महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
अमेरिकेतील डेव्हील्स टॉवरसारखी असलेली मुंबईतील गिलबर्ट हिल ही टेकडी ब्लॅक बेसॉल्ट या अति-कठीण दगडापासून बनली आहे. जगातील ही एकमेव कठीण अशी टेकडी आहे.
January 12, 2016
डेन्मार्कमधील रोसक्लिडे कॅथड्रलची उभारणी १२ व्या शतकात करण्यात आली.
September 1, 2023
अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. ‘सधन शेतकऱ्यांचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ‘अकलूज’ ओळखले जाते.
November 28, 2024
दादासाहेब कन्नमवार – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातला. १९२० पासून ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. तसेच जून, १९४८ साली ते नागपूर प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जुन्या मध्य प्रदेशात १९५२ मध्ये त्यांची आरोग्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती.
June 22, 2015
राज्यातील पानझडी व सदाहरित वनांच्या दरम्यान उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने आढळतात. १५० ते २०० से.मी. पर्जन्यक्षेत्रात ही वने सलग न आढळता तुटक स्वरुपात आढळतात.
March 10, 2017
संत ज्ञानेश्वर – वारकरी संप्रदायाचे दैवत व महाराष्ट्राचे अनमोल रत्न संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स.१२७५ मध्ये येथील पैठण तालुक्यातील आपेगाव येथे झाला. ज्ञानेश्वरांनी येथेच रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले असे म्हटले जाते.
June 22, 2015
आयर्लडमधील हा कॉजवे (सांडवा) वैशिष्ट पूर्ण खडकांसाठी प्रसिध्द आहे.
May 11, 2018
बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात महादेव काळी, भिल्ल, पारधी, कोरकू व निहाल यांसारख्या जमातीचे लोक राहतात. कोरकू व निहाल या जमातींची वस्ती ‘जळगाव-(जामोद)’ या तालुक्यात जास्त आहे. मेहकर व चिखली तालुक्यांत ‘बंजारा’ या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांची संख्या ही अधिक आहे
June 22, 2015
वाशिम जिल्ह्याचा बराचसा भाग हा डोंगराळ व पठारी असून वनच्छादीत आहे. नद्या व विहिंरीद्वारे केल्या जाणार्या जलसिंचनाचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ४,०१,००० हेक्टर्स इतके आहे.
June 26, 2015
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मांढळ हे प्राचीन ठिकाण आहे. जवळच्या डोंगर रांगेत सातवाहनकालीन लेणी सापडल्या आहेत. मांढळ येथे वाकाटक वसाहत, ढोरफडी भागातिल उत्खननीत मंदिरावशेष, भोला टेकडीवरील उत्खननात सापडलेले ताम्रपट ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात.
November 21, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti