(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माया नगरीची एक साक्षीदार 

    जे.जे. चा अप्लाईड आर्ट मधून पासआऊट होऊन वर्ष दिड वर्षे झाले असावे. नांदेडला माझ्या मोठ्या बंधूच्या घरा शेजारी गिरिश नार्वेकर नावाचे महाराष्ट्र शासनातील अधिकारी रहात असत. कला साहित्य सामाजिक क्षेत्रातील आवड त्यामुळे चांगला घरोबा होता. एकदा घरी आले असतानां त्यांनी माझी चौकशी केली व मला म्हणाले- ‘’ तू जे.जे.चा विद्यार्थी मग इथे काय करतोस.? माझ्या बरोबर एकदा मुंबईल ये माझ्या लहान भावाची ओळख करून देतो, तुला काही काम मिळू शकेल.’’ दिवाळीच्या सुट्ट्यात ते मुंबईला त्यांच्या कुटूंबा सोबत मलाही घेऊन् गेले. वरळी नाक्यावरील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एक लहानशा चाळीत ते मला घेऊन गेले. गोरा वर्ण, चेहऱ्यावर दाढी,पांढरा शुभ्र झब्बा आणि काळी पँट अश वेषातल्या एका तरूणाला मी नमस्कार केला. गिरिशभाऊ त्या तरूणास म्हणाले- “चंदू…हा माझ्या नांदेडच्या मित्राचा भाऊ दासू, जे.जे. मधून पास आऊट झालाय, काही काम मिळत असेल तर बघ त्याच्यासाठी !!! “ मग चंदूभाऊनी माझी विचारपूस केली. टायपोग्राफी हा माझा विषय सोडला तर माझ्या जवळ असलेला शून्य अनुभव त्यांच्या लक्षात आला. मला म्हणाले- “चल माझ्या सोबत.’’

    वरळी नाक्या वरून महालक्ष्मी स्टेशनकडे जाणाऱ्या डबल डेकरमध्ये आम्ही बसलो. पाच सात मिनिटात उतरलो. ती दोन मजली इमारत बाहेरून काही विशेष जाणवली नाही. आम्ही दोघे जिने चढून वर गेलो. वर जातानां काही जण डोक्यावर पत्र्याची चौकोनी पेटी घेऊन वर खाली जातानां दिसले. ही पेटी माझ्या परीचयाची होती. आमच्या शहरात अशाच पेटीतुन सिनेमांची रिळे येत असत. इमारतीच्या आत मात्र चांगलीच वर्दळ दिसत होती. प्रत्येकजण आपल्याच तोऱ्यात असल्या सारखा जाणवत होता. या इमारतीत लहान लहान ऑफिसेसची भरमार होती. मंत्रालयाच्या इमारतीत जशी केबीनची रांग असते तशी. यातल्या एका केबीनमध्ये आम्ही शिरलो. समोर एक उंच आणि किंचित टक्कल असलेल्या इसमाला चंदूभाऊ म्हणाले- “इसे कुछ काम हो तो दिजीए. जे.जे.का स्टुडन्ट है “ मग त्या इसमाने मला आत नेले. मोट्या आकाराचे दोन तीन अल्बम माझ्या समोर ठेवले व म्हणाले- इसे अच्छी तरहसे देख लो. मुवी टायटल्स कैसे लिखे जाते है उसके ये सॅम्पल है.’’ आणि मी वेड्या सारख ते अल्बम चाळत बसलो. त्यात ६० च्या दशकातल्या अनेक चित्रपटाचे टायटल्स होते. काळ्या कागदावर फक्त पांढऱ्या रंगाने नावे लिहायची. खाडाखोड वा टचिंग करायला वावच नव्हता. कारण यातील बारीकशी चूक पण पडद्यावर भली मोठी दिसणार. खरोखर अप्रतिम अल्बम होते सर्व. अत्यंत सफाईदार व वळणदार अक्षरे…मला ज्यांनी हे अल्बम बघायला दिले त्यांचे नाव मलिक साहेब. चित्रपटसृष्टीतले नामवंत नामाकंन तज्ज्ञ मलिक ब्रदर्सचे मालक. जर तुम्ही जुने चित्रपट बघण्याचे शौकिन असाल तर नामावळीत टायटल्स या मथळ्याखाली मलिक ब्रदर्स हे नाव नक्की दिसेल.

    मग मलिकभाई या इमारती मधील एका चित्रपट पब्लिसिटी स्टुडिओत घेऊन गेले. ‘सेल वेल’ नावाच्या या स्टुडिओत मला ९०० रू. महिना पगारावर काम मिळाले. ज्या चंदूभाऊमुळे मला काम मिळाले ते प्रसिद्ध एन.चंद्रा होत. नंतर मला त्यांच्या अंकुश या चित्रपट निर्मितीचा साक्षीदार होता आले. नंतर सविस्तरपणे यावर मी स्वतंत्रपणे लेख लिहीणार आहेच. अनेक चित्रपटात मी ‘फेमस स्टुडिओ’ हे नाव वाचत आलो होतो त्याच इमारतीतल्या एका केबीन मध्ये मी काम करत होतो. मुंबईतली अख्खी चित्रपट नगरी या इमारतीला ओळखत असे. याच इमारतीत त्यावेळच्या जवळपास सर्वच निर्माते, वितरक, प्रॉडक्शन, संकलक, लेखक वगैरेचे कार्यालये होते. दिवसरात्र ही इमारत गजबजलेली असे. इथे कुणीच कधी रिकामटेकडा बसलेला दिसत नसे. याच इमारतीतल्या संकलन रूममध्ये तासनतास बसून चंद्राजीने अंकूश संकलीत केला होता. संकलनाचे काम किती किचकट व डोळेफोड असते ते मी प्रत्यक्ष बघितले होते. याच ठिकाणी एकदा अनिल कपूरचे मोठे भाऊ टोनी कपूर आले होते. त्यावेळी चंद्राजी यांच्या डोक्यात तेजाब होता आणि त्यांना तो अनिल कपूर यांना घेऊन करायचा होता. आणि त्यांनी तो केला देखिल. याच ठिकाणी मी देवेन वर्मा या हास्य कलाकाराशी चक्क १० मिनीटे गप्पा मारल्या होत्या. अगदी साधेपणाने कोणताच आव न आणता ते बोलत होते. याच ठिकाणी मी जोगेंदर नावाच्या खल नायकास अत्यंत खालच्या भाषेत बोलतानां ऐकले. याच इमारतीतल्या मिनी स्टुडिओत अनेक चित्रपटांचे रशेश होत ते ही बघता आले….या इमारतीचा माहोलच काही और होता. ही इमारत फक्त दगड विटांची नव्हती तर अनेकांची स्वप्नं साकार करणारी चित्रपटमायच होती. आम्ही रूपेरी पडद्यावर फक्त काही चेहरे बघत असतो जे अभिनय करत असतात, ते आमच्या कायम लक्षात राहतात पण या इमारतीत काम करणारे कुणीही अभिनय करणारे नव्हते तर प्रत्यक्ष कामच करणारे होते. याच इमारतीत माझा अनेक शब्दांशी परिचय झाला. फोर शिटर्स, सिक्स शिटर्सचे कसे डिझाईन करायचे ते इथेच समजले. ऑप्टीकल इफेक्टस्, क्रोमो, चिटींग, पासिंग शॉट्स, क्लॅपर, क्रेन, ट्रॉली, डबींग, निगेटीव्ह कटींग, साऊंड ट्रॅक, कॅमेरा रोलिंग, अक्शन……किती किती पसारा असतो हा. २ तासाचा चित्रपट करताना किती लोक यासाठी झटत असतात ते याच इमारतीत मी अनुभवले…..ही इमारत कधीच झोप घेत नसे. काही कार्यालये वगळता रात्रभर काहीना काम चालूच असे.

    जवळपास वर्षभर मी ही या इमारतीचा एक अंश होतो. खूप मन रमायचे इथे. कोणता चित्रपट कधी प्रदर्शित होणार याच्या चर्चा रंगत असत. अमूक तमूक चित्रपट सिल्व्हर वा गोल्डन ज्युबिली कसा होईल यावर बेटींग चालायची. साफसाफाई करणाऱ्या पोरांच्या डोळ्यात पण ही इमारत भावी स्वप्ने दाखवत असे. चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या विश्वात पोहचण्याचा हाच तो रस्ता आहे असे इथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटायचे. अशा इमारती इतिहासाची साक्ष देणाऱ्या असतात. त्यांच्या मूक भिंतीने खूप काही बघितलेले असते. आता या इमारतमध्ये काय आहे हे मला माहित नाही. ही इमारत ३२५ कोटीला विकली गेली असे वाचल्याचे आठवते. मात्र या इमारतीचे अत्यंत गहीरे छायाचित्र माझ्या मनात कायम कोरले गेले…..गेले अनेक दिवस चित्रपटसृष्टीतील कलावंतावर लिहीत असतानां ही इमारत मध्येच डोकावत असे…म्हणून आज लिहले.

    दासू भगत.. (१५ जुलै २०१७)

      July 15, 2017


  • सागरेश्वर अभयारण्य

    सांगली जिल्ह्यातही सागरेश्वर हे ठिकाण वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील सागरेश्वर मंदिरामुळे वर्षा सहलीबरोबरच श्रावणात येथे होणाऱ्या यात्रेमुळं पर्यटकांना भक्तीरसातही चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो.

      September 18, 2013


  • आमची बायको

    साधारण माणसाला प्रवासात येणार्‍या अडचणीँचं वर्णन या कवितेत केलं आहे.

      August 9, 2011


  • फायर ऑनबोर्ड

    तेलवाहू तसेच केमिकल वाहून नेणाऱ्या जहाजांच्या अकोमोडेशन वर मोठ्या आकारात नो स्मोकिंग ही सूचना लिहलेली असते. लहानपणापासून मुंबईहुन मांडव्याला आणि अलिबागला जाताना लाँच मधून जाताना मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या मोठ्या मोठ्या जहाजांवर एवढ्या मोठ्या अक्षरांत नो स्मोकिंग का लिहलंय याबद्दल प्री सी ट्रेनिंग कोर्सला जाईपर्यंत नेहमीच कुतूहल वाटायचं.

      July 25, 2021


  • हा सागरी किनारा….. लाचखाऊ राजकारण्याचे गाणे

    हा सागरी किनारा............................... हा सागरी किनारा
    ओला सुगंध वारा............................... ओला सुगंध वारा
    ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा................. मिटल्या मुठीत आहे हा रेशमी निवारा

    हा सागरी किनारा............................... हा सागरी किनारा
    ओला सुगंध वारा................................ ओला सुगंध वारा
    ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा................... मिटल्या मुठीने येतो अंगावरी शहारा

    मी कालचीच भोळी............................... तू कालचाच भोळा
    मी आज तीच येडी............................... अन् आज तोच येडा
    ही भेट येगळी का............................... ही भेट येगळी बा
    न्यारीच आज गोडी............................... न्यारीच आज गोडी
    का भूल ही पडावी? वळखून घे इशारा................ ना भूल ही जराबी, वळखला मी इशारा
    ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा................... मिटल्या मुठीने येतो अंगावरी शहारा

    होते अजाणता मी................................ होतास अजाणता तू
    ते छेडले तराणे.................................. मी छेडले तराणे
    स्विकारल्या सुरांचे................................ मंजुळ मम सुरांचे
    आले जुळून गाणे................................ आले जुळून गाणे
    हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा.................. हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा
    ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा.................. मिटल्या मुठीत आहे हा रेशमी निवारा

    बोलू मुकेपणाने.................................. बोलू मुकेपणाने
    होकार ओठ देती................................ होकार ओठ देती
    नाती तनामनांची................................. नाती तुझी नि माझी
    ही एकरूप होती................................. भावाभावांची होती
    एकान्‍त नाचतो हा फुलवूनिया पिसारा................... येथेच नाचतो मी फुलवूनिया पिसारा
    ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा.................... डोळ्यांस मिटल्या दिसे एक उंच मनोरा

    - जगदीश खेबूडकर............................... - आकाश विहारकर

      January 13, 2023


  • आपली संपत्ती चाललीये कुठे?

    टेलिकॉम क्षेत्र हे देशातील सर्वाधिक ऊर्जा वापरणारे दुसर्‍या क्रमांकाचे क्षेत्र ठरले आहे. टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी देशातील एक तृतियांश ऊर्जा खर्च होते, असे दिसून आले आहे. देशाच्या एकूण ऊर्जा आवश्यकतेपैकी आयसीटी क्षेत्रासाठीच्या ऊर्जेचे प्रमाण येत्या दहा वर्षांत २.७ टक्के एवढे मोठे होईल, असे सरकारी आकडेवारी सांगते. मोबाइल टॉवर्ससाठी सर्वाधिक ऊर्जा लागते.

      November 10, 2011


  • माझे मन तुझे झाले !

     

      November 16, 2013


  • शेल्टर आर्केड को-ऑप सोसायटी, सीवूडस, नेरुळ

    खर तर मी हिंदू किंवा मुस्लीम किंवा कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करत नाही नव्हे तसा माझा मानस हि नाही. कारण मी केवळ एकच धर्म मानतो व तो केवळ मानवता (माणुसकी) किंवा त्यापुढे जावून सांगावेसे वाटते तो एक धर्म म्हणजे केवळ भारतीय

      October 16, 2013


  • इंटरनेट, फेसबुकवरील साहित्य स्वरूप व अपेक्षा

    भारतात इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकचा प्रसार फारच झपाट्याने झाला आहे. पूर्वी लोकांना काही मोजक्या मुद्द्यांवर जोडून ठेवण्याचे माध्यम म्ह्णून फेसबुकचा वापर केला जात होता. त्यानंतरच्या काळात तरूण वर्गापुरता मर्यादित असलेला फेसबुक आज सर्व वयोगटातील, सर्व वर्गातील, सर्व जाती- धर्मातील आणि सर्व स्थरातील लोकांना व्यक्त होण्याच माध्यम म्ह्णून पुढे येत आहे.आज आपल्या देशात फेसबुकला आपल्या देशातील प्रसारमाध्यमां इतकेच महत्व प्राप्त झालेले आहे. म्ह्णूनच तर येऊ घातलेल्या निवडणूका लक्षात घेता विविध राजकीय पक्षांनी प्रचारासाठी फेसबुकचा मतदारांपर्यत पोहचण्यासाठी माध्यम म्ह्णून वापर करायला सुरूवातही केली आहे. फक्त मरठी साहित्याच्या दृष्टीने फेसबुकडे पाहिले असता असे लक्षात येते की पूवी फेसबुकवर व्यक्त होण्यासाठी मराठी साहित्यिक इंग्रजीचा वापर करायचे, नंतर ते मराठी इंग्रजीतून लिहू लागले आणि आता मराठी साहित्यिक पूर्णपणे मराठीतून व्यक्त होण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सुरूवातीला फेसबुकवर मराठी साहित्य म्ह्णून मराठी कविता आणि विनोद मोठ्या प्रमाणात वाचायला मिळायचे. पण आज सर्वच प्रकारातील मराठी साहित्य फेसबुकवर अगदी मोफत वाचायला मिळ्ते ज्यात कविता, विनोद, कथा, लेख, कादंबरी, जवळ-पास सर्व विषयांना वाहिलेली ई-बुक स्वरूपातील पुस्तके काही नव्याने सुरू झालेली साप्ताहिके आणि मासिके यांचा त्यात समावेश होतो.

    कधी –कधी फेसबुकवर उपलब्ध असणारे साहित्य नक्की कोणाच्या मालकीच आहे या बाबत बर्याचदा संभ्रम निर्माण होतो कारण काही लोक इतरांच्या साहित्याखाली लिह्लेली त्या साहित्यीकांची नावे खोडून साहित्य ‘शेअर’ करतात. हे खरं म्ह्णजे थांबायला हवं. बर्याचदा आपल्याच कविता आपल्याच इतर कोणाच्या तरी नावाने वाचायला मिळतात तेंव्ह आश्चर्याचा धक्काच बसतो खास करून प्रेम कविता. त्यामुळे बर्याचदा नामवंत कवी आपल्या नव्याने लिहलेल्या कविता फेसबुकवर प्रकाशित करीत नाहीत. हा ! पण हे खर आहे की नवोदित लेखक आणि कवी यांच्यासाठी फेसबुक हे एक अमर्याद व्यासपीठ आहे. फेसबुक मूळे आज मराठी साहित्य क्षेत्राला अनेक नवोदित कवी आणि लेखकही लाभत आहेत्. मराठी साहित्याच्या दृष्टीने हे हिताचेच म्ह्णावे लागेल. फेसबुकवर उपलब्ध असणारे साहित्य उत्तम असले तरी त्याला फेसबुकच्या मर्यादांचा सामना करावा लागतोच त्यामुळे फेसबुकवर उपलब्ध असणारे उत्तम साहित्य इतर माध्यमातूनही लोकांपर्यत पोहचायला हवे तसे ते पोहचताना दिसत नाही. ते साहित्य ही आपल्या पर्यत पोहचाव अशी अपेक्षा सर्वसामान्य वाचकांची असणारच. फेसबुक आता पूर्वीसारखे फक्त गपा-टप्पांचे माध्यम उललेले नसून त्याला एका मंचाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे आता फेसबुकवर सुरू असलेले रेणुका आर्ट खुले ई साहित्य संमेलन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद मराठी साहित्य क्षेत्रात असणारे फेसबुकचे महत्व अधोरेखीतच करीत आहे...

    -- निलेश बामणे

      February 6, 2014


  • एव्हरग्रीन गाणे – “जाने कहा गये वो दिन”

    हे गाणे तुम्हाला तुमच्या त्या खास जुन्या दिवसात घेऊन जाते. तुमच्या आठवणी जाग्या करते. मनाच्या आतल्या संवेदना हलवून सोडते. जुने दिवस वाईट असले किंवा चांगले असले तरी “हरवलेले” असतात आणि जे हरवलेले असते त्याची चुटपुट आणि ओढ तितकीच तीव्र असते. त्या चुटपुटीची आणि तीव्रतेची जाणीव ह्या एव्हरग्रीन गाण्यात भरलेली आहे.

      September 22, 2018