महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९५५८ कि.मी. इतके आहे. २०११ च्या गणनेनुसार ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १,१०,५४,१३१ इतकी आहे. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे तर उत्तरेस गुजरात, वलसाड जिल्हा आहे.
June 26, 2015
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने ९ प्रेक्षणीय स्थळे आहेत.
December 7, 2016
बुरुंडी हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा देश आहे. बुरुंडी हा जगातील १० सर्वात गरीब देशांपैकी एक आहे.
October 8, 2018
पैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते.
October 5, 2023
झारखंड राज्यातील बोकारो येथे देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्पाची स्थापना सन १९६५ मध्ये रशियाच्या सहकार्याने करण्यात आली.
June 2, 2016
रायगड जिल्ह्यात अलिबाग पासून सुमारे १० किमी अंतरावर मापगाव येथून ७५० पायर्या चढून गेल्यावर कनकेश्वर हे २००० फूट उंचावर डोंगराच्या गर्द झाडीत वसलेले गाव आहे. याठिकाणी श्रीराम सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. या ठिकाणी शंकराचे स्वयंभू स्थान आहे आणि शंकराच्या मंदिराजवळच गणेशाचे देऊळ आहे.
गणेशमूर्तीच्या बाजूंना ऋद्धि-सिद्धिच्या संगमरवरी मूर्ती आहेत. शेजारीच मूळ मूर्तीची प्रतिकृती व तांब्याच्या पेटीत ठेवलेली मूळ गणेश मूर्ती आहे. ही मूळ मूर्ती म्हणजेच 'लक्ष्मी गणेश' आहे. ती पिवळ्या संगमरवराची असून तिच्याही बाजूस ऋद्धि सिद्धी व लक्ष लाभ (पुत्र) असून ती कोरिव व अती लहान आहे. ही मूर्ती सन १७०० च्या सुमारास परशुरामांनी लंबोदरानंद स्वामीना ध्यानधारणेसाठी दिली अशी कथा आहे. परशुरामांच्या सांगण्यानुसार तिची पुजा केली जात नाही. पूजेची मोठी मूर्ती बडोद्याचे सावकार मैराळ यांच्याकडून आणली आहे. येथील उंदीर सुद्धा एक लहान स्वतंत्र मंदिरात आहे.
या मंदिराशेजारी लंबोदर स्वामींची समाधी आहे.
कनकेश्वराला मुंबईहून रेवसपर्यंत सागरमार्गे जाता येते; रेवस ते कनकेश्वर अशी एस . टी . आहे. अलिबाग धरमतर एस. टी. नेही कनकेश्वरला जाता येते.
कनकेश्वर मंदिराची माहिती देणारा हा एक व्हिडिओ बघा...
May 7, 2017
सिक्कीम या राज्यातील नामची येथे गुरु रिन पोचेन यांची ३६ मीटर उंची मूर्ती आहे. सिक्कीमचे संरक्षक गुरु रिन पोचेन हे ९ व्या शतकातील बौध्द संत आहेत.
इ.स. १९७५ साली सिक्कीम भारतीय संघराज्यात सहभागी झाले.
November 8, 2016
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ मध्ये अस्तित्वात आला. या कायद्यानुसार कर्मचारी भविष्य निधी योजना, कर्मचारी विमा योजना आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजना अशा तीन योजनांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेतर्फे सध्या अंमलबजावणी केली जात आहे.
November 1, 2017
पूर्वी पूर्व खानदेश या नावाने ओळखल्या जाणार्या जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे.
June 23, 2015
कॅनडा हा उत्तर अमेरिकेतील एक प्रमुख देश आहे. रशियानंतर कॅनडा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे.
October 14, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti