वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. आज केवळ १० तास ४७ मिनिटे सुर्याचे दर्शन घडणार आहे. व उर्वरित तासांची रात्र असणार आहे. २२ डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला 'विंटर सोल्सस्टाईल' असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो. कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू आहे. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो, याला शरद संपात बिंदू असे म्हणतात, या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. २१ जून हा ग्रेगेरियन वर्षातील १७२ वा दिवस आणि लीप वर्षात १७३ वा दिवस असून हा विषुवृत्ताच्या उत्तरीय भागात सर्वात मोठा दिवस असतो. २१ जून या दिवसाचे कालमान जवळपास १४ तासांचे तर रात्रीचे कालमान १० तासांच्या जवळपास असते. खगोलीय घटनेप्रमाणे २१ जूनला पृथ्वी आपला गोलार्थ बदलवत असून या दिवसापासून सूर्याचे काल्पनिक दक्षिणायन होण्याला सुरूवात होते. हा क्रम २१ डिसेंबरपर्यंत चालते. तोच २२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस असून त्यानंतर सूर्याची उत्तरायण होण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती २१ जूनपर्यंत चालत असते. पृथ्वी २४ तासात एक वेळा स्वत: फिरत असून २४ तासात दिवस-रात्र घडत असतात. त्याचप्रमाणे स्वत: भोवती फिरत असताना पृथ्वी ३६५ दिवसांत सूर्याभोवती एक फेरा लावत असते. म्हणून ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे ३६५ दिवसांचा एक वर्ष मानला जातो. २१ जून नंतर वर्षातील १९३ दिवस उरले असतात. २१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना २३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. तसेच २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण क्रम सुरू होते आणि २३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना दर तीन महिन्यांत आपला गोलार्ध बदलण्याची प्रक्रिया करते. त्यामुळे या दरम्यान काही भाग सूर्याच्या सरळ रेषेत येतो, नंतर काही भाग निरकस दिशेत येतो. त्यामुळे एकाच वेळी पृथ्वीवरील काही भागात उन्हाळा तर काही भागात हिवाळा चालत असतो. पृथ्वीवर काल्पनिक रेखांचे जाळे आहेत. त्यातील आडव्या रेषांना अंक्षांश आणि उभ्या रेषांना देशांश म्हणतात. मधोमध शून्य अंशावरून गेलेली अंक्षाश रेखा विषुवृत्त असून उत्तरेकडे २३(१/२) अंशावर कर्कवृत्त आणि ६६(१/२) वर अर्काटीक वृत्त तर दक्षिणेकडेही एवढ्याच अंतरावर मकरवृत्त व अंटार्टिक वृत्त आहेत. उत्तरेकडील कर्कवृत्त हे भारताच्या मधोमध गेले असून २१ जूनला सूर्याची स्थिती कर्करेषेच्या सरळ रेषेत असून या वेळी प्रचंड तापमान वाढलेले असते. भारतात वेळेचे निर्धारण पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक देशांश रेखांपैकी ८२(१/२) अंशावरील देशांश रेखा ही वाराणसी या शहराजवळून गेलेली आहे. भारताचे रोजच्या वेळा निर्धारण या ८२(१/२) वरील देशांश रेषेवर होत असते. हा वेळ संपूर्ण भारतात चालतो. यानुसारच घड्याळ्यातील वेळ निश्चित केली जाते. आजच्या दिवसाचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्रकिनारी जगभरातील लोकं गर्दी करतात. आणि वर्षातील मोठी समजल्या जाणाऱ्या रात्रीचे स्वागत करतात. आज ६ वाजून ५ मिनीटांनी सूर्यास्त होणार आहे. तसेच आजपासून उत्तरायण प्रारंभ होत आहे. या दिवसाला हिवाळा अयन दिवस असेही म्हणतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 22, 2018
केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी ही केसगळतीची प्रमुख कारणे आहेत. पण यावर नियमित योगसाधना हा एक उत्तम उपाय असून केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होण्यास मदत तर होतेच शिवाय मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून देखील सुटका होते.
April 4, 2019
सत्य घटना आहे ही . साधारण वीस ,बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट . भराभर पायऱ्या चढणारी मी एकदम सावध झाले . हळूच डावीकडे, उजवीकडे, पाठी मला कोणी बघत तर नाही ना ? कोणी ओळखीचे दिसले नाही, असे पाहून मी पटकन आत शिरले .
June 12, 2023
पर्यटन हा तर कोकणाचा श्वास! ढगांनी गच्च भरून ओथंबून येणारं आकाश आणि सहस्रावधी जलकुंभांनी अभिषेक करावा असा अनिर्बंध कोसळणारा पाऊस कोकणातला पर्यटन हंगाम खऱ्या अर्थानं जिवंत करतो. ओसंडून वाहणारे धबधबे, धडकी भरवणारे पण डोळ्याचं पारणं फेडणारे घाटरस्ते, थंड हवेची ठिकाणं आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावतात.
April 4, 2023
कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.
रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तयस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.
शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.
कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.
संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते.
याप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 2, 2017
निषेधार्ह पाणी भाग एक
काही श्लोकांचे अर्थ कळले नाहीत तरी ते द्यावेत असे वाटते. म्हणजे त्याविषयी वाचणाऱ्याच्या मनात शंका रहात नाही.
जसे वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे म्हणतात,
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाणडूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
यांनी पाणी पिऊ नये, कोणी ?
ज्यांचा अग्नि मंद आणि अल्प आहे, ज्यांना गुल्म, रक्ताल्पता, जलोदर, अतिसार, मुळव्याध, संग्रहणी, सूज हे आजार असतील त्यांनी (अतिरिक्त) पाणी (आयुर्वेदीय डिग्रीहोल्डर आणि शुद्ध आयुर्वेदाचीच प्रॅक्टीस करणाऱ्या वैद्यांच्या सल्ल्याशिवाय ) पिऊ नये.
आयुर्वेदाची सरकारमान्य पदवी धारकाकडूनच आयुर्वेदीय उपचार करून घ्यावेत. हे सुशिक्षितांना पण सांगावे लागते, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?
बरं केवळ पदवी असून उपयोगी नाही. ते स्वतःला "वैद्य" म्हणवून घ्यायला लाजत नाहीत असे हवेत. (स्वतःला डाॅक्टर म्हणवून घेण्यात कोणता आनंद मिळतो कोण जाणे ? असो.
प्रत्येकाचा स्वतःकडे किंवा स्वतःच्या व्यवसायाकडे पहाण्याचा विचार वेगवेगळा असू शकतो. )
पदवी आयुर्वेदाची असेलही, पण ते प्रॅक्टीस आयुर्वेदाची करत असतील याची खात्री नाही. म्हणून म्हटले, शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टीस करणाऱ्यांचा सल्ला घ्यावा. माझे काही मित्र म्हणतात, शुद्ध आयुर्वेद हा शब्दच चुकीचा आहे. अशुद्ध आयुर्वेद नसतोच ! पण समाजात बघितले की कळते, राजस्थानी, बंगाली, हिमालयीन जडीबूटीवाले, यांनी आयुर्वेद पोटासाठी अशुद्ध करून ठेवलाय. वैदूंनी जिवंत ठेवलाय, पण सशास्त्र नाही. आणि ज्या शास्त्र जाणणाऱ्यांनी आयुर्वेदाचे संगोपन करायला हवे होते, त्यांनी मात्र आता तरी सवतीभावाने आयुर्वेदाकडे पाहू नये. ही वेळ आयुर्वेद पुनरूत्थानाची आहे.
असो !
वरील श्लोकाचे शास्त्रीय स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास असे सांगता येते की, ज्या रोगांची नावे उल्लेखित केली आहेत, ते रोग तर आहेतच, पण तशाच लक्षणसमुहाचे अन्य रोग देखील जाणावेत, (हे वाक्य अनुक्त प्रकारात येते. अनुक्त म्हणजे, प्रत्यक्ष सांगितलेले नाही, पण यापूर्वी सांगितले असल्यामुळे इथे परत सांगत नाही, असे. )
या रोगांची प्रातिनिधीक यादी बघीतली तर सात व्याधी अन्नवह स्रोतसाशी प्रत्यक्ष संबंधीत आहेत. आणि सूज हे लक्षण रक्त आणि मूत्रवह संस्थेशी निगडीत आहे. म्हणजे पाण्यापासून ज्या अवयवांना विशेष हानी होणार आहे, असे हे अवयव जाणावेत. असे ग्रंथकर्ते वाग्भटाचार्य सुचवतात.
त्यात प्रथम उल्लेख केला आहे, भूक मंद आणि कमी असलेल्यांचा. स्वल्पम् आणि अल्पम् असे दोन वेगळे शब्द ग्रंथकार वापरतात. ते केवळ यमक जुळवून घेण्यासाठी नव्हे !
सध्या भूक म्हणजे काय, असाच प्रश्न पडतो. कारण भुकेची जाणीव व्हायच्या आतच पुढची खाण्याची डिश किंवा डबा समोर येतोय. इतकं अरबट चरबट खाणं अधे मधे होत असतं. ग्रहण केलेले अन्न पचवायला देखील वेळ हवा असतो ना ! तर त्यातून पोषक अंश शरीर तयार करेल. नाहीतर खाल्लेलं अन्नच रोगाच कारण होतंय.
यालाच म्हणतात भस्मासूर उलटणे !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
January 9, 2017
स्त्री भ्रूण हत्या व् अवैध गर्भपात यावर चर्चा करणारा लेख
December 12, 2017
‘नोव्हेंबर’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘क्रीडाशौकीन, निरोगी, विश्वासू, देखण्या व शिस्तप्रिय’ मानल्या जातात. चालू ‘नोव्हेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
November 16, 2025
शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली असता काही मुलभूत फरक आपणाला दिसले. अगदीच एकदोन अपवाद सोडले तर कोणीही प्राणी निसर्गदत्त नियम मोडत नाहीत, असे लक्षात येते.
या दोन प्रकारात माणूस कुठे बसतो ? हा प्रश्न आहे.
काही जण समजत होते, माणूस शाकाहारी.
काही जण समजत होते, माणूस मांसाहारी. काही मध्यम मार्गी मिश्राहारी या प्रकाराला चिकटून होते. पण "त्याच्या" नियमानुसार, ना माणूस शाकाहारी ना मांसाहारी ना मिश्राहारी.
मिश्राहारी ही अगदी सोयीस्कर पळवाट झाली.
म्हणजे उपवासाच्या दिवशी फळाहार पण करायचा आणि वडे भजी पण खायची. तसे झाले.
त्याच्या डिक्शनरीमधे मिश्राहारी हा हायब्रीड शब्दच नाही.
माणसाची वैशिष्ट्ये बघूया. म्हणजे त्याला अपेक्षित असलेले माणसाचे नियम आपोआप समजून येतील. .
शाकाहारी प्रमाणेच पाणी ओठानेच पितो, जीभेने चाटत बसत नाही.
समुहाने शांतपणे एकमेकांवर डूक न धरता जेवतो.
रोज आंघोळ करतो. पाण्याची आवड आहे.
अंगाला घाम येतो आणि शरीराचे तापमान संतुलीत ठेवायला मदतच होते.
जेवताना अगदी सावकाश जेवतो. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे वचावचा किंवा शाकाहारी प्राण्यांप्रमाणे भराभरा जेवत नाही.
खाल्लेले अन्न पुनः पचनासाठी परत तोंडात आणत नाही. रवंथ करीत नाही.
तोंडातील लाळेचे रासायनिक पृथक्करण केले असता, शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगळे दिसते. आतड्यांची रचना, लांबी पण वेगळीच असते.
मांसाहारी प्रमाणे माणसाची नखे आत बाहेर करता येत नाही. शाकाहारी प्रमाणे स्थिर आहेत. धारदार टोकदार नाहीत. त्यामुळे नखांनी शिकार करता येत नाही.
शिकार करण्यासाठी वेगळ्या साधनांचा वापर करावा लागतो. एवढेच नव्हे तर समोरचे मांस खाण्यासाठी भाजणे, जाळणे, तळणे, शिजवणे इ.इ. वेगळ्या संस्काराची आवश्यकता पडते. खाण्यासाठी सुद्धा काटे चमचे सुऱ्या घेऊन जणुकाही लुटुपुटुचे आभासी युद्ध करावे लागते.
शिवाजी महाराजांना अफजल्ल्याचे पोट फाडण्यासाठी वेगळी वाघनखे वापरावी लागली, आणि हिरण्यकश्यपूला ठार मारण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताना देखील सिंहनखे धारण करावी लागली. त्यासाठी मानवरूप सोडून नरसिंह अवतार घ्यावा लागला. पण भगवंतांनी पण नियम नाही मोडला.
इथे प्रत्येकाचे नियम वेगळे. ज्याला जो नियम घालून दिला आहे, तोच नियम प्रत्येकाने पाळावा.
आणि नियम मोडला तर शिक्षा ही होणारच.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
1.10.2016
October 1, 2016
विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधामुळे सगळ्या गोष्टी सहज व विनाकष्ट उपलब्ध झाल्याने माणूस जसा सुखी झाला तसा तो आळशी व ऐतोबा होऊन सवईचा गुलाम झाला. सवय ही काळ, वेळ व कारणांनी बदलत जाते. आज आपण पहातो सर्वच स्त्री व पुरुषांचे जीवन सवईमुळे बदलल्याने शारीरिक व्याधीत वाढ होताना दिसते. पूर्वी पैसा कमाविण्यासाठी घाम गाळायला लागायचा आता घाम गाळायला पैसा खर्च करावा लागतो यातच सर्वकाही आलं.
July 25, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti