वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतीय प्रजातान्त्रिक व्यवस्थेवर विश्वास ठेऊन तिने निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. तिचा हा निर्णय निश्चितच योग्य आहे.
August 14, 2016
तणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून उपेक्षा व धावपळीचे जग यामुळे आज एका नवीन समस्येला जगाला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे निद्रानाश (झोप न येणे). मग यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ येते. त्यातूनच पुढे डिप्रेशन येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या आजाराने आज ग्रस्त केले आहे.
या आजाराची साधारण कारणे व सहज घरी करण्याजोगे उपाय
कारणे - तणावपूर्ण वातावरणात जगणे, काम करणे. उत्तेजक पदार्थांचे सेवन करणे- उदा. कॉफी, बीअर, सिगारेट, उत्तेजक दृश्य बघणे, विचार करणे. आयुर्वेदानुसार मलबद्धता हेही एक मुख्य कारण आहे. ४) उपाशी झोपणे, पोटाच्या आजाराच्या समस्या रात्री जास्त प्रमाणात पाणी पिणे, त्यामुळे लघवीसाठी वारंवार उठावे लागणे. मनाला उत्तेजना देणारे कार्य करणे. उदा. रात्री झोपताना टीव्ही बघणे. ७) अपेक्षांचे अति ओझे असणे, त्यामुळे सतत विचार करणे. पिझ्झा, बर्गर, वडापाव, चायनीजसारखे कुपोषण करणारे पदार्थ खाणे. प्रेमभंग, करिअर समस्या, असमाधानी जीवन. वाढत्या अभ्यासाचे क्षेत्र. या वा इतर कारणांनी निद्रानाश होऊ शकतो. झोप व्यवस्थित न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच ब्लडप्रेशर वाढणे, पोटाच्या समस्या, मानसिक विकार इत्यादी समस्यांनी आपण ग्रस्त होतो. यासाठी साधारण उपाय.
नियमित व्यायाम केल्याने शरीराचे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते व त्यामुळे झोप येते.
योगा, प्राणायाम व देवाची प्रार्थना केल्यास मन शांत होते व व्यवस्थित झोप येते.
रात्रीचे जेवण हलके घ्यावे व जास्त पाणी पिऊ नये.
रात्री झोपताना मनाला आवडेल असे संगीत ऐकावे. दीर्घ श्वसन केल्यास मनाचा अति चंचलपणा कमी होतो.
अति तिखट, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे.
झोपण्याच्या बेडचा उपयोग केवळ झोपण्यासाठीच करावा. यावर लॅपटॉप बघणे, मोबाईल खेळणे इत्यादी उपद्व्याप करू नयेत. जेणेकरून शरीराला एक सवय पडेल की बेड केवळ झोपण्यासाठीच आहे. प्राणीदेखील झोपण्यासाठीच रोज एकाच जागेचा उपयोग करतात.
झोपण्याच्या व जागण्याच्या वेळा निश्चित असाव्यात; जेणेकरून शरीराचे लळेश्रेलरश्र लश्रेलज्ञ सेट राहील.
चिंता दूर सारून प्रसन्न, आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.
झोपण्याचा बिछाना व्यवस्थित अंधारमय खोलीत असावा.
नियमित मसाज केल्याने झोप व्यवस्थित येते. किमान झोपण्यापूर्वी चेह-याची, डोक्याची तेलाने हळुवार मालिश केल्यास झोप येते.
वरील उपाययोजना करूनही निद्रानाश न गेल्यास आयुर्वेदिक पंचकर्मात सांगितलेली शिरोधारा करावी. याने औषधी न घेता कोणत्याही दुष्परिणामांविना मन व डोके शांत होऊन झोप येते. तणाव दूर होतो. ही अतिशय उपयुक्त प्रक्रिया आहे. आयुर्वेदात काही औषधी योजनाही सांगितलेली आहे. जसे. अश्वगंधा, ब्राह्मी, सर्पगंधा, जटामांसी. या औषधीचे वैशिष्ट्य म्हणजे याची सवय लागत नाही. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वरील उपाय करून निद्रा -झोप घ्यावी. स्वस्थ, प्रसन्न जीवन जगावे. असे केल्याने आपला व परिवाराचा तणाव दूर होईल. शिरोधाराही घ्या. ही अमृततुल्य उपाययोजना आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 5, 2017
फार पूर्वी चिरंजीवांवर “देण्याचा” संस्कार व्हावा या हेतूने मी आणि माझ्या पत्नीने त्याच्या व्रतबंधाच्यावेळी त्याच्या हस्ते काही सामाजिक कार्य केले होते. काल मी स्वतःवर संस्कार करून आलो.
October 7, 2022
श्रीकृष्णकथेत वर्णन केलेली ही पूतना खरंच कोणी राक्षसी होती की पूतना ग्रहाच्या वर्णनाचा विपर्यास होत ही दंतकथा तयार झाली?! दंतकथा तयार होण्यास फार काळ लागत नसतो. जिथे स्वामी विवेकानंद वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांसंबंधी दंतकथा निर्माण होतात तिथे प्रत्यक्ष भगवंतांचीही काय कथा?! मात्र एका परीने आयुर्वेद हा भारतीय मनात किती रुजला आहे याची ही साक्षच नव्हे का?!
August 25, 2016
मोठी माणसे पत्ररुपाने आपल्यात मृत्यूनंतरही असतात. अब्राहम लिकन आज असते तर आपले पत्र शैक्षणिक संस्था विसरल्या की काय? अशी शंका त्यांना आली असती. पत्राला ‘शोपीस केलेलं त्यांनाही आवडलं नसतं. काही पत्र काळाशी इमान ठेवून लिहिलेली असतात. काळ बदलतो, काळ सोकावतो, परिस्थितीचे संदर्भ बदलल्यावरही पत्रातील विचारांची उंची कमी होत नाही. समाज थिटा पडतो. तेव्हा विचारांची उंचीच कामाला येते.
October 9, 2018
रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास करण्याकरता अॅंजिओग्राफी हा तपास क्ष-किरण शास्त्र करीत असे.
December 14, 2010
१० मे २०१६ ला भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य-युद्धाला १५९ वर्षें पूर्ण होतील. तें युद्ध १० मे १८५७ ला सुरूं झालें होतें. जरी इंग्रजांनी त्याची ‘गदर’ म्हणून संभावना केली असली तरी, तें स्वातंत्र्ययुद्धच होतें, हें स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०७ मधील त्यांच्या ग्रंथाद्वारें दाखवून दिलेलें आहे.
हें स्वातंत्र्ययुद्ध असफल झालें असें म्हटलें जातें. बहादुरशहा जफर याला दूर ब्रह्मदेशात कैदेत ठेवलें गेलें, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिला वीरमृत्यू आला, तात्या टोपे यांना फाशी देण्यात आले, नानासाहेब पेशवे परागंदा झाले, कित्येक लहानमोठ्या वीरांचा मृत्यू झाला, किंवा त्यांना झाडांवर लटकवून फाशी दिलें गेलें. काळ्या पाण्याची शिक्षा १८५७ नंतरच सुरूं झाली. आणि, १८५७ नंतर, ब्रिटिश सत्तेचे पाय भारतात आणखी घट्ट रोवले गेले. या सर्वांचा अर्थ , ‘हें युद्ध असफलच झालें’, असा काढला गेला तर नवल नव्हे.
पण, हें युद्ध असफल झालें नाहीं !! ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार या युद्धानंतर संपुष्टात आला ; ही महत्वाची घटना नाहीं काय ? त्यानंतर या कंपनीचा सर्व व्यापार संपलाच ! , आणि ती एक केवळ एक पोकळ shell बनून अस्तित्वात राहिली.
या युद्धानंतर जरी UK च्या सरकारनें भारताचा कारभार हातात घेतला , तरी, आपण हें ध्यानात घ्यायला हवें की, it was the beginning of the end of the British Rule in India. कारण, १८५७ च्या युद्धापासून स्फूर्ती घेऊन, त्यानंतर ब्रिटिशांशी विविध पातळ्यांवर संघर्ष सुरूं झाला, आणि परिणामस्वरूप, १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालें. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या भारतासारख्या पुरातन देशाच्या दृष्टीनें , (१८५७ ते १९४७ ही) ९० वर्षें म्हणजे कांहींच नाहीं !
रामदास स्वामींनी म्हटलें आहे – ‘वन्हि तो चेतवावा रे’. तो वन्हि १८५७ नें नक्कीच चेतवला, आणि त्याचे दूरगामी परिणामही झाले !
मात्र, २१ व्या शतकात जन्म झालेल्या युवा पिढीला १८५७ चें महत्व काय आहे, तें कितपत ठाऊक आहे ? ; कांहीं कल्पना नाहीं. तें महत्व तिला कळायला मात्र नक्कीच हवें.
दर वर्षी, भारत सरकार, राज्य सरकारें व consencious राजकीय पक्षांनी, तसेंच जनजागृती करणार्या सोशल-ऑरगायझेशन्सनी, १० मे हा दिवस, ‘१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा स्मृतिदिवस ’ म्हणून साजरा करायला हवा, असें मला सुचवावेसें वाटतें. (मात्र या दिवशीं, सुट्टी नको. आधीच भारतात खूप सुट्ट्या आहेत ! ). १० मे या दिवशी, या दिवसाची महती वर्णणारे, त्याची long-term implications सांगणारे कार्यक्रम व्हावेत, अशी अपेक्षा करणें चूक आहे काय ?
पाहूं या, कोणी जागें होतें कां, तें.
-- सुभाष स. नाईक . सांताक्रूझ मुंबई.
M- 9869002126. eMail : vistainfin@yahoo.co.in
May 10, 2017
श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती यांच्यानंतर दत्तात्रेयाचे तृतीय पुर्णावतार म्हणून श्रीमाणिकप्रभूंचेच नाव घ्यावे लागेल. लिंगायत धर्माचे संस्थापक बसवेश्वर यांनी श्रीमाणिकप्रभूंच्या अवताराचे भाकीत बरेच दिवस आधी वर्तवले होते. श्रीमाणिकप्रभूंचे सारेच चरित्र अतर्क्य व अद्भुत घटनांनी भरलेले आहे. त्यांची अलोट संपत्ती, अतुल ऐश्वर्य, त्यांनी केलेले अमाप अन्नसंतर्पण इत्यादी लोकोत्तर गोष्टी वाचून वाचक खरोखरच स्तिमित होतो!
July 12, 2025
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य किसन पाटील यांनी लिहिलेला हा लेख
संत तुकाराम म्हणजे देहू गावच्या मोरे - अंबिले घराण्यात जन्म घेतलेला एक सुपुत्र . वोल्होबा आणि कनकाई या मातापित्यांच्या उदरातील एक बालक . शेती - भाती आणि दुकानदारी करणाऱ्या या आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या कुटुंबाचा वारस . आपणा सर्वांच्या प्रपंचात येणारे दुःख , भोग आणि लौकिकातील आरिष्टांशी झुंज देत जीवनाची लढाई लढणारा एक प्रापंचिक माणूस . सर्वांभूती ईश्वराचं वास्तव्य मानून सर्व जगाच्या कल्याणासाठी , मदतीसाठी धावून जाणारा संवेदनशील , सहवेदना घेऊन जमलेल्या डोळस श्रद्ध - भक्तीचा पाईक . इहवादी दृष्टीतून लौकिक आणि अलौकिकाचा विवेकनिष्ठ विचार घेऊन सनातनी ब्राह्मणी प्रवृत्तीचा विरोध व अत्याचारांना बळी पडलेला विद्रोही संत . खऱ्या - खोट्याचा विचारपूर्वक निर्णय घेण्याची सम्यक बुद्धी असलेला प्रापंचिक भक्त माणूस . वेद , पुरुष नारायण म्हणत , ' वेदांचा तो अर्थ आम्हाची ठावा ' असा ठामपणे भूमिका मांडणारा सत्यनिष्ठ विचारवंत .. कर्म - ज्ञान - भक्ती यांचा सगम्य आणि व्यवहारिक लौकिक अर्थ प्रतिपादन करणारा संत - साहित्यिक आणि विचारवंत . अनुभवाशिवाय लिहू नये , जाणल्याशिवाय बोलू नये आणि कृतीशीलतेने प्रश्नांची सोडवणूक करावी . काया - वाचा - मनानं , कृतीशील , जाणिवेतून भक्तीला ज्ञानात्मक पातळीवर शोधणारा जीवनवादी संत . या कर्म - ज्ञान - शक्तीची एकसंध विचारधारा म्हणजे त्यांची अभंगवाणी , ' तुकाराम गाथा . ' जी बुडाली नाही . म्हणजे या जीवनाच्या भवसागरात तरली अशी अभंग विचारांची खाण म्हणजे त्यांची बुद्धीनिष्ठ विवेकाची वृत्ती . ढोंगीवृत्ती , पाखंडीपणा आणि धर्माच्या नावाखाली सर्व वैभव भोगणाऱ्या भोगवादीवृत्तीवर त्यांनी प्रखर टीका केली . असे धर्मशास्त्राचे व जीवनाचे भाष्यकार . अशा अनेक दृष्टीने संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाच्या कर्तृत्ववान आणि लौकिकचा शोध आणि बोध घ्यावा लागतो .
संत तुकारामांच्या जीवनाकडे आणि विचारवैभवाकडे जात - धर्मादि संकुचित सनातनी विचारांचा परिप्रेक्ष्यातून पाहता येत नाही . अशी व्यापक स्वयंप्रज्ञा आणि विवेकी प्रतिभा असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे . चातुर्वर्ण्य व्यवस्थेत आणि आचारधर्मात जो धर्माचाराच्या नावाखाली चाललेली लुबाडणूकीचा व्यवहार त्यावर प्रहार करीत त्यांनी ' सत्य ' मांडले . निर्भीडपणानं त्यांनी जुनाट रूढी- विचार आणि कर्मविपाकातील अवडंबराला कालबाह्य ठरवले . कर्मकांडरहित भक्ती , नामभक्ती आणि ज्ञानात्मक कर्मभक्तीचे प्रतिपादन करीत त्यांनी आपल्या अभंगातून कीर्तनातून समाजप्रबोधनाचे अद्वितीय कार्य आरंभले . ' बुडती हे जन देखवेना डोळा , म्हणुनी वक्रवळी येतसे ' या भूमिकेतून त्यांनी अज्ञान - पाखंडादि विचारांवर शब्दांनी प्रहार केला . स्वयंज्ञानी होण्यासाठीचा जीवनवादी वास्तवाचा त्यांचा अभ्यास त्यांनी सोप्या सहज भाषेत मांडला . त्यामुळे वेदांचा सार आणि अडाणी लोकांना कळला तर आपली परंपरागत उच्चभ्रू दुकानदारी बंद होईल अशी भीती मंबाजीसारख्या ब्राह्मणी प्रवृत्तीला वाटणे साहजिक होते म्हणून त्यांनी संत तुकारामांच्या जीवनात अनेक अडथळे निर्माण केले . परंतु त्यांचा तुकाराम द्वेष ' सत्यचिंतन आणि शाश्वत मूल्याधिष्ठित विचारांच्या पुढे टिकला नाही हाच निष्कर्ष सार्वकालिक ठरतो . ब्राह्मण वैष्णवांना , शूद्र वैष्णवांना तुकाराम हे आपले गुरू करण्यात जो कमीपणा वाटत होता तो केवळ सनातनी उच्चभ्रू अशा खोट्या दांभिकतेचा अहंकार होता . म्हणून जेव्हा आपण रामेश्वर भट्टांच्या वैचारिक परिवर्तनाचा आलेख लक्षात घेतो , तेव्हा रामेश्वर भट्टांनी ज्ञानोबा - तुकाराम या वारकरी परंपरेचा स्वीकार केला . त्यांनी तुकारामांना गुरूस्थानी मानले . संत बहिणाबाई ही शिष्या अशीच विचारांतून घडत गेली . ‘ गुरूत्व ही ब्राह्मणांची मिरासदारी आहे असा दृढ समज असल्याने ( मंबाजी ) तुकारामांचा द्वेष करू लागला . खरे तर तुकारामांना गुरूत्व नको होते . ते गुरूबाजीच्या विरुद्ध होते . पण लोकच त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध गुरु मानत होते . हे सदानंद मोरे यांचे विधान महत्त्वाचे वाटते . ( तुकाराम दर्शन , पृष्ठ १५ ) संत ज्ञानेश्वरांनी ‘ इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळु वारी ' असे प्रतिज्ञामय वचन प्रबोधन परंपरेत मांडले . याच विद्येचे पाईक बहुजनांच्या प्रबोधनासाठी म्हणतात , ' शब्द हेच धन | शब्द म्हणजे जीवन , शब्द म्हणजे शस्त्र , शब्द हेच धन ! ' कारण शब्दांनीच मानवजागृती होते , शब्दांनीच चिंतनगर्भ विचार प्रकटीकरण होते . शब्दांनीच माणसं बांधली जातात ; शब्दांतूनच ज्ञानात्मक भक्तीचा कर्ममय मार्ग सापडतो . त्यातून जे फळ मिळते ते कर्ममय ईश्वराचा लौकिक साक्षात्कार असे त्यांना सुचवायचे आहे .
आम्हां घरी धन शब्दाचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जन लोकां ।।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करू || ( गाथा ३३९६ )
शब्दांनी माणूस जागवण्याचा , प्रबोधनाचा मार्ग संत तुकारामांनी जोपासला . त्यांची ‘ अभंगगाथा ' म्हणजे मराठीतल्या बहुजनांचा वेद , बहुजनांचे ज्ञानमय संचित असं म्हणता येईल . उपनिषद आणि पुराणकारांनी जे जे चुकीच्या पद्धतीने रूजवण्याचा प्रयत्न केला त्याची वास्तव जीवनवादी चिकित्सा तुकोबांनी केली . म्हणून मराठीतली ही ‘ अभंगगाथा ’ , ही महाराष्ट्र वेद म्हणता येईल . हे विचार , चिंतन आणि जीवनदृष्टी म्हणजे त्यांची अभंगवाणी आहे कारण त्यांनीच म्हटले आहे . नव्हे माझी वाणी पदरीची , मज विश्वंभर बोलावितो , नव्हे हे कवित्व टांकसाळी नाणे , जोडिली अक्षरे , नव्हती बुद्धीची उत्तरे , तुका म्हणे झरा अंतरीचा आहे खरा ’ अशी ही त्यांची काव्यनिर्मितीची भूमिकाच त्यांनी सांगितली . म्हणूनच तुकोबांनी वचनामृत अशी जीवननिष्ठ विचारांची शिदोरी अडाणी सामान्यजनांना उपलब्ध करून दिली .
जोडूनिया धन उत्तम व्यवहारे , साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा , तुका म्हणे सुवर्ण आम्हा मृत्तिकेसमान , जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती , नाही निर्मळ जीवन काय करील साबण , परकिया नारी माऊली समान , मुलाम्याचे नाणे - नव्हे सोने , सर्वांभूति द्यावे अन्न - द्रव्य पात्र विचारोन , यातायाती धर्म नाही विष्णुसी , बरा कुणबी केलो । नाही तर दंभे असतो मेलो । अशा कितीतरी अभंगांतून त्यांनी ही इहवादी - लौकिक जीवनव्यवहारदृष्टी प्रकट होते . त्यामुळेच दांभिक बढाचारी प्रवृत्तीच्या उच्चपदस्थ धार्मिकांनी त्यांना खूप त्रास दिला . विचारांनीच अविचारांचा पर्दाफाश करणारी तुकोबांची वैचारिक धर्मचिकित्सा तथाकथित पोटभरू वृत्तीच्या धर्म पंडितांना पचली नाही. जेव्हा विचारांची उफराटी दिशा आणि उलटे चक्र फिरते , तेव्हा साम , दाम , दंड भेद नीतीही अपुऱ्या पडतात. अशा वेळी धर्माचे आणि वेदांचे अभ्यासक म्हणवणारे अहंगडाच्या अंधारात , आत्मज्ञानाच्या खोट्या दंभात आणि वर्चस्ववादी धर्माच्या अहंकारात हिंसा - अहिंसा विसरतात . ' शत्रू'पदाच्या गर्तेत विचार कुंठतात. अविचारांचे दानवी साम्राज्य तथाकथित विद्वान पंडितांच्या आचारात प्रवेश करते . त्याची प्रचिती ही देहदंडाच्या, मृत्युच्या गर्तेत विचारांची गळचेपी करण्यात होते . देह जाते ... विचार अमर असतात . म्हणून तुकोबांचे ' अभंग ' बुडत नाहीत, त्यांची ' गाथा ' ही तरंगते . अक्षर होते . शेकडो वर्षे ही वैचारिक शिदोरी पुरून उरते . कधीच सरत नाही . त्यांना संतश्रेष्ठत्वाची उच्च पदवी बहाल करीत जनमानसात अक्षयस्थान प्रदान करते . आज तुकोबांना लोक ओळखतात , मंबाजीलाही ओळखतात . परंतु प्रत्येकाची ओळख किती वेगळी असते हे चाणाक्ष विचार करणाऱ्यांना सांगण्याची गरज भासत नाही .
संत तुकारामांनी अध्यात्मिक , धार्मिक आणि सामाजिक अशा स्तरांवर समाजाला प्रबोधनाचे विचार सांगितले . आध्यात्मिक प्रबोधनात त्यांनी चार वेद , सहा शास्त्रे , उपनिषदे , अठरा पुराणे यांच्या संदर्भातील सुस्पष्ट विचार मांडले आहेत . काही पाठ केली संतांची उत्तरे । अत्यंत आदरे करूनिया | माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि होय गुरूदेव । देही असोनिया देव , वृथा फिरतो निर्देव । देव आहे अंतर्यामी , व्यर्थ हिंडे तीर्थग्मी ।। तुका म्हणे मूढजना , देही देव का पहाना ।।
सेंद्रीय संवेदनांनी देव जाणावा , बोलण्याच्या नादाचा शक्तीत देव बघावा , मन - बुद्धीसह तेजशक्ती देणारा तोच आहे . तो सर्वांभूती असतो असा विठ्ठल स्वतःच्या आत शोधावा असे साधे सरळ आध्यात्मिक प्रबोधन करून त्यांनी ' बुडती हे जन देखवे ना डोळा ' या दृष्टीने लाभावीण प्रीतीसाठी कळवळ्याच्या जातीसाठी प्रार्थना हेच प्रबोधन मानले होते . अणू रेणूपेक्षा सूक्ष्म असे अस्तित्वाचा विचार मांडून त्यांनी ' तुका आकाशा एवढा ' असा अनुभव मांडलेला दिसतो . पंचमहाभूते , सेंद्रीय संवेदना आणि जळीस्थळीकाष्ठी पाषाणी असे देवाचे स्वरूप तुकोबांनी प्रबोधनात्मक दृष्टीने मांडले . ' वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । एरांनी वहावा भार सारा । ’ असे म्हणताना तुकोबांनी समानता , जीवशिवाचे ऐक्य , असा आत्मौपम्य आध्यात्मिक विचार सांगितला आहे . विश्वात्मक परमेश्वराची आपण सारी लेकरं , जनीजनार्दन असल्याची भावना , स्वतःच विठ्ठल होऊन एकरूप होण्याची त्यांची दृष्टी ही ' स्वयंभू ' आहे असा संदेश देणारी आहे .
द्वैताद्वैत भावे । अवघे व्यापियले देवे ।
तुका म्हणे हरि । आम्हामाजि क्रीडा करी ।
विठ्ठल हाच माय , बाप , चुलता - बंधु ।
सर्व भेदांना बाजूस करून आध्यात्माचा शोध घेत तुकोबांनी ' हरि आणि हर ' यांचे एकात्म दर्शन घडवले .
हरिहरा भेद । नाही करूं नये वाद ।।
एकएकाचे हृदयी । गोडी साखरेच्या ठायी ।।
भेदकासी वांड । एक वेलांटीच आड ।।
उगवे वामांग । तुका म्हणे एकची अंग ।।
विठ्ठलभक्तीत ' हरि + हर ' यांचा मिलाफ वारकरी मानतात . तो भक्तीचा मळा हेच आध्यात्म प्रबोधन तुकोबांनी मांडले आहे . ' पंढरी ' हे भूवैकुंठ असून विठोबा ' हे दैवत आणि सारे ' विश्व सोयरे ' असा विश्वंभर विश्वव्यापक स्वरूपाचे आध्यात्म त्यांनी रोखठोक सुस्पष्टपणे मांडले . त्यामुळे जनसामान्यांना सहज सोपे आध्यात्म सांगणे हेच त्यांचे अध्यात्मिक प्रबोधनाचे कार्य म्हटले पाहिजे . नामभक्ती , ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती पुढे कर्मकांड कसे कष्टप्रद आहे याचा सोपा सिद्धान्त त्यांनी दिला . त्यांचे अभंग या इहवादी लौकिकातच अलौकिकाचा आध्यात्मिक अर्थ सुस्पष्ट करतात .
आध्यात्म जाणून घेतले की धर्म जाणणे सोपे होते . धर्माची चिकित्सा करणे म्हणजे जीवाशिवाच्या परिप्रेक्ष्यात वैष्णवांचा धर्म म्हणजेच ' माणुसकीचा ( मानवता ) धर्म असा प्रबोधनात्मक विचार ते मांडतात . धार्मिक प्रबोधन करताना त्यांनी आत्मज्ञान , स्व जाणीव , परमात्व तापाची जाणीव या माध्यमातून देहापासून देवाचा शोध घेण्याची जाणीव या माध्यमातून ' वैष्णव धर्म ' सांगितला . जो ' मानवता धर्म ' म्हणून जाणवतो .
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम अमंगळ ।
अशी व्यापक , सर्वसमावेशक धर्माची व्याख्या त्यांनी प्रतिपादन केली . अशा माणुसकी धर्माचे क्षेत्र ( विश्व ) म्हणजे पंढरी , ज्याला ते भूवैकुंठ म्हणतात . तीर्थक्षेत्रापेक्षा ' भूवैकुंठ ' ही व्यापक संकल्पना आहे . म्हणूनच म्हणतात की , तीर्थी धोंडा पाणी । विठ्ठल रोकडा सज्जनी । जपजाप्य विधी , कर्मकांडापेक्षा शोषण विरहित मानवता धर्म त्यांनी प्रतिपादन केला .
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ।
दयाक्षमाशांती तेथे देवाची वसती ।
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती ।
नाही निर्मळ जीवन काय करील साबण |
तुका म्हणे तोचि संत , सोसी जगाचे आघात ।
न लगे मुक्ति आणि संपदा , संत संग देई सदा ।
जे कां रंजले गांजले , त्यांसि म्हणे जो आपुले ।
अशा विविध अभंगातून त्यांनी माणुसकी धर्माची , लौकिक आचारधर्माची , सात्विक विचार धर्माची पाठराखण केलेली आहे . या धर्माचे रक्षण करण्यासाठीच हा मानवी जन्म आहे . सर्वांभूती परमेश्वर मानणारा ' मानवता धर्म ' श्रेष्ठ असल्याची प्रचिती त्यांनी प्रतिपादन केली . ' पाखंडी ' लोकांनी देव - धर्माच्या नावाखाली जो उच्छाद मांडला त्याचा निकित्सक परामर्श तुकोबांनी घेतला . ' विठ्ठल ( पांडुरंग ) मध्यवर्ती ठेवून त्यांनी एकेश्वरवादी विचारांतून धर्म प्रबोधनाचे ऐहिक विचार मांडले . शेंदरी दैवते , अनेक देव - दैवतांची विखुरलेली पूजा - विधी कसे कर्मकांडात्मक ठरतात याचा वैचारिक चिकित्सा करताना त्यांनी अनिष्ट प्रथा प्रवृत्तींवर टीका केली . तीर्थक्षेत्र , तीर्थयात्रा , पर्वणी , दानधर्म दक्षिणा , उद्यापने , उपवास , पूजाअर्चा इत्यादि भक्तीमार्गात कर्मकांडाचा अतिरेक होऊन पाप - पुण्याच्या चुकीच्या भ्रमात भक्त कसा अडकतो याचे वर्णन आणि वास्तव दर्शन तुकोबांनी घडवले आहे . त्यामुळेच मंबाजी प्रवृत्तीचा विरोध सहन करीत त्यांना भोगावे - सोसावे लागले . हे प्रबोधनाचे विचार तत्कालीन कालबाह्य परंपरावादी भोंदू प्रवृत्तींना पचणे शक्य नव्हते . त्यासाठी तुकोबा म्हणतात
मान दंभ पोटासाठी । केली अक्षरांची आटी ।
तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ।।
सर्वांभूती प्रेम हाच विश्वधर्म , माणसाने माणसाशी भेदभाव निरहित असे माणुसकीने वागावे हाच माणुसकी धर्म आहे . आत्मशोध घेऊन सत्यासत्य विवेकाने चारित्र्य घडवावे . देह - आत्मा आणि आचारधर्माचे पालन करावे . सेवामय कर्मातून मोक्षाचा , स्वमुक्तीचा मार्ग शोधावा . भ्रांत कल्पना , कर्मकांडापेक्षा ' एकांतात आपुलाची वाद आपणासी ' अशा भक्तीने देव जपावा . ' तुज आहे तुजपासी परि जागा विसरलाशी । ' या भूमिकेतून आत्मधर्म पालन करून मानवता धर्माचे रक्षण करावे असे धार्मिक प्रबोधन त्यांनी केले आहे . शरीर सुदृढ ठेवावे , मन शांत व सुचितापूर्ण राखावे . आत्म स्वरूपात देव जाणावा , प्रत्येक कर्मात विठ्ठलाची जाणीव ठेवावी . विश्वव्यापक होऊन जगाकडे पहावे . म्हणजे द्वेष - मत्सर गळून पडावा . असा आध्यात्मिक धर्माचा साक्षात इहलोकीचा अनुभव प्रकृतीपासून शिकावा . विकृती झडून गेली , प्रकृती निकोप झाली की संस्कृती संवर्धन होते . तोच माणुसाने जोपासलेला ' मानवता धर्म ' असे सावधानात्मक विचार म्हणजेच तुकोबांचे धार्मिक प्रबोधन आहे .
आध्यात्म कळले की खरा धर्म आकलन होतो . तदनंतर आत्मनिष्ठता गळाली की समष्ठिनिष्ठा जोपासली जाते . या दृष्टीने संत तुकारामांच्या सामाजिक प्रबोधनावर बघावे लागते . जात - पंथ - वंश - धर्म हे मानवनिर्मित आहेत . त्यातूनच समाज निर्माण होतो . तो समष्टीच्या अनुभव , भावना , कल्पनांचा सारांश असतो . लोक परंपरा , रीतीरिवाज , चालीरीती , लोकाचार , विधी - कायदे , लोकविधी निषेध , अशा अनेक सामाजिक जडणघडणी होऊन ' समाज ' तयार होतो . त्यातील श्रद्धा - अंधश्रद्धा इत्यादिंमुळे समाजात जुन्या नव्या मीलनाची जडणघडण होत असते . संतांनी यातील जातीभेदाभेद - पंथभेद , स्त्रीपुरुष भेदाभेदांच्या कालबाह्य घटनांची चिकित्सा केली . नीतीनियम , आचार धर्माच्या दृष्टीने समाजाचे कल्याण म्हणजे हितचिंतन तुकोबांनी डोळसपणाने केले . हेच त्यांचे विचार सामाजिक प्रबोधनाला दिशा देणारे ठरतात . अंगात येणे , भूतप्रेत पिशाच्च मानणे , देव्हारा अंधपणाने पूजणे, नवसायास करणे , जटा वाढवून , शकून अपशकुनाच्या गोष्टी करणे , शेंदूर फासून दगड पूजणे, विवेक सोडून अंधश्रद्धा वृत्ती जोपासणे यासारख्या कर्मकांडावर त्यांनी डोळस भक्तीच्या माध्यमातून प्रहार केला . अडाणी जनांना बुडताना पाहून त्यांना कळवळा येत होता . त्यासाठी त्यांनी नैतिक वर्तन , डोळस विवेकी ज्ञान , चारित्र्यसंपन्नता कशी वाढवावी असा उपदश अभंगवाणीतून समाजाला केला . हे त्यांचे दिशादर्शक विचार म्हणजेच समाजप्रबोधनाचा मार्ग ठरतात . उत्तम व्यवहार करून कोणलाही न फसवता , कष्टाने धन कसे मिळवावे, स्वकष्टाचे मोल जाणावे , दुसऱ्याचे शोषण करू नये असेच त्यांनी सुचविले आहे .
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ।
उदास विचारे वेच करी ।।
आमचि गती तो एक पावेल ।
उत्तम भोगील जीवखाणी ।।
असे सुजाण विचाराचे , नैतिक कर्माचे चिंतन करीत त्यांनी समाजातील अनिष्टतेला नाकारले . सुष्टांची पाठराखण आणि दुष्टांचा निषेध करणारी त्यांची लेखणी म्हटली पाहिजे .
नवसे कन्या पुत्र होती ।
तरी का करणे लागे पती ।
तुका म्हणे मैंद । नाही त्यापाशी गोविंद ।
आणिकांच्या कोपतो मना ।
निष्ठुरपणा पार नाही ।
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा ।
थोरली ती पीडा रिद्धीसिद्धी ।।
लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडे पाषाण ।
समाजाचा नैतिकतेचा सज्जनतेच्या आणि उत्तम व्यवहाराचा आदर्श देऊन , तुकोबांनी समाजाला जागृत केले . भक्तिमार्गातही काही संधीसाधू गुरू आणि स्वार्थापुरत्या असतात .
असा आचारधर्म सांगून त्यांनी निःस्वार्थ भक्ती सेवा म्हणजेच ईश्वराचे कार्य जाणावे , जनसेवा हीच ईश्वरसेवा मानली . सत्याची कास धरावी , दांभिकपणा टाकून द्यावा , स्वार्थत्याग करावा , आर्थिक व्यवहार उत्तम करावे , समाजात दक्षता जपावी , सतत सावध स्वस्थचित्त रहावे , प्रेम - करुणा भक्तीमार्गाची जोपासना करावी असा उपदेश / सूचना त्यांनी केल्या आहेत .
संत तुकाराम हे डोळस , ज्ञानी - विवेकी वृत्तीचे संत होते . त्यांचे प्रबोधन हे बहुआयामी वैशिष्ट्यपूर्ण असे होते . त्यांची ईश्वरनिष्ठा ही जननिष्ठापूर्ण होती संत सज्जनांना पारखून घेऊन त्यांचे योग्य अनुसरण करण्याची दिशादर्शक सूचना त्यांनी जनतेला केली. जनहित दक्षता , ज्ञानासह सत्यनिष्ठ विवेकाची भूमिका त्यांनी मांडली . समाजाच्या वर्तनात सकारात्मक असा कर्मशील कृतीशील बदल घडावा आणि प्रबोधनातून समर्पक परिवर्तन घडावे , हा त्यांचा ध्यास होता . निर्भीडपणा , सुस्पष्ट विचार , आक्रमक भाषाशैली , सुत्रबद्ध विषय प्रतिपादन , अल्पाक्षरात व्यापक विचार मांडण्याची पद्धती , नैतिक मूल्यनिष्ठ कालातीत विचार शाश्वताच्या पार्श्वभूमीवर मांडण्याची त्यांची चिरंतनता लक्षात येते विद्रोही , द्रष्टे , स्पष्टवक्ते , रोखठोक बाणा , इहवादी दृष्टी अशा अनेक गुणांचा संचय त्यांच्या ज्ञान - भक्ती आणि कर्ममय जीवनात आढळतो . त्यांचे विचार अज्ञानी कर्मकांडी जनातील दांभिकांनी, स्वयंघोषित उच्चवर्णीय ज्ञानी जनांना आवडले नाहीत . ते टीकात्मक विचार आपले शत्रू मानून त्यांनी संत तुकारामांचा अनन्वित छळ केला . त्यांचा स्वार्थ दुखावला त्यांनी शत्रूत्व निर्माण केले. परंतु तुकारामांच्या मनात वेगळेच शत्रू होते ; त्यांनी ' षड्रिपूंना ' शत्रू मानले होते . आध्यात्म, धर्म आणि समाजाची परखड - रोखठोक निकित्सा करणारे संत तुकाराम देहाने गेले परंतु विचारांनी - वाङ्मयाने ‘ अभंग ' राहिले . त्यांच्या विचारांचे अमरत्व ! अक्षरत्व ! कालातीत राहिले. ते मंबाजी प्रवृत्तीला मिटवता येणार नाही ; हेच खरे ! आजही त्यांची गरज समाजाला आहे.
-- प्राचार्य किसन पाटील,
जळगाव
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
September 29, 2022
बालक पालक हा चित्रपट बघताना प्रत्येकाला बरेच काही आठवत असेल जे पन्नाशीच्या पुढे आहेत विशेष करून ती जी पोरे म्हणा कार्टी म्हणा ते व्ही सी आर आणण्यापासून ते नीलचित्र म्हणजे ब्लु फिल्म बघताना ती संपेपर्यंतचे हावभाव पाहून प्रत्येकाला आपले बालपण आठवत असेल अर्थात स्कालर मंडळी सोडून पण कदाचित.
मला आठवतंय जत्रेमध्ये दहा पैसे दिले की तंबूमध्ये एक गाणे पडयावर गाणे तर केव्हा एखादा फाईटसीन. पण घरी चोरून व्ही सी आर आणण्यापर्यंत जो काही प्रवास असे तो जीवघेणा असे आणि मग पूढे ते सम्पूर्ण बघता आले की श्रमाचे चीज का लोणी होत असे.
मला आठवतंय आमच्याइथे भाड्याने व्हीसीआर मिळत परंतु ते एक घरातून मिळत , कधीकधी कुणी कॅसेट आणायला जात असे तेव्हा त्यांची मोठी मुलगी बघितल्यावर क्सासेट मागणारा अडखळत असे मग तीच सांगत असे वो कासेत चाहिये ना, आयसा बोलो ना आणि खुद्कन हसून ती कॅसेट देत असे मागणारा झक मारली आणि मागितली असे त्याला होत असे.
विशेषतः A सर्टिफिकेटची सिनेमा त्यावेळी लागत से अर्थात इंग्रजी , पोस्टर भडक दिसले की कार्टी थेटरात पण कधीकधी तो पोस्टर शॉट कट केलेला असे मग सगळे चडफडत.
तेव्हा आम्ही एक काटेकावरपणे नियम पाळत असू ते म्हणजे टॉकीजच्या बाहेर आल्या आल्या तिकीट फेकून देणे. पण काही मुलाचे तीर्थरूप पक्के चालू म्हणा अनुभवी म्हणा शर्टाच्या मागे पडलेल्या चुण्यावरून ओळखत असत ह्याने आज पिक्चर टाकलेला आहे.
सगळे कमावते झाले , बिझी झाले. खूप काळ गेला स्मार्ट फोन आला, तरीपण ब्ल्यू फिल्म डोक्यातच होत्या..
मला आठवतंय माझ्या ठाण्याच्या बिल्डींग मध्ये खाली दुकाने आहेत तेथे एका ब्रँडेड चष्म्याच्या दुकानाचे ओपनींग होणार होते त्यावेळी ते करायला सनी लिओन येणार होती. खाली गर्दी होती रात्री दहा वाजता ती आली मी गॅलरीतून बघितले ती दुकानात जाताना दिसली , माझे नव्वद वर्धाचे वडील पण होते, ते म्हणाले ही कोण आहे ? मी चुपचाप कॉम्प्युटर वर बसलो , सर्च मारला वडिलांना सांगितले ही ती बया ..वडील हैराण ..चूप.
त्यावेळी इतक्या वर्षानंतर पोर्नचे दर्शन झाले. पहिल्यांदा पोर्नचे दर्शन झाले. मग मोबाईल वर सुरु. पण फारच थोडा काळ कारण त्याचे बिझनेसचे स्वरूप समजले आणि परदेशात तर सहजपणे हा व्यवसाय चालतो.
आपल्या देशात त्या बाबतीत आपण मागासलेले आहोत अर्थात मनातून नाही ? वृत्ती आणि विकृती यांच्यामध्ये एक गोल्डन लाईन असते ती कधी पार पडतो आणि कधी नाही हे समाजातच नाही. जेव्हा crime सिरीज बघतो तेव्हा त्याचे भयानक स्वरुप दिसते. कायद्याने त्याला बंदी आहे म्हणे तर करा लॉक सगळे. आज तर ते इतके सहज आहे. पण ते का होत नाही ? याचे एकाच कारण जितका खोकला दाबून धराल तितकी उबळ जास्त.
साधे उदाहरण घेऊ चार ताटे झाकली आहेत , मग तीन ताटावरचे रुमाल काढले. पण एक ताटावर रुमाल तसाच ठेवला , तर सगळे लक्ष केंद्रित होते ते झाकलेल्या ताटावर ?
हे सगळे त्या बालक पालक चा फोटो बघितला आणि आठवले.
बघा विचार करा, आत्मपरीक्षण करा काहीही करा...पण प्रामाणिकपणे?
सतीश चाफेकर
June 24, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti