(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एडटेक कंपन्यांचे शैक्षणिक संस्थांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?

    संवादात्मक स्क्रीन ,ऑनलाइन वर्ग तसेच एड टेक स्टार्टअप मुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो ,शिकणें मनोरंजक  व जटील संकल्पना समजण्यास मदत होते. संबोध स्पष्ट नसणें हेच शिक्षणाच्या पिछेहाटीचं कारण आहे. पोपटपंची ने करिअर करण्याचे दिवस आता संपले आहेत. शैक्षणिक परीणाम वाढविण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर वापरून शिक्षण अधिक आकर्षक व सुलभ बनविले जात आहे.

      April 18, 2022


  • पृथ्वीचं भावंड

    पृथ्वीच्या एका ‘नव्या’ भावंडाचा अलीकडेच शोध लागला आहे. हे भावंड इमानेइतबारे पृथ्वीबरोबरच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत आहे. ते पृथ्वीच्या मागून चालत आहे. चालताना ते पुढे-मागे जात आहे. पृथ्वीचं हे भावंड म्हणजे एक लघुग्रह आहे. हा लघुग्रह २०२०एक्सएल५ या नावानं आता ओळखला जातो. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लघुग्रह हे काही वेळा ग्रहमालेतील इतर ग्रहांच्या सान्निध्यात येतात व त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणात जखडले जातात.

      February 24, 2022


  • खोबरेल तेलाने करावा केसांचा मसाज

    केस मुलायम व्हावे यासाठी केसांची काळजी घेणे गरजेचे असते. वेळोवेळी केसांचा मसाज करावा लागतो. परंतु मसाज योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा फायदा होत नाही.

    तेलाने मसाज करण्यासाठी लागणारे साहित्य

    - खोबरेल तेल, कॉटन(कापूस), गरम पाणी, टॉवेल, शँम्पू इत्यादी.

    प्रथम खोबरेल तेल थोडे कोमट करुन घ्यावे. केसाचे दोन भाग करुन कापसाच्या साहाय्याने सगळ्या केसांच्या मुळाशी तेल चांगल्या प्रकारे लावावे.

    १५ मिनिटे गोलाकार मसाज करावा. एका कानापासून दुसर्याु कानापर्यंत क्रॉस मसाज करावा.

    थोडे-थोडे केस घेऊन संपूर्ण केसांचा गरम तेलाने मसाज करावा.

    मानेपासून कांद्यापर्यत खालच्या दिशेने मसाज करत यावा.

    अधून-मधून डोक्याचे पॉईट दाबावे या क्रियेला पंचिंग असे म्हणतात.

    १५ मिनिटे व्यवस्थीत मसाज झाल्यावर गरम पाण्यात टॉवेल भिजवून केसांना गुंडाळून थोडा वेळ वाफ घ्यावी या क्रियेला स्टीम असे म्हणतात
    मसाज झाल्यानंतर केस शँम्पूने स्वच्छ धुवावेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 8, 2017


  • इतिहासातली मुंबई – एस्प्लनेड हाऊस

    २९, एस्प्लनेड हाऊस, हजारीमल सोमाणी मार्ग, फोर्ट, मुंबई -१..वरील पत्त्यावरून आपणापैकी अनेकांनी अनेक वेळा प्रवास केला असेल..

      April 22, 2016


  • इंग्लंडस्य प्रथम दिवसे… नि हटन-पुत्र

    ६ सप्टेंबर १८८० हा इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटच्या आरंभाचा दिवस ठरला. डॉ. विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांच्याकडून या दिवशीच शतक निघावे हा अनोखा योगायोग होता. केनिंग्टन ओवलवरील या कसोटीपूर्वी क्रिकेट जगतात केवळ तीनच कसोट्या खेळल्या गेल्या होत्या…रिचर्ड हटनच्या अठ्ठेचाळिसाव्या वाढदिवशी लेन हटन परलोकवासी झाले ही मात्र नक्कीच नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. वाढीचा ठरलेला असा दिवस नसतो पण अर्थ समजावा म्हणून नाईलाजाने असे शब्द वापरावेच लागतात. असो

      September 6, 2010


  • दादर, मुंबई येथील ‘धी गिरगांव पंचे डेपो प्रायव्हेट लिमिटेड’

    मुंबईतील मराठी माणसांच्या उद्योग-व्यवसायात ९० वर्षांची परंपरा असलेले “दि गिरगाव पंचे डेपो प्रा. लि.” हे दुकान अग्रभागी आहे. मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या या दुकानात मराठी माणूस खरेदीसाठी दूरदूरच्या ठिकाणांहून येतो.

    देवीच्या साड्या हे “गिरगाव पंचे डेपो”चे खास वैशिष्ट्य. याचबरोबर इतरही सूती कपडे, खासकरुन मराठी ग्राहक आणि कुटुंबांमध्ये वापरले जाणारे कपडे यांच्या व्यवसायात “गिरगाव पंचे डेपो” अग्रस्थानी आहे.

    Founder of the girgaon panche depot९० वर्षांपूर्वी, १९२६ मध्ये स्वर्गिय महादेव यशवंत कुलकर्णी यांनी या उद्योगाची सुरुवात केली. खरंतर त्यापूर्वीपासूनच त्यांनी कोकणातून पंचे वगैरे वस्तू आणून घरोघरी विकण्याचा व्यवसाय सुरु केला होताच. त्याचीच पुढची पायरी म्हणजे सुरुवातील गिरगावात आणि नंतर एका वर्षात, १९२७ मध्ये दादर येथे त्यांनी दुकान थाटले.

    त्यानंतर त्यांचे चिरंजीव अरविंद महादेव कुलकर्णी यांनी दुकानाची जबाबदारी सांभाळली. ते महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष होते. सध्या श्री रमाकांत अरविंद कुलकर्णी हे या दुकानाची धुरा सांभाळत आहेत. या कामात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चना यांची साथ आहे.

    आता कुलकर्णी कुटुंबाच्या सदिच्छा व स्वराज या चौथ्या पिढीने या व्यवसायात पदार्पण केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेल्या या पिढीने आता या उद्योगाला ऑनलाईन जगात आणण्यासाठी पाऊल उचलले आहे. लवकरंच “गिरगाव पंचे डेपो”मधील विविध वस्तू ऑनलाईन शॉपींगच्या माध्यमातून घरबसल्या मागवण्याची सोय सुरु होणार आहे.

    “देवीच्या साड्यां”नी कुलकर्णींच्या व्यवसायाला भरभराट आणली. त्यामुळे ऑनलाईन व्यवसायाची सुरुवात देवीच्याच साड्या नवरात्रीनिमित्त ग्राहकांपर्यंत पोहोचवून करण्याचा त्यांचा निर्णय अगदी योग्यच आहे.

    मराठी ग्राहकाने ज्याप्रमाणे कुलकर्णींच्या तीन पिढ्यांवर प्रेम केले आणि त्यांना साथ दिली तशीच साथ या नव्या पिढीलाही मिळेल याबद्दल रमाकांत आणि अर्चना कुलकर्णींच्या मनात अजिबात संदेह नाही.

    <!--घटस्थापनेच्या शूभमुहुर्तावर देवीच्या साड्यांची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे. सर्व साड्यांसाठी घरपोच डिलिव्हरी सेवा मुंबई आणि ठाणे विभागात उपलब्ध. डिलिव्हरी चार्जेस - रु.७०/- प्रति साडी. डिलिव्हरी ३ दिवसात मिळेल रंगाच्या निवडीसाठी फोनवरुन संपर्क साधावा व त्यानंतर ऑनलाईन लिंकवर जाऊन पैेसे भरावेत. आपला पत्ता आणि फोन नंबर आमच्याकडे इ-मेलने पाठवावा. पैसे भरण्यासाठी येथे क्लिक करा [supsystic-tables id='1'] [supsystic-tables id='2'] -->
    पत्ता - ३५४, एन सी केळकर मार्ग, दादर, मुंबई ४०००२८
    फोन - 9869007736
    इ-मेल - ramakantarchana@gmail.com

      September 29, 2016


  • तंत्रज्ञान बदलतेय वेगात

    गेल्या दशकभरात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून आज नवी वाटणारी गोष्ट उद्या लगेच जुनी होत आहे. यामुळे ग्राहकांसमोर एकाच वेळी अनेक पर्याय खुले होत असून योग्य पर्याय निवडताना ते गोंधळून जात आहेत. सध्या अॅण्ड्राईड या मोबाईल फोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल बरीच चर्चा होत असली तरी त्यापेक्षाही चांगली ऑपरेटिंग सिस्टिम कधीही बाजारात दाखल होऊ शकेल अशी परिस्थिती आहे.

      January 28, 2011


  • भयसापळा, मोहसापळा

    पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला भयसापळा असे म्हणता येईल.

    जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे. "हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही..!

    माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे. एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व शरीराने मडक्‍यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.

    आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच मुक्तिदायक नाही काय?

    पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं, हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.

    भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.

    -- डॉ. विकास आमटे..

    हि दोन्हीही उदाहरणे ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत दिलेली आहेत छान मेसेज आला म्हणून पाठवला


    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..

      June 15, 2017


  • फेब्रुवारी ०८ : मोहम्मद अझरुद्दीनचा जन्म

    कारकिर्दीतील पहिल्या तिन्ही कसोट्यांमध्ये शतक रचण्याचा अनोखा विक्रम अझरच्या नावावर आहे आणि आजवर कुणीही त्याची बरोबरी देखील करू शकलेले नाही. अझर हा एक चपळ क्षेत्ररक्षकही होता. एदिसांमध्ये त्याच्या नावावर १५६ झेल आहेत. एके काळी हा विश्वविक्रम होता. पुढे श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने तो मोडला. एकेकाळी त्याच्या नावावर एदिसांमधील सर्वाधिक धावांचा विक्रम होता. पुढे सचिन तेंडुलकरने तो मोडला.

      February 8, 2016


  • WhatsApp च नवं फिचर “रिड रिसिप्ट”

    Hello Friends,

    आजपासुन मी येथे लेख सुरू करत आहे. मला खात्री आहे की माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल.

    Now back to the Work.

    तुम्हाला WhatsApp ची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. WhatsApp ने नुकत्याच प्रसारीत केलेल्या जाहिरनाम्यात भारतात त्यांचे ७० मिलीअन म्हणजेच जवळपास ७ कोटि युसर्स आहेत. आज बहुतेकांकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे WhatsApp नसलेला स्मार्ट फोन मिळणे कठीणच!

    तर या आपल्या आवडत्या मॅसेंजर App मध्ये एक नविन फिचर अपडेट होणार आहे आणि हे फिचर जरा हटके आहे. म्हणजे बघा काहीवेळा असे होते की तुम्ही तुमच्या मित्राला WhatsApp वर message पाठवता पण तो message वाचुनही वाचला नाही असं सांगतो. मग कारण देताना message डाऊनलोड झाला पण मी वाचला नाही, किंवा कामात होतो म्हणुन उशिरा वाचला वगैरे थापा मारतो. पण आता हे शक्य नाही.

    WhatsApp च्या नविन फिचरमुळे तुम्हाला आता तुमच्या मित्राने message वाचला कि रिड रिसिप्ट मिळणार आहे. हो हे खरयं!!

    WhatsApp वर एखादा message पाठवला कि त्याखाली एक टिकमार्क येतो. तो message मित्राच्या मोबाईलवर डाऊनलोड झाला कि दोन टिकमार्क दाखवतात. हे टिकमार्क राखाडी कलर मध्ये असतात. पण आता जर का तुमच्या मित्राने तो message वाचला असेल तर ते राखाडी टिकमार्कचे कलर बदलुन निळे होईल. जेणेकरुण तुम्हाला कळू शकेल कि तुमच्या मित्राने तो message वाचला आहे कि नाही.

    म्हणजे आता थापा मारणा-या मित्रांनो सावधान! सावधान! सावधान!

    WhatsApp च्या FAQ सेक्शन मध्ये यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. सध्यातरी हे फिचर फक्त Group Chat आणि Broadcast message साठी आहे. जेव्हा Group मधिल सर्व सभासद message वाचतील तेव्हा दोन्ही टिकमार्क निळे होईल.

    © अभिजीत शिंदे

    तुम्ही माझ्या BLOG ना ही भेट देऊ शकता.

    http://comptechguru.wordpress.com/

    http://mycomptechguru.blogspot.in/

    -- अभिजीत शिंदे उर्फ COMPTECHGURU (कॉम्पटेकगुरू)

      December 25, 2014