(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • घाणा (मुलीच्या लग्नाचा) (३)

  • छतावर साहित्यिकांच्या नावांचे कोंदण

    लहानपणापासून कवितांची प्रचंड आवड. वाचलेल्या कवींवर निस्सीम प्रेम. या कवींची नावे सतत आपल्या डोळ्यासमोर आसावीत ही भावना. मात्र, घर पत्र्याचे. त्याला छत नसल्यामुळे नावे टाकण्याची अडचण. ही अडचण पत्र्याच्या घराला पीओपी करून सोडवली.

  • शैक्षणिक सहल आयोजनातील सावधानता

    शाळा सुरू असताना अनेक सहशालेय उपक्रम घेतले जातात. स्नेहसंमेलन, परिसर भेट, चावडी वाचन अशा काही उपक्रमाचा प्रामुख्याने त्यामध्ये समावेश असतो.स्पर्धा परीक्षा, रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , संगीत खुर्ची,जिलेबी रेस, विविध खेळ या उपक्रमामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते . सहल हा भौगोलिक आणि ऐतिहासिक माहीतीसाठी उत्तम प्रकार आहे. गड-किल्ले पाहणे, धरण, पर्यटनस्थळ पाहणे किंवा मग ऐतिहासिक किंवा भौगोलिक स्थळ पाहणे हे औत्सुक्याचा विषय ठरतो. मुलांना पर्यटन आवडते. त्यातून जी ज्ञानप्राप्ती होते ती चिरःकाल टिकाऊ स्वरूपाची असते.कायम स्मरणात राहते. मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन आणि दृढीकरण होते किंबहुना ते शिक्षणाचेच कार्य आहे.

    शाळास्तरावर सहलीचे आयोजन करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.मुलं उत्साही असतील तरीही ग्रामीण भागातील मुलांचे पालक बसभाडे देण्यास तयार नसतात . दुसरे म्हणजे दिले तर उशीरा . त्यातही शाळेतील मुलांची संख्या कमी असते अशी मुले सहलीचे आयोजन करू शकत नाहीत. ज्या शाळेत जास्तीची मुलं आहेत तेच सहलीचे आयोजन करतात. तिथेही शिक्षक, पालक यांच्या भूमिकेवर ते अवलंबून आहे. सहलीचे ठिकाण, मुक्कामाचे स्थळ, तेथील भोजन व्यवस्था यांचा सारासार विचार करावा लागतो.सुरक्षितता हा एक प्रश्नच आहे. अनुचित काही घडू नये याचीही दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षक पालक मानसिकतेवर ते अवलंबून असते.

    प्रवासाच्या बाबतीत खाजगी वाहनाच्या ऐवजी एस.टी.बसला पसंती दिल्यास तो उत्तम पर्याय ठरतो. सहलीसाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. ती तालुकास्तरावर मिळत नाही. जिल्ह्यावरून परवानगी आणणे खर्चिक काम ठरते. सहलीच्या परवानगीसाठी चिरीमिरी दिल्याचे एका मित्राने खाजगीत सांगितले. मुख्याध्यापक , शिक्षक यांच्या सकारात्मक दृष्टिकोनावर बरेच अवलंबून असते. स्थळांची निवड करताना मुलांना जास्त कष्टप्रद होणार नाहीत असे किल्ले निवडावे लागतात.सहलीसाठी वापरण्यात येणारी बस दुरूस्त असणे आणि चालकास रस्त्याची माहीती असणे गरजेचे असते. डोंगर , दरी , एकेरी वाहतुक, गर्दीची ठिकाणे या बाबी प्राधान्यक्रमाने पहाव्या लागतात. सोबत पाण्याची सोय असावी लागते त्याचबरोबर मुक्कामाची ठिकाणे अगोदरच निश्चित झालेली असावीत. समुद्राच्या किनारी जाणार असाल तर पाण्याची खोली किती आहे ? मुलं काय करताहेत ? हेही लक्षात घ्यायला हवे. मध्यंतरी सहलीसाठी गेलेली काही मुलं बुडून मृत्यूमुखी पडल्याचे आपण ऐकले असेल. अशा दुर्घटना टाळणे आपल्या हाती आहे. इतर वेळी बंदिस्त असणारी मुले आनंदाच्या भरात सैरावैरा धावण्याची शक्यता असते. याबाबत दक्षता घेणे गरजेचे असते. मुलांना शिस्त असणे यावेळी कामी येते . यामुळे स्थळ पाहण्याचा आनंदही घेता येतो. हलका-फुलका म्हणजे पचनास सोपा असा आहार प्रवासात सोबत असावा.तेलकट पदार्थ शक्यतो टाळावेत. त्याचबरोबर प्रथमोपचार पेटीही जवळ असणे आवश्यक आहे. त्यात आवश्यक ते साहित्य असावे. स्थळ पाहणी करताना टिपणे काढण्याची सवय मुलांना लावावी. गाईड, मार्गदर्शकाचे मानधन पुरातत्व विभागाशी संपर्क करूनच ठरवावे. गाईडमुळे योग्य मार्गदर्शन मिळते. सहलीदरम्यान छायाचित्र काढण्याचा मोह होणे साहजिकच आहे तद्वतच काळजी घेणे महत्वाचे असते . किल्ल्यांची तटबंदी किंवा निमुळता कडा फोटोसाठी निवडू नये. अपघात होण्याची शक्यता अधिक असते.त्या स्थळाचे पावित्र्य टिकविणे आपल्या हाती असते. सोबतचा कचरा कचराकुंडीतच टाकावा . इतरत्र तो फेकून देऊ नये. मुलांच्या सोबत आपल्या शाळेचे ओळखपत्र असणे गरजेचे असते. कारण अनेक शाळांचे अनेक विद्यार्थी सहलीसाठी आलेले असतात. मुलांचे गट पाडून यादी आपल्याजवळ ठेवावी. पालकांचे दुरध्वनी क्रमांक असल्यास उत्तमच. प्रसंगी गटनायक पद्धती अवलंबवावी. निरीक्षण नोंदी ठेवल्या पाहिजेत . शिक्षकांनी तेथील स्थळांबाबत अधिकची माहीती अगोदरच दिली पाहिजे. कित्येकवेळा मुलं काय पाहतात हेच त्यांना कळत नाही. पाहणी निरीक्षणानंतर कुणी चुकलेच तर कुठे यायचे याची निश्चिती अगोदरच करावी. कारण सहलीनंतर कोण कुठे कसे चुकले? मग कशी घबराट झाली? याचे मजेदार किस्से ऐकायला मिळतात. सहल हा आनंदाचा क्षण असतो.या आनंदात विरजण पडू नये.या काळात प्रत्येक घटकांचे वर्तन सहकार्याचे एकोप्याचे असावे लागते. बसगाडी पंक्चर , डिझेल व इतर उणिवा दूर करून सज्ज असली पाहिजे. इतकी काळजी घेतली सावधानता बाळगली तर सहशालेय उपक्रमात सहल या उपक्रमास मात्र तोड नाही तो एक अविष्मरणिय क्षण असतो एवढे मात्र नक्की . कारण मोठ्यांना आपण बालपणी ज्या सहलीसाठी गेलो होतो ती सहल आठवतेच ना ?

    सहली या शासकीय यंत्रणेने आयोजित केल्यास अधिकाधिक मुलांना त्याचा फायदा होईल. प्रत्येक मुलाचा विमा असावा. स्थळे ठरवून द्यावीत. शिक्षकांना अधिक संरक्षण द्यावे. बसचे वाहक, बसगाडी ठरवून द्यावी.भोजनासाठी परवाने द्यावेत. परवानाधारक हाॅटेलमध्ये निवास आणि भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. सर्वच सहलींसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी. खर्चाची प्रतिपुर्ती वाहतुक खर्चासह शासनस्तरावर झाल्यास या उपक्रमास पाठबळ मिळेल..

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार जि.बीड
    मो.9421442995

  • गोळवलकर गुरूजी आजही लाखोंचे प्रेरणास्थान! 

    संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर जगात अनेक देशात संघ परिवाराची जी घोडदौड सुरु आहे आणि संघाच्या व्यापक परिवाराची निर्मिती ज्यांनी केली ते माधव सदाशिव गोळवलकर ज्यांना सारेजण गोळवलकर गुरूजी म्हणून ओळखतात त्यांचा आज जन्मदिवस. या त्यांच्या जन्मदिनी त्यांच्याचरणी कोटी कोटी प्रणाम.

  • लोककला आणि कलावंतांना राजाश्रयाचा प्रश्न..

    जीवन ही एक कला आहे. मानवी जीवनात कला नसेल तर औदासिन्य , दैन्य असेल. कलाकार आपली कला जीव ओतून सादर करत असतो.रसिक त्यास प्रतिसाद देतात. रसिकांचा प्रतिसाद हा कलाकारांचा खरा आनंद असतो. कलाकाराच्या दृष्टीने कला हे त्याच्या जगण्याचे आणि इतरांना आदर्शवत जगवण्याचे माध्यम असते. चित्रकार रंगरेषांच्या, गायक आवाजाच्या, वादक वाद्यांच्या तर लेखक लेखनीच्या माध्यमातून आपली कला सादर करत असतो. कला त्याच्यासाठी जीव की प्राण असते. तो कलेत रमतो.कला जगतो.कला जोपासतो. कला परंपरेने आणि आवडीने त्याचबरोबर कौशल्याने साध्य होते. कलेच्या साधनेसाठी कठिण परिश्रमाची गरज असते.तरच ती अवगत होते.

    लग्नकार्यात गायक गातात. वर्हाडीमंडळीचे मनोरंजन करतात. सनई ,चौघडा, बासरीबरोबर ढोल आणि बँडवादनही होते. किर्तनात पकवाज, टाळ, हार्मोनियम अशी वाद्ये असतात तर गायक , वादक , किर्तनकार सहभागी असतात. लोककलेतही तमाशामध्ये ढोलकीवादक, नृत्यकला, अभिनय कला असते. जागरण गोंधळामध्ये संबळ, ढोलकी , तुणतुणे या वाद्यांसह वाघ्या-मुरळी हे कलाकार असतात. देवीच्या मंदीरात आराधी आपली कला सादर करतात. कवड्याच्या माळा, ज्योत आणि एकासुरात लोकगीते म्हणणारी कलावंत मंडळी येथे असते.चित्रपट, नाटक यांतूनही कलाच आविष्कृत होते.त्याचबरोबर पोतराज, मसनजोगी, कुरमुडेवाले, नंदीबैलवाले यांचेसह असंख्य लोककला जोपासणारे कलाकारच असतात. त्यांचे जीवनमान आज कसे आहे ? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जागतिकीकरणाच्या आणि आधुनिकतेच्या स्पर्धेच्या युगात नुसती भागंमभाग चालू आहे. रस्त्यावरचा डोंबार्याचा खेळ पाहण्यात कोणालाही रूची नाही. कलाकार जीव ओतून, मेहनतीने कलेचे सादरीकरण करत असतो. ज्याच्या कलेला समाजाचा आधार मिळाला तो कलावंत यशस्वी होतो. यश, प्रसिध्दीच्या जोरावर अर्थप्राप्ती होते. सिनेतारका , सिनेकलावंत यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात. टीआरपीवाढीसाठी चढाओढ लागते. झगमगाटी दुनिया असते.अशा कलाकारांचा वेगळा समुह होतो. आज लाखो कलावंत असे आहेत की कला सादरीकरणासाठी त्यांना संधी नाही.मंच नाही.जी व्यवस्था आहे ती कमकुवत आहे. आराधी, गोंधळी किंवा इतर लोककलावंताना चरितार्थ चालविण्याचे साधन त्यांचेकडे नसते. एकतर समाजाचा आधार संपुष्टात येत असताना उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने अनेक कलावंत खितपत पडलेले आहेत. तमाशातील वगामध्ये राजाचे पात्र करणारे कलावंत स्वतःच्या जीवनाचा तमाशा करून बसले आहेत! कलेच्या माध्यमातून जे काही मिळते त्यातून उपजिवीका न भागल्याने कित्येक कलावंतांनी एकतर ती कला सोडून दिली किंवा स्वतः नैराश्याच्या गर्तेत गेलेले आहेत. काहींनी व्यसनाला जवळ केले आहे.

    प्राचिन काळात कला जाणिवपुर्वक जोपासली जायची. राज्याच्या सांस्कृतिक वैभवात त्यामुळे भर पडायची. युग बदलले. यांत्रिकीकरणामुळे पोटाचेच प्रश्न निर्माण झाले.गतीमान युगात नवनवे शोध लागत गेले तसा लोककलेचा वारसा कमी होत गेला. पुढील पिढीत हे गुण उतरत नाही. त्यासाठी प्रयत्न झाले नाहीत अथवा कालौघात दुर्लक्षित झाले. त्यामुळे झाले काय की जी वैभवशाली परंपरा आपण निर्माण केली होती.जी बाब समाजाच्या जडणघडणीमध्ये खूप मोलाची भर टाकत होती. सुसंस्कृत समाजासाठी ज्याचा मोठा हातभार होता अशा कला लोप पावत चालल्या आहेत. एकेकाळी रसिकजनांनी डोक्यावर घेतलेली कला नावापुरतीच राहीलेली आहे. जत्रा, यात्रा, उत्सव , बाजार असे समाजसमुहाचे उपक्रम कमी होत आहेत तसा या कलांची र्हासाकडे वाटचाल सुरू आहे. शिवकालात याच लोककलेने महत्वाची भूमिका बजावलेली आहे.तमाशा, पोवाडा, भजन किंवा कोणतीही लोककला असो आता समाजमान्यता कमी होतेय. राजमान्यतेच्या बाबतीतही तेच आहे. त्या कलावंतासमोर आज खूप अडचणी आहेत. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील. किंवा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल ते सोडविण्यासाठी कुणालाही त्यात रस नाही.कितीतरी वृध्द कलावंत जर्जर आजाराने त्रस्त आहेत. त्यांना विमाकवच नाही कि सुरक्षाकवच नाही. जोपर्यंत कलावंताच्या अंगात रग आणि धग आहे तोपर्यंत धरपड करण्यातच त्याची कला संपते. सिनेमा,ऑडिशनच्या , चित्रपटात काम देण्याचा स्वप्नापायी कितीतरी कलाकाराची फसवणूक होऊन जीवन बरबाद झालेले आहे. त्यासाठी आज काहीतरी उपाययोजना करावीच लाजेल.. हजारो स्वप्न उराशी घेऊन आलेले तरूण कलाकार गैरमार्गास गेलेले आहेत. हे वास्तव स्वीकारण्यावाचुन पर्याय नाही.

    वृध्द कलावंताना व्यवस्थेकडून मानधन मिळते . कितीतरी वर्षापासुन त्यात वाढ झालेली नाही. कितीतरी कलावंत अजुनही मानधनापासुन वंचित आहे. 'क' दर्जाच्या कलावंताला दरमहा दीड हजार इतके मानधन मिळते. ते त्याच्या उपजिविकेसाठी पुरते का ? निवड प्रक्रिया किती पारदर्शक होते हेही महत्वाचे असते. बँकेच्या दारात मानधनासाठी तासन् तास ताटकळत बसणार्या कलावंताला मिळणारी वागणूक आश्चर्यचकित करणारी आहे. तालुक्यातून दरवर्षी फक्त तीन चारच प्रस्तावाची शिफारस होते. यातून काही अडाणी दुर्गम भागातील लोककलावंत पुढे येत नाहीत किंवा त्यांच्या कलेचे मुल्यमापन करण्याचे कोणतेच परिमाण उपलब्ध नाही. संगणक क्रांतीमुळे या लोककला लोप पावत चालल्यात. तसे काही वृद्ध कलावंताचा तर मानधन न मिळताच मृत्यूही झालेला असतो.

    लोककला असो की इतर कला असो ही जाणिवपुर्वक जोपासायला हवी. तिचे संगोपन, संवर्धन हे शासन आणि समाजव्यवस्थेने केले पाहिजे. सुसंस्कृत समाजासाठी ते गरजेचे आहे. कला, क्रिडा क्षेत्रात नैपुण्य मिळवार्या विद्यार्थ्यांसाठी पंचवीस गुण देण्याचा निर्णय असताना खूप मुलं त्यापासून वंचित राहतात किंवा ज्यांचे पालक सुशिक्षित आहेत अशांचीच दखल घेतली जाते. लोककला सादर करणार्या विद्यार्थ्यांचा या गुणवाढीसाठी काही उपयोग नाही. लोककला जतन झाल्या. तिचे संगोपन झाले तर समाजजीवनात रस निर्माण होईल. मान्यताप्राप्त कलावंताच्या पाल्याला नोकरी आणि शिक्षणात सवलती देता येतील.

    पुण्यनगरी
    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार,जि.बीड
    संपर्क-9421442995

  • लहानपणी बर होत….

    लहानपणी बर होत....
    वरच्या इयत्तेतल्या मुलांची पुस्तक अर्ध्या किमतीत आपल्याला चालायची.
    आता नवीनचं पुस्तक.... ती हि शाळेतूनच घ्यावी लागतात.
    मोठ्या भावाचा शाळेचा गणवेश आपल्याला कामी यायचा ...
    आता किमान दोन प्रकारचे गणवेश शाळेत लागतात..
    ईतर दिवशी वेगळा आणि पी.टी. च्या दिवशी वेगळा.
    आम्हाला एकदा घेतलेला रिलाईबल (Reliable) कंपनीचा रेनकोट दोन तीन वर्ष चालायचा...
    आता प्रत्येक वर्षी नवीन कार्टुनच चित्र असलेला रेनकोट आणि सोबत छत्री ही लागते.
    आम्ही अर्धा तास चालत मित्रांसोबत गप्पा मस्करी करत शाळा आणि शाळा ते घर गाठायचो...
    आता १५/२० मिनिटावरची शाळा गाठायला सुद्धा बस किंवा रिक्षा लागते.
    तेव्हा शाळेत फुल दंगा करून एकमेकांना लोळवून घरी गेलो तरी चालायचं...
    आता आपल्या मुलाला धक्का लागला तरी पालक तक्रार घेऊन शाळेत पोहोचतात.
    तेव्हा बाबा लाईफबॉय साबणाच्या लाल वडीचे दोन तुकडे करायचे आणि आम्ही डोक्यापासून पायापर्यंत तोच साबण वापरायचो...
    आता केसांना वेगळा शॅम्पू, चेहेऱ्याला वेगळा साबण, शरीराला वेगळा साबण, ताईला वेगळा साबण, दादाला वेगळा साबण, आईला वेगळा साबण, बाबांना वेगळा साबण लागतो.
    तेव्हा आई ५०१ साबणाच्या बार चे चार तुकडे करायची आणि तेच सर्व कपड्यांना वापरायची....
    आता वेगळ्या कपड्यांना वेगळा साबण आणि पावडर लागते, वेगळी निळ लागते, स्टार्च ला वेगळं आणि सुगंध यायला वेगळं लिक्विड साबण लागत.
    तेव्हा आम्ही सणा सुदीला अत्तर वापरायचो.
    आता रात्रंदिवस फॉग चालतोय....
    तेव्हा पावसाळ्यात चिखल उडू नये म्हणून पायल स्लिपर्स ला मागे रब्बर लावायचो.
    आता घरी वापरायला वेगळी, बाहेर वापरायला वेगळी, पावसाळ्यात वापरायला वेग वेगळी चप्पल लागते.
    तेव्हा पावसाळ्यात खाली खराब होऊ नये म्हणून फुल पॅन्ट वर दुमडून विशिष्ट पिन असलेल्या रबर ने फिट्ट करत असायचो.
    आता खास पावसाळी कपडे, हाफ पॅन्ट वापरतो.
    तेव्हा शाळा सुटली कि... आवळा, बोर, चिंच, पेरू, काळ मीठ, कलर वाला बर्फाचा गोळा खात घर गाठायचो....
    आता... कुरकुरे, कॅडबरी, किंडर जॉय, पेप्सी कोला, वेफर्स खातात मुलं....
    तेव्हा पेरुवाल्याकडे सहा मित्र जायचे, दोन मित्र दोन पेरू विकत घायचे बाकीचे चार मित्र गलका करत किमान दोन पेरू तरी ढापायचे..
    तेव्हाचे पालक अश्या गोष्टींना मुलांचा खोडकरपणा समजायचे.. आताचे पालक चोरी समजतात .
    तेव्हा वाढत्या अंगाचे कपडे मिळायचे
    आता तोकड्या अंगाचे कपडे मिळतात..
    तेव्हा हे अनुभवायला मिळायचं
    आता हे वाचायला लागतयं...

  • बदलणारं अस्तित्व

    तिच्या घरापासून थोडी लांब एक छानशी जागा होती. तिथे भरपूर आणि उंच झाडं, झाडांना लपेटलेल्या वेली, त्यावरील वेगवेगळ्या रंगाची, गंधाची फुलं आणि या सगळ्यावर मुक्त विहार करणारे, किलबिल करणारे पक्षी. या सगळ्या गोष्टी जेवढ्या ठळक तेवढंच त्यांच्या विरुद्ध असणारा एक डोहं ही होता तिथे.

  • व्यक्तिबोधक शालेय शिक्षण

    आज एक व्हाट्स अँप मेल आला, छान होता. “एक दगड काच फोडू शकतो, एक शब्द हृदय दुखावू शकतो, एक क्षणात प्रेम होऊ शकते, मग एका धड्यात परीक्षेचा पेपर का संपू शकत नाही?” थोडा विनोदी होता. लिहिणारा गमतीत लिहून गेला होता. त्याने ‘एक’ ह्या शब्दावर श्लेष साधला होता.

  • वातावरणाच्या शुद्धीसाठी भेषज यज्ञ, अग्निहोत्र वगैरे…….

    पूर्वी आपल्याकडे विश्वाच्या सुख-शांती आणि कल्याणासाठी विविध यज्ञ केले जात. आज या यज्ञांविषयी उपेक्षेने बोलले जात असले तरी नासासारख्या जगन्मान्य संशोधन संस्थेने यज्ञांबाबत संशोधन केले आहे. त्या संशोधनानुसार यज्ञामुळे त्या परिसरातील हवेतील विषाणू व जिवाणू नष्ट होऊन वातावरणशुद्धी होते. यज्ञामध्ये धूप, वनस्पती, औषधी इ.ची किती प्रमाणात आहुती दिली. यावर यज्ञाचे कार्यक्षेत्र किती मोठे असेल ते ठरते.

  • जगातली १० अशी ठिकाणे जिथे तुम्हाला सहजपणे प्रवेश नाही.

    जगातली १० अशी ठिकाणे जिथे तुम्हाला सहजपणे प्रवेश नाही. इथली सिक्युरिटी व्यवस्था अचाट आहे.