(User Level: User is not logged in.)

विज्ञान / तंत्रज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ड्रॅक्यूलाचे अश्रू

    ड्रॅक्यूलाचे अश्रू

    सन १८९७मध्ये प्रसिद्ध झालेली, ‘ड्रॅक्यूला’ ही ब्रॅम स्टॉकर यांची कादंबरी म्हणजे एक भयकथा आहे. ही कादंबरी इतकी लोकप्रिय झाली, की त्यावर अनेक चित्रपटही निघाले. या कादंबरीतलं ड्रॅक्यूला हे पात्र रक्तपिपासू आहे. हे पात्र लेखकानं, रोमानिआमधील वॉलॅशिआ प्रदेशात पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या, व्लाद (तिसरा) या क्रूर लष्करी सरदारावर बेतलं असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण, या कांदबरीलाही आजच्या रोमानिआची पार्श्वभूमी लाभली आहे आणि तिसरा व्लाद हा स्वतः ‘ड्रॅक्यूल्ये’ या नावानंही ओळखला जायचा.

      September 8, 2023


  • महात्सुनामीचे पडसाद

    पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं स्वरूप साफ बदलण्यास कारणीभूत ठरलेला हा आघात खगोलशास्त्र, भूशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र, अशा विविध शास्त्रांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला आहे. या विविध क्षेत्रांतील संशोधनातून या आघाताचं व त्याच्या परिणामांचं स्पष्ट चित्र हळूहळू उभं राहात आहे.

      February 3, 2022


  • भारतीय स्त्री वैज्ञानिक असीमा चटर्जी

    असीमा चॅटर्जी  या भारतीय सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ होत्या  ज्या  सेंद्रिय रसायनशास्त्र आणि फायटोमेडिसिन क्षेत्रात त्यांचा कामासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांचे  सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे विंका अल्कलॉइड्सवरील संशोधन, एपिलेप्टिक औषधांचा विकास आणि मलेरियाविरोधी औषधांचा विकास आहे. त्यानी  भारतीय उपखंडातील औषधी वनस्पतींवर देखील मोठ्या प्रमाणात काम केले. भारतीय विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ सायन्स मिळविणारी त्या  पहिल्या महिला होत्या.

      August 13, 2025


  • एका प्राचीन तलावाचं चरित्र

    रशियाच्या पश्चिमेला असणाऱ्या, काळ्या समुद्राच्या परिसरातील टॅमान द्वीपकल्पावरील डोंगराळ भागात, पॅराटेथिस जलाशयाचे कालानुरूप पुरावे खडकांतील थरांच्या स्वरूपात व्यवस्थित टिकून राहिले आहेत. डॅन व्हॅलेंटिन पाल्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॅमान येथील डोंगराळ जमिनीतले, पृष्ठभागापासून सुमारे पाचशे मीटर खोलीपर्यंतच्या खडकांचे, जवळपास साडेतीनशे थरांतले सुमारे सातशे नमुने गोळा केले.

      December 23, 2021


  • क्वॉंटम सिद्धांत

    क्वॉंटम सिद्धांत

    Quantum Theory मध्ये Quantum mechanism आणि Quantum Entanglement अशा दोन concept आहेत.

      April 30, 2024


  • न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ

    न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ

    न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ काढण्यासाठी मदत झाली ती ‘मेंसेंजर’ या नासानं बुधाकडे पाठवलेल्या अंतराळयानाची. मेसेंजर यानानं २०११ ते २०१५ या काळात बुधाभोवती प्रदक्षिणा घातल्या. बुधाकडे जाताना या यानानं शुक्राजवळूनही प्रवास केला. आपल्याकडील उपकरणाद्वारे, या दोन्ही ग्रहांच्या पृष्ठभागापासून विविध अंतरावरून जाताना या यानानं, या ग्रहांपासून येणाऱ्या न्यूट्रॉन कणांची संख्या मोजली व त्यावरून संशोधकांना न्यूट्रॉनच्या सरासरी आयुष्याचं गणित मांडणं शक्य झालं. या गणितानुसार न्यूट्रॉनचं सरासरी आयुष्य हे फक्त तेरा मिनिटांचं असल्याचं आढळून आलं आहे.

      June 30, 2022


  • सीएफएल बल्ब

    वीज वाचवणे हे वीज निर्माण करण्याइतके महत्त्वाचे आहे यात शंका नाही. आपल्याला प्रकाश देतात ते बल्ब किंवा ट्यूब यांना जास्त वीज लागते, त्यामुळे कमी विजेवर चालणारे सीएफएल बल्ब तयार करण्यात आले.

      October 26, 2023


  • खगोलशास्त्रावर आधारित गैरसमजुती कोणत्या?

    खगोलशास्त्राबद्दल जनसामान्यांत अनेक समज-अपसमज प्रचलित असतात. मध्यंतरी अशी बातमी पसरली होती की मंगळ ग्रह पृथ्वीच्या खूपच जवळ येणार असून तो पौर्णिमेच्या चंद्राइतका मोठा दिसेल. ही बातमी खोटी होती. सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरताना ठरावीक कालाने परस्परांजवळ येतात. पण जवळ आल्यावरही थोडा तेजस्वी दिसण्यापलीकडे मंगळ नुसत्या डोळ्यांना मोठा दिसत नाही. कारण तो फारच दूर आहे.

      October 20, 2023


  • तळ्याकाठचे निअँडरटाल

    निअँडरटाल ही मुख्यतः शिकारीवर जगणारी प्रजाती होती. त्यामुळे ते कदाचित खाद्य गोळा करण्यासाठी या तळ्याशी आले असावेत. मात्र या निअँडरटालांनी मोठ्या प्राण्याची शिकार केल्याचा पुरावा काही या वाळूच्या थरावरील खुणांवरून मिळाला नाही. तळ्यातले मासे पकडण्यासाठी, छोटे कवचधारी मृदुकाय प्राणी गोळा करण्यासाठी किंवा तळ्यावर येणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ते आले असावेत. कारण या परिसरातील निअँडरटालांच्या खाद्यात या गोष्टींचा समावेश असायचा. या ठशांच्या बाबतीतला एक वेगळाच भाग म्हणजे, ज्या सहा वर्षांच्या दोन छोट्या मुलांच्या पायांचे ठसे इथे आढळले आहेत, ते फक्त ठरावीक दिशेनंच गेलेले दिसत नाहीत. ते इकडेतिकडे विखुरले आहेत. यावरून या संशोधकांनी, ही दोघं लहान मुलं वाळूत खेळत असावीत, खेळताना ती इकडेतिकडे बागडत असावीत, असा एक सरळ साधा, पण मनोरंजक निष्कर्ष काढला आहे.

      May 1, 2022


  • वर्षावनांचा कायापालट

    पृथ्वीवरील प्राणिसृष्टीवर वर्चस्व गाजवणारे डायनोसॉर हे सरीसृप या आघातामुळे नष्ट झाले आणि सस्तन प्राणी हे, त्यानंतर अस्तित्वात आलेल्या प्राणिसृष्टीचे महत्त्वाचे घटक बनले. या आघातानंतर, प्राणिसृष्टीप्रमाणे वनस्पतिसृष्टीत कोणता बदल घडून आला, याचं कुतूहल उत्क्रांतीच्या अभ्यासकांना आहे. हे कुतूहल काही प्रमाणात शमवू शकणारं एक संशोधन ‘सायन्स’ या शोधपत्रिकेत अलीकडे प्रसिद्ध झालं आहे. पनामा शहरातल्या (मध्य अमेरिका) स्मिथ्सोनिअन ट्रॉपिकल रिसर्च इंस्टिट्यूट या संस्थेतील पुराजीवशास्त्रज्ञ मोनिका कार्‌व्हॅलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष लक्षवेधी आहेत.

      June 21, 2022