वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हॉस्पिटलमधुन थेट मैदानावर जाऊन फलन्दाजी कर्णारा इंग्लन्डचा एडी पेन्टर
February 13, 2011
आपला भारत देश श्रेष्ठ संस्कृतीचा धनी आहे. तसेच भारत देशाला ‘माता ‘ ह्या नावाने संबोधले जाते. ज्या मातेने अनेक जाती, धर्म, पंथ ह्यांना सामावून घेतले आहे. तसेच ‘वसुवैध कुटुम्बकम’ ची भावना जागृत राहावी, सर्वांनी एकत्र येऊन आनंदोस्तव साजरा करावा ह्या उद्देशाने अनेक सण , उत्सव ह्याची निर्मिती केली गेली. प्रत्येक सणां पाठीमागे काही आध्यात्मिक रहस्य दडली आहेत. अनेक सणापैकी एक सण आहे ‘नवरात्री उत्सव’. जो संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा केला जातो.
October 7, 2021
भारताची वाढती लोकसंख्या शाप आहे की वरदान हा वादाचा विषय होऊ शकतो. सध्या प्रचलित असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त मतप्रवाहानुसार वाढती लोकसंख्या शाप ठरत असली तरी थोड्या वेगळ्या अंगाने विचार केल्यास ही वाढती लोकसंख्या भारतासाठी वरदान ठरू शकते. लोकसंख्या वाढत आहे म्हणजे खाणारी तोंडे वाढत आहेत, असाच विचार केला जातो; परंतु त्याचवेळी काम करणारे दोन हातदेखील वाढत आहेत, याकडे दुर्लक्ष केले जाते.
July 23, 2006
आपल्या सगळ्यांच्याच धकाधकीच्या जीवनशैलीचा मोठा परिणाम होत आहे तो आपल्या हृदयावर. म्हणूनच आपल्या हृदयासाठी आपण एकदा थांबून शांतपणे विचार करायला हवा, तोही हृदयापासून..
हृदयविकाराचे प्रमाण भारतात झपाटय़ाने वाढत आहे. जर हे प्रमाण असेच वाढत राहिले तर २०२० मध्ये भारतात सर्वात अधिक हृदयविकाराचे रुग्ण असतील. भारतात कारोनरी आर्टरी या आजाराचे प्रमाण पूर्वी १९६० साली ४ टक्के होते आणि आता ते ११ टक्के इतके वाढले आहे. पूर्वी हा आजार वयस्कर व्यक्तीमध्येच आढळत होता. त्याचे प्रमाण ३० ते ४० वर्षे वयाच्या तरुणांमध्ये आता झपाटय़ाने वाढत आहे. उच्च रक्तदाबाचे प्रमाण १९५० साली जवळपास १ ते ३ टक्के होते, पण तेच आता १० ते ३१ टक्के इतके वाढलेले आहे. भारतात दरवर्षी लाखो हृदयविकारच्या आजाराने बळी पडतात. हे सर्व टाळण्यासाठी हा आजार का होतो, त्याची उपचारपद्धती काय आणि ते टाळण्याचे उपाय काय हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
हृदयविकार
हृदय हे स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. ते सतत आकुंचन-प्रसरण पावत असते. या स्नायूंना ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात, त्या रक्तवाहिन्यांना ‘कोरोनरी’ धमनी म्हणतात आणि जर या कोरोनरी धमन्यामध्ये अवरोध निर्माण झाला तर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो, त्यावेळी रुग्णाला ‘हृदयविकार’ आहे असेही म्हणतात. हृदयात रुग्णाला थोडे काम केल्यावर छातीच्या मध्यभागी दुखणे, छाती भरून येणे, डाव्या हातामध्ये दुखणे, दम लागणे, छातीमध्ये धडधड होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. या छातीतील दुखण्याला ‘अंजायना’ (हृदयशूळ) म्हणतात.
मधुमेह असलेल्या रुग्णाला कदाचित छातीत वेदना होणार नाहीत, अशा रुग्णाला दम लागणे, थोडेच काम केल्यावर थकवा येणे, कमजोरी वाटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जेव्हा कोरोनरी धमनीतील अवरोध हा शंभर टक्के होतो. (१०० टक्के BLOCK) तेव्हा रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो. त्यावेळी छातीत तीव्र वेदना होणे. दरदरून घाम येणे.. भोवळ येणे.. दम लागणे.. असा त्रास होतो. कधी कधी हृदयविकारच्या तीव्र झटक्यामुळे ताबडतोब मृत्यूसुद्धा होऊ शकतो. या सर्व आजारांना हृदयविकार असे म्हणतात. हृदयविकार टाळण्यासाठी खालील बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
* हृदयविकाराचे निदान करणे.
* धोक्याची घटके ओळखणे.
*धोक्याची घटके टाळण्याचा प्रयत्न करणे.
* औषधोपचार करणे.
* नवीन तंत्राचा उपयोग करून हृदयविकाराचा उपचार करणे.
* अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करणे.
हृदयविकाराचे निदान : हे सर्व टाळण्यासाठी या आजाराचे लवकर व योग्य निदान होणे आवश्यक आहे. हृदयरोगतज्ज्ञ (काíडओलॉजिस्ट) रुग्णांची संपूर्ण तपासणी केल्यानंतर हृदयाच्या काही विशिष्ट टेस्ट करायला सांगतील. त्यात ई.सी.जी, हृदयाची सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट किंवा थॅलियम यांचा समावेश होतो. या सर्व नॉन इन्वेसिव्ह टेस्ट असून यात हृदयविकाराचे निदान होण्याची शक्यता ८० ते ९० टक्के आहे, पण सर्वात महत्त्वाची व शंभर टक्के निदान करणारी गोल्ड स्टॅण्डर्ड टेस्ट आहे. ‘कोरोनरी अॅन्जिओग्राफी.’ हृदयरोगाचे निदान करण्याचे, त्याची तीव्रता, प्रमाण, विस्तार बघण्याची एकमेव तपासणी म्हणजे ‘कोरोनरी अॅन्जिओग्राफी. अत्यंत सुरक्षित, सोपी व १०० टक्के निदान देणारी तपासणी.!
तज्ज्ञ हृदयविशारदाकडून ही तपासणी १० ते १५ मिनिटांत होते. रुग्णाच्या मांडीच्या आर्टरीमधून एक छोटीशी पोकळ नळी १.५ मि. मी. व्यासाची, हृदयाच्या कोरोनरी धमनीपर्यंत नेण्यात येते. मॉनिटरवर याचे एक्स-रे स्कॅनिंगद्वारे चित्रण चालू असते. आणि दुसऱ्या मॉनिटरवर रुग्णाचे रक्तदाब, हार्ट रेट (स्पंदन), ई. सी. जी, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे सर्व काही दिसत असते. तीन तासांच्या विश्रांतीनंतर रुग्णाला सुट्टी करण्यात येऊ शकते. ही प्रक्रिया एकंदरीत अत्यंत सुरक्षित असून शंभर टक्के निदान करणारी आहे.
धोक्याचे घटक
हृदयविकाराचे निदान झाल्यानंतर त्याचे धोक्याचे घटक ओळखणे जरुरी आहे.
वय : वाढत्या वयानुसार हृदयविकाराचे प्रमाणसुद्धा वाढते. वयाच्या ५५ ते ६० वर्षांनंतर हे प्रमाण अधिक असते. पण आता मध्यम वयामध्येसुद्धा हे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार रक्त वाहिन्यांमध्ये कठिणीकरणाची प्रक्रिया होत असते, म्हणून हे प्रमाण वाढत्या वयानुसार वाढते.
लिंगभेद : पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे प्रमाण कमी असते. स्त्रियांमधील ईस्ट्रोजन नावाचा आंतरिक स्राव हा हृदयविकार टाळण्यास मदत करतो. पण जेव्हा स्त्रीची मासिक पाळी थांबते, तेव्हा या स्रावाचे प्रमाण कमी होते आणि अशा स्त्रियांत हृदयविकाराचे प्रमाण पुरुषांप्रमाणेच असू शकते.
आनुवंशिकता : हृदयविकाराचा आजार बऱ्याच प्रमाणात आनुवंशिक आहे. आईवडिलांना हा आजार असेल तर मुलांना तो होण्याची शक्यता दाट असते.
धूम्रपान : हा सर्वात मोठा धोक्याचा घटक आहे. तंबाखूमध्ये चार हजार धनरूप किंवा वायूरूपात असणारी रसायने असतात. कार्बन, कार्बन मोनॉक्साईड आणि निकोटीन हे पदार्थ हृदयाला हानीकारक असतात. त्यांनी रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या कठीण होण्यास सुरुवात होते आणि रक्तवाहिन्यांतील अवरोध वाढू लागतो. हृदयाची ऑक्सिजनची आवश्यकता वाढते. निकोटीनमुळे रक्तवाहिन्यांच्या अवरोधामध्ये तडे जाऊन तेथे रक्ताच्या गुठळ्या जमा होण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट अॅटॅक येऊ शकतो. धूम्रपानामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे दम लागतो. जगात जवळपास १० लाख लोक धूम्रपानामुळे दरवर्षी मरतात.
मद्यपान : मद्यपानामुळे स्नायूंचे आजार होतात. हृदयाच्या पेशींच्या सेल्युलर पातळीवर दुष्परिणाम होऊन हृदयपेशींची कार्यक्षमता कमी होते. मद्यामुळे हृदयाची लय आणि गती बिघडू शकते.
हृदयविकार टाळण्यासाठी
* आहारात योग्य तो बदल करणे.
* व्यायाम करणे.
* योगा- मेडिटेशन करणे.
* औषधोपचार करणे.
*अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करणे.
आहार
संपूर्ण शाकाहार हा आरोग्यदायी आहे.
रोजच्या आहारातून मिळणाऱ्या उष्मांकांपैकी १० टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी उष्मांक स्निग्ध पदार्थामधून आलेले असावेत. कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वज्र्य करावेत. अगदी स्निग्धांशविरहित मध्ये थोडंसं कोलेस्टेरॉल असतं. संपृक्त स्निग्धांश जवळजवळ वज्र्य करावेत. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असलेले कांदा, लसूण, गाजर, वांगी, सोयाबिन, स्किम्ड मिल्क, दुधाचं दही, सफरचंद इतर नेहमी आहारात ठेवावे.
कच्चे पदार्थ शक्यतो जास्त खावे. कोबी, फ्लॉवर, गाजर, मुळा, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, कोवळी भेंडी, पालक, मेथी, लेटय़ूस अशा भाज्या, मोडाची कडधान्ये, भिजवलेल्या डाळी, वेगवेगळी फळे भरपूर खावीत.
चहा, कॉफीचा अतिरेक टाळावा.
मांसाहार टाळावा. मटन-चिकन टाळावे, अंडय़ातील पिवळा भाग टाळावा. दुधाचे पदार्थ : मलई, तूप, लोणी, चीज, पनीर, मिठाई शक्यतो टाळावे. मिताहारी असावे.
चायनीज पदार्थ, तळलेले पदार्थ, पिझ्झासारखे पदार्थ, मैद्याचा अतिरेक टाळावा.
आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण पुष्कळ असावे.
मीठ आणि साखर आहारात कमी प्रमाणात वापरणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते.
खाल्ल्यानंतर ताबडतोब झोपू नये. थोडी शतपावली घ्यावी.
उपवास टाळावे. सकाळी व्यवस्थित न्याहारी करावी, पण दुपारचे आणि रात्रीचे जेवण मात्र हलकेच घ्यावे. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये योग्य अंतर ठेवावे. त्या वेळा नियमितपणे पाळणे.
व्यायाम
भरपूर व्यायाम करावा. भराभरा चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवावी यासारखा व्यायाम जितक्या वेळा सहन होईल तोपर्यंत करावा. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी व्यायामाचा वेळ आणि प्रकार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावा. शरीरांतर्गत ऊर्जा दीर्घकाळासाठी, पण प्रमाणशीरपणे आणि योग्य गतीने वापरली जाते त्याला एरोबिक व्यायाम असे म्हणतात. असे व्यायाम हृदयविकार टाळण्यास मदत करतात. योगासने करावीत.
योगा-मेडिटेशन
मानसिक आणि शारीरिक आरोग्य मिळवून देणारा उत्तम मार्ग म्हणजे योगा-मेडिटेशन. यात प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी (मेडिटेशन) आणि यम, नियम, योगासने, प्राणायाम यांचा समावेश होतो. अशांत मन शांत करण्याचा हा योग्य मार्ग आहे. या सर्व गोष्टींमुळे जीवनात उत्साह वाढू लागतो. जीवनातील नकारात्मक दृष्टिकोन बदलतो. ही भावना फार महत्त्वाची असते. यामुळे जीवनातील ताणतणाव, स्ट्रेस कमी होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
कोरोनरी अॅन्जिओप्लास्टी
कोरोनरी अॅन्जिओग्राफी या तपासणीमध्ये जर कोरोनरी आर्टरीला अवरोध असल्याचे निदर्शनास आले, या अवरोधाची ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येक वेळी बायपास सर्जरीच करावी लागते, असे नाही. गेल्या १५ वर्षांपासून कमी त्रासदायक, कमी विच्छेदन लागणारी औषधोपचार पद्धती विकसित झाली असून तिचे नाव ‘कोरोनरी अॅन्जिओप्लास्टी’. अवरोध हा मुख्यत: चरबीनी बनलेला असल्यामुळे ह्य बलूनद्वारे दाबला जातो व आर्टरी पूर्ववत होऊ शकते. ज्या ठिकाणी आर्टरीमध्ये अवरोध आहे त्या ठिकाणी आधी बलून अॅन्जिओप्लास्टी केली जाते; त्यानंतर अवरोधाच्या आकारमानाप्रमाणे आणि रक्तवाहिनीच्या आकाराप्रमाणे स्टेंट निवडला जातो आणि बलून अॅन्जिओप्लास्टीप्रमाणेच त्या ठिकाणी स्टेंट बसवण्यात येतो. ह्य प्रक्रियेला अॅन्जिओप्लास्टी विथ स्टेंट असे म्हणतात.
अॅन्जिओप्लास्टीचे फायदे
अॅन्जिओप्लास्टी ही औषधोपचार पद्धती अत्यंत सुरक्षित व कमी वेळात होणारी आहे. (अर्धा तास) ह्यत कुठेही चिरफाड करण्याची आवश्यकता नसते, ना भूल देण्याची आवश्यकता असते. रुग्ण हा पूर्ण वेळ शुद्धीवर असतो, त्यामुळे जनरल अॅनेस्थेशिया देण्याचे जे धोके असतात, ते टाळता येतात. मुख्यत: वयस्कर लोकांमध्ये ही फारच उपयोगाची गोष्ट आहे. ज्यांना हृदयविकारावर सोबत बाकी आजारसुद्धा आहेत, उदा. दम्याचे विकार, किडनीचे आजार, हाडांचे आजार किंवा फार वयस्कर अशा लोकांना बायपास सर्जरीचा किंवा ४-६ तास अॅनेस्थेशियाचा त्रास होऊ शकतो अशा रुग्णांना अॅन्जिओप्लास्टी वरदान ठरू शकते. बायपास सर्जरीमध्ये लावण्यात आलेल्या ग्राफ्टमध्ये जर अवरोध निर्माण झाला तरी त्याचीसुद्धा अॅन्जिओप्लास्टी करता येते. त्याला ‘ग्राफ्ट अॅन्जिओप्लास्टी’ असे म्हणतात.
रुग्ण फारच सिरिअस असेल, शॉकमध्ये असेल किंवा हार्ट अटॅकमुळे त्याचा रक्तदाब कमी झाला असेल अशा वेळी ज्या आर्टरीमुळे हार्ट अटॅक आला आहे, त्या आर्टरीची अॅन्जिओप्लस्टी केल्यास रुग्ण वाचू शकतो किंवा त्याचा रक्तदाब स्थिर होऊ शकतो. ज्यांना एक किंवा दोनच आर्टरीमध्ये मर्यादित अवरोध आहे त्याना अॅन्जिओप्लास्टी फार उपयोगी असते. तरुण रुग्णांवर सहसा अॅन्जिओप्लास्टी करण्यात येते. बायपास सर्जरी टाळता येत असल्यास टाळावी किंवा लांबवावी.
बायपास सर्जरी
जर कोरोनरी आर्टरीमध्ये अवरोधाचे प्रमाण जस्त असल्यास किंवा मुख्य कोरोनरी आर्टरीला जर अवरोध असल्यास किंवा विभाजन होणाऱ्या दोन आर्टरीच्या उगमावर जर अवरोध असल्यास बायपास सर्जरी करणे योग्य आहे.
हृदयरोग टाळण्यासाठी
दररोज सकाळी योग्य असा व्यायाम करावा. ह्य व्यायामाचे स्वरूप हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून आखून घ्यावे. डॉक्टर रुग्णाच्या वयाप्रमाणे, वजनाप्रमाणे आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवरून त्याच्या व्यायामाचे स्वरूप ठरवतात. सकाळी उठून वेगाने चालण्याचा व्यायाम हा सर्व वयाच्या लोकांसाठी चांगला आहे.
आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा. वजन आणि कमरेचा घेर कमी करावा. ह्यासाठी आहारात योग्य तो बदल करावा. आनंदी राहा. मानसिक शांतता व स्थैर्य याचा हृदयरोग्यांना उत्तम फायदा होतो. त्यासाठी ध्यान- धारणा, योगा ह्य गोष्टीचा उपयोग करावा. योग्य वेळी आणि शांत झोप शरीराला आवश्यक असते म्हणून रात्री ७ ते ८ तास छान झोप घ्यावी. धूम्रपान टाळा, तंबाखूचे सेवन बंद करा. मद्यपान टाळा. जेवणात मिठाचे आणि मसाल्यांच्या पदार्थाचा वापर कमी करावा. संताप, चिडचिड, वैताग, मत्सर, द्वेष, निराशा यांना सोबत वागवू नका. सामाजिक असहिष्णुता व एकाकी राहणे टाळा. आपला रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवणे, नेमाने वैद्यकीय तपासणी करा अणि डॉक्टरचा सल्ला घ्या.. तो पाळा. आहार, विहार, आचार, विचारात योग्य तो बदल करून आपलं आरोग्य आणि शरीर निरोगी ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. लोकसत्ता / डॉ. गजानन रत्नपारखी
February 2, 2017
अतिविषा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी हिमालयात आढळते आणि तिचे उपयोग अनेक आहेत. ती प्रामुख्याने लहान मुलांच्या आजारांवर वापरली जाते, पण सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या अनेक समस्यांवरही गुणकारी आहे.
December 13, 2025
आयुर्विम्याचा उद्देश हा घरातील कर्ता माणूस गेल्यावर त्याच्या कुटुंबाला साधारणपणे तीच जीवनशैली जगता यावी यासाठी तरतूद करणे हा आहे असे ढोबळमानाने म्हणता येईल. थोडक्यात विम्याची आलेली रक्कम गुंतवून त्याच्या उत्पन्नातून त्या कुटुंबाला जगता आले पाहिजे असा यामागचा विचार आहे. पण हळूहळू विमा कंपन्यांनी विविध प्रकारच्या योजना काढून या विचाराची व्याप्ती वाढवली. विम्याला करसवलत लागू केल्याने याकडे एक गुंतवणुकीचे साधन म्हणूनही पाहण्यास सुरुवात झाली. आपण या लेखात ढोबळमानाने या योजनांचा विचार करणार आहोत.
April 28, 2010
मुख्य बाजारात जाण्याआधी डावीकडे जाणाऱ्या एका रस्त्याने थोडं पुढे आलं की तिथे तीन रस्ते एका ठिकाणी मिळतात . अगदी सकाळी साडेआठ नऊ पासून या जागी त्यांची डेरेदाखल व्हायला सूरवात होते. प्रत्येकीचं अढळपद ठरलेलं असतं. ट्रेनमधून भाजीच्या टोपल्या, बोचकी उतरवून पुढे ऑटोने आपल्या नित्याच्या जागी त्या दाखल होतात आणि आपला भाजीबाजार मांडायला सूरवात करतात. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्यापासून चिकू , पेरू, जाम (रानफळ) पिवळ्या सालीची केळी, झेंडूची, जास्वंदीची फुलं अशा बऱ्याच गोष्टी असतात.
June 19, 2022
माझं काही कामानिमित्त फोर्ट-चर्चगेट परिसरात जाणं होतं..हा परिसरच मुळी माझ्यावर गारूड करतो..सीएसटी पासून रमत गमत चालत निघायचं, ते सरळ काळ्या घोड्यापर्यंत.
March 26, 2016
मकर संक्रान्ति साजरी करतांना, आपण १४ जानेवारी १७६१ ला लढल्या गेलेल्या पानिपतच्या तिसर्या लढाईची आठवण विसरूं या नको.
January 17, 2019
२०१८ - १९ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आपल्या संसदेत आता संमत झाला आहे . त्यावर संसदेत जरासूद्धा चर्चा झाली नसली तरी हा अर्थसंकल्पसादर होतांना प्रस्तावित केलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करात ( आपल्या अर्वाचीन मराठीत सांगायचे म्हणजे लॉन्ग टर्म कपिटल गेन टक्सआणि आधुनिक स्टायलिश भाषेत सांगायच तर LTCG ) काही सवलती देऊन झाल्या आहेत .( या कराबाबत सविस्तर स्वतंत्र लेख लवकरच .)लोकसभा - विधानसभा यांच्या ज्या काही निवडणुका - पोटनिवडणुका व्हायच्या होत्या त्या होऊन गेल्या आहेत . सध्या ज्यांना ज्या - त्या सरकारातयायच - जायचं होत त्यांच ते करून झाल असाव अस आत्ता तरी वाटत आहे . ज्यांना यातल्या किंवा कुठल्याही विषयांवर नुसते बोलायचेच आहे ते नेहमीप्रमाणे जोरदार बोलत आहेत .
अर्थात अशी पार्श्वभूमी आपल्या देशात बऱ्याचदा असते .
अशावेळी गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नवीन वर्षाचा मुहूर्त साधत सध्याच्या एप्रिल ते मार्च अशा आर्थिक वर्षाऐवजी जानेवारी ते डिसेंबर अशाआर्थिक वर्षाची घोषणा पंतप्रधान करणार का ?
ते अशी घोषणा येत्या काही दिवसांत करतील असे मला अनेक कारणांमुळे वाटते .
त्यापैकी पहिले कारण म्हणजे सर्व महत्वाच्या घोषणा अर्थसंकल्पाबाहेर करण्याचा मोदीकारणाचा परिपाठ आहे . त्यात अशी महत्वपूर्ण घोषणा आत्ताकरणे चपखल बसते .
दुसरे कारण म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात ( " चालू " मुद्दामून म्हणले नाही . कारण त्यालाआपल्या मराठीत अनेक अर्थ आहेत . सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत निष्कारण गैरसमज नको .) आपल्या देशात झालेल्या थेट विदेशीगुंतवणुकीचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर आहे . इतकेच नव्हे तर , या काळात आपल्या देशाने इतर देशांत केलेल्या थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाणहीसर्वोच्च पातळीवर आहे . हा कल येणाऱ्या काळातही सुरू राहील असे आजमितीस मिळणारे संकेत आहेत . अशी थेट विदेशी गुंतवणूक स्वीकारत आणिकरत असताना जर संबंधीत दोन देशांचे आर्थिक वर्ष एक असेल तर ते सोयीस्कर ठरते . नाहीतर संबंधित कंपन्यांना दोन्ही देशांच्या वर्षानुसार स्वतःचेहिशोब ( Accounts ) ठेवावे लागतात . त्यामुळे ते Ease of doing business च्या निकषांवर तितकेसे बसत नाही . जगातील महत्वपूर्णअर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत असताना हा पुस्तकी अडथळा दूर करत जगातील अनेक देशांत प्रचलित असणाऱ्या जानेवारी ते डिसेंबर अशाआर्थिक वर्षाचा स्वीकार करणे जास्त सयुक्तिक ठरते .
आर्थिक वर्षात असा बदल करण्यामागे असू शकणारे तिसरे कारण हे वस्तू - सेवा कराच्या ( GST ) अंमलबजावणीशी निगडीत आहे .१ जुलै २०१७पासून अंमलात आलेल्या या कराच्या सुरवातीच्या काळात विविध कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी सादर केलेली माहीती आणि आता सादर होत असलेलीमाहीती यात बऱ्यापैकी तफावत असल्याचे आता लक्षात येऊ लागले आहे . एक अर्थव्यवस्था म्हणून हे गाडे लवकरात लवकर रुळावर येणे आवश्यकआहे . याबाबत केवळ नियम किंवा मार्गदर्शक तत्वे बनवण्यापेक्षाही आर्थिक वर्ष बदलण्याचा उपाय जास्त कालबद्ध ठरेल . कारण त्यातून संपूर्णआर्थिक क्षेत्र एका विशिष्ट वेळेत संपूर्ण माहीती दिल्या वेळेत सादर करण्यास उद्युक्त होईल . त्यातून निर्माण होणाऱ्या आकडेवारीच्या पायावर या कराचेदर , त्यातील वस्तू व सेवांचे वर्गीकरण , आणि कर - संकलनाची प्रक्रिया अशा सगळ्याच गोष्टींबद्दल जास्त शास्त्रशुद्ध आणि व्यवहार्य पद्धतीने निर्णयघेणे सर्वच संबंधितांना शक्य होईल .
असे आर्थिक वर्ष बदलण्याचे चौथे कारणही GST शी च संबंधित आहे . यंदाच्या अर्थसंकल्पात GST पासूनचे उत्पन्न फक्त अकरा महिन्यांसाठीचग्रुहीत धरल्याचे नमूद करण्यात आले आहे . वास्तविक पाहाता असा स्वतंत्र उल्लेख करण्याचे काहीच कारण नव्हते . त्यामुळे हा स्वतंत्र उल्लेख हेआर्थिक वर्ष बदलण्याचे सूतोवाच तर नाही ना अशी शंका येते .
याबाबतचे पाचवे कारणही एका वेगळ्या तऱ्हेने पुन्हा GST शीच निगडीत आहे . या कराची अंमलबजावणी करत असताना या करामुळे होणाऱ्या राज्यसरकारांचे नुकसान केंद्र सरकार पहिली ५ वर्षे भरून देईल अशी हमी देण्यात आली आहे . याबाबतचा उल्लेख " पाच वर्षे " असा आहे . यांत वर्ष याशब्दाला विशेषण नाही . त्यामुळे पाच आर्थिक वर्षे की पाच केलेंडर वर्ष हे स्पष्ट नाही . त्यामुळे आता जर आर्थिक वर्षात बदल केला गेला तर केंद्रसरकारला प्रत्यक्षात १२ महिन्यांपेक्षा कमी काळासाठी नुकसान - भरपाई देत वर्षासाठी ती दिल्याचे गणित मांडता येईल . वित्तीय तुटीचे प्रमाण त्यातूनत्या वर्षात आवाक्यात ठेवण्यास त्यातून मदत होईल . २०१९ साली आपल्या लोकसभेच्या मध्यावधि निवडणुका आहेत हे लक्षात घेतले तर हा फायदालगेचच घेण्याच्या द्रुष्टीने अशी आर्थिक वर्ष बदलण्याची घोषणा आता कधीही होऊ शकते असे मला वाटते .
असा बदल होण्याचे सहावे कारण हे शेअर - बाजारातील वादळी बदलांशी ( Volatility ) निगडीत आहे . गेल्या काही वर्षात विदेशी गुंतवणूक संस्थानीआपल्या देशांत केलेल्या गुंतवणूक तसेच खरेदी - विक्रीचे प्रमाण आणि सातत्य यांत लक्षणीय प्रमाणांत वाढ झाली आहे . अशा प्रकारे कार्यरतअसणाऱ्या बहुतांश संस्थांच्या देशाचे आर्थिक वर्ष हे जानेवारी ते डिसेंबर असे आहे . त्यामुळे त्यांची आर्थिक नफा - नुकसानीची सोयीस्कर आकडेवारी दाखवण्यासाठी ही मंडळी नोव्हेंबर - डिसेंबर मधे मोठे व वारंवार व्यवहार करण्यातून आपल्या देशाच्या शेअर - बाजाराची volatility या काळातनिष्कारणच वाढते .त्याचा आपल्या देशाच्या त्यावेळी असणाऱ्या अर्थस्थीतीशी अर्थाआर्थी फारसा ताळमेळ दरवेळी असेलच असे नाही .पण म्हणूनकोणतेही सरकार असले तरी त्यावर बंदी घालता येत नाही . त्यानंतर मार्च मधे सध्याच्या नियमानुसार आपले आर्थिक वर्ष मार्च मधे सपते .तेंव्हापुन्हा काही प्रमाणात हा मार्ग स्वदेशी वित्तसंस्था अंमलात आणतात . आर्थिक वर्ष बदलण्यातून हा प्रकार थांबणार नाही . पण निदान या कारणामुळेवर्षात दोनदा येणारी volatality निदान काही प्रमाणात तरी कमी होईल आणि ती वर्षात एकदाच येईल . अर्थातच शेअर - बाजारातील volatality चेहेच फक्त कारण नसल्याने बाकीच्या कारणांमुळे येणारी volatality हा प्रकार राहीलच .( या मुद्द्याची विस्तृत चर्चा राजहंस प्रकाशनाने प्रकाशितकेलेल्या माझ्या " मार्केट मेकर्स " या मराठी पुस्तकात केली आहे .)
अशा बदलाचे सातवे कारण हे शेती क्षेत्राशी निगडीत आहे . खरीप मोसमाचा नेमका अंदाज घेत सप्टेम्बर - ऑक्टोबर मध अर्थसंकल्प सादर होणेक्रुषिप्रधान देशात जास्त सयुक्तीक होईल . त्यातून खरीप आणि रब्बी या दोन्ही मोसमांसाठी योग्य तरतूद आणि योग्य अंमलबजावणी व यासाठी पुरेसाकालावधि अश बदलातून मिळेल . हे एकूणच क्रुषि क्षेत्रास उपयोगी ठरेल .
आर्थिक वर्ष बदलण्याची घोषणा आता कधीही होण्याचे आठवे कारण म्हणले तर आर्थिक आहे आणि म्हणले तर राजकीय आहे . अशी घोषणायेणाऱ्या काही दिवसांत झाली तर त्यानुसार आपल्या देशाचे नवीन आर्थिक वर्ष १ जानेवारी २०१९ पासून सुरू होऊ शकते .त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर२०१९ या संभाव्य आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प सप्टेम्बर - ऑक्टोबर २०१८ मधे सादर करण्याची संधी मोदी सरकारला मिळू शकेल .कारणएप्रिल २०१९ मधे होणाऱ्या मध्यावधि निवडणुकांची आचार -संहीता तोपर्यंत लागू झालेली नसेल .
त्यामुळे राहता - राहीला प्रश्न या संभाव्य बदलाच्या घोषणेच्या मुहुर्ताचा .....
कदाचित आंध्र प्रदेश मधल्या दोन राजकीय पक्षांनी सादर केलेल्या मोदी सरकार विरुद्धच्या अविश्वास ठरावाची संधी साधत सरकारी कामगिरीचा अहवाल संसदेत मांडला जाईल ....
आणि ज्या दिवशी या ठरावाचा निकाल मोदी सरकारच्या बाजूने लागेल त्या रात्री देशवासीयांना उद्देशून केलेल्या राष्ट्रीय संबोधनात अशी आर्थिक वर्ष बदलाची घोषणा होऊ शकते ....
निदान मला तरी असे वाटते .
मग ?
" Ready - Steady -Go " म्हणायचे का ?
चन्द्रशेखर टिळक
२० मार्च २०१८.
( ही माझी वैयक्तिक मते आहेत . यातील काही मुद्द्यांची यंदाच्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने माझ्या फेब्रुवारी २०१८ मधील काही कार्यक्रमात मी सविस्तर चर्चा केली होती .)
March 22, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti