
युरोपातले आल्प्स पर्वत हे भटकंतीसाठी गिर्यारोहकांत अत्यंत लोकप्रिय आहेत. ऑस्ट्रिआ, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्विट्झरलँड, इत्यादी देशांत पसरलेल्या या पर्वतरांगांत गिर्यारोहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या आल्प्स पर्वतात भटकणाऱ्या काही जर्मन गिर्यारोहकांना १९९१ सालच्या सप्टेंबर महिन्यात, इटली आणि ऑस्ट्रिआ या देशांच्या सीमेजवळच्या योट्झाल खोऱ्याजवळ, बर्फात अर्धवट दडलेला एक मानवी मृतदेह आढळला.
December 20, 2022

दिएगो सालाझार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासलेल्या, इथल्या सुमारे तेहतीस हजार सागरी सजीवांच्या अवशेषांत, शैवाल, मासे, मृदुकाय प्राणी, कणाधारी (पृष्ठवंशी) प्राणी, तसंच कणा नसलेले (अपृष्ठवंशी) प्राणी, अशा अनेक प्रकारच्या सजीवांचा समावेश होता. यांतील अनेक प्राणी हे खोल पाण्यात राहणारे सागरी जीव आहेत. या सागरी प्राण्यांच्या अवशेषांबरोबरच, या संशोधकांना इथे विविध प्रकारची सागरी वाळू आणि सागरी दगड-गोटे सापडले. इथे सापडलेल्या, काही ठिकाणच्या अवशेषांत मानवी हाडांचा, कोळशाच्या तुकड्यांचाही समावेश होता. माणसांनी दगडांपासून उभारलेल्या भिंतींचे अवशेषही इथे सापडले. या अवशेषांतील दगड हे ज्या प्रकारे कलंडले होते, त्यावरून या भिंती समुद्राकडून आलेल्या शक्तिशाली लाटेमुळे पडल्या असल्याचं दिसून येत होतं. या सर्व पुराव्यांवरून या सागरी प्रदेशावर त्सुनामीचं आक्रमण झालं असल्याचं स्पष्ट झालं.
May 26, 2022
रेल्वेसेवा व्यवस्थित सुरू राहण्यासाठी तिची देखभाल ही अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यासाठी विशेष प्रकारची यंत्रे वापरावी लागतात. तसेच, अपघातासारख्या संकटकालीन परिस्थितीतसुद्धा विशेष प्रकारच्या सामग्रीचा वापर करावा लागतो. देखभालीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची ही ओळख…
February 25, 2024
सॅटेलाईट रेडिओ’ ही संकल्पना तुलनेने खूपच अलीकडची आहे. त्याला डिजिटल रेडिओ असेही म्हटले जाते. यात डिजिटल सिग्नल हे उपग्रहामार्फत रिले केले जातात व ते आपल्या विशिष्ट प्रकारच्या रिसिव्हरपर्यंत म्हणजे रेडिओपर्यंत पोहोचतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय मोठ्या भौगोलिक प्रदेशात हे कार्यक्रम अतिशय स्पष्टपणे ऐकता येतात.
September 19, 2023
माणूस हा भूचर प्राणी आहे. त्याचे वावरणे जमिनीवर असल्यामुळे, पोहताना त्याची पाण्याखाली राहण्याची क्षमता मर्यादित असते. परंतु, यालाही काही अपवाद आहेत. एक ‘पाणबुडी’ जमात या अपवादात मोडते. या पाणबुड्या जमातीतील लोकांवर शास्त्रज्ञांकडून संशोधन केले जात आहे. या संशोधनात एक अनपेक्षित निष्कर्ष निघाला आहे. त्या संशोधनाचीच ही ओळख…
February 23, 2024
कर्णकर्कश आवाज हा शरीर व मनाला दोन्हींनाही पीडा देणारा असतो; त्यामुळे ध्वनिप्रदूषण हे हानिकारक असते. न्यायालयांच्या हस्तक्षेपामुळे आता काही प्रमाणात या ध्वनिप्रदूषणापासून लोकांना दिलासा मिळाला आहे.
October 4, 2023

पृथ्वी ही भूशास्त्रीयदृष्ट्या सक्रिय असल्याचं दर्शवणारी एक महत्त्वाची खूण म्हणजे पृथ्वीवरचे ज्वालामुखी. पृथ्वीच्या सक्रियतेचे पुरावे म्हणता येतील असे शेकडो जिवंत आणि मृत ज्वालामुखी पृथ्वीवरच्या जमिनीवर अस्तित्वात आहेत. असे ज्वालामुखी अस्तित्वात असण्याला सागराचा तळही अपवाद नाही. पृथ्वीचा सत्तर टक्के पृष्ठभाग व्यापणाऱ्या या महासागरांतही अचानक उफाळणाऱ्या सक्रिय ज्वालामुखींबरोबरच अनेक निष्क्रिय ज्वालामुखीही दडले आहेत.
May 20, 2023
मेटल डिटेक्टर ज्याला धातुशोधक यंत्र असे म्हटले जाते. त्याचा उपयोग पूर्वीच्या काळापासून होत आहे. अजूनही हे साधन कालबाह्य ठरलेले नाही उलट त्याचे महत्त्व आजच्या दहशतवादी कारवायांच्या जगात वाढतच चालले आहे. मेटल डिटेक्टरचा उपयोग अर्थातच धातूचा शोध घेण्यासाठी केला जातो.
August 24, 2023
५७ वर्षीय शीना राणी ह्या हैदराबादमधील डीआरडीओच्या हाय-टेक लॅबमध्ये शास्त्रज्ञ आहेत . त्या १९९९ पासून अग्नि मालिकेतील सर्व क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण नियंत्रण प्रणालींवर काम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण मोहिमेला ‘मिशन दिव्यास्त्र’ असे नाव दिले होते.
August 12, 2025

केळ्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न बराच पूर्वीपासून सुरू आहे. लागवड केली जाणारी आजची केळी ही केळ्यांच्याच विविध जाती-उपजातींत झालेल्या संकरातून निर्माण झाली आहेत. आजच्या मुसा अॅक्युमिनाटापासून निर्माण झालेल्या केळ्यांत, या जातीच्या जनुकांबरोबरच इतर काही जंगली केळ्यांतील जनुकही अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे.
December 6, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti