(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!

    न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!
    आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!
    बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!
    यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!
    मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?
    तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!!
    शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती?
    तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या?
    आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?
    हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते!!
    मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!
    सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!
    आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!
    आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!
    भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!
    पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!
    पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!
    माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?
    कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?
    वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?
    लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?
    आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?
    निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!
    प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!
    शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!
    आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!
    शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो!!

      November 18, 2016


  • बिनभोगवटा शुल्क करपात्र की करमुक्त (Non occupancy charges) याबाबतचे स्पष्टीकरण

    गृहनिर्माण संस्थेला दरवर्षी विविध शुल्कातून होणाऱ्या उत्पन्नावर प्राप्तीकर भरावा लागतो. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संस्थेच्या मासिक शुल्क यामधील बिनभोगवटा शुल्क (NOC) ह्या उत्पन्नावर आता प्राप्तीकर देय नसल्याने गृहनिर्माण संस्थाना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दलची माहिती आपल्यासाठी सदर सत्रात देण्यात आली आहे.

      September 6, 2021


  • आत्महत्येचे नाटक (नशायात्रा – भाग २१)

    माझ्या लाडक्या जँकी कुत्र्याला देखील मी हळू हळू गांजा च्या धुराची सवय लावत होतो , अर्थात त्यामागे माझा फक्त कुतूहल हाच हेतू होता त्याला त्रास देणे हा हेतू कधीच नव्हता तरीही ते अतिशय निंद्य कृत्य होते हे मान्य करायला मला संकोच वाटत नाहीय एका नशेबाज व्यक्तीच्या डोक्यात काय येऊ शकेल हे सांगता येत नाही याचाच हा नमुना आहे .

      February 24, 2020


  • शरीररुपी परिस

    विचारान्चे सोने

      May 3, 2010


  • मराठीची समृध्द स्वरमाला – अ ची बाराखडी

    ५ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न होणार्‍या विश्व साहित्य संमेलनानिमित्त......

    सोपी मराठी ... प्रवाही मराठी ... अुत्क्रांत मराठी ... समृध्द मराठी....

    अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ

    मराठीच्या आद्य लिपीकारांनी, अ ला काना लावून तयार झालेला आ स्वीकारला ......
    मराठीच्या आद्य लिपीकारांनी अ ला ओकार लावून तयार झालेला ओ स्वीकारला .....
    मराठीच्या आद्य लिपीकारांनी अ ला औकार लावून तयार झालेला औ स्वीकारला .....
    पण .....
    मराठीच्या त्याच लिपीकारांनी अ ला अिकार लावून तयार झालेली अि .....
    अ ला अीकार लावून तयार झालेली अी .....
    अ ला अुकार लावून तयार झालेला अु .....
    अ ला अूकार लावून तयार झालेला अू ...
    अ ला अेकार लावून तयार झालेला अे ...
    अ ला अैकार लावून तयार झालेला अै ....
    स्वीकारले असते तर ......
    इ, ई, उ, ऊ, ए, ऐ ही अक्षरचिन्हं घडविण्याची गरजच नव्हती.

    हाच विचार, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रतिभावान द्रष्ट्या व्यक्तीला सुचला आणि त्यांनी, अि, अी, अु, अू, अे, अै ही अक्षरचिन्हं वापरण्यास सुरूवात केली. हीच अक्षरचिन्हं वापरून लेख लिहीले. अिसवीसन 1940 च्या सुमारास. पुण्याहून प्रसिध्द होणार्या, किर्लोस्कर, स्त्री वगैरे मासिकात प्रसिध्द झालेल्या मजकूरात हीच अक्षरचिन्हं वापरली आहेत, हे त्या काळी प्रसिध्द झालेल्या साहित्यात आढळतं. मी ही अ ची बाराखडी, गेली चाळीस वर्षे वापरतो आहे. माझ्या सर्व लेखात आणि पुस्तकात हीच बाराखडी वापरली आहे. डोळ्यांना आणि मेंदूला, या बाराखडीची सवय, लवकरच होते.
    आपणही हीच अक्षरचिन्हं वापरावीत.

    ही अक्षरचिन्हं वापरून तयार झालेले काही शब्द ......

    अिंद्र, अिन्द्र, अिंदिरा, अिन्दिरा, अितक्यात, अितीहास, अिच्छा ....
    अीश्वर, अीशस्तवन, अीशान्य, अीर्षा, ....
    अुपकार, अुपवन, अुकळणं, अुचापत्या, अुंच, अुंट, ....
    अून, अूब, अूर, अूस ....
    अेक, अेकवीस, अेकाअेकी, अेकादशी, अेकूण .....
    अैरावत, अैतिहासिक, अैवज, अैवजी, अैहिक .....

    हे शब्द वाचतांना काही अडचण आली? लिहीतांनाही कठीण वाटणार नाही.

    गजानन वामनाचार्य
    180/4931 पंतनगर, घाटकोपर (पूर्व),
    मुंबअी 400075.
    मोबाअील :: 9819341841

      September 2, 2015


  • आंघोळीचे प्रकार

    थंडी वाढत चाललीय... त्यामुळे आंघोळीचे खालील प्रकार वापरता येतील.

    1 - काकड स्नान - या स्नानात पाण्याच्या थेंबांना आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते.

    2 - नळ नमस्कार स्नान - यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल.

    3 - स्पर्शानुभूती स्नान - या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून
    "त्वं स्नानम् मम् स्नानम्" बोलल्याने आंघोळ झाली असे मानण्यात येईल॥

    4. जल स्मरण स्नान - हे उच्च कोटीचे स्नान असून अंथरूणात राहूनच पाण्याने आंघोळ करतोय या स्मरणानेच आंघोळ झाली असे होईल..... हे स्नान सुट्टी च्या दिवशी केल्याने विशेष लाभ मिळतो असे अनेकांचे मानने आहे ....

      November 12, 2016


  • वीजनिर्मिती – एक वेगळा विचार

    “महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात नवीन वीजनिर्मिती झाली नाही.”

    “महाराष्ट्र २०१२ पर्यंत लोडशेडींगमुक्त होणार- ऊर्जामंत्री”

    “२०१६ पर्यंत लोडशेडींग चालू ठेवावे लागणार- महाजेनको”

      June 23, 2010


  • राशी व त्यांचे स्वभाव – कन्या

    राशी :- कन्या
    स्वामी :- बुध
    देवता :- पीताम्बर
    जप मंत्र :- ॐ ह्री परमात्मने नमः
    उपास्यदेव :- श्री कुबेर
    रत्न :- पाचू
    जन्माक्षर :- टो ट्रो प पा पृ प्रपि प्रि प्री पी पु पू ष ण ठ पे प्रे प्रो कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर बुधाचाअंमल आहे. द्विस्वभाव, पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. मीन रास कन्या राशीचा विरोधी रास मानली जाते. उत्कृष्ट बुध्दीमत्ता संशोधक वृत्ती दिसून येते. वेळी कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती आढळते. बुध्दीचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद याच्या जोरावर उत्कृष्ट लोकप्रियता मिळते. निरीक्षण हातोटी उत्तम. अंतर्मनाचा थांग लागू देत नाहीत. पैशाच्या बाबतीत काटेकोर, दूरचा विचार करणारी असतात. माणसाची उत्तम पारख असते.

      November 28, 2016


  • अवर्णनीय देस

    भारतीय रागसंगीतात असे बरेच राग सापडतात, जे "ख्याल" म्हणून अधिक प्रचलित न होता, उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतात बरेच लोकप्रिय असतात. पूर्वी आपण, असे काही राग बघितले आहेत, जसे पिलू या रागाचे असेच नाव अग्रभागी येते. याचे मुख्य कारण, बहुदा या रागाचा उगम लोकसंगीतातून झाला असावा. याबाबत असे देखील विधान करता येईल, "ख्याल" म्हणून या रागात "भरणा" करणे जरा अधिक अवघड होत असणार. तसे बघितले तर, शास्त्रीय वादकांत, हे राग बरेच प्रसिद्ध आहेत आणि वादनातून, अशा रागांच्या भरपूर रचना आणि त्या देखील विविध भावनांशी संलग्न अशा, रचना ऐकायला मिळतात. असे असले तरी देखील, ज्या हिशेबात सुगम संगीतात आणि उपशास्त्रीय संगीतात, अशा रागांचे जे दर्शन घडते, ते केवळ अपूर्व असते.

    देस रागाबाबत असेच काहीसे म्हणता येईल. थोडे खोलात शिरलो तर, देस रागाच्या अनेक छटा, भारतातील विविध राज्यांच्या लोकसंगीतातून आढळतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, देस रागाच्या, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब इथल्या लोकसंगीतात या रागाच्या प्रसंगानुरूप छटा ऐकायला मिळतात. अर्थात, प्रसिद्ध गायक कुमार गंधर्वांनी याबाबत भरपूर संशोधन करून, चक्क नवीन रागांची निर्मिती केली आहे.
    देस रागाबाबत म्हणायचे झाल्यास, या रागावर लोकसंगीताचा बराच पगडा दिसतो तरीही, शास्त्रीय संगीताच्या कलाकारांनी त्याला "संपूर्ण" रागाचे स्वरूप देण्यात यश मिळवले आहे. आरोही सप्तकात "गंधार" आणि "धैवत" स्वर वर्जित तर अवरोही सप्तकात सगळे स्वर उपयोगात आणले जातात, म्हणजे औडव-संपूर्ण जातीचा हा राग आहे. स्वरावलीत, दोन्ही निषाद आणि त्यातल्या त्यात कोमल निषाद स्वराला या रागात अतिशय महत्व आहे. दोन्ही निषाद सांभाळून, या रागाची बढत करायची, यातच या रागाचे खरे कौशल्य आहे. या रागाची "मींड" बघायला गेलो तर मात्र, रिषभ स्वर आणि त्याच्या जोडीने मध्यम आणि गंधार स्वर घेऊन, जे स्वरमाला तयार होते, ती अपूर्व अशी असते.
    आता आपण, उस्ताद अमजद अली खानसाहेबांनी वाजवलेला राग देस ऐकायला घेतला तर हेच विवेचन आपल्याला समजून घेता येईल. उस्ताद अली अकबर खान साहेबांनी सरोदवर प्रस्थापित केलेले "गायकी" अंग आणखी वेगळ्या पायरीवर नेण्याचे काम, उस्ताद अमजद अली खान, यांनी फार समर्थपणे केले आहे. विशेषत: वाजत्या तारेवर, बोटातील नखीच्या सहाय्याने, मींड काढण्याची करामत तर विशेष ऐकण्यासारखी असते. तसेच तान घेताना, एखादा स्वर लांबवत, त्यातून "गमक" या अलंकाराचे यथार्थ दर्शन, त्यांच्या वादनातून आपल्याला ऐकायला मिळते.
    इथल्या या वादनात, आलापीपासून सुरवात करीत, हळूहळू रागाची "बढत" घेत, राग सर्वांगाने खुलवला आहे. गत वाजवताना, एखादी जीवघेणी हरकत घेऊन, ऐकणाऱ्याला चकित करण्याची खासियत तर खासच आहे.
    वास्तविक, मेहदी हसन हे नाव गझल गायकीतील अत्यंत आदराने घ्यायचे नाव, परंतु त्यांनी देस रागात गायलेली ठुमरी देखील अप्रतिम आहे. "उमड घुमड घिर आयो रे" हीच ती ठुमरी आहे. या ठुमरी गायनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, खान साहेबांनी "गझल" गाताना ज्याप्रकारे "गायकी" पेश करतात, त्यापेक्षा इथे संपूर्ण वेगळा आविष्कार, त्यांच्या गायकीत दिसतो आणि मजेचा भाग म्हणजे, ठुमरी गायनाची सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. हे तर खरेच आहे, गझल गायकी आणि ठुमरी गायकी, यांचा गायकी "अंदाज" हा वेगळा असतो आणि तसा तो आविष्कृत होणे गरजेचे असते.
    शब्दार्थाने ही ठुमरी वाचल्यास, या ठुमरीमध्ये ढग, पाउस, याचेच वर्णन आहे पण तरीही, देस रागात "तर्ज" बांधली आहे. अर्थात, रचनेत, पुढे "बदरा" हा शब्द येतो, तिथे उस्तादांनी काही क्षणात "मल्हार" रागाची झलक दाखवली आहे!! हा भाग खरच असामान्य वकुबाचा आहे. रचनेत, निषाद स्वरावर केलेली "आंदोलीत" कामगत तर थक्क करणारी आहे. अर्थात, इथे परत मध्यम स्वरातून, गंधार स्वराचा आधार घेऊन, निषाद स्वरावरील ठेहराव जो, मिंडेद्वारे घेतला आहे, ते देखील खास अनुभवण्यासारखे आहे.
    आशा भोसल्यांनी हिंदीत गायलेल्या अजरामर गाण्यांच्यात या गाण्याचा समावेश नक्की करता येईल. "बेकसी हद पे" हेच ते अप्रतिम गाणे. आवाजाचा विस्तृत पल्ला, तारता मर्यादा सहज,वेगाने आणि अगदी गीताच्या प्रारंभी देखील घेणे, यात कुणाही गायिकेला बरोबरी करणे अशक्य!! या गाण्यात देखील याच विशेषाचा विशेषत्वाने प्रत्यय येतो. अर्थात, केवळ स्वरांच्या फेकीचा पल्ला, हेच भूषण नसून, प्रसंगी वाद्यांचा स्वनगुण तंतोतंतपणे गळ्यातून काढून, चकित करण्याचे अलौकिक सामर्थ्य या गळ्यात आहे.
    "बेकसी हद पे जब गुजर जाये,
    कोई ऐ दिल जिये के मर जाये".
    या गाण्याच्या दुसऱ्या ओळीत, ज्या प्रकाराने लय आणि स्वरांची उंची, आशाबाईंनी गाठली आहे, ती खास ऐकण्यासारखी आहे. देस रागाचे ओळख म्हणून हे गाणे घेता येईल पण तरीही, गाण्यात अनेक ठिकाणी, इतर रागांचे स्वर देखील आढळतात!! खरतर, सुगम संगीतात ज्या सर्जनशीलतेच्या शक्यता असतात, त्या सगळ्या शक्यता, आशा भोसल्यांच्या गळ्यातून शक्य होतात.आवाजावरील नियंत्रण आणि ध्वनीवैशिष्ट्ये याचा अचूक वापर,यामुळे ऐकणाऱ्याला एक समृद्ध गायन ऐकल्याचा आनंद मिळतो.या आवाजाचे थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, कंठ्संगीतातील ध्वनीपरिणामांच्या शब्दावलीत भर टाकून, सांगीत शक्यतांची नवी परिमाणे सादर केली. जागतिकीकरण झालेल्या संगीतात सुखाने वावरणाऱ्या एका मोकळ्या, गात्या आवाजाचा त्यांनी आदिनमुना पेश केला आहे.
    वसंत देसाई, हे बहुदा एकमेव संगीतकार असावेत, ज्यांनी हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट आणि मराठी रंगभूमी इथे लीलया वावर केला आणि तसे करताना, त्या ठिकाणी, स्वत:ची स्वतंत्र मुद्रा उमटवली. शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास, चाल निर्माण करताना त्यात पुरेशी लवचिकता ठेवणे, जेणेकरून गाताना विस्तारशक्यता सहज निर्माण करता येणे शक्य. गायकी ढंगाच्या चाली करण्यात वाकबगार परंतु त्याचबरोबर, आपण कुठल्या माध्यमासाठी संगीत रचना करीत आहोत, याचे नेमके भान राखून, चाली निर्माण करण्याचा असामान्य ताकदीचा वकूब. मराठी रंगभूमीवर, संगीतकार म्हणून त्यांचा वावर प्रामुख्याने "ललित कलादर्श" या संस्थेपुरता अधिक करून होता. वसंतरावांनी तयार केलेली अशीच एक मनोरम रचना इथे ऐकायला घेऊ. "देह देवाचे मंदिर" ही, उदयराज गोडबोले यांनी गायलेली रचना, देस रागाशी नाते सांगणारी आहे.
    "देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर;
    जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर;
    जसे दुग्धामधे लोणी, तसा देही चक्रपाणी".
    उदयराज गोडबोले यांचा थोडा "खडा" आवाज म्हणजे तार सप्तकात अधिक रमणारा आणि हे ध्यानात ठेऊन, वसंतरावांनी या गाण्याचे "तर्ज" बांधली आहे. "प्रीतीसंगम" नाटकातील हे गाणे, देस रागाची ओळख करून देते. पहिल्या सुरांपासून तार स्वरांत गाणे सुरु होते. गाण्याची चाल मात्र, ज्याला "उडती छक्कड" म्हणता येईल अशा धर्तीची आहे आणि त्याला ढोलकीची साथ देखील अतिशय सुरेख आहे. अर्थात, पारंपारिक नाट्यगीताचा बाज नसून, थोडा भावगीताचा बाज वापरलेला आहे.
    आता आपण, सरदारी बेगम चित्रपटातील ठुमरी सदृश, चित्रपट गीत ऐकुया. "सांवरिया देख जरा इस ओर" हेच ते गाणे आहे. आरती अंकलीकर आणि शुभा जोशी यांनी एकत्रितपणे ही रचना गायलेली आहे. देस रागाशी या रचनेचे खूप जवळचे नाते सांगता येते. वनराज भाटीया, या संगीतकाराने ही रचना बांधली आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा संगीतकार परंतु व्यावसायिकदृष्ट्या काहीसा मागे पडलेला.
    "सांवरिया देख जरा इस ओर,
    युं ना आंख चुरा चितचोर".
    वास्तविक या दोघी शास्त्रीय संगीतातील गायिका पण तरीही ठुमरीसदृश रचना असूनही सादरीकरण अतिशय सुंदर झाले आहे. गाण्याच्या पहिल्या सुरापासून देस रागाची आठवण येते. एखाद्या उपशास्त्रीय रचनेचे, चित्रपट गीतात रुपांतर करताना, बरेचवेळा अनावश्यक काटछाट केली जाते आणि मूळ सौंदर्याला बाधा आणली जाते. तसला कुठलाच प्रकार इथे नाही. अत्यंत सुंदर लयीत गाणे पुढे सरकत जाते आणि गाताना, हरकती, अर्धताना वगैरे अलंकार सहज येतात. यात, सहज येतात, हे फार महत्वाचे!!
    "गोरी तोरे नैन नैनवा कजर बिना कारे
    छलके छलक छलक तरसाये,
    समय बदल दे जब मिल जाये;
    गोरी तोरे नैन नैनवा कजर बिना कारे"
    "मै सुहागन हुं" हिंदी चित्रपटातील हे गाणे आपल्याला देस रागाची झलक दाखवते. सुप्रसिध्द शयार कैफी आझमी यांची शब्दकळा असून, पंडित लच्छीराम या गुणवान संगीतकाराची चाल आहे. मोहमद रफी आणि आशा भोसले यांनी ही रमणीय चाल सादर केली आहे. गाण्याची चाल जरी देस रागावर असली तरी गायला फारशी कठीण नाही आणि हे कौशल्य संगीतकाराचे. रागच आराखडा डोळ्यासमोर ठेऊन चाल बांधली असल्याने, गाण्यातील ताना, हरकती अगदी देस रागात जशा आहेत, त्याच साच्यात बसवलेल्या आहेत.
    "आपको प्यार छुपाने की बुरी आदत है,
    आपको प्यार जताने की बुरी आदत है ".
    "नीला आकाश" या हिंदी चित्रपटातील हे गाणे देस रागाची छटा दाखवते. संगीतकार मदन मोहन यांनी गाण्याची तर्ज बांधली आहे. तसे बघितले तर ही चाल, संगीतकाराच्या नेहमीच्या पठडीतली वाटत नाही. गाणे म्हणून सुश्राव्य आहे पण तरीही गाण्यावर संगीतकाराची छाप नाही. अर्थात, कलाकृतीवर स्वत:ची मुद्रा असणे, हे योग्य की अयोग्य, हा वादाचा मुद्दा आहे.
    - अनिल गोविलकर

      October 2, 2018


  • मंगळागौरीची आरती

      September 27, 2011