साबण वापरत असलो तरी साबण व डिटर्जंट यात फरक असतो. साधारणपणे डिटर्जंट म्हणजे आपण कुठलीही गोष्ट धुण्यासाठी जे रसायनयुक्त द्रव वापरतो त्याला डिटर्जंट असे म्हणतात. ग्रीस किंवा इतर कुठलेही चिकट डाग त्यामुळे निघतात.
November 4, 2023
आयफोन हा स्मार्टफोनचा एक प्रकार आहे. त्यात आयपॉड व सेलफोन या दोन्हींचा समावेश असतो. पहिला आयफोन अॅपल कंपनीचे प्रमुख स्टीव्ह जॉब्ज यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसमवेत तयार केला.
September 13, 2023

चंद्रावरील एकूण पदार्थांपैकी किमान साठ टक्के पदार्थ हे या ग्रहापासून आल्याचं विविध प्रारूपांतून दिसून येतं. चंद्राच्या जन्माला कारणीभूत ठरणाऱ्या या ग्रहाला खगोलशास्त्रज्ञांनी ‘थिआ’ हे ग्रीक पुराणातलं नाव दिलं आहे. चंद्राच्या जन्माची ही कहाणी जरी बऱ्याच अंशी स्वीकारली गेली असली तरी, या थिआचे अवशेष काही पृथ्वीवर सापडलेले नाहीत. त्यामुळे चंद्राच्या जन्मामागील सिद्धांतातील अनिश्चितता कायम राहिली आहे.
March 31, 2022
सफरचंद आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक झालेला आहे. ताज्या, कापलेल्या सफरचंदाच्या करकरीत पांढऱ्या फोडी खाण्यातली मजा काही वेगळीच. मात्र सफरचंद कापून ठेवलं की ते लालसर होतं, आणि मग खावंसं वाटत नाही. सफरचंद कापून ठेवलं की लालसर का होतं? आपण एक प्रयोग करू या. एक सफरचंद घ्या. ते उभे कापा.
November 1, 2023

सजीवाच्या शरीराचं स्वरूप, हा प्राणी आजच्या जेलिफिशसारख्या, छत्रीसारखा आकार असणाऱ्या आणि शुंडक धारण करणाऱ्या सागरी प्राण्यांच्या, मेडूसोझोआ या प्रकारचा प्राणी असण्याची शक्यता दिसून आली आहे. याचा शोध लावणाऱ्या संशोधकांनी या सजीवाला ‘ऑरालुमिना अॅटेनबरोई’ हे जीवशास्त्रीय नाव दिलं आहे. या नावातील पहिला भाग असणारा ‘ऑरालुमिना’ हा लॅटिन शब्द म्हणजे पहाटेची मशाल. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या पहाटेच्या काळात अस्तित्वात आलेल्या, मशालीसारखा आकार असणाऱ्या या सजीवाला पूरक असं हे नाव आहे. या नावातला ‘अॅटेनबरोई’ हा दुसरा शब्द प्रख्यात निसर्गअभ्यासक डेव्हिड अॅटेनबरो यांच्या गौरवार्थ वापरला आहे.
August 18, 2022

अॅमेझॉनच्या जंगलात लपलेली अशी दोन पुरातन शहरं, दक्षिण अमेरिकेतील बोलिविआ या देशात सापडली आहेत. बोलिविआतील मोजोस पठारांच्या परिसरात सापडलेली ही शहरं सहाशे वर्षं जुनी आहेत. या प्राचीन वसाहतींचा शोध लावण्यासाठी लायडर या तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला. बॉन येथील ‘जर्मन आर्किऑलॉजिकल इंस्टिट्यूट’ या संस्थेतील हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे.
July 18, 2022
दिल्लीच्या रामलीला मैदानावर योगगुरू रामदेवबाबा यांचे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, त्याला टीअर गॅस असेही म्हणतात. दंगल नियंत्रणाच्या वेळी जमावाला पांगवण्यासाठीही अश्रुधुराचा वापर केला जातो.अश्रुधुराला लॅक्रिमेटर असेही म्हणतात.
October 15, 2023
आजच्या लोडशेडिंगच्या जमान्यात इनव्हर्टर हे यंत्र सर्वांना परिचयाचे झाले आहे. ‘… इनव्हर्टर असेल तर सारं चालेल निश्चिंतपणे’ ही जाहिरातही आपण पाहतो आहोतच, वीज नसली तर आपली घरातील सर्व उपकरणे बंद पडतात, पण इनव्हर्टरमुळे आपण ती वीज नसतानाही काही काळासाठी चालवू शकतो अगदी संगणकासोबत आपण जो यूपीएस वापरतो तो इनव्हर्टरचाच प्रकार असतो, त्याला अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय असे म्हणतात.
September 9, 2023
बुलेटप्रूफ जॅकेटची चर्चा मुंबई हल्ल्यानंतर प्रामुख्याने झाली होती. ती जॅकेट्स ही चांगल्या दर्जाची नव्हती, असेही त्यावेळी सांगण्यात आले. शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला चिलखत परिधान करून गेले होते, यावरून अशा साधनाची आवश्यकता फार जुन्या काळापासून जाणवत होती हे उघड आहे.
October 1, 2023

प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींच्याही एकमेकांशी संपर्क साधण्याच्या भाषा असतात. मात्र या भाषा रासायनिक स्वरूपाच्या असतात. काही वेळा ही रसायनं या वनस्पतींच्या मुळांद्वारे जमिनीतून, तर काही वेळा पानांद्वारे हवेतून, एका वनस्पतीकडून दुसऱ्या वनस्पतीकडे पोचवली जातात. एखाद्या वनस्पतीला जेव्हा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होतो, तेव्हा ती वनस्पती आजूबाजूच्या तिच्या भाऊबंदांना धोक्याची सूचना देऊन सावध करते.
November 7, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti