ साली दि स्पॉट ही पहिली वेब सिरीज प्रसिद्ध झाली. मात्र वेब सिरीजला प्रचंड प्रतिसाद २०१४ पासून सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. कलाकार मंडळींनाही यू टयूब हे उत्तम माध्यम वाटत असल्याने तेही वेब सिरीजला महत्त्व देताना देसतात. मात्र आजकाल या यू टयूब चॅनेलचा किंवा या वेब सिरीजचा तरुणाई जरा हटके पद्धतीने विचार करताना दिसते.

    कवितेचे गाणं होताना ही वेब सिरीज तुम्हाला माहीत असेलच. सलील कुलकर्णी दर रविवारी यू टयूबवर त्यांचा हा वेबिसोड अपलोड करतात. त्यात त्यांच्या प्रत्येक कवितेविषयी आत्मितयेने बोलताना दिसतात. त्याचप्रमाणे आपल्या तरुण वर्गातही कविता लिहिणारे कमी नाहीत.

    पूर्वी कवितांचा संच तयार करून त्याचं पुस्तक रूपात प्रकाशन केलं जायचं. नाहीतर आपली एखादी कविता कोणत्याही प्रकाशनात किंवा अगदी दिवाळी अंकातही छापून यावी अशी माफक अपेक्षा काही नवकवींची असायची. मात्र आपल्या कवितांना प्रसिद्धी मिळण्यासाठी या नवकवींना आयता प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे तो म्हणजे यू टयूबच्या माध्यमातून.

    एखादी स्वरचित कविता व्हीडिओ रूपात सादर करून ती यू टयूबवर टाकायची आणि त्या यू टयूबची लिंक सर्वत्र पसरवायची. हा ट्रेंड आता बराच रुळला आहे. यू टयूबवर अशा कविताकारांचे अनेक व्हीडिओ सहज आपल्याला पाहायला मिळतील. फेब्रुवारी महिन्यात साज-या करण्यात येणा-या व्हॅलेंटाईननिमित्ताने अनेक नवकवींनी या संधीचं सोनं केलं. स्वरचित प्रेम कविता व्हीडिओ रूपात सादर करून त्या यू टयूबवर अपलोड केल्या. त्याचप्रमाणे महिला दिनादिवशीही महिलांसाठी त्यांचं गौरव करणारे त्यांना सन्मानित करणा-या कविता यू टयूबवर पाहायला मिळाल्या.

    सतत कवितेच्या धुंदीत असणारा कवी मल्हार (मनोज गुंड) म्हणतो की, कविता करणं हे माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या कलेला प्रसिद्धी मिळावी, असं प्रत्येकालाच वाटते. त्यामुळेच आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो. यू टयूबच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचणं सोपं जातं. या यू टयूबमुळे आमच्या कवितांना प्रचंड लाईक्सही मिळतात.

    पूजा भंडागे नावाची तरुण कवियीत्रीही फेसबुकवर चारोळ्या पोस्ट करत असते. तिची सावळबाधा ही कविता यू टयूबवर फार प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे तिने अनेक कविता यू टयूबच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या आहेत. मनोज किंवा पूजा याप्रमाणेच अनेकांच्या कविता आपल्याला यू टयूबच्या माध्यमातून वाचायला, ऐकायला मिळतील. महिला दिनानिमित्त शिल्पा देशपांडे आणि राधिका फराटे यांची कविताही प्रचंड गाजली.

    पूर्वी कवितांची मैफल भरवली जायची. आजही कविताप्रेमी ऑनलाईन एकत्र येतात आणि मैफल रंगवतात. फेसबुक लाईव्ह चॅटमध्येही ही कविता मैफल भरवलेली पाहायला मिळते. तरुणांनी त्यांच्या कलेसाठी सोशल मीडियाचा केलेला हा वापर स्तुत्यच आहे. त्यामुळे त्यांच्या कलेला भरभरून दाद द्यायला तुम्हीही कधीतरी त्यांच्या यू टयूब चॅनलला भेट द्या.

    -- स्नेहा कोलते

      April 9, 2017


  • श्यामची आई

    `श्यामची आई’ वाचताना ज्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या नाहीत, असा माणूस क्वचितच सापडेल. हे कथानक म्हणजे खरे तर गद्य रुपात साने गुरुजींनी रचलेले काव्यच आहे.

      February 9, 2022


  • इंटरनॅशनल शेफ डे (आंतरराष्ट्रीय स्वयंपाकी दिवस)

    दर वर्षी, २० ऑक्टोबर रोजी, इंटरनॅशनल शेफ डे (आंतरराष्ट्रीय स्वयंपाकी दिवस) साजरा केलें जातो.

    WACS ही संस्था २० ऑक्टोबर १९२८ मध्ये पॅरिस येथे स्थापना झाली. इंटरनॅशनल शेफ डे हा २००४ सालापासून World Association of Chefs Societies (WACS) या संस्थेतर्फे साजरा केला जातो.

    स्वयंपाक ही एक कला आहेच पण तो आकर्षक व्यवसायही झाला आहे. शेफ बनणं आता प्रतिष्ठेचं मानलं जातं. हे क्षेत्र वेगाने विस्तारत असून, प्रोफेशनल शेफना बरीच मागणी आहे. स्वयंपाकाची आवड असणाऱ्या व्यक्तीला शेफ म्हणून नवनव्या डिशेस बनवण्याची संधी तर मिळतेच. शिवाय त्यातून स्वतःचं करिअरही घडवता येतं. निरनिराळी हॉटेल्स, त्यातून मिळणाऱ्या चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव मारणं हे आजच्या लाइफस्टाइलचा एक भाग बनला आहे. काही हॉटेल्सचे विशिष्ट पदार्थ चाखायला लोक आवर्जून त्या हॉटेलची पायरी चढत असतात. शिवाय फूडचे वेगवेगळे इव्हेंटस टीव्हीवर दिसत असतात. त्यातून वेगवेगळ्या रेसिपीज लोकांसाठी पेश केल्या जातात. एकूणच स्वयंपाक बनवणं ही कला घरापुरती मर्यादित राहिली नाही. कुणालाही खूश करण्याचा मार्ग पोटातून जातो हे व्यावसायिकांना पक्कं उमगलं आहे. त्यामुळे चमचमीत खाना खजाना बनवणाऱ्यांना खूप महत्त्व आलं आहे. या व्यवसायाला एक प्रकारचं ग्लॅमरचं स्वरुपही प्राप्त झालं आहे. हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात तसंच परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतायत. त्यामुळे या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय.

    व्यावसायिक पद्धतीने जेवण बनवणारी व्यक्ती म्हणजे मुख्य स्वयंपाकी (आचारी; शेफ.) सॅलड्स, सूप, मासे, मटण, भाज्या, पक्वान्नं किंवा इतर पदार्थ बनविण्याची तयारी करून घेण्याचं काम शेफचं असतं. त्याचप्रमाणे मेन्यू आणि त्याच्या किंमती ठरवणे, माल ऑर्डर करणं, रेकॉर्ड्स आणि अकाऊंट्स ठेवणं याही जबाबदाऱ्या त्याच्याच असतात. जेवणाची तयारी करणं आणि ते तयार करणं यात त्याचा प्रमुख सहभाग असतो. ऑर्डरनुसार आलेल्या प्रत्येक मालाची तपासणी करणे, त्याचा दर्जा तपासणं या कामावरही त्याचं लक्ष असलं पाहिजे.

    करीयरसाठी चांगली संधी
    पात्रता: दहावी किंवा बारावीनंतर सर्टिफिकेट कोर्स करता येतो, किंवा बारावीनंतर बॅचलर ऑफ केटरिंग टेक्नॉलॉजी अॅण्ड कुलिनरी आर्ट्स किंवा कुलिनरी आर्ट्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करता येईल.

    नोकरीच्या संधी: हॉटेल/ रेस्टॉरण्ट, एअर केटरिंग, रेल्वे केटरिंग, आर्मी केटरिंग, फूड प्रोसेसिंग कंपनी, कन्फेक्शनरी, थीम रेस्टॉरण्ट, मॉल्स, बेस किचन, खासगी हॉस्पिटल्स, क्रूझ लायनर्स, कॉर्पोरेट केटरिंग, इत्यादी. काही वर्षांच्या अनुभवानंतर फूड रायटर किंवा क्रिटीक किंवा शिक्षक म्हणून काम करता येईल. स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करता येईल. जगात भारतीय खाद्यपदार्थांना बाहेरही मोठी मागणी असल्याने बाहेरही नशीब आजमावता येईल. बाहरील देशात भारतीय रेस्टॉरण्ट्सची मोठी संख्या प्रचंड मोठी आहे.

    शेफचे प्रकारः- खासगी किंवा वैयक्तिक शेफ, एक्झिक्युटिव्ह शेफ/ मुख्य शेफ, स्यूस शेफ, स्टेशन शेफ (शेफ डे पार्टी, पॅस्ट्री शेफ (पॅटीसीअर), साऊट शेफ (सॉसिअर), फिश शेफ (पॉयजनियर), व्हेजिटेबल शेफ (एण्ट्रेमीटिअर ग्रिल शेफ), ग्रिलार्डीन, क्रूझ शेफ.

    काही रंजक माहीती इंटरनॅशनल शेफ डे च्या निमित्ताने.
    २१ जानेवारी १९३७ रोजी शेफ Marcel Boulestin यांनी बीबीसी वर पहिला कुकरी शो केला.
    राजा हेन्री आठवा यांना त्याच्या सूप मध्ये केस सापडला,त्यांनी शाही शेफचा शिरच्छेद करवला होता, नंतर इतर शेफना टोपी परिधान करण्यास आदेश दिले. तेव्हा पासून जगातील सर्व शेफनी जेवण बनवताना टोपी (शेफ कॅप) घालावयास सुरुवात केली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 7, 2017


  • २६ जुलै – आजचे दिनविशेष

    २६ जुलै १६७७ ः शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहीमेत जिंजीचा किल्ला जिंकला.

    २६ जुलै १६८० : कर्नाटकातील कारवारला बजाजी पंडीत हा इंग्रजांना तहात ठरल्यापेक्षा स्वतासाठी जास्त होन मागायचा.मात्र इंग्रजांनी ते देण्याचे नाकारले आणि संभाजी महाराजांच्या कानावर ही तक्रार घालण्याची योजना इंग्रजांनी आखली.

    विजय दिन - भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).

    घडामोडी
    १९६५ - मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
    २००५ - मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
    २०११ - मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.

    जन्म
    १८७४ - शाहू महाराज, समाज सुधारक.
    १९२७ - जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
    १९४३ - मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक.
    १९४९ - थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.

    मृत्यू
    १८६७ - ओट्टो, ग्रीसचा राजा.
    १९५२ - एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका.
    २००९ - भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार.

      July 26, 2016


  • कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र याबाबतचे समज आणि गैरसमज

    सर्व सामान्य नागरिकांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्हणजे वारस विषयक कायद्यातील तरतुदी. ह्या तरतुदी अत्यंत किचकट असून भारतात हिंदूंसाठी (बौद्ध, शीख, जैन, ब्राह्मण समाज,आर्यसमाज, नंबुद्री, लिंगायत) ‘हिंदू वारसा कायदा’, मुस्लिमांसाठी‘मुस्लिम वारसा कायदा’ तर पारसी, ख्रिश्चन, अंग्लो इंडियन आणि इतर सर्व धर्मियांसाठी ‘भारतीय वारसा कायदा’ यातील तरतुदी पहाव्या लागतात.

      June 23, 2021