एलसीडी याचा अर्थ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. या तंत्रज्ञानाचा वापर करून जे टीव्ही संच तयार केले जातात त्याला एलसीडी टीव्ही म्हणतात. पारंपरिक कॅथोड रे ट्यूब वापरलेल्या टीव्हीपेक्षा एलसीडी टीव्ही हे सडपातळ असतात, तसेच हलकेही असतात.
September 25, 2023
हेल्मेटचा वापर पूर्वीच्या काळापासून होत असला तरी आता त्यात बरेच बदल होत गेले आहेत. हेल्मेट म्हणजे शिरस्त्राण हे त्या अर्थाने लढाईत डोक्याचे संरक्षण व्हावे यासाठी वापरले जात असे. ख्रिस्तपूर्व ९०० या असिरियन काळात हेल्मेट वापरली जात होती असा उल्लेख आहे.
October 23, 2023
आपल्या पेशीतीलं सर्व जैविक, जैवरसायनिक आणि रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण करणारा रेणू म्हणजे ‘डीएनए’ पेशीत असणाऱ्या केंद्रकात हा महारेणू सामावलेला असतो. खरे तर डीएनए एकच रेणू नसून अनेक रेणू एककांची एक भलीमोठी साखळी असते. आणि यातील प्रत्येक एकक (म्हणजे प्रत्येक मणी) चार वेगवेगळ्या रेणूंचा बनलेला असतो.
October 23, 2023
अंतराळवीरांच्या गरजा या आवश्यकतेनुसार बदलत असतात. अंतराळयानात वावरतानाच्या गरजा वेगळ्या, तर अंतराळयानाच्या बाहेर पडल्यानंतरच्या गरजा वेगळ्या. या गरजांनुसारच त्यांच्या पोशाखात बदल होत असतो. अंतराळवीर वापरत असलेल्या या पोशाखांची ही ओळख…
February 21, 2024
एकदा विचारेकाका, वहिनी आणि त्यांची काही मित्रमंडळी उंच डोंगरमाथ्यावरच्या थंड ठिकाणी सहलीला गेले. तिथे गेल्यावर चहासाठी आधण ठेवले गेले. पाणी उकळताना पाहिल्याबरोबर, विचारेंच्या डोक्यातला किडा वळवळू लागला. त्यांनी आपल्या बॅगेतला थर्मामीटर बाहेर काढला. पाणी उकळतंय म्हणजे त्याचे तापमान १०० अंश सेल्सिअस असले पाहिजे.
October 15, 2023

सपाट प्रदेश असो वा डोंगराळ प्रदेश असो, जंगलातला प्रदेश असो वा वैराण प्रदेश असो, उष्ण प्रदेश असो वा थंड प्रदेश असो… कोणत्याही प्रदेशातून निमूटपणे भार वाहून नेण्याचं काम करणारा प्राणी म्हणजे गाढव. घोड्याचा भाऊबंद असणारा हा प्राणी गेली हजारो वर्षं, त्याच्या पाठीवर टाकलेला भार इमानेइतबारे वाहतो आहे. जगात अनेक ठिकाणी आढळणारा हा ‘गरीब बिचारा’ प्राणी उत्क्रांतिशास्त्राच्या अभ्यासकांकडून दुर्लक्षित राहिला आहे.
November 8, 2022

ग्रीनलँड हा पृथ्वीवरचा अतिउत्तरेकडचा प्रदेश आहे – उत्तर ध्रुवाजवळचा! या प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे एक शीत मरुभूमी आहे. अत्यंत कोरडी आणि थंड हवा असणारा हा प्रदेश अगदी वैराण आहे. इथल्या जमिनीतलं पाणी हे सतत गोठलेल्या अवस्थेत असतं. इथल्या अतिप्राचीन काळातील वनस्पतींची आणि प्राण्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही.
February 11, 2023
एलइडी टीव्ही हा असा एलसीडी टीव्ही असतो की, ज्यात बॅकलायटिंगसाठी एलइडीचा वापर केलेला असतो. पारंपरिक एलसीडी टीव्हीमध्ये बॅकलायटिंगसाठी कोल्ड कॅथोड फ्लुरोसंट लाईट्सचा वापर केलेला असतो, त्यामुळे तो प्रत्यक्षात एलइडी डिस्प्ले नसतो तरीही त्याला एलइडी टीव्ही असे म्हणतात.
September 27, 2023

दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अरसिबो दुर्बीण कोसळली… वेस्ट इंडिजच्या परिसरातील प्युर्तो रिको या बेटावर असलेली ही जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बीण कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून यापूर्वीच व्यक्त केली गेली होती! या दुर्बिणीच्या ३०५ मीटर व्यासाच्या तबकडीवरून परावर्तित होणारे रेडिओ किरण या तबकडीपासून सुमारे दीडशे मीटर उंचीवर असणाऱ्या साधनांद्वारे टिपले जात होते. ही साधनं ज्या सांगाड्यावर बसवली होती, त्या नऊशे टन वजनाच्या सांगाड्याला तोलणारे दोरखंड तुटून हा सांगाडा तबकडीवर कोसळला आणि दुर्बिणीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली.
November 30, 2021
डांबर ऊर्फ बिटुमीन जुन्या काळापासून इजिप्शियन लोकांना माहीत होते. त्यांच्या लाकडी जहाजांची पाण्यामुळे नासधूस होऊ नये म्हणून ते डांबराचा थर जहाजांवर देत. लाख हे एक प्रकारचे प्लास्टिकच. ही लाख मानवाला फार पूर्वीपासून माहीत आहे.
October 26, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti