(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जमिनीची धूप कशी होते?

    माती वाहून लुप्त होते, त्याला आपण जमिनीची धूप झाली असे म्हणतो. धूप होत असलेली जमीन अनुत्पादक होत होत शेवटी वांझ बनते. ज्या गतीने निसर्गात जमीन तयार होते. त्यापेक्षा ती खराब होण्याची गती जास्त होते तेव्हा त्या जमिनीवर अवलंबून असलेली जीवनसृष्टी धोक्यात येते.

      July 16, 2023


  • सांधेदुखी तरुणपणातील (खेळाडूतील)

    तरुण मुलं जेव्हा खूप खेळ खेळू लागतात तेव्हा आपल्या दोन्ही खांद्यांची भरपूर हालचाल करू लागतात. कोणताही खेळ असो- क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक्स, वजन उचलणे, थ्रो बॉल या सर्वच खेळात खांद्यावर फारच ताण पडतो. उलट्या-सुलट्या उड्या -मारणे, हातावर जोर देऊन काम करणे यात खांद्याला इजा होऊ शकते.

      July 11, 2023


  • न्याययंत्रणेला भ्रष्ट्राचाराचा विळखा

    सर्व क्षेत्रात वाढत चाललेला भ्रष्ट्राचार चिताजनक ठरत आहे. भ्रष्ट्राचाराची पाळेमुळे खोलवर रुजल्यामुळे वरवरच्या उपायांनी तो आटोक्यात येण्यासारखा नाही. आजवर न्यायसंस्था भ्रष्ट्राचारापासून दूर होती. पण अलीकडेच याही क्षेत्रात भ्रष्ट्राचाराच्या घटना आढळल्याने खळबळ माजली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रकमेच्या अपहार करणार्‍या न्यायाधिशांवर काय कारवाई केली जाते याकडे सयार्‍यांचे लक्ष लागले आहे.

      August 14, 2010


  • गुरूदत्त यांचे यांचे काही क्लासिक चित्रपट

    गुरूदत्त यांचे यांचे काही क्लासिक चित्रपट अगदी नक्की बघावे असे

    साल १९६२
    साहिब बीवी और गुलघा
    निर्माता - गुरूदत्त
    दिग्दर्शक - अब्रार अल्वी

    कलाकार - मीना कुमारी, गुरूदत्त, रहमान, सप्रू, धुमाळ, नजीर हुसैन, एस्.एन.बॅनर्जी, कृष्ण धवन, जवाहर कौल, बिक्रम कपूर.

    कथानक सारांश - नोकरीच्या शोधात कलकत्त्यात आलेल्या भूतनाथ या मध्यमवर्गीय परंतू सुशिक्षित तरूणाच्या नजरेतून सांगितलेली एका पतनोन्मुख जमीनदार घराण्याची १९ व्या शतकातील कथा. जमीनदाराची पत्नी छोटी बहू हिच्याबद्दल त्याला सुप्त आकर्षण वाटते. तिचा नवरा मात्र मद्य आणि मर्तिका यांच्यात रमलेला असतो. जमीनदार घराण्याचे पतन सुरू होते व छोटी बहू दारूच्या आहारी जाते. जमीनदारांच्या पतनाची कथा सांगणारा चित्रपट.
    (विमल मित्र यांच्या कादंबरीवर आधारीत)

    साल १९५९
    कागज के फूल
    निर्माता - गुरूदत्त
    संगीत - एस.डी.बर्मन
    दिग्दर्शक - गुरूदत्त

    कलाकार - गुरूदत्त, वहिदा रहमान, जॉनी वॉकर, बेबी नाझ, महेश कौल, वीना, मीनू मुमताज.

    कथानक सारांश - एका चित्रपट दिग्दर्शकाच्या शोकांतिकेचे दर्शन. वैवाहिक जीवन विस्कळीत असलेला एक दिग्दर्शक एका नव्या नयिकेला प्रकाशात आणतो, तिच्या प्रेमात पडतो. पुढे त्याची वाताहात होते. अखेर एक्स्ट्रॉ म्हणून काम करण्याची वेळ त्याच्यावर येते.
    साल १९५७
    प्यासा
    निर्मिती -गुरूदत्त फिल्म्स
    दिग्दर्शक -गुरूदत्त
    संगीत -एस. डी. बर्मन

    कलाकार - गुरूदत्त, माला सिन्हा, वहिदा रहमान, जॉनी वॉकर, रहमान, मेहमूद, कुमकूम, श्याम, लीला मिश्रा, माया दास, राध्येश्याम, अशिता मुझुमदार, तनवीर, मोहन सँडो.

    कथानक सारांश - एका कवीची शोकांतिका. त्याची व्यवहारी प्रेयसी एका श्रीमंत प्रकाशकाशी लग्न करते. जग त्याच्या कवितांच मुल्यही ओळखत नाही. तो निराश होतो. जगाविषयी त्याच्या मनात चीड निर्माण होते. अशा स्थितीत एक वेश्या मात्र या कवीवर व त्याच्या कवितांवर प्रेम करते. एका अपघातात कवी मेला अशी जगाची समजुत होते. प्रत्यक्षात तो जिवंत असतो. त्याच्या निधनानंतर प्रकाशक त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊ इच्छितो तर वेश्येला फक्त त्याच्या कविता जगासमोर आणायच्या असतात. कवी जेव्हा स्वतःची ओळख सांगतो तेव्हा त्याच्यावर स्वार्थी जग विश्वास ठेवत नाही. त्याची साथ देते ती त्याच्यासारखीच जगाकडून तिरस्कृत, उपेक्षित झालेली वेश्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 12, 2017


  • सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा

    विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो.

    रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्येदेवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्याआवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्याला सांगिलते.

    गुरूने उत्तर दिले:-कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय.परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? असे विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले,मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाडूनच आणून दे.ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या धीरावर तो तेथून बाहेर पडला, परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमाकडून मिळविणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले.

    रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला, परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत गरीबी आलेली होती. कौत्साने त्याच्या एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दुःख झाले. रघुराजाने आपल्या दारीआलेल्या विद्वान् ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले.

    कौत्साने कारण सांगितलेव तो पुढे म्हणाला, 'राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याजबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली.

    ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतू ऋषींपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. परंतु त्यानेफक्त १४ कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्यसास परत दिल्या. त्या त्याने रघुरराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले.

    लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला.

    हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.

    -- व्हॉटसऍपवरुन

      October 10, 2016


  • पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?

    देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.

    देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

    सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.

    त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.

    आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

    1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
    ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
    जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

    2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
    ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

    3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
    अ. कापूर जाळणे -- दृष्टी
    ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
    क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
    क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
    हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
    ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
    अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
    मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
    पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
    मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..

    मुळात हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो science वर आधारित आहे

    || श्री स्वामी समर्थ ||

    -- WhastApp वरुन 

      August 16, 2017


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३०

    अमर्यादमेवाहमाबालवृद्धं
    हरंतं कृतांतं समीक्ष्यास्मि भीतः |
    मृतौ तावकांघ्र्यब्जदिव्यप्रसादाद्भवानीपते निर्भयोऽहं भवानि ‖ ३० ‖

    महाभारतामध्ये आलेल्या विश्व प्रसिद्ध अशा यक्ष धर्मराज संवादात यक्षाने एक प्रश्न विचारला आहे की या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य काय? त्यावर उत्तर देताना श्री धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की जगामध्ये असंख्य लोकांना रोज मरतांना पाहून देखील पाहणारा स्वतःला अमर समजतो यापेक्षा मोठे आश्चर्य नाही.
    श्री धर्मराजांचे उत्तर अत्यंत यथार्थ आहे. पण हा झाला अविवेकी माणसाचा विषय.
    याउलट विवेकशील व्यक्ती नेमक्या याच गोष्टीने व्यथित होतो.
    त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,

    अमर्यादम् - कोणत्याच प्रकारची मर्यादा अर्थात बंधन नसलेले,
    एवाहम् - अशा त्या यमराजांना मी
    आबालवृद्धं- बालकापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना
    हरंतं कृतांतं - धरून नेणाऱ्या यमराजांना, समीक्ष्यास्मि भीतः - पाहून मी घाबरून जातो.
    मृतौ - या मृत्यूच्या विषयात, तावकांघ्र्यब्ज- आपल्या चरणकमलांच्या,
    दिव्यप्रसादाद्- दिव्य प्रसादामुळे
    भवानीपते - ही भवानी पती भगवान शंकरा !
    निर्भयोऽहं भवानि - मी निर्भय होवो.

    भगवान यमराज खऱ्या अर्थाने समदर्शी आहेत. बालकापासून वृद्धापर्यंत, गरीबा पासून श्रीमंता पर्यंत, मूर्खा पासून पंडिता पर्यंत, कुरुपा पासून विश्वसुंदरी पर्यंत, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता ते सगळ्यांना नेतात. हे पाहिल्यावर ते मला तरी कसे सोडतील? हा विचार माझ्या मनात येऊन मी त्रस्त होतो.
    अशावेळी आपली चरणकमले हेच माझ्या दुःख निवृत्तीचे एकमेव स्थान आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 9, 2020


  • सदाबहार चित्रपट ‘पडोसन’ची पन्नास वर्षे

    काही विनोदी सिनेमे असतात असे जे आज ही आपणास मनमुराद आंनद देतात आपल्या कुटुंबियां सोबत ‘पड़ोसन ‘हा सिनेमा बघण्याची आज ही मज्जा काही आगळीच असते. अगदी हसवत ठेवणारा सिनेमा..

      January 30, 2019


  • संत्रा : विदर्भाचा भाग्योदय होणार का?

    २०१९ च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे.

      August 21, 2017


  • जानेवारी १५ : सचिन आज खेळणार ४४४ वा एदिसा

    सचिन करणार एदिसांमध्ये सर्वाधिक डाव खेळण्याचा विक्रम

      January 15, 2011