महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
वारुड हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. चुडामणी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून या नदीला प्राचीन काळापासून पवित्र मानले जाते.
November 28, 2024
बारामती हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इतिहासात ते भीमथडी नावाने प्रसिद्ध होते. हे शहर कहा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून, शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
November 28, 2024
राहुरी हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. शहराचा साक्षरतेचा आलेख उल्लेखनीय आहे. सरासरी ७० टक्के लोक साक्षर आहेत. या शहरात असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.
November 28, 2024
खामगाव हे शहर बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ असून, येथील चांदीही देशभर प्रसिद्ध आहे.
November 28, 2024
पालीन हे अरुणाचल प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आणि एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. कुरुंगकुमे या जिल्ह्यात हे शहर येते. समुद्रसपाटीपासून १०८० मीटर उंचीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या ५८१६ इतकी आहे.
August 16, 2018
भगवान रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक शहरात पुरातन अष्टदशभुज गणेश मंदिर आहे. हे मंदिर ११-१२ व्या शतकातील असल्याची नोंद असून १८ हात असलेली ही एकमेव मूर्ती आहे.
November 28, 2024
मदुराई हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. वैगाई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तमिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.
October 11, 2023
प्रसिद्ध कृषितज्ज्ञ व महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील गहुली या ठिकाणी झाला. ते सुमारे बारा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात सर्वात जास्त काळ असलेले मुख्यमंत्री म्हणूनही ते ओळखले जातात.
June 26, 2015
कोमोरोस हा हिंदी महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनार्याजवळील एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे. १९१२ ते १९७५ ह्या काळामध्ये कोमोरोस ही फ्रान्स देशाची वसाहत होती. मोरोनी ही कोमोरोसची राजधानी व प्रमुख शहर आहे.
October 12, 2018
महाराष्ट्रात अनेक द्राक्षमळे आहेत. द्राक्षापासून मद्यनिर्मिती करणारे अनेक कारखानेही महाराष्ट्रात आहेत. नारायणगाव येथे चौगुले इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प असून येथे भारतातील शॅंपेनचे पगिले उत्पादन सुरु झाले होते.
November 21, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti