महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्याल पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे. असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे.
February 24, 2019
जुन्नर गावातील रविवार पेठेत हे मंदिर आहे. सुमारे ३०० वर्षापूर्वी हे देवस्थान श्री जोशी नांवाच्या गणेशभक्ताच्या भक्तीचे प्रतीक आहे.
November 28, 2024
जगात एकूण १७ देश हे क्षेत्रफळाने लहान असून यात व्हॅटीकन सिटी सर्वात लहान म्हणून प्रसिध्द आहे.
June 10, 2016
सासवड हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आचार्य अत्रे यांचे जन्मगाव आहे.
November 28, 2024
कर्नाटकातील विजापूर हे दक्षिणेतील एक ऐतिहासिक शहर असून या शहराला पूर्वी भक्कम तटबंदी अंदाजे दहा कि.मी. भरेल. पूर्वी या शहराचे विजयपूर असे नाव होते. नंतर अपभ्रंश होता होता त्याचे विजापूर असे झाले
February 7, 2017
महाराष्ट्रातील माणसाला फ्लोरा फाऊंटन माहित नाही असे होणारच नाही. मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.१८६४ साली हे कारंजे बांधण्यात आले. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असूनही अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच रुपांतर झाले.
July 23, 2016
ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती,मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. या जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात.
June 26, 2015
सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते.
जिल्ह्यात रबी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर असून,खरीप ज्वारीचे क्षेत्र १५०० हेक्टर आहे. जिल्ह्यात ज्वारीची मालदांडे ३५-१ ही जात प्रसिध्द आहे. राज्य शासनाच्या फळबाग लागवड योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यात फळबाग लागवडीतही क्रांती झाली आहे.
December 7, 2016
नांदेड जिल्ह्यातील कंधार हे तालुक्याचे ठिकाण असून, याचे प्राचीन नाव खंदार असे होते. कंधार शहर राष्ट्रकुटांची राजधानी होते. कंधार गावाला लागूनच सोमेश्वर तिसरा या राष्ट्रकुट राज्याच्या काळात भांधला गेलेला भुईकोट किल्ला आहे.
August 3, 2016
नांदगाव-खांडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, तालुक्याचे मुख्यालय या शहरात आहे. येथे असलेले भगवान खांडेश्वराचे प्राचीन मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे.
November 28, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti