(User Level: User is not logged in.)

विज्ञान / तंत्रज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अँडिझवरचे उंदीर

    अतिउंचीवरील परिस्थिती ही सजीवांसाठी राहण्याच्या दृष्टीनं अत्यंत बिकट असते. अतिथंड तापमान, अत्यंत शुष्क हवा, प्राणवायूची कमतरता, खाद्याचा अभाव, अशा सर्व कारणांमुळे, अधिकाधिक उंचावर जावं तसं तिथे आढळणाऱ्या पशु-पक्ष्यांची संख्या रोडावत जाते.

      November 20, 2023


  • समुद्रतळावरचं ‘ओॲ‍सिस’

    पृथ्वीवरचं जीवन सूर्यप्रकाशावर आधारलेलं आहे. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पती अन्नाची निर्मिती करतात व या अन्नावर इतर सजीवांची गुजराण होते. अर्थात, जिथे थोडाही सूर्यप्रकाश पोचू शकत नाही, अशा पूर्ण काळोखी जागेत राहणारे सजीवही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. अशा ठिकाणी सजीवांची विविधता मर्यादित असणं, अपेक्षित असतं. मात्र हा तर्क चुकीचा ठरेल, असा एक शोध अलीकडेच लागला आहे.

      April 2, 2022


  • वर्षावनांचा कायापालट

    पृथ्वीवरील प्राणिसृष्टीवर वर्चस्व गाजवणारे डायनोसॉर हे सरीसृप या आघातामुळे नष्ट झाले आणि सस्तन प्राणी हे, त्यानंतर अस्तित्वात आलेल्या प्राणिसृष्टीचे महत्त्वाचे घटक बनले. या आघातानंतर, प्राणिसृष्टीप्रमाणे वनस्पतिसृष्टीत कोणता बदल घडून आला, याचं कुतूहल उत्क्रांतीच्या अभ्यासकांना आहे. हे कुतूहल काही प्रमाणात शमवू शकणारं एक संशोधन ‘सायन्स’ या शोधपत्रिकेत अलीकडे प्रसिद्ध झालं आहे. पनामा शहरातल्या (मध्य अमेरिका) स्मिथ्सोनिअन ट्रॉपिकल रिसर्च इंस्टिट्यूट या संस्थेतील पुराजीवशास्त्रज्ञ मोनिका कार्‌व्हॅलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष लक्षवेधी आहेत.

      June 21, 2022


  • ध्वनिमापक यंत्र

    कर्णकर्कश आवाज हा शरीर व मनाला दोन्हींनाही पीडा देणारा असतो; त्यामुळे ध्वनिप्रदूषण हे हानिकारक असते. न्यायालयांच्या हस्तक्षेपामुळे आता काही प्रमाणात या ध्वनिप्रदूषणापासून लोकांना दिलासा मिळाला आहे.

      October 4, 2023


  • आरएनए म्हणजे काय?

    प्रथिनांच्या बांधणीचा सर्व आराखडा डीएनएवर रेखलेला असतो. डीएनए पेशी केंद्रकात असते व प्रथिनांची बांधणी पेशीद्रवात होते. केंद्रकातून प्रथिनाच्या बांधणीसंबंधीची सर्व माहिती पेशीद्रवात आणण्याचे कार्य करणारा रेणू असतो तो म्हणजे आरएनए, रायबोन्युक्लिक ॲसिड. याची रचना काहीशी डीएनएसारखीच असते.

      November 15, 2023


  • एक अल्पायुषी बेट

    टोंगा बेटांचा प्रदेश हा भूशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय प्रदेश आहे. इथे पृथ्वीच्या कवचातील दोन भूपट्ट एकत्र आले आहेत व त्यातील एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली सरकत आहे. अनेक ज्वालामुखींनी व्यापलेला, वारंवार भूकंप घडून येणारा, असा हा प्रदेश भूशास्त्रज्ञांकडून पूर्वीपासूनच अभ्यासला जात आहे.

      February 13, 2022


  • टी-रेक्सची ‘लोक’संख्या

    पूर्ण वाढ झालेल्या टी-रेक्सची उंची सुमारे चार मीटर आणि लांबी बारा मीटर असल्याचं, तसंच त्याचं वजन सुमारे सात टन असल्याचं, टी-रेक्सच्या अवशेषांवरून माहीत झालं होतं. त्याचबरोबर हाडांतील वर्तुळांवरून टी-रेक्सचं सरासरी वय सुमारे अठ्ठावीस वर्षं असल्याचं दिसून आलं होतं. याशिवाय टी-रेक्सच्या वाढीच्या वेगावरून त्याच्या शरीरातील अन्नाच्या चयापचयाचा वेगही पूर्वीच काढला गेला होता.

      February 10, 2022


  • क्रिप्टोग्राफी

    सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. इंटरनेटवर चक्क वस्तूंचा बाजारही भरतो, त्यात तुम्ही मागणी नोंदवता किंवा बुकिंग करता. पण यात पैशांचे व्यवहार कसे होतात, हवी तेवढी रक्कम हव्या त्या व्यक्ती किंवा संस्थेपर्यंत कशी पोहोचते, आपल्याला माहिती नसलेल्या माणसांशी आपण असे व्यवहार एका साखळीमार्फत कसे करू शकतो, याला इलेक्ट्रॉनिक व्यवहार असे म्हणतात.

      October 10, 2023


  • अतितप्त अ‍ॅल्टिप्लॅनो

    आपण जसे अधिकाधिक उंचीवर जाऊ, तशी हवा थंड होत जाते. त्यामुळे अतिशय उंचीवरील पठारासारख्या ठिकाणांचं किंवा उंच पर्वतांवरचं तापमान कमी झालेलं असतं. परंतु जशी उंची वाढत जाते, तसा त्या ठिकाणी होणारा सूर्यप्रकाशाचा मारा अधिकाधिक तीव्र होत जातो. तीव्र सूर्यप्रकाश झेलणारी ही ठिकाणं त्यामुळे, एका अर्थी ‘तप्त’ ठिकाणं ठरतात.

      December 6, 2023


  • किरणोत्सर्ग शोधक (रेडिएशन डिटेक्टर)

    जपानमध्ये सध्या फुकुशिमा येथील दाईची अणुप्रकल्पात सुनामी लाटा व भूकंप या दोन्हीमुळे झालेल्या अणुदुर्घटनेमुळे किरणोत्सर्ग झाला आहे. ही किरणोत्सारी घटकद्रव्ये आता तेथील अन्नपदार्थातही मिसळली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

      October 2, 2023