महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
महाराष्ट्रात अनेक द्राक्षमळे आहेत. द्राक्षापासून मद्यनिर्मिती करणारे अनेक कारखानेही महाराष्ट्रात आहेत. नारायणगाव येथे चौगुले इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प असून येथे भारतातील शॅंपेनचे पगिले उत्पादन सुरु झाले होते.
November 21, 2015
धाडसी लमाणी लोकांचे वास्तव्य हे जालना जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. भिल्ल्ल जमातीचे लोकही जिल्ह्यात आढळतात. भिल्ल जमातीची भाषा भिल्ली असून, अहिराणी व पावरी या बोलीभाषाही या भागात बोलल्या जातात.
June 23, 2015
पूर्वी पूर्व खानदेश या नावाने ओळखल्या जाणार्या जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे.
June 23, 2015
पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी गोवा मुक्ती संग्रामाचा लढा उभारण्यात आला. गोवा कृती समितीने १५ अॉगस्ट १९५५ ला मार्च कढण्याचे ठरवले तेव्हा पोर्तुगीज शासनकर्त्यांना त्याची कुणकुण लागली. मोठ्या प्रमाणात गोवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. गोव्याकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. भारतीय व विदेशी वृत्तपत्रांना बंदी घालण्यात आली तसेच रेल्वे आणि तत्सम सेवा बंद करण्यात आल्या.
November 8, 2016
स्वामी विवेकानंद यांचे निवासस्थान असलेला बेलूर मठ पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात आहे.
July 11, 2016
इटली हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. हा देश विकसित देशांपैकी एक असून तो जी-७चा सदस्य आहे. इटली चे क्षेत्रफळ ३,०१,२५३ चौ.किमी एवढे आहे. लिरा हे इटली चे चलन असून इटली ची साक्षरता ९७ टक्के आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून इटालियन ही प्रमुख भाषा आहे. रोम ही इटलीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हा देश गंधकाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.इटली तील प्रमुख खेळ फुटबॉल आहे.
February 20, 2019
चामराजनगर हे शहर कर्नाटक राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले एक मोठे शहर आहे. म्हैसूरचे नववे राजे चामराज यांच्या नावावरुन या शहराचे नाव पडलेले असून, कर्नाटकातील तुलनेने हे एक अल्पविकसित असे शहर आहे.
तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांच्या सीमा चामराजनगरपासून खूपच जवळ आहेत. म्हैसूरपासून राष्ट्रीय महामार्घ क्र. १७ वरुन चामराजनगरला जाता येते.
चामराजनगर आणि परिसरात अनेक प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. चामराजराजेश्वर मंदिर, बन्नारी अमन मंदिर, गोपालस्वामी मंदिर, बांदिपुरा राष्ट्रीय अभयारण्य, शिवनासमुद्र धबधबा आदींचा त्यात समावेश आहे.
प्रसिध्द भवानीसागर धरण येथून ७५ कि.मी. वर आहे.
July 17, 2016
ज्वारी व कापूस ही जिल्ह्यातील प्रमुख पिके असून काही भागात केळीचे पीकदेखील घेतले जाते. प्रामुख्याने किनवट तालुक्यातील जंगलांत बांबूची वने आहेत. नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात काळी कसदार मृदा मोठ्या प्रमाणात आढळते.
June 26, 2015
कोल्हापूर शहरापासून २७ किलोमीटर अंतरावर बाहुबली पहाडी मंदिर आहे. येथे २८ फूट उंचीची संगमरवरी दगडाची उभी बाहुबली मूर्ती आहे. या मंदिराची स्थापना सन १९३५ साली करण्यात आली आहे.
July 20, 2016
हिंगोली जिल्ह्यात व कळमनुरी येथे सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहती आहेत. हिंगोली येथे इंदिरा सहकारी साखर करखाना, वसमत तालुक्यात पूर्णा सहकारी साखर करखाना, कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा येथील साखर कारखाना तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना असे मिळून ४ साखर कारखाने आहेत.
June 23, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti