(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बोध कथा – उंदीर आणि बिल्ली मौसी

    स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय? माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या म्होरक्यांनी, तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे. बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर येऊन कितीही गोड बोलली तरी उन्दिरांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. एवढेच नव्हे तर बाहेर जमिनीवर तिच्या विष्ठे जवळ हि उन्दिरांनी फिरकू नये. तिच्या विष्ठेत अशी काही जादू आहे कि एकदा उंदराने तिचा वास घेतला कि तो पुन्हा बिळात परत येत नसे.

    असेच एकदा बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर आली. गोड स्वरात गाणे म्हणू लागली.
    नंदन वन के सब जानवर
    शेर-बकरी, चूहा बिल्ली
    एक घाटपर पिए पानी.
    चूहों का म्होरक्या मुर्दाबाद
    बिल्ली मौसी जिंदाबाद.
    माझ्या प्रिय उन्दिरांनो, तुम्हाला माहित नाही, तुमच्या म्होरक्यांनी तुम्हाला जमिनीखाली अंधार्या जगात डांबून ठेवले आहे. इथे बाहेर बघा, सूर्य प्रकाश आहे, प्रसन्न वातावरण आहे. माझ्याशी मैत्री करा, तुम्हाला कुणाचेच भय राहणार नाही. मधुर फळांच्या रस आणि गोड फळे तुम्हाला खायला मिळतील. म्होरक्याची पर्वा करू नका, चला बाहेर या, माझ्या सोबत मौज करा, अंधाराच्या राज्याचा नाश करा. उन्दिरांनो बोला बुर्ज्वा म्होरक्या मुर्दाबाद, बिल्ली मौसी जिंदाबाद.
    आजाद नावाच्या उन्दिर, म्होरक्यांच्या जाचक नियमांना त्रासून गेलेला होता. त्याला बिल्ली मौसीचे म्हणणे खरे वाटू लागले. पण बिल्ली मौसीची भीतीही वाटत होती. स्वभावाप्रमाणे बिल्ली मौसी, बिळाबाहेर विष्ठा करून गेली. बिल्ली मौसी दूर जाताच आजाद नावाचा उंदीर बिळाबाहेर आला. बिल्ली मौसीच्या विष्ठे जवळ जाऊ लागला, दुसर्या उन्दिरांनी त्याला मना केले, पण त्याने ऐकले नाही. बिल्ली मौसीच्या विष्ठे जवळ येऊन, त्याने त्या विष्ठेचा वास घेतला. विष्ठेत असलेल्या परजीवींनी लगेच आजादच्या शरीरात प्रवेश केला. त्या परजीवींनी आजादच्या डोक्याचा ताबा घेतला. आजादची विचार शक्ती नष्ट झाली. आता आजाद परजीवींच्या इशार्या वर नाचू लागला. आजादला वाटले, बिल्ली मौसी खरेच म्हणते, नंदनवनातल्या सर्व प्राण्यांनी एकत्र राहिले पाहिजे. अर्धवट आणि अतिशहाणे उन्दिरांचे म्होरके आपल्या स्वार्था साठी बिल्ली मौसी विरुद्ध आमच्या डोक्यात विष कालवितात जेणेकरून त्यांचे राज्य अबाधित राहो. त्याने जोरात नारा लावला, उन्दिरांच्या राज्याचा नाश होवो, बिल्ली मौसी जिंदाबाद म्हणत आजाद बिल्ली मौसीच्या शोधात निघाला. बिल्ली मौसी एका झाडाखाली बसलेली होती, ती आजाद सारख्या मूर्ख उन्दिराचीच वाट पाहत होती. बिल्ली मौसीच्या जवळ येऊन आजाद म्हणाला मौसी मी त्या मूर्खांचे राज्य सोडून आलो आहेत, मूर्ख उन्दिरांचा म्होरक्या म्हणतो बिल्ली मौसी उन्दिरांना खाते, खोटे बोलतो ना तो. बिल्ली मौसी गालात हसली, तिने अलगद आजादला आपल्या पंज्यात पकडले आणि त्याला म्हणाली, मूर्खा तुमचा म्होरक्या खरेच म्हणतो, मी तुझ्या सारख्या कोवळ्या उन्दिराना आनंदाने खाते, असे म्हणत तिने आजादला गटकले.

    स्वामीजी बोलता बोलता थांबले, पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाले, बच्चा, ज्याला उंदीर, परजीवी आणि बिल्ली मौसीचा अर्थ कळेल, त्याला आज काय चालले आहे, हे हि कळेल. स्वामीजी पुन्हा समाधीत गेले. मला काही गोष्ट कळली नाही, तुम्हाला कळली का.

    -- विवेक पटाईत

      February 20, 2016


  • मेरे प्यारे मित्रों ssss

    आपण आपला दिवसाचा सरासरी किती महत्वाचा वेळ फेसबुक (आणि व्हॉटसअॅपवर) वर वायां घालवला, पोस्ट्सवर टाकलेल्या प्रतिक्रियांच्या वेळां पहिल्या तर) किती जागरणे केली, ज्या वेळात आपण सकारात्मक, विधायक, चिरंतन असं कांहीतरी करूं शकलो असतो, एखादे वाचानालय सुरूं करून चांगली पुस्तके वाचूं शकलो असतो, लिहूं शकलो असतो, चांगल्या विचारांचं आदान-प्रदान करूं शकलो असतो….

      October 16, 2018


  • कायदा पाळा गतीचा (मार्मिक लेख)

    माधव ज्युलीयन म्हणतात,”कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.” ह्या ओळी गुणगुणतांना लहानपणी ऐकलेली ससा आणि कासवाची गोष्ट आठवल्याशिवाय रहात नाही.

      December 22, 2019


  • महत्वाचं काय?

    माझ्या कार्यक्रमांमध्ये मी बरेचदा एक प्रश्ण विचारते- तुम्ही स्वतःवर आणि आपल्या आयुष्यावर प्रेम करता का? आणि श्वास घेण्याच्या आधीच काहीही विचार ना करता बहुतांश उपस्थित उत्तर देतात- "हो आम्ही प्रेम करतो". मग माझा दुसरा प्रश्ण "इतका प्रेम करता तर स्वतःला इतका त्रास का देता?"

    हेच दोन प्रश्ण मी तुम्हालाही विचारते. काय उत्तरे आहेत तुमची? थोडा विचार करा आणि नंतर उत्तरे सांगा स्वतःला. तुम्ही म्हणाल, "आम्ही कुठे स्वतःला त्रास देतो..ते तर दुसरे लोक आहेत जे सुखाने जगू देत नाही." खरंच दुसरेच तुम्हाला त्रास देतात का?

    मागच्या वेळी तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला ते आठवा. कुणी तरी उलटून बोलला? कुणी जाणतेपणी अपमानजनक बोलून गेला? तुमच्याकडून काम घेत असतांना तुम्हाला कुणी नोकरासारखं वागविलं? बॉस सारखा घालून- पडून बोलतो? सासू सगळं केल्यावरही तक्रार करते? सून मनासारखा स्वयंपाक करत नाही? इंटरव्हिव मध्ये पास होत नाही? मित्र सतत आपल्या पैश्याचे प्रदर्शन करून खाली दाखवतो कि आणखीन काही कारण आहे तुमच्या त्रासाचे?

    कारण कुठलही असो परत एकदा विचार करून पहा कि कुणी कसही वागलं तरी तुम्हाला त्रास त्यांच्या वागण्याचा होतो कि दुसरं काही कारण आहे?

    सखोल विचार केलात तर लक्षात येईल कि प्रत्येक व्यक्ती तिच्या मनाला आणि बुद्धीला पटेल असं वागते. पण आपली अपेक्षा असते कि सगळ्यांनी फक्त आपल्याला बरे वाटेल असेच वागावे. आणि तसे ना झाल्यास आपल्याला त्रास होतो. पण दुसऱयांनी आपल्यासाठी स्वतःला का बदलावे? तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणताहेत का?

    तो तसा वागला म्हणून आपण ती घटना होऊन गेल्यावरही सारख तेच आठवून आतमध्ये धुमसत राहतो. त्रास कुणाला होतोय? आणि तो कोण देतोय? ... त्या व्यक्तीने जे केले ते ४ दिवसांआधी संपलेही. आता जे तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय तो त्या व्यक्तीची जवाबदारी नाही. तो गेला. त्याला कदाचित कल्पनाहि नसेल कि तुम्ही स्वतःला अशी शिक्षा देत आहात ते. पण तुम्ही मात्र शक्य तेवढी कारणे शोधून दुसर्याला नावे ठेवण्याचे कारण धरून स्वतःला छळत आहात.

    एकदा विसरून तर पहा! त्याच्यासाठी नाही. स्वतःसाठी. पण प्रश्न असा आहे कि तुम्ही जितका त्या व्यक्तीचा राग करता त्याहून जास्तं स्वतःवर प्रेम करता का? आणि मग तुम्हाला माझ्या पहिल्या प्रष्णांचे खरे उत्तर मिळेल.

    नुसत प्रेम करतो म्हणणं म्हणजे प्रेम होत नसतं. स्वतःवर प्रेम असेल तर स्वतःच्या आनंदासाठी, सुख शान्ति साठी तुम्ही कुणाशी वैर घेणार नाही आणि कुणी तुमच्याशी वाईट वागलं तर त्याला जीवाशी लावून बसणार नाही. ती व्यक्ती महत्वाची असेल तर मैत्री चा हाथ तुम्हीच पुढे करा. महत्वाची नसेल तर पाठ फिरवून चालते व्हा. स्वतःला खरे सिद्ध करण्याने तुम्हाला तुमची सुख शांती परत मिळण्याची शक्यता कमीच आहे, परंतु त्या प्रक्रियेत दुसर्यांना तर सोडूनच द्या तुमचं मन कडवट होऊन जाईल आणि शान्ति तर सोडाच पण आनंदही दुरावले.

    प्रत्येक भांडणाच्या किंवा वादाच्या परिस्थितीत स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, " मी दुसर्यावर जितका राग करतो त्यापेक्षा थोडं तरी जास्तं प्रेम स्वतःवर करतो का?"

    मूळ लेखक - सपना शर्मा

    फेसबुकवरुन संकलन - नचिकेत पाध्ये

      November 4, 2016


  • परनिंदा माणसाला भगवंतापासून दूर नेते

    परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते.

    दुसर्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो ? म्हणजे मग आपण यात काय साधले ?
    निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते.

    ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे.

    तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी.

    भगवंताच्या मार्गाने जाणार्याने, दुसर्याच्या ठिकाणी दिसणार्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे, आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.

    पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताचा आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोषदेखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे.

    मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसर्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही.

    विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक 'विठ्ठल विठ्ठल' म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत.

    घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तांत मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे, पुस्तकीज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.

    भगवंताकरिता कुणीही कष्ट करून नका; कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ती वस्तू सात्त्विक प्रेमाने साध्य होणारी आहे; आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो.

    तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसांत प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल, आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल.

    निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.

    -- सुमंत आचार्य

      October 30, 2016


  • प्रेरणा

    “प्रेरणा”मग ती कशी कां असेना, अंतिम परिणाम ‘आत्मविश्वास’ हाच असायला हवा. म्हणतात नं, “स्वत:वर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते.”

      June 20, 2021


  • एक सामान्य करदात्याच पत्र

    मी एक भारतातला सर्वसामान्य नागरिक असून दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कर भरत आहे. तरीसुद्धा काही दिवसात गरीब लोकांसाठी आलेल्या पुळक्यासाठी हे पत्र लिहावेसे वाटले. गरीब आणि श्रीमंत ह्याची व्याख्या आजही आपण त्यांच्याकडे असलेल्या पैश्यावरुन करत आहोत. ते पैसे कसे कमावले ह्याच काहीच देणघेण कोणाला नसते. म्हणूनच नोकरी करून पगार घेणारा एक सामान्य करदाता त्याला मिळणाऱ्या पांढऱ्या पैश्यामुळे नेहमीच श्रीमंत ठरवला जातो. कारण त्याला मिळणाऱ्या पैशाची नोंद हि होत असल्याने त्याच्या हातात पडण्याआधीच ते पैसे कराच्या रुपात कापून घेतले जातात.

      July 17, 2017


  • फसवा विकास सोपे उपाय!

    सरकारी कर्मचारी असो की राजकीय पुढारी त्यांनी आपली मुले नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या शाळांमधेच शिकविणे बंधनकारक करायला हवे, बघा ह्याच शाळांचा दर्जा कसा सुधारतो! हीच मंडळी जर आजारी पडली किंवा त्यांना आरोग्य सुविधा हव्या असतील तर न.पा., मनपा किंवा शासकीय रुग्णालयातूनच घेणे अनिवार्य करावे. हे झाल्या बरोबर बघा ह्या सर्व गोष्टी कश्या झपाट्याने सुधारतात. ब्रिटिशांच्या काळात आणि नंतरही बराच काळ तहसिलदार, मामलेदार टांग्यात फिरायचे, आता नाही टांग्यात तर किमान एसटीतून त्यांना फिरायला लावा, त्यांच्या एसी गाड्या बंद करा, पहा सगळ्या एसटीच्या बसेस एसी होतात की नाही? उपाय सोपे आहे बघा सरकारला सूचवून!

      June 9, 2010


  • विकल्पांमुळे होतो समाधानाचा नाश

    विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात.

      November 6, 2016


  • गणराया बुध्दी दे!

    गणेशोत्सव हा इतर अनेक पतवैकल्यासारखाच आपल्या घरात साजरा करण्याचा उत्सव होता. टिळकांनी तत्कालीन गरज लक्षात घेऊन शुद्ध राजकीय हेतूने या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. त्या पृष्ठभूमीवर आज स्वातंत्र्योत्तर काळात उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप टिकविणे गरजेचे आहे का आणि असलेच तर त्यामागे कोणते हेतू आहेत, त्या हेतूंची पूर्तता होते की नाही, या सगळ्यांची चिकित्सा करण्याची वेळ आली आहे.

      September 6, 2009