सफरचंद आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक झालेला आहे. ताज्या, कापलेल्या सफरचंदाच्या करकरीत पांढऱ्या फोडी खाण्यातली मजा काही वेगळीच. मात्र सफरचंद कापून ठेवलं की ते लालसर होतं, आणि मग खावंसं वाटत नाही. सफरचंद कापून ठेवलं की लालसर का होतं? आपण एक प्रयोग करू या. एक सफरचंद घ्या. ते उभे कापा.
November 1, 2023
भूकंप होत असताना ज्या लहरी जमिनीखाली निर्माण होतात त्या पसरत जातात तेव्हा त्यांची नोंद आरेखन किंवा आलेखाच्या माध्यमातून घेतली जाते. हे काम ज्या यंत्राच्या मदतीने केले जाते त्याला सिस्मोग्राफ असे म्हणतात.
October 14, 2023
लॅपटॉप याचा अर्थच मुळी मांडीवर ठेवता येईल, एवढ्या आकाराचा संगणक असा आहे. डेस्क टॉप संगणकही जास्त जागा व्यापतात व ते प्रवासात किंवा बाहेर वापरता येत नाहीत, त्यामुळे पोर्टेबल संगणकाची ही कल्पना पुढे आली.
September 18, 2023
‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम’ – जीपीएस – ही आजच्या काळातली आघाडीवरची स्थानदर्शक पद्धत आहे. एखाद्या माणसाचं वा वाहनाचं स्थान निश्चित करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत प्रथम, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहाद्वारे रेडिओ लहरी सोडल्या जातात.
June 21, 2026

आपण जसे अधिकाधिक उंचीवर जाऊ, तशी हवा थंड होत जाते. त्यामुळे अतिशय उंचीवरील पठारासारख्या ठिकाणांचं किंवा उंच पर्वतांवरचं तापमान कमी झालेलं असतं. परंतु जशी उंची वाढत जाते, तसा त्या ठिकाणी होणारा सूर्यप्रकाशाचा मारा अधिकाधिक तीव्र होत जातो. तीव्र सूर्यप्रकाश झेलणारी ही ठिकाणं त्यामुळे, एका अर्थी ‘तप्त’ ठिकाणं ठरतात.
December 6, 2023
मोबाइल फोन आपल्याला सर्वात जवळचा झालेला आहे, म्हणून त्याच्यापासून फार नुकसान व्हायला हवे का? परंतु जास्त त्रास तर टॉवरपासून आहे. कारण मोबाइलचा वापर आपण एकसारखा करत नाही, परंतु टॉवर मात्र अहोरात्र रेडिएशन पसरवत असतात, प्राणीमात्रावर त्याचे दुष्परिणाम होत असतात.
December 20, 2025

पृथ्वी झुकते आहे… खरं तर, पृथ्वी साडेतेवीस अंशांनी अगोदरच झुकली असल्याचं सर्वज्ञात आहे. पण ती आणखी झुकते आहे… पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते आहे, तो अक्ष आणखी कलतो आहे. परिणामी, पृथ्वीचे ध्रुव बिंदूही सरकत आहेत. अक्षाच्या दिशेतला हा बदल पृथ्वीवर होत असलेल्या बदलांमुळे होत आहे. नैसर्गिक कारणांमुळे असे बदल घडून येत असले, तरी या कारणांना अनेकवेळा अप्रत्यक्षपणे मानवी हातभारही लागलेला असतो.
June 28, 2023
अणुभट्टीत निर्माण होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थांचे बहुविध उपयोग आहेत. यात काही वेळा किरणोत्सारी पदार्थांचा प्रत्यक्ष वापर होतो, तर काही वेळा किरणोत्सर्गी पदार्थांपासून उत्सर्जित होणाऱ्या किरणांचाच फक्त वापर केला जातो.
August 15, 2023

बर्फाच्या वितळण्याची भाकितं करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीतली अडचण ही आहे की, समुद्रावरच्या बर्फाचं प्रमाण हे अनेक घटकांवर अवलंबून असतं – वातावरणातल्या घटकांवर तसंच समुद्राच्या पाण्यातल्या घटकांवर! त्यामुळे या प्रारूपांची अचूकता ही काहीशी मर्यादितच असते.
December 18, 2021
रेझरचा वापर अगदी पुरातन काळापासून केला जात होता पण ते फारसे प्रगत नव्हते. इतिहासपूर्व काळात शार्कचे दात, शंख व फ्लिंट यांचा उपयोग रेझरसारखा केला जात असे. इजिप्तमधील उत्खननात सोने व तांब्याचे रेझर सापडले होते. रोममध्ये अगदी पुरातन काळात ल्युसियस तरक्विनस प्रिस्कस या राजाने पहिल्यांदा रेझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला.
August 15, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti