
इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत सापांना विशेष स्थान आहे. तिथल्या पौराणिक कथांत सापांच्या रूपांतील पात्रांचा वारंवार उल्लेख केला गेला आहे. उदाहरण द्यायचं तर अॅपोफिसचं देता येईल. पाताळलोकीचा हा राजा सापाच्या रूपात वावरत असे. मात्र इजिप्तमधील सापांचं महत्त्व हे फक्त अशा पौराणिक कथांपुरतं मर्यादित नव्हतं.
December 26, 2023

अमेरिकेतल्या रॉकी माउंटन्स या डोंगराळ परिसरात यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान वसलं आहे. नैसर्गिक वैविध्यानं नटलेल्या या राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग, त्यातील गरम पाण्याचे कारंजे, झरे, तलाव, तसंच वाफेचे स्रोत यांसाठी जगप्रसिद्ध आहे. गरम पाण्याचे आणि वाफेचे सुमारे दहा हजार स्रोत इथे सापडले आहेत. यांतला दर तास-दोन तासांनी उसळणारा ‘ओल्ड फेथफूल’ हा गरम पाण्याचा कारंजा, तसंच ‘ग्रँड प्रिझ्मॅटिक स्प्रिंग’ हा गरम पाण्याच्या झऱ्यामुळे निर्माण झालेला रंगीबेरंगी तलाव, या जागा तर वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
July 23, 2022

हॅरिसन ॲलन-सटर आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी प्रयोगशाळेत केलेल्या आपल्या प्रयोगात, सिलिकॉन कार्बाइड हे संयुग पाण्यात बुडवून त्यावर प्रचंड दाब दिला. त्यानंतर लेझर किरणांच्या साहाय्यानं, दाबाखाली असलेल्या या सिलिकॉन कार्बाइडचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढवलं. पृथ्वीवरच्या वातावरणातील दाबाच्या सुमारे पाच लाखपट दाब आणि सुमारे तेवीसशे अंश सेल्सियस तापमान निर्माण झाल्यावर, सिलिकॉन कार्बाइ़डमधील कार्बनचं रूपांतर चक्क हिऱ्यांत झालं.
December 26, 2021
ज्या युरेनिअममध्ये विखंडनक्षम अणूंची संख्या नैसर्गिक प्रमाणापेक्षा वाढवण्यात आली आहे, त्या युरेनिअमला समृद्ध युरेनिअम म्हटलं जातं. नैसर्गिक युरेनिअममध्ये विखंडनक्षम अणूंचं प्रमाण ०.७ टक्के असतं, तर समुद्ध युरेनिअममध्ये हेच प्रमाण साधारणपणे तीन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढवलेलं असतं.
August 11, 2023
ॲक्रिलोनायट्रिल ब्युटाडाइन स्टायरिन या मिश्र प्लास्टिकचा शोध १९४८ साली यामध्ये असलेल्या लागला. अॅक्रिलोनायट्रीलमुळे त्याला उच्च ताण सहन करण्याची शक्ती, रसायनांना विरोध करण्याची शक्ती व उष्णतेला टिकून राहण्याची शक्ती हे गुणधर्म प्राप्त झाले. यामध्ये आलेल्या ब्युटाडाइन या रबरामुळे त्याची आघात सहन करण्याची शक्ती व मजबुती वाढली व स्टायरिन या घटकद्रव्यामुळे प्लास्टिक अधिक चकचकीत दिसते आणि त्यापासून वस्तू बनवणे सोपे झाले.
October 29, 2023
पूर्वी तर सीडी हा प्रकार नव्हता, इंटरनेटचाही बोलबाला नव्हता; त्या वेळी फ्लॉपी डिस्कमधून हे विषाणू तुमच्या संगणकात यायचे. नंतर सीडीतून यायला लागले. आता तर इंटरनेटमुळे कुठलाही विषाणू केव्हा तुमच्या संगणकात येईल सांगता येत नाही. जिथे प्रश्न आहे तिथे त्याचे उत्तरही उपलब्ध असतेच. संगणकात विषाणूंचा शिरकाव होऊ लागला व संगणक प्रणाली बंद पडू लागल्या तेव्हा हा प्रकार नेमका कशामुळे होतो याचा शोध घेतला गेला.
September 2, 2023
भारतातील विविध ठिकाणच्या नैसर्गिक परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतात एका बाजूला थरच्या वाळवंटासारखे रुक्ष प्रदेश आहेत, तर दुसऱ्या बाजूला मेघालयासारखी आत्यंतिक पावसाची राज्यं आहेत.
September 2, 2023
फोर जी हे अत्याधुनिक असे तंत्रज्ञान असून त्याचा अर्थ फोर्थ जनरेशन वायरलेस असा आहे. वायरलेसची ती चौथी आवृत्ती आहे असे म्हणायला हरकत नाही. थ्री-जी पेक्षा प्रगत असे हे तंत्रज्ञान असून त्यात पूर्वीच्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक वेगाने माहितीची देवाणघेवाण करता येते. केव्हाही व कुठेही अतिशय स्पष्टपणे व्हिडिओ पाहता येते.
त्यामुळेच त्याला मॅजिक टेक्नॉलॉजी (मोबाईल मल्टिमीडिया एनीटाईम एनीव्हेअर) असेही म्हटले जाते. आवाज व माहिती दोन्ही पाठवण्याची सुविधा यात असते. फोर जी तंत्रज्ञानात अनेक नवीन सेवांचा समावेश आहे. त्यात हाय डेफिनिशन व्हिडिओ, उच्च प्रतीचा आवाज, उच्च प्रतीची हाय डेटा वायरलेस चॅनेल्स यांचा समावेश होतो. फोर जी तंत्रज्ञानाचा वापर केवळ मोबाईलसाठीच नाही तर इतर अनेक दळणवळण सुविधांसाठी करण्यात येतो. त्यात वायरलेस ब्रॉडबँड अॅक्सेस सिस्टीम्सचा समावेश होतो. जास्त डेटा रेट व तरंगलांबी यामुळे अनेक वायरलेस उपकरणांसाठी त्याचा वापर करता येतो.
फोर जी वायरलेस तंत्रज्ञानात ऑरथॅगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हीजन मल्टीप्लेक्सिंग (ओएफडीएम), सॉफ्टवेअर डिफाइन्ड रेडिओ रिसीव्हर्स, ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टीपल अॅक्सेस (ओएमएमडीए), युनिव्हर्सल मोबाईल टेलिकम्युनिकेशन सिस्टीम (यूटीएमएस) व मल्टीपल इनपुट, मल्टीपल आऊटपुट टेक्नॉलॉजी यांचा समावेश होतो. या सर्व प्रकारांमध्ये अतिशय वेगाने माहितीची देवाणघेवाण होते. माहिती देवाणघेवाणीचा वेग हा सेकंदाला १०० मेगाबाईट इतका जास्त असतो, त्यामुळे अनेक नेटवर्कवर रोमिंगची सुविधा मिळते. उच्चप्रतीची मल्टीमीडिया सेवाही मिळते. इंटरनेट प्रोटोकोल वायरलेस इंटरनेट सेवा देण्यासाठी फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस, वायरलेस लोकल एरिया नेटवर्क, वायरलेस लोकल लुप, पर्सनल एरिया नेटवर्क यांचा एकात्मिक वापरही केला जाऊ शकतो. फोर जी तंत्रज्ञानातही जपानच्या एनटीटी डोकोमो कंपनीने आघाडी घेतली असून त्यांनी २०१० मध्ये त्याची चाचणी घेतली आहे.
स्थिर वापरकर्त्यासाठी सेकंदाला १ गिगाबाईट्स तर चलत वापरकर्त्यासाठी (धावत्या मोटारीत) हा माहितीचा वेग सेकंदाला १०० मेगाबाईट राहील असे दिसते आहे. अतिशय उत्तम आवाज व नितळ व्हिडिओ (हाय डेफिनिशन सुविधा) यामुळे व्हिडिओ ब्लॉगिंग हा नवा प्रकार यामुळे उदयास येणार आहे. कोरियाची एलजी व सॅमसंग तसेच युरोपची सिमेन्स या कंपन्याही या तंत्रज्ञानात अधिक संशोधन करीत आहेत. या तंत्रज्ञानात भारत नऊ वर्षांनी मागे आहे. एकतर आताशी आपण थ्री-जी सेवा आणली आहे. त्यातही अजून पुरेसा प्रसार झालेला नाही.
September 11, 2023
क्वांटम कॉम्प्युटर हा अशा प्रकारचा संगणक असतो ज्यात क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे पुंज यांत्रिकीचा थेट वापर केलेला असतो. सुपरपोझिशन व एन्टँगलमेंट अशी दोन तत्त्वे वापरून त्यात माहितीचे संस्करण केले जाते.
September 30, 2023
अभय गुजर गगनचुंबी इमारतींतील ‘अग्नी सुरक्षा’ ही नेहमीच चिंतेची बाब असते. नुकत्याच लागलेल्या ‘लोटस बिझनेस पार्क’मधील आगीच्या तांडवात ही बाब प्रकर्षाने ऐरणीवर आली आहे. अग्निशमन यंत्रणांच्या नियमांच्या अंमलबजावणीतील पळवाटा शोधण्याच्या वृत्तीमुळे अशा इमारतींत वावरणाऱ्या माणसांना धोका निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने या ‘आधुनिक लाक्षागृहां’चा घेतलेला हा जळजळीत लेखाजोखा…
January 24, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti