वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
समजा तुम्ही युद्धसदृश किंवा जिथे दंगल चालू आहे अशा ठिकाणी गेलात तर तुम्हाला केव्हाही गोळी लागण्याचा धोका असतो. गोळी थेट तुमच्या शरीराचा वेध घेऊ शकते. मग यावर उपाय काय पळून जाणे पण पळता पळता गोळी लागतेच. बंदुकीच्या गोळीपासून बचाव करण्यासाठी असे एखादे आवरण तुमच्या शरीरासमोर असले पाहिजे, की ज्यावर ती गोळी लागेल व तिची गतीज ऊर्जा विखुरली जाईल.
October 5, 2023
सरकारला बचत करायची असेल किंवा वायफळ खर्चाला आवर घालायचा असेल तर केवळ आपल्या मंत्र्यांचा ‘क्लास’ बदलून चालणार नाही. सरकारने आता एवढ्यावरच थांबू नये. सरकारी तिजोरीतून खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशाचा नेमक्या कारणासाठी योग्य विनियोग होतो की नाही याची दक्षता घेतली जावी, प्रसंगी त्यासाठी
कठोर पावले उचलावी लागली तरी हरकत नाही.
September 20, 2009
उन्हाळ्यात वन्यजीव प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जंगलात वन विभागाने निर्माण केलेल्या कूपनलिकावर ‘वॉटर इज लाईफ’ या वन्यजीव प्रेमी संस्थेतर्फे अत्याधुनिक सौरऊर्जा पंपाद्वारे कृत्रिम झरे निर्माण करून आठ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आल्यामुळे वन्यजीवांना तृष्णा भागवता येणार आहे.
उन्हाळ्यात तलावातील पाणी आटत असल्यामुळे वन्यजीवन पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसून येतात. त्यामुळे उन्हाळ्यात प्राण्यांना तृष्णा भागवण्यासाठी मोहर्ली येथील आठ पाणवठ्यांवर सौर पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे कृत्रिम झरे आता उन्हाळ्यात नैसर्गिक झऱ्यात पाणी साठवण्याचे काम करीत आहेत. यामुळे प्राण्यांना पाणी पिण्याची जागाही बदलण्याची गरज नाही, असे दृश्य आता दिसून येत आहे. यासर्व प्रयोगामुळे 50 चौरस किलोमीटर भागातील प्राण्यांची तृष्णा भागवण्यात व या प्राण्यांना उन्हापासून होणारा त्रास वाचविण्यास मदत होत आहे.
2010 पासून धनंजय बापट यांच्या पुढाकाराने मोहर्ली बफर क्षेत्रात ‘वन्यजीवांसाठी पाणपोई’ हा उपक्रम राबविला. पहिल्या तीन वर्षात टँकरच्या माध्यमातून संपूर्ण उन्हाळाभर वन विभागासोबत विविध ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत होता. चौथ्या वर्षी सहकारी मित्र डॉ. विवेक भोरे जे स्वत: मेकॅनिकल इंजीनियर व सौर ऊर्जा या विषयात डॉक्टरेट आहेत. त्यांनी अत्यंत कमी क्षमतेचा परंतु सूर्योदय ते सूर्यास्त असा पूर्ण वेळ चालणारा बॅटरी विरहीत पंप तयार करून याच क्षेत्रातील हातपंप असलेल्या कूपनलिका सोबतच हा पंप टाकून एक अभिनव प्रयोगाची सुरूवात केली. त्यामुळे मागील वर्षीपासून हाच उपक्रम अनेक सुधारणांसह सुरू करण्यात आला आहे. प्राण्यासाठी पाणी पुरवठा हा कृत्रिम सिमेंटच्या पानवठ्यात होत होता. त्यामुळे यातील पाणी संपले की जनावरे इतर ठिकाणी स्थलांतर करीत होते. सोबतच नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी आटले की जनावरांना इतरत्र भटकावे लागत होते. त्यामुळे त्यांना स्थलांतरित न होता त्याच व सोबतच्या नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी मिळावे म्हणून ‘वॉटर इज लाईफ’ च्या सदस्यांनी नेहमीच्या नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी उपलब्ध व्हावे व त्यासाठी जमिनीच्या आत उपलब्ध असलेले पाणी जमिनीवर आणण्यासाठी पंपाचा उपयोग करून नैसर्गिक ठिकाणी सतत ताजे व शुद्ध पाणी जनावरांना उपलब्ध करून देण्यासाठी सौर पाणपोई ही योजना वन अधिकाऱ्यासमोर ठेवली. त्यामुळे या वर्षी आठ ठिकाणी तलावात कूपनलिका तयार करून दिल्या आहेत. डॉ. भोरे यांनी तयार केलेले पंप ‘वॉटर ईज लाईफ’ या गटातर्फे स्वखर्चाने बसवून देण्यात आले आहेत व त्याची दररोज देखभाल सुद्धा या गटातर्फे करण्यात येत आहे. यावर्षी या आठ सौर पाणपोई मोहर्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 188, आगरझरी कुटी कक्ष क्र. 169, फेटराबोडी कक्ष क्र. 167 चा तलाव, कालापाणी कक्ष क्र. 175 चा देवाडा तलाव 170, जुनोना कुटी कक्ष क्र. 154 अशा ठिकाणी लावण्यात आल्या आहेत.
या सर्व कामासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी राऊतकर, श्रीधर बालपाणे, संजय घोडवे, विठ्ठल लेडांगे, वन विभागाचे वनरक्षक हिंगणकर आदीचे मार्गदर्शन व मदत सतत लाभत असून वनरक्षक या सर्व उपक्रमांची देखरेख करीत आहेत. तलाव क्षेत्रात 100 फूट खोल कूपनलिका तयार करून अत्यंत कमी दरात म्हणजेच फक्त 40 हजार रूपयात ताजे, स्वच्छ पाणीपुरवठा करणारा पंप बसवून प्राण्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा उपक्रम जर संपूर्ण महाराष्ट्रात वनविभागात स्वीकृत करून राबवण्यात आला तर स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होऊन शासनाची कोट्यवधींची बचत होईल. कारण यासर्व उपक्रमाला जवळपास 4 लाख इतका खर्च येतो. मात्र येथे फक्त 40 हजार रूपयांच्या खर्चात हे काम असून याला मनुष्यबळाची गरज नाही. सोबतच या पाणपोईमुळे प्राण्यांची पिण्याची जागाही बदलणार नाही, असे मत धनंजय बापट यांनी व्यक्त केले. ही पाणपोई प्राण्यासांठी उन्हाळ्यात वरदान ठरली आहे असेच म्हणावे लागणार.
June 12, 2015
सशक्त राष्ट्र चांगल्या नागरिकांच्या मुळे बनते ....
चांगले नागरिक तेच होऊ शकतात ज्यांना सामाजिक प्रश्नांची जाण असते, राष्ट्रातील इतर नागरिकांच्या आणि नागरिकांच्या समूहाच्या भावना योग्य तर्हेने समजू शकतात ....
सामाजिक प्रश्नांची जाण शाळेत निर्माण करता येत नाही तर त्याचे माध्यम आहे वाङ्मय ....
वाङ्मय निर्मिती आणि वाचन हे राष्ट्र निर्मिती चे महत्वाचे साधन आहे .....
जे वाङ्मय वाचले जाते आणि त्याचा रसास्वाद केला जातो त्यानुसार व्यक्तीचे भावविश्व् निर्माण होते ....
कोणत्याही वाङ्मयात त्याच्या लेखकाच्या संस्कृतीचे आणि प्रदेशाचे भावविश्व् असते ....
एखाद्या राष्ट्रात चांगले नागरिक निर्माण करायचे असतील तर त्या प्रदेशात स्थानिक वाङ्मय निर्मिती आणि त्याचे वाचन होणे गरजेचे आहे ....
वाङ्मयाचे माध्यम आहे भाषा ...
तर मंडळी विचार करा ....
१. इंग्रजी मध्ये किंवा इतर कोणत्याही अस्थानिक भाषेमधील वाङ्मय वाचून चांगले नागरिक निर्माण होऊ शकतील का ??
२. अस्थानिक, पुराणकालीन भाषांमध्ये स्थानिक प्रश्नांचे, समस्यांचे, भावनांचे प्रतिबिंब योग्य तर्हेने दिसेल का ??
३. पुराणकालीन भाषा वापरून राष्ट्र निर्माण होऊ शकते का ??
४. चांगले राष्ट्र निर्मिती साठी स्थानिक भाषा माध्यम म्हणून अनिवार्य करायला नको का ??
५. अस्थानिक किंवा पुराणकालीन भाषेला प्राधान्य देणाऱ्यांना देशभक्त म्हणता येईल का ??
६. अस्थानिक लोक जे अस्थानिक भाषेचा आग्रह धरतात त्यांना स्थानिक प्रश्नांची जाण आहे असे म्हणता येईल का ??
७. Cosmopolitan संस्कृती चांगले नागरिक निर्माण करू शकेल का ??
८. कॉस्मोपॉलिटन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांना देशभक्त म्हणता येईल का ??
९. .........
मला उत्तरे नको आहेत ...... कारण ती स्पष्ट आहेत ......
मला थोडक्यात सांगायचे आहे ......
अनेक भाषिक समूह किंवा प्रदेश हा धर्म, संस्कृती किंवा राज्यघटनेने जोडला असला तरी त्याचे राष्ट्र होत नाही ....
असे प्रतिपादन करणारे जे कोणी आहेत त्यांचे डोके किंवा उद्देश तपासायलाच हवेत .....
भारतात आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती चूकीची तत्वे अंमलात आणल्याने आहे ......
This is by design ??? or By mistake ???? need to investigate ....
-- मिलिंद कोतवाल
ठाणे
November 3, 2016
ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत. ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे,त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते. मासिक पाळी,अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने,तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो.
August 26, 2017
काही वर्षांपूर्वी ज्या चंद्राकडे लहान मुले आपला मामा म्हणून पाहत होती , त्याच चंद्रावर नंतर मानवाची पावले उमटली . नंतरची पिढी चंद्रावर वसाहत तयार करण्याचा विचार करू लागली . चंद्रावर पाणी आणि अन्य जीवनोपयोगी गोष्टींचा शोध घेऊ लागली . आता नवी पिढी चंद्रावर चक्क शेती करू पाहत आहे . होय ! विश्वास बसणार नाही ; पण हे खरे आहे.
August 5, 2022
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग सहा
औषध न लगे मजला आणि औषध नल गे मजला या धर्तीवर आणखी एक श्लेष आजच एका गटात वाचायला मिळाला.
औषधे किती हवी जवळी ?
औषधे ? कि, "ती" हवी जवळी ?
औषधांमधे ताकद आहे कि "तिच्यामधे" जास्ती ताकद आहे.
जर "ती" जवळ असेल तर,
जर तिने जवळ घेतले असेल तर ,
जर तिला जवळ धरले असेल तर,
औषधे कशाला हवीत ?
असं या प्रश्नकर्त्याला विचारायचे आहे.
ती माझे सर्वस्व!
ती माझी प्रेरणा !
ती माझी धारणा !
ती माझी शक्ती !
तीच माझी भक्ती !
शक्तीचीही शक्ती तीच तूही !
सतत असतेस अंतरी
न दिसशी दुसऱ्यास जरी
माझी कर्ती करविती
बोलवती धनी तीच तूही !
केवळ बाजूला बसूनी
सतत सूचना करूनी
घेते गाडी चालवूनी
दुसऱ्या करवी
कधी कोपशी
कधी उर्वशी
कधी फटकारीशी
कशी कवटाळीसी
अशी कशी तू ललना
सांभाळीशी माझ्या जीवना
माझा प्राण तू
माझा श्वास तू
माझा भास तू
अंतरीची आस तू
तू माझे जीवन
जीवन झाले पावन
पावन होण्या कारण
कारण माझे मन !
मनासी देसी कामना
आत्म्यासी चेतना
शरीरासी वासना
तूची देसी
जन्मलो तुझ्यासाठी
जगेन तुझ्यासाठी
सोडलीस जर साथ तू
मृत्युही उभा दारी
सोडू नको साथ अशी
दुधावरची साय जशी
मुलाला माय तशी
रहा जवळी माझेपाशी
खरंय हे ?
एवढी ताकद आहे "तिच्यामधे" ?
का शंका का यावी मनामधे ?
एवढी जपावी ह्रदयामधे ?
अशी कोण लागोन गेली ?
"ती" म्हणजे कोण हे ज्याच्या त्याच्या विचार करण्यावर अवलंबून आहे.
मला "ती" म्हणजे "प्रतिकारशक्ती" वाटली.
आणि आपल्याला. ?
वाचा पुनः
- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
24.04.2017
आजची आरोग्यटीप
April 25, 2017
काल पु.ल. वाचत बसलो होतो. ते एके ठिकाणी म्हणतात “तुम्हाला ‘मुंबईकर’ व्हायचं असेल तर तुम्हाला मुंबईत जन्माला येणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या रहाण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यानीच सोडवायला हवा.” मी हे वाक्य वाचता वाचता विचारात पडलो… ‘अरे, हे तर अगदी माझ्या मनातले शब्द पुलं नी लिहिलेत’. कारण माझा ही जन्म मुबंईचाच की.
November 17, 2023

केळ्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न बराच पूर्वीपासून सुरू आहे. लागवड केली जाणारी आजची केळी ही केळ्यांच्याच विविध जाती-उपजातींत झालेल्या संकरातून निर्माण झाली आहेत. आजच्या मुसा अॅक्युमिनाटापासून निर्माण झालेल्या केळ्यांत, या जातीच्या जनुकांबरोबरच इतर काही जंगली केळ्यांतील जनुकही अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे.
December 6, 2022
३ मे १९१३ रोजी गिरगावातील 'कॉरोनेशन सिनेमा' च्या परिसरात जमलेल्या गर्दीनं एक अद्भुत क्षण अनुभवला. दादासाहेब फाळके निर्मित "राजा हरिश्चंद्र" हा भारतीय चित्रपट जगतातील पहिला चित्रपट या दिवशी दाखवण्यात आला आणि ह्या मूकपटाच्या प्रदर्शनानं भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा श्रीगणेशा झाला. दादासाहेब फाळके यांनी "राजा हरिश्चंद्र‘ या चित्रपटाद्वारे प्रथमच "हलत्या चित्रां‘चे दर्शन घडवीत भारतीयांच्या "चित्रपट वेडाची‘ मुहूर्तमेढ रोवली. गेल्या शंभर वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीने मोठी भरारी घेतली असतानाच मराठी, तमीळ व बंगालीसारख्या प्रादेशिक भाषांतील चित्रपटांनीही आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. "हलत्या चित्रांचा विजय असो,‘ म्हणत फाळक्यांनी लावलेल्या वृक्षाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. परदेशामध्ये फिल्मच्या मदतीने पडद्यावर हलते चित्रपट दाखविण्याचा प्रयोग होऊ लागला व हे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी दादासाहेब फाळके या अवलियानं कंबर कसली व "राजा हरिश्चंद्र" च्या रूपानं भारतात मोठ्या पडद्यावर हलती चित्रे दिसली. "भस्मासुर मोहिनी‘ फाळकेंच्या दुसऱ्या चित्रपटात अभिनेत्रीचा प्रवेश झाला आणखी एक इतिहास घडला. फाळकेंकडून प्रेरणा घेऊन अनेक निर्माते व दिग्दर्शक चित्रपट निर्मितीकडे वळले.
१९१८ मध्ये इंडियन सिनेमॅटोग्राफ कायदा पास झाला व मुंबई, कलकत्ता, मद्रास व लाहोर बोर्ड १९२० मध्ये सुरू झाले. कलकत्त्यामध्ये धीरेन गांगुली व मुंबईमध्ये चंदुलाल शहा यांनी ब्रिटिश आणि जर्मनांची मदत घेत चित्रपट आधुनिक करण्यास सुरवात केली. हिमांशू रॉय यांनी "द लाइट ऑफ एशिया‘ची निर्मिती करीत भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. १९२९ मध्ये प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. याच दरम्यान इम्पिरिअल फिल्म कंपनीने १४ मार्च १९३१ ला "आलम आरा‘ या भारतातील पहिल्या बोलपटाची निर्मिती केली. या चित्रपटात प्रथम गाण्यांचा समावेश केला गेला व चित्रपटाच्या यशामुळे भारतीयांच्या गाणी व संवादांच्या आवडीचं बीज रोवलं गेलं! चलचित्रांबरोबरच आवाजही आल्यानं "टॉकीज‘चा जन्म झाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 4, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti