महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
अँडोरामधील माड्र्यू खोरे ४,२४७ हेक्टर परिसरात पसरले आहे. येथे तलाव, डोंगरांचे कडे आणि कुरणे आहेत.
September 1, 2023
धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री या तालुक्यांतील डोंगराळ व वनव्याप्त प्रदेशांत आदिवासी बहुसंख्येने राहतात. आदिवासींची मोठी संख्या असलेला नंदुरबार जिल्हा धुळ्यापासून वेगळा करण्यात आला असला तरीही धुळे हा ‘आदिवासी बहुल’ जिल्हा आहे.
June 22, 2015
गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्रात विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ मंदिर आहे.
July 6, 2016
स्पेन, अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश आहे. स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत.
March 6, 2019
एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील सर्वांत लहान व सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश आहे. साल्व्हाडोरच्या पश्चिमेला होन्डुरास, उत्तर व पूर्वेला ग्वातेमाला तर दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. सान साल्व्हाडोर ही साल्व्हाडोरची राजधानी व सर्वात मोठे शहर असून सांता आना व सान मिगेल ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.
September 12, 2018
सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे.
June 23, 2015
वाशिम या जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जिल्हा अनेक धर्म-पंथ-समाजांसाठी धार्मिकदृष्ट्या श्रद्धेय आहे. श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील एका भागास जैन धर्मियांची काशी म्हटले जाते.
June 26, 2015

कुडलोर हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. कुडलोर शहराची कधी स्थापना झाली याचा नेमका इतिहास उपलब्ध नाही. चोल, पल्लव, आदी अनेक राजांची राजवट या शहरावर होती. १७५८ ला ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात झालेली लढाई कुडलोरची लढाई नावाने प्रसिद्ध आहे. २००४ ला येथे त्सुनामीचा तडाखा बसला होता.
सील्व्हर बीच प्रसिद्ध
कुडलोर हे तमिळनाडूतील एक बंदर असलेले शहर असून, येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. सातव्या शतकात बांधलेले शहरातील पटलीश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध सील्व्हर बीच येथून अवघ्या दोन किलोमीटरवर असून, अनेक लोक येथे येतात.
October 10, 2023
जपानमधील टोकियोपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले ओगाशिमा हे ज्वालामुखीनिर्मित बेट जगातील सुंदर बेटांपैकी एक आहे.
१७८१ ते १७८५ या काळात या बेटाची निर्मिती झाली.
March 13, 2017
मुंबई-भूसावळ-नागपूर-कोलकाता, मूर्तिजापूर-अचलपूर, खांडवा-अकोला-पूर्णा, व बडनेरा-अमरावती हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या लोहमार्गांमुळे अमरावती हे शहर मुंबई, जळगाव, नागपूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांना जोडले गेले आहे.
June 22, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti