वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या बाहेर एक भाजी विक्रेता फुटपाथवर जवळपास पंचवीस प्रकारच्या भाज्या विकायला बसतो. भाजी घेणाऱ्यांची तोबा गर्दी असते, साधारण वाडीकडे जाणारे सर्व लोक यांच्याकडूनच भाजी घेतात, याचे प्रमुख कारण भाजी बाजारभावापेक्षा स्वस्त असते. सर्व दुचाकी व तुरळक चारचाकी पण इथे थांबून भाजी घेऊन पुढे जातात, हा विक्रेता भाजी घेणाऱ्या प्रत्येकाला एका भाजीला एक प्लास्टिक पिशवी देतो, साधारण एक व्यक्ती तीन ते सहा प्लास्टिक पिशव्या घेऊनच इथून निघतो, हि सर्व मंडळी स्वतःला शिक्षित समजतात, हा एक मोठा गैरसमज आहे हे याना समजत नाही.
ऑफिस मधून घरी जाताना आज भाजी संपली आहे असा साक्षात्कार नक्कीच होत नसणार. सकाळी घरून निघताना भाजीसाठी दोनतीन कापडी पिशव्या घेऊन निघावे, इतके न समाजण्याइतके हे लोक निर्बुद्ध आहेत का? असा प्रश्न यांच्याकडे पाहिल्यावर मला नेहेमी पडतो. हा भाजीवाला दररोज अंदाजे 800 ते 1000 प्लास्टिक पिशव्या लोकांना देतो, यात चूक त्याची का घेणाऱ्यांची.
हे सर्व शिक्षित लोक आहेत यात शंका नाही, सुशिक्षित मात्र नक्की नाहीत. एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, याच पिशव्यांचा सर्वात मोठा कचरा आज होत आहे, हे सर्व या मध्यमवर्गीय लोकांना माहित असून देखील, असे का वागतात याची चीड व किव येते. हे चित्र फक्त नागपूर शहराचे नाही, तर पूर्ण देशाचे आहे, असे म्हणू शकतो कि ल्युटिन पासून लालभाई च्या घरापर्यंत समान चित्र आहे. देशात या पिशव्यांचा दररोज सहा हजार टनापेक्षा जास्त कचरा होत आहे, जो नष्ट करण्यासाठी किव्वा शहराबाहेर फेकण्यासाठी स्थानिक नगरपालिकेच्या सरकारला त्या पासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या कैकपट जास्त खर्च करावा लागतो.
सरकार या पिशव्या बाजारात येतात हे माहित असून देखील काहीही उपाययोजना का करत नाही? याचा अर्थ बड्या अधिकाऱ्यांना, तसेच निवडून आलेल्या नेत्यांना हप्ते जातात, हे न समजायला आम्ही आंधळे नाही. कदाचित याच राजकारण्यांचे अश्या पिशव्या बनवायचे कारखाने असू शकतात. यातून हे हि लक्षात घ्यावे लागेल कि केंद्र सरकार, राज्य सरकार, नगरपालिका प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा अश्या अर्थाच्या जाहिराती कर देणाऱ्या लोकांचे करोडो रुपये खर्च करून रेडिओ, टीव्ही, पेपर मधून देतात, हि आमच्या डोळ्यात धूळफेक आहे, हे आता समजू लागले आहे. अश्या जाहिरातीवर खर्च करून स्वतःच्याच तुमड्या भरणे सुरु आहे, हे हि आता जगजाहीर होत आहे.
मोदी सरकारचा आता तीन वर्षाचा कार्यकाळ संपत आला आहे, स्वच्छ भारत अभियानावर अमाप पैसा खर्च झाला, मोदीजींनी ठरवले तर एकदिवसात प्लास्टिक पिशव्या बनवणारे कारखाने बंद पडू शकतात, मग ते का करत नाहीत? मी म्हणत नाही कि त्यांचे हात हि बरबटलेले असतील, पण मग त्यांना कठोर निर्णय घेण्यापासून कोणते कारण थांबवत आहे? का सत्ता कोणाचीही असो, सूत्रधार अंबानीच असणार, असे तर चित्र नाही ना?
हा लेख समाज धुरिणींच्या माध्यमातून सरकार दरबारी पोहोचावा अशी आशा करतो. इंग्रजीमध्ये म्हण आहे, More the things change more they remain the same.
असेच काहीसे अनुभव आजकाल येऊ लागले आहेत, याची डोळस नेत्यांनी नोंद घ्यावी हि विनंती.
-- विजय लिमये
March 17, 2017
बिती ना बिताई या गाण्याचं नि माझं नातं
March 7, 2018
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगदभक्षकः ।
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला विद्युच्चलं जीवितं
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ॥१५॥
या नश्वर जगातून वाचवण्यासाठी ईश्वर असणाऱ्या भगवंताला आचार्य श्री प्रार्थना करीत आहेत. ते सांगतात,
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं - पहा! हे आयुष्य रोज कमी कमी होत चालले आहे. वास्तविक आयुष्यातील एक दिवस कमी होणे म्हणजे ईश्वरी सेवेची एक संधी नष्ट होणे आहे. वाढत्या वयासोबत ही जाणीव वाढली नाही, तर वाढ नेमकी कशाची?
याति क्षयं यौवनं- तारुण्य लयाला जात आहे. पर्यायाने क्षमता नष्ट होत आहेत.
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः - एकदा गेलेला दिवस कधीही परत येत नाही. शेवटी पश्चातापच करावा लागेल.
कालो जगदभक्षकः - काळ हा संपूर्ण विश्वाचे भक्षण करणारा आहे. त्याच्या तावडीतून आजपर्यंत कोणी सुटला नाही. आपणही सुटण्याची शक्यता नाही.
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला - ज्या पैशाच्या आधारावर आपण स्वतःला सुरक्षित समजतो तो पैसा पाण्यावरच्या तरंगा प्रमाणे चंचल आहे. कधी, कुठून आणि कसा निघून जाईल सांगता येत नाही. या जगातील मोठमोठी साम्राज्ये, राजसत्ता नष्ट झाल्या मग माझ्या पैशाचा पाड तो किती?
विद्युच्चलं जीवितं - विजे प्रमाणे जीवन चपल आहे. विजे प्रमाणेच त्याला धरून ठेवता येत नाही. अनेकदा ते धक्केच देते.
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना - त्यामुळे शरण आलेल्या माझे, हे शरण देणाऱ्या भगवंता आता आपणच रक्षण करा.
या जगात आपल्या शिवाय सर्व नश्वर आहे. त्यामुळे मी आपल्याला शरण आलो आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
August 3, 2020
प्रकाशन दिनांक :- 14/03/2004
फार जुनी गोष्ट आहे. याच भरतभूमीत एक महान ऋषी होऊन गेले. त्यांचे विचार आणि आचारधर्माच्या शिकवणीचा मोठा प्रभाव त्याकाळी जनमानसावर पडला होता.
March 14, 2004
१९६८ मध्ये परत तो अँशेस साठी परत सिलेक्ट झाला तो इंग्लंडच्या संघाविरुद्ध त्यावेळी ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या टूरवर गेली होते तेथे त्याने ३४.६६ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या. १९६९-७०मध्ये त्याच्या हाताची किंमत इतकी वाढली की त्याचा हाताचा १०, ००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा विमा काढण्यात आला.
September 12, 2021
१८९५ : भारताच्या पहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म. कर्नल कोट्टरी कंकरिया नायडू ड्राईव्ह करण्यात अतिशय पटाईत फलंदाज आणि उपयुक्त मंदगती गोलंदाज होते.
१९८७ : विश्वचषक स्पर्धेतील पहिला त्रिक्रम. आपल्या सहाव्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर केन रुदरफोर्ड, इअन स्मिथ आणि इवेन चॅटफिल्डला बाद करीत भारताच्या चेतन शर्माने त्रिक्रम साधला.
October 29, 2010
नॉटिंगहॅम ट्रेन्ट विद्यापीठ व तामिळनाडूची त्यागराजर स्कूल मॅनेजमेंट या संस्थांनी २०१४ मध्ये सेल्फिटिसची चर्चा सुरू झाल्यानंतर याबाबत संशोधन सुरू केले. सेल्फिटिस हा मानसिक रोग असल्याचे वर्गीकरण पहिल्यांदा अमेरिकन सायकिॲकट्रिक असोसिएशनने केले होते. आता सेल्फिटिस वर्तन हा रोग असल्याचे ठोसपणे सांगण्यात आले आहे.
March 16, 2022
खते, बियाणे, मजूर अशा प्रत्येक बाबतीत शेतकऱ्याला अपंग करणाऱ्या सरकारनेच आता शेतकऱ्यांना आधार देऊन उभे केले पाहिजे, ही सरकारचीच जबाबदारी आहे. ‘मामा’ला पुढे करून सरकार आपल्या जबाबदारीतून पळ काढू शकत नाही. ‘मामा’ पूर्वीही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे; त्याने कधी शेतकऱ्यांचा जीव घेतला नाही.
June 7, 2009
गणेशचतुर्थीला आजही घराघरातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती, अभिषेक, अथर्वशीर्ष पठण, नैवेद्य अशा गोष्टी अतिशय श्रद्धापूर्वक आणि धर्मिकपणे केल्या जातात.
पण काही घरगुती गणेशोत्सवामध्ये आणि अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आता खूप बदल होताना दिसतात. उत्सवी मांडवांमध्ये कोंबडी, पोपट, मैना, म्हावरा, चिमणी, लुंगी, दांडा, रिक्षा, झिंगाट अशा अनेक वैविध्यपूर्ण शब्दांवरील गाणी आपल्या कानांच्या, भक्तीच्या आणि मराठी संस्कृतीच्या चिंधड्या उडवत असतातच ! पण आपल्या गणपतीच्या आरत्या हा सुद्धा आता धार्मिक कार्यक्रम राहिलेला नसून तो आता एक Reality show किंवा Performing show होत चालला आहे.आपण कुठल्या आरत्या म्हणतोय, काय शब्द म्हणतोय, चाल कुठली लावली आहे अशा गोष्टींकडे लक्ष न देता केवळ एक उपचार म्हणून तो दणक्यात पाळला जातो.
आपल्या विविध संतांनी रचलेल्या, शेकडो वर्षे जुन्या आरत्यांना ( मग त्यात "शेंदूरलाल चढायो अच्छा गजमुखको " ही हिंदी आरतीही आली) त्या संतांच्या अपार भक्तीची पार्श्वभूमी लाभली आहे. काही मराठी आरत्या आणि गणपती पूजेनंतर "गणपती बाप्पा मोरया " हा मराठीतला जयजयकार तर अगदी अमेरिकन, ब्रिटीश, जपानी, कोरियन मंडळीही ( तेथे स्थाईक मराठी किंवा भारतीय मंडळी नव्हेत ) मराठीतूनच करताना ( युट्युबवर) पाहायला मिळतात .
पण आपल्याला मात्र त्या आरत्या आता जुन्या, कालबाह्य , out of fashion वाटायला लागल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांना संत कवींच्या या आरत्यांऐवजी ... देवा हो देवा गणपती देवा, जय गणेश, जय गणेश, जय गणेशदेवा, देवा श्रीगणेशा देवा श्रीगणेशा ,ओम जय जगदीश हरे .... अशी व्यावसायिक गीतकारांनी रचलेली सिनेमातील गाणी ह्याच आरत्या वाटायला लागल्या आहेत.
येई गे विठ्ठले माझे माउली ये आणि आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रम्ह या आरत्या तर खूप ओरडूनच म्हटल्या पाहिजेत अशी आपली पारंपारिक समजूत आहे. सर्वात विडंबन म्हणजे आरतीनंतर म्हटले जाणारे "देवे " म्हणजेच मंत्रपुष्पांजली ! हे खरेतर एक आद्य राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. अतिशय सुंदर रचना आणि मंत्रमुग्ध करणारे हे मंत्र , अनेक ठिकाणी मात्र सामूहिकपणे देवावर खेकसत , --देवाच्या अंगावर धावून जात, त्याला खडसावून काही विचारतोय अशा तऱ्हेने म्हटले जातात. दोन शब्दांमधले अवग्रह ( म्हणजे SSS चिन्हांकीत लांब आकार ) कितीही वेळ ताणून धरून एकमेकांकडे पाहत जुगलबंदीचा आनंद घेतला जातो.
भरकटत चाललेली ही मराठी सांस्कृतिक चाल आपणच सावरायला हवी. अधिकाधिक मंडळींनी , गणपतीची पूजा - आरती ही जास्तीतजास्त योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायला हवा. बाकीचा उत्सव हा मनोरंजनासाठी असतोच ना ?
-- मकरंद करंदीकर
अंधेरी ( पूर्व ), मुंबई ४०००६९
August 27, 2017
धुकं पांघरून निश्चिन्त झोपलेल्या गंगामाईचा हेवा करीत आज सकाळी मी आशिया खंडातील सर्वात मोठ्या (वाहनचालकाने पुरविलेली माहिती) आणि नुकत्याच बांधलेल्या “गांधी सेतू ” या पुलावरून (चालकाच्या मते तो नऊ किलोमीटर लांबीचा आहे – मला ते पटले नाही, पण मोजण्याचे साधन पटकन हाती नसल्याने मी ते मान्य केले) प्रवास केला.
January 29, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti