(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ब्राझील

    ब्राझील

    ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्‌ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

      October 9, 2018


  • परभणी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परभणी भूमी गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे.

      June 23, 2015


  • वीज निर्मिती

    वीज निर्मिती

    महाराष्ट्रात २०११-१२ मध्ये एकूण वीज निर्मिती (अक्षय ऊर्जेसह ) ८९,४६५ दक्षलक्ष युनिटस होती.

      March 19, 2017


  • p-485-solapur-chaddar

    चादरींचे माहेरघर सोलापूर

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. येथील हातमाग व यंत्रमागावरील सूती कापडासाठी हे शहर प्रसिध्द आहे. येथे तयार होणार्‍या टॉवेल व चादरींना देशभरात मोठी मागणी आहे.

      December 19, 2025


  • संत तुकारामांचे जन्मस्थळ देहू

    संत तुकारामांचे जन्मस्थळ देहू

    पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिध्द आहे. देहूपासून ५ किलोमीटर अतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद आहे.

      February 9, 2016


  • रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    जिल्ह्यात चिपळूण, पोफळी, खाडपाडी, खेरडी, लोटेमाळ, रत्नागिरी, जयगड, देवरुख, दापोली, राजापूर याठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. पावसजवळ फिनोलेक्स ही शेतीसाठी लागणारे पाईप्स तयार करणारी कंपनी आहे. मासेमारी आणि आंबा व आनुषंगिक उत्पादने हे जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय आहेत.

      June 23, 2015


  • इक्वेडोर

    इक्वेडोर

    लॅटिन अमेरिकेमधील अनेक देशांप्रमाणे स्पेनची वसाहत असलेल्या इक्वेडोरला १८२२ साली स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर अल्प काळाकरिता ग्रान कोलंबियाचा भाग असलेला इक्वेडोर १८३० साली पूर्णपणे स्वतंत्र देश बनला.

      October 9, 2018


  • जळगाव जिल्ह्यातील दळणवळण

    राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (हाजीरा-धुळे-कोलकाता) या जिल्ह्यातून जातो. मध्य रेल्वेचे मुंबई-दिल्ली व मुंबई-कोलकाता हे लोहमार्ग जळगाव, भुसावळमार्गे जातात.

      June 23, 2015


  • अरूणाचल प्रदेश – अनोळखी प्रवास पथांचा शोध

    अरूणाचल प्रदेश – अनोळखी प्रवास पथांचा शोध

    भारताच्या पूर्वेकडील टोकावर, जिथे उगवता सूर्य पहिल्यांदा हिमालयाच्या कुशीत हसतो, त्या भूमीतील काही ठिकाणं नकाशावर दिसतात, पण त्यांचं सौंदर्य मनाने अनुभवावं लागतं – तेव्हाच प्रवासाचा अर्थ उमगतो. ‘तवांग’ आणि ‘सेला खिंड’सारख्या प्रसिद्ध ठिकाणां पलीकडेही अरूणाचल प्रदेशात अशा अनेक अद्भुत जागा आहेत – ज्या तुम्हाला अनोख्या संस्कृतींच्या, निसर्गाच्या आणि मानवी साधेपणाच्या जवळ नेतात. चला, या भागात करूया अशाच काही “गुप्त रत्नांचा” शोध, ज्यामुळे तुमचा पुढचा प्रवास एक नवीन अनुभव ठरेल.

      November 7, 2025


  • यवतमाळ जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    मोठ्या प्रमाणावर सापडणारी चुनखडी हे या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वणी तालुक्यात राजूर, चनाखा, परमडोह, सिंदोला या भागात अधिक प्रमाणात चुनखडक सापडतो. राळेगाव तालुक्यातील गौराळा व मारेगाव तालुक्यातील मुकुटवन येथेही चुनखडक सापडतो.

      June 26, 2015