(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आजी आजोबांचे आरोग्य – भाग ३

    वृद्धापकाळात होणारे मुख्य आजार आणि संक्षिप्त उपचार

    २) हाडे ठिसूळ होणे (Osteoporosis) - उतार वयात हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होऊ लागतात. सुरुवातीला त्याची फारशी काही लक्षणे दिसत नाहीत पण लहानशा आघातमुळे पटकन हाड मोडण्याची (fracture) शक्यता वाढते. अशा वयात अस्थिसंधान (हाडे जुळून येणे) होणे कठीण असते, लवकर झीज भरून निघत नाही शिवाय वयोपरत्वे हालचाली कमी असल्यामुळे स्नायू पण दुर्बल होऊ लागतात आणि परिस्थिति कठीण होऊन बसते. झीज भरून येण्यासाठी आहारतून मिळणारे कॅल्शियम पुरत नाही. अधिक कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी महागड्या गोळ्या घेण्यापेक्षा साधी चुन्याची निवळी रोज फक्त २ चमचे घ्यावी. त्यामुळे पुरेसे कॅल्शियम मिळून हाडे बळकट होऊन मोडण्याची शक्यता कमी होते. निवळी कीती आणि कशी घ्यावी - सकाळी चहा किंवा दुधामध्ये २ चमचे टाकून घेणे. कॅल्शियमचे शोषण योग्य होण्यासाठी व्हिटॅमिन डी (ड जीवनसत्व) मिळण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान अर्धा तास रोज बसावे. विना खर्चाचा आणि हमखास लाभदायक असा हा उपाय आहे.

    ३) संधिवात (Osteoarthritis) - या आजाराला संधिवात अर्थात degenerative arthritis किंवा osteoarthritis म्हणतात. वेदनाशामक औषधांचा उपयोग तात्पुरता होतो. उतारवयात अशा औषधांचा उपयोग टाळणे योग्य. वेदानाशमक औषधांचा वापर टाळून संतुलित आहारावर भर द्यावा, दिनचर्येत बदल करावेत, योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करावेत आणि गरज लागली तर वनस्पतीजन्य सौम्य औषधांचा वापर करावा.
    आहार: भाजलेल्या धान्याचा आहारात वापर करावा, पोळ्यांच्या पिठात सुंठ पाव चमचा आणि एरंडेल २ चमचे टाकणे, मोड आलेल्या मेथी २ चमचे सकाळी रिकाम्या पोटी खाण्यास द्याव्या.

    ४) निद्रानाश (Insomnia) - मूल जन्माला आल्यावर दिवासतले १५ ते २० तास झोपते. वय वाढू लागल्यावर झोप कमी होत जाते. वृद्धावस्थेत तर झोप खूपच कमी होते. शरीराला आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळण्यासाठी किमान ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. कोणत्याही वयात झोपेच्या गोळ्या घेतल्या तर मेंदूच्या पेशींवर घातक परिणाम होतो हे आपण जाणतोच. मग उतार वयात तर याचे दुष्परिणाम झेलण्याची ताकद शरीराकडे कशी असेल? त्यासाठी काही अगदी सोपे उपचार आपल्याला करता येतील ज्याने काहीही दुष्परिणाम न होता झोपही छान लागेल.
    उपचार: १) तळपायला तूप चोळून मोजे घालून झोपावे. २) कुंकुम घृत (नस्य) २ - २ थेंब झोपण्यापूर्वी १५ मिनिटे कोमट करून नाकात टाकावेत. ३) अर्धा कप दुधात २ - ३ चिमूट जायफळ टाकून झोपताना प्यावे.

    ५) विस्मरण (Dementia / Alzheimer’s disease) - मेंदू आणि एकंदर सर्वच मज्जायंत्रणेची निर्मिती होण्यात स्निग्ध पदार्थांचा सर्वात जास्त सहभाग असतो. हाडांसाठी जसे कॅल्शियम किंवा स्नायूंसाठी जशी प्रोटीनन्स तसे मेंदूसाठी स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थांमध्ये सर्वात उत्तम आहे गाईचे तूप आणि त्याच्या खालोखाल नारळाच्या दुधापासून निर्मित तेल (याला व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणतात). या मिश्रणात विशिष्ट वनस्पतींचे तैलार्क मिश्र करून “कुंकुम घृत” मी स्वतः तयार करतो. हे औषध नित्यनेमाने नाकात टाकावे. खरंतर वृद्धांनाच नव्हे तर शाळकरी विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती सुधारण्यासाठी हे उत्तम पोषण आहे. वार्धक्यात विस्मरण हे लक्षण अतिशय हळूहळू दिसू लागते. सुरुवातीला एखाद्या माणसाचं नाव आठवत नाही. त्यावेळी असं वाटतं की बरेच दिवसात भेट झाली नाही म्हणून आठवत नसेल. पण ही एका रोगाची सुरुवात आहे हे समजत नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पुढे विसरण्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि घरात हा एक थट्टा मस्करीचा विषय होतो. मात्र पुढे काही वर्षांनी डिमेन्शिया किंवा अल्झायमर्सचे निदान झाल्यावर “आता यावर काही इलाज नाही” अशी परिस्थिति होते. म्हणून सर्वांना आवर्जून सांगावेसे वाटते की पन्नाशी दरम्यान हे औषध नाकात टाकायला सुरुवात करा, एकदा लक्षणे दिसू लागली की कोणत्याही औषधाचा काहीही उपयोग होत नाही.
    मात्रा: २ - २ थेंब सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी, किंचित कोमट करून नाकात टाकावेत. मान कलती करून दोन मिनिटे तसेच पडून राहावे. हे कुंकुम नस्य कोमट केल्याने नाकाच्या श्लेष्मल त्वचेच्या माध्यमातून मेंदूच्या पेशींपर्यन्त हे सहज शोषले जाते.

    ६) कंपवात (Parkinson’s disease) - या विकारात शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करणारा मेंदूतील चेतापेशींचा विशिष्ट भाग हळूहळू नाश पावतो. हातांना कंप, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे अशी या विकाराची मुख्य लक्षणे आहेत. मज्जा यंत्रणेतील डोपामाइनचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा विकार संभवतो. या आजारपासून सुटका होण्यासाठी वरील कुंकुम नस्याचा वापर नियमितपणे करावा.

    ७) ऐकू कमी येणे (Hearing disorder) - वयानुसार कानाने कमी ऐकू येणे हे नॉर्मल आहे असे बऱ्याच लोकांना वाटते. वास्तविक हा दोष आहे आणि बिना औषधाने पण कधीकधी बरा होऊ शकतो. विशेषतः वारंवार सर्दीमुळे कानात दडे बसतात आणि त्यामुळे बहिरेपणा आला असेल तर एक सोपा इलाज म्हणजे लसूण आणि हिंगाचा खडा कापसात गुंडाळून रात्री कानात ठेवावा. लसूण आणि हिंग अतिशय उष्ण असतात. याने कानात आग झाल्यासारखी संवेदना होते. रात्री झोपताना पाणी पिण्याची सवय असणाऱ्यांना कानात दडे बसण्याची शक्यता जास्त असते. काहीही इलाज न करता एवढेच पथ्य केल्याने कित्येक जणांना फायदा झाला आहे. उपाय अगदी सोपा आहे, करून पाहायला काहीच हरकत नाही. कानाच्या शिरेला (नर्व्हला) दुखापत झाली असेल तर मात्र या उपायचा फायदा होणार नाही.

    ८) अंथरूणात लघवी होणे (Lack of bladder control) - वयानुसार मूत्राशयावर नियंत्रण करणाऱ्या चेतापेशी दुर्बल होतात आणि त्यावरचे नियंत्रण बिघडते. हा त्रास टाळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक तास पाणी किंवा कोणताही द्रव आहार (सरबत/ चहा/ कॉफी/ शीतपेय) घेऊ नये. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी ‘संध्या’ नावाची पूजा करण्यामागे आरोग्याचा हाच दृष्टिकोन असावा. आहारतून गोड पदार्थ कमी करावेत, रात्रीच्या जेवणात तर गोड मुळीच खाऊ नये, केळी वर्ज्य करावीत. एवढे करूनही बरे नाही वाटले तर उंबरसाल चूर्ण अर्धा चमचा थोड्या गुळाबरोबर मिश्र करून गोळी संध्याकाळी घ्यावी.

    ९) अपचन (Indigestion/ Constipation) - वृद्धापकाळात शरीराची हालचाल कमी असते त्यामुळे पचनक्रिया मंदावते, पोटाला जडपणा जाणवतो, त्यामुळे कधीकधी श्वास घ्यायलाही त्रास होतो. यावर सोपा उपाय म्हणजे धान्य (गहू/ तांदूळ/ ज्वारी/ बाजरी वगैरे) भाजून आहारात वापर करावा. पोट साफ होत नसेल तर पोळ्यांच्या पिठात योग्य मात्रेत एरंडेल तेल टाकावे. एरंडेल टाकल्यामुळे पोळ्या अतिशय नरम होतात, त्याच्या गिळगिळीतपणाचा त्रास अजिबात जाणवत नाही. मालवरोध होत असल्यास सर्रास पालेभाज्या खण्यावर जोर दिल जातो. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे आतड्यांमधला स्निग्धांश शोषला जातो आणि तो स्तर अधिकच कोरडा होत जातो. काहीतरी रेचक औषध घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही अशी परिस्थिति पालेभाज्या जास्त खण्यामुळे निर्माण होते हे लक्षात ठेवावे. कोठा साफ राहण्यासाठी आणखीन काही उपाय म्हणजे जेवणाच्या सुरुवातीला १ चमचा तिळाचे तेल आणि त्यात सैंधव मीठ पाव चमचा घालून गिळून टाकावे. तेलामुळे अन्नमार्गात स्नेहन होते आणि सैंधव मिठाने मळाचे खडे ठिसूळ होतात. दुसरा प्रयोग म्हणजे अर्धा कप गरम दूध, तेवढेच पाणी आणि चमचाभर तूप सकाळी रिकाम्यापोटी घ्यावे. यानेही पोट चांगले साफ होते.

    १०) मधुमेह (Diabetes) - भारताला मधुमेहाची राजधानी म्हणतात कारण जगात सर्वात जास्त माधुमेही रुग्ण भारतात आहेत. मधुमेहात दोन मुख्य प्रकार आढळतात. ज्यांना इन्सुलीनचे इंजेक्शन घ्यावे लागते आणि दुसऱ्या प्रकारात केवळ औषधाने उपयोग होतो. औषधे घेत असताना सोबत मोड आलेल्या मेथीचे २ चमचे सकाळी रिकाम्यापोटी चावून खाण्यामुळे वाढती रक्तशर्करा चांगलीच नियंत्रणात राहते.
    इतर फायदे - याने पचन सुधारते, सांधेदुखी कमी होते, हृदयाचे रक्ताभिसरण सुधारते, रोग प्रतिकरक्षमता सुधारते, अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी करण्यासाठी हा प्रयोग उपयोगी आहे.

    -डॉ. संतोष जळूकर

    वैयक्तिक सल्ल्याकरिता फोन +91 7208777773

      July 5, 2022


  • अॅ निमिया किंवा रक्त्पांढरीवर घरगुती उपाय

    पालक
    पालकामध्ये बी-12 हे जीवनसत्त्व आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे. तसेच फॉलिक अॅ सिडचाही तो मोठा स्रोत आहे. त्यामुळे पालकाचे सेवन केल्यास रक्ताोची कमतरता भरून निघते. पालक सूप, पालकाची भाजी यांचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे.

    डाळिंब
    डाळिंब खाल्ल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढते. कार्बोहायड्रेट आणि प्रथिने यांचे प्रमाण डाळिंबामध्ये खूप जास्त असते. काही प्रमाणात लोह आणि कॅल्शिअम यांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण झटपट वाढते आणि रक्त प्रवाहही योग्य राहतो. सकाळी अनशापोटी डाळिंब खाल्ल्यास किंवा डाळिंबाचा रस प्यायल्यास अॅरनिमियामध्ये फायदा होतो.

    बीट आणि सफरचंदाचा ज्यूस
    बीटामध्ये फॉलिक अॅासिड मोठ्या प्रमाणात असते तर सफरचंदात लोहाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अॅयनिमियामध्ये त्याचा फायदा होतो. अॅलनिमियाच्या रोगात एका बीटाचे रस आणि एक सफरचंदाचा रस यांच्यामध्ये दोन चमचे मध मिसळून दिवसातून दोनदा प्यायलाने फायदा होतो.

    टोमॅटो
    शरीरातील लोहाचे जास्त प्रमाण गरजेचे असते; पण ते लोह शरीरात शोषले जाणेही महत्त्वाचे आहे. टोमॅटोमुळे लोह शोषले जाते. रोजच्या रोज दोन टोमॅटो खाणे आणि एक ग्लास टोमॅटोचा ज्यूस पिणे हितकारक असते. त्याशिवाय सॅलड आणि स्वयंपाकातही टोमॅटोचा वापर अधिक प्रमाणात केला पाहिजे.

    खजूर
    खजुरामध्ये अधिक प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. शंभर ग्रॅम खजुरामध्ये 90 मिलिग्रॅम लोहाचे प्रमाण असते. दुधात दोन खजूर रात्रभर भिजवून सकाळी अनशापोटी चावूनचावून खाऊन आणि दूधही प्यावे. त्याशिवाय खजूर गरम पाण्यात भिजवूनही खाल्ल्यास फायदा होतो. ज्या व्यक्तींाना लॅक्टोजची अलर्जी आहे त्यांच्यासाठी पाण्यात भिजवलेले खजूर हा उत्तम पर्याय आहे.

    किसमिस
    किसमिसमध्ये लोह, प्रथिने, फायबर आणि सोडियम यांचे अधिक प्रमाण असते त्यामुळे अॅकनिमियामध्ये फायदा होतो. दहा ते बारा किसमिस रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी त्या पाण्यात मध टाकून किसमिस खाऊन टाकावे आणि पाणी पिऊन टाकावे.

    मध
    लोह आणि बी-12 जीवनसत्त्वाचे प्रमाण मधामध्ये जास्त असते त्यामुळे रोज मध खाल्ल्यास त्याचा नक्कीबच फायदा होतो. फळांचे तुकडे, दूध यांच्यात मध मिसळून खाल्ल्यास अॅचनिमियातील रक्ताातली कमतरता पूर्ण होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. डॉ. रोहिणी भगत

      January 18, 2017


  • घरी उटणे कसे बनवाल ?

    भारतातील प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटण्याचे आयुर्वेदिक महत्वही आहेच. दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे.

    पूर्वी उटणे घरीच तयार करीत असत. आजकाल ही पद्धत मागे पडली आहे. दिवाळीच्या वेळेस बाजारात अनेक प्रकारची उटणी विकत मिळतात.

    खाली दिलेले सर्व सामान आपणाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळु शकेल. त्यात गुढळ्या असल्यास फोडून घेऊन , चांगले चाळून घ्यावे व हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

    साहित्य

    मसूर डाळ पीठ 110 ग्राम
    आवळकाठी 10 ग्राम
    सरीवा 10 ग्राम
    वाळा 10 ग्राम
    नागर मोथा 10 ग्राम
    जेष्टमध 10 ग्राम
    सुगंधी कचोरा 10 ग्राम
    आंबेहळद 2 ग्राम
    तुलसी पावडर 10 ग्राम
    मंजीस्ट 10 ग्राम
    कापूर 2 ग्राम

    हे घरी बनवलेले उटणे आपण सणासुदीला वापरु शकता. उटणे फक्त दिवाळीतच का वापरायचे? घरच्या घरी बनवलेले उटणे केव्हाही वापरता येईल.

      October 28, 2016


  • श्री स्वामी नामाचे माहात्म्य !

    अक्कलकोट निवासी जगद्गुरू परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे सर्वांग सुदंर आहे. स्वामींच्या चरित्राचे पठण केल्याने साधा भोळा प्रांपचिक भक्त ते हटयोगी साधकापर्यंत सर्वांना हवे ते प्राप्त होते. दु:खित, पिडीत, मुमुक्षू जिवांना आधार देऊन दु:ख मुक्त करणारे दीनजनउध्दारक स्वामी महाराज हे केवळ शुध्द भक्तीभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या अल्प साधनेने ही अतिप्रसन्न होतात.

      July 21, 2018


  • चित्रपट संस्कृतीचे बदलते रूप

    चित्रपटसंस्कृती ही सातत्याने विकसित होणारी प्रक्रिया आहे. चित्रपट क्षेत्रातील बदल, त्यातील नवे प्रवाह, नवे तंत्रज्ञान, नवे व्यासपीठ या साऱ्याचा मोठा परिणाम चित्रपट संस्कृतीवर होत असतो. तो यापूर्वी होत आला आहे आणि यापुढेही होत राहील. चित्रपटसंस्कृतीतील महत्त्वाच्या बदलांचे माझ्या चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर केलेले हे विचारमंथन…

      January 23, 2024


  • महाराष्ट्राच्या अनेक “गीता”बबिता” संधीच्या प्रतीक्षेत

    "दंगल" चित्रपटानिमित्त हा खास लेख

    आजच "दंगल" हा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती पै.कु. गीता फोगट च्या जीवनावर सत्यकथा असलेला दंगल चित्रपट रिलीज झाला. गीता चा सर्व जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.प्रत्येक पालकांनी पहावा असा हा चित्रपट आहे.

    आजच्या घडीला महाराष्ट्रात पण अनेक गीता,बबिता संघर्षमय जीवन जगताना दिसून येतात.

    बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यातून आलेली पै.कु.सोनाली तोडकर हिने नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले,कोल्हापूर च्या रेश्मा माने हीने सुवर्णपदक जिंकले.

    मुरगुड कोल्हापूर च्या स्वाती व नंदिनी या एकदम गरीब घरच्या मुली जीची आई दुसऱ्याच्या घरी धुणे भांडी घासून मुलींना राष्ट्रीय पैलवान करून दाखवले.

    पुण्याच्या वंदना खेनंत या महिलेने 15/15 तास ट्रेव्हेल कंपनीत ओव्हरकाम करून आपली एकुलती एक मुलगी निशा ला पैलवान बनवले.

    या सर्वांच्या कथा ही दंगल पेक्षा कमी नाहीत. अनेक समस्यां घेऊन आज महिला कुस्ती कासवाच्या गतीने महाराष्ट्रात पुढे जात आहे.

    एकीकडे मुलांसाठी तालमी सहज उपलब्ध होतात पण मुलींच्या तालमी शोधून पण सापडणे मुश्किल.

    आळंदी देवाची येथील मा.दिनेशजी गुंड सरांची जोग महाराज कुस्ती केंद्र,राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांची राष्ट्रकुल कुस्ती केंद्र कोल्हापूर, NIS कोच अश्विनी बोऱ्हाडे यांची राजगुरूनगर येथील केंद्र,NIS कोच संदीप पाटील सर यांचे साई कुस्ती केंद्र आमशी, मुरगुड चे दादा लवटे सर यांचे कुस्ती केंद्र असे काही बोटावर मोजण्या एवढ्या महिला कुस्ती केंद्रे शिल्लक आहेत

    आज शासकीय दरबारी महिला कुस्ती वाढावी म्हणून एकही योजना नाही,पुरुषप्रधान संस्कृतीला चिटकून असणारे पालक मुलींना कुस्ती हा खेळ करियर साठी निवडू देत नाहीत तिथे गीता व बबिता यांच्या वडिलांनी म्हणजेच पै.महावीर फोगट यांनी आपल्या मुलींना पैलवान बनवले,नोकरी मिळवून देऊन तिचे आयुष्य सोन्याचे केले ही बाब नक्कीच महाराष्ट्रातील पालकांनी ध्यानात घ्यावी व आपल्या मुलींना आता तरी जुनाट रुढीप्रमाणे घरी न ठेवता कुस्ती कडे पाठवावे....अगदी त्या पदक जिंकत नाहीत तोवर जर पालकांचे लक्ष असेल तर मुली त्यांच्या घराचे,गावाचे,देशाचे नाव उज्वल करतील यात शंका नाही.

    महिला कुस्तीसाठी पुर्वी लिहलेला लेख व महत्वाचे मुद्दे मांडत आहे..

    कुस्ती सारख्या पुरुष प्रधान खेळात सुद्धा स्त्रियांनी इतिहास निर्माण केला आहे.
    आज कित्येक महिला मल्ल आपल्या झुंझार खेळीने जन माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
    महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदीपयमान मल्लपरंपरा आहे.
    मात्र महिला या खेळात येण्याचा ओढा तसा फारसा नाही.
    पण ज्या ज्या मुली आज कुस्ती सारखा खेळ आपल्या करियर चा विषय म्हणून निवडत आहे त्यांना खरच आज सरकारी पाठबळाची गरज आहे.
    महाराष्ट्रातील अनेक महिला खेळाडू आहेत ज्यांना जर शासकीय नोकरीत समावून घेतले तर त्या कुस्ती कडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यात यश मिळवतील.

    कुस्तीमध्ये करियरसाठी महिलांना सुवर्णसंधी

    कुस्ती मध्ये महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसतात.
    साहजिकच महिला कुस्तीगीरांनी संख्या कमी आहे म्हणून आजच्या घडीला त्यांना कुस्ती मध्ये करियर ची संधी आहे.
    जिथे मुलांना अनेक फेऱ्या अनेक दिगग्ज मल्लांच्यासोबत खेळाव्या लागतात तिथे केवळ काही फेऱ्या नंतर राज्य,राष्ट्रीय पातळीवर मुली जाऊ शकतात.
    या गोष्टीची पालकांनी जरूर दखल घ्यावी असे वाटते.

    महिला कुस्तीगीराना कुस्ती खेळातील प्रमुख समस्या

    कुस्ती हा खेळ तसा मनगट मस्तीचा,नाजूक रुसव्या फुगव्याना इथे काही अर्थ नसतो.
    त्यामुळे ज्या मुलींना कुस्ती हा करियर चा खेळ निवडावा असे वाटते त्यांनी आधी हे लक्षात ठेवावे की हा पुरुषांचा खेळ पुरुष बनूनच खेळावा लागेल.
    झोकून देऊन व्यायाम करावा लागेल,सकस आहार घ्यावा लागेल,योग्य झोप घ्यावी लागेल व यासह वस्तादनाचा मार सुद्धा खावा लागेल.

    या सर्व गोष्टींची तयारी करुन मगच हा खेळ निवडा कारण एकदा तुम्ही हा विषय निवडला आणि कालांतराने यातून निवृत्ती घेतली तर तुमचे पूर्वीचे आयुष्य जसेच्या तसे मिळेल याची खात्री नाही,कारण कुस्ती मध्ये जास्त ऊर्जेचा आहार,प्रामाणिक कष्ट यामुळे शरीर पुरुषाप्रमाणे टणक बनू लागते,सौन्दर्यावर परिणाम दिसतो.

    त्यामुळे कुस्ती करत असताना योग्य गुरु,मार्गदर्शक ची निवड करणे हे सुद्धा महत्वाचे असते.
    कारण कुस्ती निवृत्तीनंतर तुम्हाला लग्न करुन संसार सुद्धा करणे हा संस्कृतीचा भाग असतो.
    तुमचे सौन्दर्य सुद्धा टिकणे हे तुम्ही खात असलेल्या खुराकावर अवलंबून असते.
    कुस्ती नंतर वजन बेफाम वाढू शकते,यासाठी आहार,व्यायाम शास्त्र यांची माहिती असणारा गुरु जरूर असावा.
    ही अट पुरुषांना लागू नाही कारण पुरुषांची कुस्ती कारकीर्द वयाच्या 11 वर्षांपासून ते 15 वर्ष असते,तिथून पुढे कितीही वर्ष तो त्याच्या कर्तृत्वावर आपला फॉर्म टिकवू शकतो,मात्र मुलींची कुस्ती कारकीर्द 5 ते 8 वर्ष इतकीच असते आणि यानंतर वैवाहिक जीवन.
    त्यामुळे महिला मल्लानी या गोष्टीची जरूर काळजी घ्यावी.

    पण एकदा तुम्ही या वर्तुळातून बाहेर आलात तर समाजातील अनेक मुलींना सुर्यासारखा तेजस्वी आदर्श नक्कीच निर्माण कराल.

    आज गीता फोगट सारखी महिला पैलवान DYSP सारख्या क्लास वन पदावर केवळ कुस्तीमुळे पोहोचली आहे ,अनेक मुली पोलीस दलात आहेत.
    त्यामुळे कुस्ती मध्ये महिलना नक्कीच सुवर्णसंधी आहे.

    अभ्यासू महिला "कोच" ची आवश्यकता

    महिला कुस्ती मध्ये कोच महिला असणे सर्व दृष्टीने आवश्यक आहे असे मला वाटते.
    जिथे महिला कुस्ती सेंटर आहे तिथे केवळ महिलाच कोच असणे हि गरजेची बाब आहे.
    पण,अनेक ठिकाणी सराव करताना महिला मल्लच नसल्याने नाईलाजाने मुलांच्या सोबत सराव करणे मुलींना भाग पडत आहे.
    ही जशी फायद्याची बाब आहे तशीच तोट्याची सुद्धा आहे.
    तोटा एवढ्या साठी की ज्या वयात मुली कुस्ती कडे येतात ते वय म्हणजे त्यांच्या मनात अनेक भावभावनांचा गुंता सुरु होण्याचे वय असते त्यामुळे सहाजिकच नकळत त्यांच्या हातून चुका घडण्याची शक्यता असते व त्या चुका पुढे जाऊन जटील समस्यां बनतात.
    पालकांनी जो दृष्टिकोन ठेवून त्यांना कुस्ती मध्ये घातले असते ते ध्येय दूरच राहते व इतर समस्यां सोडवता सोडवता नाके नऊ येते आणि का हि चूक केली असे वाटू लागते.
    अश्या अनेक महिला पालकांच्या तक्रारी मला येतात पण त्यावर उघडपणे भाष्य करणे ना पालकांना शक्य आहे ना मला.
    यावर केवळ एकच उपाय कि मुलींना याची जाणीव अगोदर करून द्यावी असे मला वाटते.
    त्यासाठी त्यांची मने समजून घेणारी महिला कोच त्या त्या सेंटर वर उपलब्ध करून देणे हि काळाची गरज बनली आहे.
    आज अनेक सेंटर अशी आहेत जिथे पुरुष कोच नी अनेक आंतरराष्ट्रीय महिला पैलवान घडवल्या,मात्र प्रत्येक ठिकाणी असे होईलच असे नाही.
    या सर्वांचा अभ्यास करून महिला कुस्तीगीरांनी कुस्ती निवृत्तीनंतर कुस्तीच्या दीर्घ आभ्यासाकडे जरूर लक्ष द्यावे.
    NIS सारख्या शासकीय कोर्स मध्ये करियर ची सुवर्णसंधी आहे.
    पुण्याची पै.कु. अश्विनी बोऱ्हाडे ही NIS पतियाळा पंजाब येथे कुस्तीचा दीर्घ अभ्यास करुन महाराष्ट्राच्या महिला कुस्तीसाठी भव्य कामगिरी करण्याची स्वप्ने पाहू शकते तशी प्रत्येक महिला कुस्तीगीरांनी आपआपल्या परीने यासाठी योगदान देणे गरजेचे आहे तर भविष्यात महाराष्ट्रातून अनेक महिला कुस्तीगीर घडतील अशी खात्री वाटते..!
    अश्विनी बरोबर मुंबई ची कौशल्या वाघ देखील पंजाब मध्ये NIS डिप्लोमा पूर्ण करत आहे.

    महाराष्ट्राच्या सर्व महिला मल्लाना कुस्ती-मल्लविद्या परिवाराचा मानाचा मुजरा..!
    तुमच्या सारख्या महिला हे महाराष्ट्राचे खरे भूषण आहे.

    -- पै.गणेश मानुगडे
    कुस्ती-मल्लविद्या
    Www.facebook.com/kustimallavidya

      December 23, 2016


  • फ्रंटियर मेल (गोल्डन टेंपल मेल)

    मुंबईहून दिल्लीमार्गे थेट पाकिस्तानच्या सरहद्दीपर्यंत जाणारी पश्चिम रेल्वेवरील ही एक अति-महत्त्वाची गाडी. दोन रात्रींचा प्रवास करत ही गाडी मुंबईहून अमृतसर शहर गाठते. सरहद्दीपर्यंत जाणारी गाडी म्हणून पूर्वी तिचं नाव 'फ्रंटियर मेल' असं होतं. पुढे अमृतसर तेथील सुवर्णमंदिरामुळे प्रसिद्धीस आल्यानंतर या गाडीला 'सुवर्णमंदिर एक्सप्रेस' असं नाव ठेवलं गेलं. आज ही गाडी त्या दोन्ही नावांनी ओळखली जाते.

    ब्रिटिश राज्यकर्त्यांना मुंबईत बोटीनं उतरल्यावर दिल्ली गाठण्यासाठी मध्य रेल्वेपेक्षा पश्चिम रेल्वे मार्ग हा अधिक जवळचा होता. त्यामुळे ब्रिटिश राजवटीत ह्या गाडीचं महत्त्व बरंच होतं. व्हॉईसरॉय, ब्रिटिश सरसेनापती व इतर मान्यवर याच गाडीनं दिल्लीला जात असत. पुढे स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती राजेशाही थाटात याच गाडीनं प्रवास करीत. आजच्या घडीला ही गाडी हजारो पर्यटकांना सुवर्णमंदिराचं दर्शन घडवते.

    पंजाबचे प्रवासी म्हणजे अफाट सामान, त्यांत भलेमोठाले पेटारे, ट्रंका, खेचून नेता येणाऱ्या जम्बो बॅग्ज, त्याला साजेसे खाण्याचे अनेक कप्पी डबे, घर सजविण्याच्या अनेक शोभिवंत वस्तू, पेटिंग्ज... अशा असंख्य गोष्टी डब्या-डब्यातून दिसतील. त्यातच जर लग्नाचं वहाड असेल, तर मग माहौल औरच. गव्हाळ वा गौरवर्णीय, दागिन्यांनी मढलेल्या, नटलेल्या पंजाबी ललना, त्यांच्याबरोबर दणकट, उंचपुरे, दाढी-फेटेवाले सरदारजी. गाणं बजावणं, सतत चरत राहणं, पंजाबी भाषेत चालणाऱ्या हास्याच्या व गप्पागोष्टींच्या फैरींच्या फैरी या डब्यांमधून लग्नाघराचंच वातावरण तयार करतात. पंजाबी लोक असे दिलदार, की तुम्ही सहप्रवासी म्हणून त्यांच्या डब्यात असाल तर तुम्हालाही आपल्या मौजमजेत व खाण्यापिण्यात सामील करून घेतात.

    माझा वैद्यकीय महाविद्यालयातील मित्र परांजपे ह्या गाडीच्या महाप्रेमात असे. मेडिकल इंटर्नशिप करताना आम्ही पालघर स्टेशनजवळ राहत होतो. मुंबईहून निघालेली फ्रंटियर मेल रात्री साधारण ११ च्या सुमाराला पालघरजवळ तुफान वेगात येत असे. स्टेशनजवळच्या एका लेव्हल क्रॉसिंगच्या फाटकाजवळ आम्ही सर्व मित्र त्या वेळेच्या गप्पागोष्टी मारत या गाडीची प्रतीक्षा करीत असू. बहुतेक वेळा ती बरोबर वेळेत येत असे. दूरवरून प्रथम इंजिनाचा डोळे दिपविणारा उजेड दिसू लागला, की आम्हा सर्व रेल्वेप्रेमींचे चेहरे असे काही फुलत, की त्या आनंदाला तोड नसे. संपूर्ण गाडी जाईपर्यंत, अगदी गाडीच्या शेवटाला असलेला लाल दिवा दिसेनासा होईपर्यंत, मंत्रमुग्ध होऊन खिळून राहिलेले आम्ही नंतरच परतीची वाट धरत असू. अगदी आपणच अमृतसरपर्यंत प्रवास करीत आहोत अशी मनाची अवस्था असे. त्यात परांजपेचा रेल्वेटाईमटेबलचा गाढा अभ्यास! मग तेव्हा त्याची नुसती फ्रंटियर मेलवर आधारित प्रश्नमाला आजच्या 'कौन बनेगा करोडपती' या धर्तीवर सुरू होत असे. पहिल्या प्रश्नातच सर्व जण गारद होत. प्रश्न असे की, रात्री ११ वाजता किती फ्रंटियर मेल प्रवास करत असतील?

    तसंच, त्यावेळी त्या कोणत्या स्टेशनजवळ असतील? कारण, एकूण जाणाऱ्या २ व येणाऱ्या २ मिळून चार गाड्यांना विचारात घ्यायचं असे. उत्तर देणं सर्वांनाच अशक्य, परंतु या महाभागाला उत्तरं बरोबर माहीत असत व त्याचा खुलासा व खात्री तो टाईमटेबल दाखवून लगेचच करून देई.

    जवळजवळ १९६० सालापर्यंत या फ्रंटियर मेल गाडीला आलिशान फर्स्ट क्लासचा डबा (सलून) असे. तो डबा म्हणजे फिरता राजवाडाच होता. पुढे तो वातानुकूलित (ए.सी.) बनला. आता तर या गाडीला ६ ते ७ एअर कंडिशन्ड डबे आहेत.

    आता सुवर्णमंदिर नावाने ओळखली जाणारी ही गाडी बाराही महिने सतत पूर्ण आरक्षित असते. या गाडीची मुख्य खासियत आहे, चिकन बिर्याणी आणि मडक्यातील घट्ट दही. ती खाद्यसंधी खवय्यांना खूश करते. या फ्रंटियर मेलचा प्रवास आजही सुखाचा व आनंद देणारा आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य

      June 24, 2022


  • श्रीराम जन्म कथा

    श्रीरामाचा अवतार
    दुष्टांचा करण्या संहार
    जन्म घेतला पृथ्वीवर
    परमेश्वरानी ||१||

    रामासी लाभले मोठेपण
    तयाठायीं तन मन धन
    अर्पिती सर्व भक्तजन
    प्रेमभरे ||२||

    थोर ग्रंथ रामायण
    त्यातील जन्मकथा निवडून
    करीत असे अर्पण
    तुमचेसाठीं ||३||

    लंकाधीपती रावण
    होता शिवभक्त महान
    उन्मत्त झाला वर पावून
    त्रास देई सर्वाना ||४||

    युद्ध केले स्वर्गासी
    बंदी केले देवांसी
    छळूं लागला तयांसी
    दुष्टपणानें ||५||

    रावणाच्या त्रासा पोटीं
    देवांच्या मुक्तीसाठीं
    अवतार घेई जगत् जेठी
    श्रीराम जन्म घेऊनी ||६||

    आयोध्येचा दशरथ राजा
    आनंदी होती प्रजा
    सुखी बघण्यात मजा
    त्यास वाटे ||७||

    एक दुःख होते त्यास
    पुत्राविना जात दिवस
    पुत्र प्राप्त करण्यास
    प्रयत्न केले बहूत ||८||

    राजा जाई वशिष्ठ गुरु कडे
    घालूनी त्यास साकडे
    पुत्राविना वंश न वाढे
    मार्ग सुचवावा ||९||

    वशिष्ठ गुरु सुचविती
    यज्ञ करण्या सांगती
    पुत्रकामेष्टी यज्ञ महती
    आगीच असे ||१०||

    गुरुंचा आशिर्वाद घेऊनी
    राजा निघाला तेथून
    संकल्प केला दशरथांनी
    पुत्रकामेष्टी यज्ञाचा ||११||

    श्रृंगऋषी महान
    होते तप सामर्थवान
    विनवितसे जाऊन
    त्यांचे आश्रमी ||१२||

    पाद्यपुजा त्यांची करुनी
    भक्तिभावे विनवूनी
    यज्ञासाठीं पाचारण करुनी
    तयासी बोलावले ||१३||

    मंडव घातला भला
    यज्ञाचा भव्य सोहळा
    ऋषीगण ब्राह्मण सगळा
    यज्ञासी जमती ||१४||

    यज्ञांत आवाहन केले
    सर्व देव निमंत्रिले
    हविर्भाव सर्वासी दिले
    श्रृंगऋषीनें ||१५||

    स्पष्ट मंत्रोपचार म्हणून
    सर्व ऋषी एकसूर धरुन
    अग्नीसी टाकती हवन
    राजा दशरथ ||१६||

    प्रसन्न झाली यज्ञदेवता
    पायस कलश हातीं देता
    समान भाग राण्यांस वाटता
    पुत्र प्राप्त होई ||१७||

    दशरथाच्या राण्या तीन
    कौसल्या सुमित्रा नि कैकयी लहान
    आनंदी झाल्या पायस बघून
    यज्ञाचा प्रसाद ||१८||

    कैकयी बसली रुसून
    पट्टराणी मी लहान असूनी
    प्रथम भाग कौसलेस देवून
    अपमान माझा होई ||१९||

    प्रसाद घेवूनी बैसली
    मनीं विचार करुं लागली
    तत् क्षणी एक घार आली
    प्रसाद जाई घेऊन ||२०||

    सर्वजण होती चकीत
    कांही समजण्याचे आंत
    एक भाग घार नेत
    आकाशी उडाली ||२१||

    कैकयी झाली दुःखी
    शब्द निघेना मुखी
    प्रसंग ओडावला एकाएकीं
    तिचेवर ||२२||

    आपल्या प्रसादातील भाग
    देवून कैकयीस सांग
    सोडून द्यावा तुझा राग
    विनवितसे दोन्ही राण्या ||२३||

    चैत्रशुद्ध नवमीला
    राम जन्म झाला
    कौसल्या मातेला
    आनंद होई त्रिभुवनी ||२४||

    सुमित्रेचा लक्ष्मण
    कैकयीस भरत शत्रुघ्न
    चार पुत्र मिळून
    पितृत्व दिले दशरथासी ||२५||

    आदर्श जीवन जगला
    पितृआज्ञे वनवास सोसला
    मारिले दुष्ट रावणाला
    यशस्वी केले रामराज्य ||२६||

    रामाचा महीमा थोर
    परमेश्वराचा तो अवतार
    भक्तांचा करी उद्धार
    त्याचे आशिर्वादे ||२७||

    एक पत्नी, वचनी, बाणी
    सत्य आणि प्रेमळ वाणी
    अद्वितीय गुणांच्या खाणी
    रामासी ठरवी पुरुषोत्तम ||२८||

    रामाचे जीवन भव्य
    आदर्शमय ते काव्य
    दाखवोनी जगाला दिव्य
    ठाव घेई सर्वा मना ||२९||

    रामनामी मोठेपण
    जाईल तो उद्धरुन
    संकटे जात निघून
    आठवण येता त्याची ||३०||

    रामरक्षा स्तोत्र पठण
    करी तुमचे देह रक्षण
    नित्य नियमें वाचन
    मनोभावें ||३१||

    " शुभं भवतु "

    डॉ. भगवान नागापूरकर
    ५-०१११८३

      January 4, 2018


  • माऊ

    मला लहानपणापासून आवडणारा एकमेव प्राणी एकच, तो म्हणजे मनीमाऊ! गावी असताना कुठेही मांजरं दिसायची, ती राखाडी रंगाचीच. ती कधी जवळ यायची नाहीत. पकडायला गेलं तर फिसऽ करुन फिसकरायची. एखादं दुसरं पांढरं मांजर असेल तर ते चूल विझल्यावर राखेत बसून पार ‘गोसावडं’ झालेलं असायचं. कधी त्यानं दूधात तोंड घातलं तर त्याला माझी काकू चुलीवरची फुंकणी फेकून मारायची.. गावात फासेपारधी फिरताना दिसले की, मोठी माणसांनी सांगितलेलं आठवायचं.. फासेपारधी बोके पकडून नेतात व खातात..

      August 12, 2023


  • जपानने पर्ल हार्बर वर केलेला हल्ला – ७ डिसेंबर १९४१

    ७ डिसेंबर - आजच्या दिवशी १९४१ साली जपानने पर्ल हार्बर वर हल्ला केला.

    ७ डिसेंबर १९४१ रोजी सकाळी जपानी बॉम्बर्सनी पर्ल हार्बरमधील यूएस नेव्ही बेसवर कोणताही इशारा न देता कार्पेट बॉम्बिंग केली होती. जपानच्या एअरफोर्सने अचानक अमेरिकेवर हल्ला केला होता. त्यात अमेरिकेचे सुमारे २,५०० नागरिक मारले गेले होते. तसेच नेव्हीची १८ जहाजेही उध्वस्त झाली होती. हल्ल्यात अमेरिकेच्या आठपैकी सहा युद्धनौका, क्रूझर, डिस्ट्रॉयरसह एकूण २०० हून अधिक एअरक्राफ्ट उध्वस्त झाले होते. जपानच्या एअरफोर्सकडून अचानक झालेल्या या हल्ल्यात अमेरिकेचे २,४०३ सैनिक मारले गेले होते. तर १,१७८ जखमी झाले होते.

    ७ डिसेंबरचा हवाई बेटांवरचा सूर्योदय नेहमीप्रमाणेच निसर्गरम्य होता.रविवारीच्या सुट्टीच्या रम्य स्वप्नात बहुतेक सर्वजण अंथरुणात पहुडले होते. थोड्याच क्षणात तेथे वेगवेगळ्या आवाजांचा कोलाहल माजला. गोळ्यांचे सु..सु आवाज, फुटणाऱ्या बाँबचे आवाज, जाग्या झालेल्या अमेरिकन तोफांच्या गर्जना आणि या सर्वांच्या आगीत जळण्याचा एक विशिष्ट वास याने युद्धाचा तो रंगमंच व्यापून गेला. त्या रंगमंचाचा थोड्याच वेळात नरक झाला. पर्ल हार्बरवरील अमेरिकेचे सैनिक या अचानक हल्ल्याने थिजले. त्यांची विचारशक्ती काम करेनाशी झाली. ॲडमिरल किमेलचा चेहरा पांढराफटक पडला. त्याने कसेबसे स्वत:ला सावरले. फोर्ड बेटांचा ऑपरेशन ऑफिसर कमांडर लोगन रामसेने जपानने पर्ल हार्बरवर हल्ला चढविला आहे ही बातमी प्रथम जगाला जाहीर केली.

    जपानने दोन फेजमध्ये हल्ले केले होते. त्यासाठी त्यांनी फायटर जेट्स बॉम्बर्स आणि टारपीडो मिसाइल्सचा वापर केला होता. कमांडर मिस्तुओ फुचिदा यांच्या नेतृत्त्वात १८३ फायटर जेट्सद्वारे ओहियोच्या पूर्वेला तैनात असलेल्या जपानच्या सहा लढाऊ विमानांनी उड्डाण घेतले होते. या माणसाला देव मानणारे वैमानिक त्याच्या तुकडीत होते. पण त्याची खरी ताकद होती ते वैमानिक व पंखात असलेल्या २० मि. मी. तोफा व दोन मशिनगन. त्याची एकदम वर चढायची क्षमता व चपळपणा बघून अमेरिकेच्या भल्या भल्या वैमानिकांनी तोंडात बोटे घातली. या सगळ्यात विमानात भयंकर होती ती त्यांची टॉरपेडो डागणारी विमाने. या विमानांच्या तुकड्यांचा प्रमुख होता ले. कमांडर शिगेचारु मुराटा. याचे वय त्यावेळी ३२ होते व त्याला चीनच्या युद्धाचा चांगलाच अनुभव होता.

    विमान उडाविण्याची त्याच्याकडे नैसर्गिक क्षमता किंवा कला होती असे म्हटले तरी चालेल. एक विमान पेटले की तेथे आगीचा डोंब उसळत असे. त्या ज्वाळांचा स्पर्श शेजारच्या विमानाला झाला की त्याचीही तीच गत होत असे. असे भीषण हल्ले चालू असताना आश्चर्यचकित झालेल्या अमेरिकन सैनिकांनी मोठ्या शौर्याने प्रतिकार केला, परंतु सगळी परिस्थितीच त्यांच्या विरुद्ध होती. चांगली विमाने बाजूला काढत असताना समुद्रातून काळ्या धुरांचे काळे ढग आकाशात चढत होते. त्यांच्यासमोर आता विमानांचे भंगार पडले होते. जपानी विमानांनी तीस टक्क्याहून विमाने नष्ट केली होती व उरलेली विमाने उडण्याच्या परिस्थितीत नव्हती. इकडे हिकॅम विमानतळावर काही वेगळे घडत नव्हते. तेथे ७० बाँबर विमाने अशीच एकत्र उभी केली गेली होती. त्यांचीही अशीच कत्तल झाली. या विमानांमधे प्रसिद्ध बी-१७ विमानेही होती. या विमानांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. ती इतकी अभेद्य होती की त्यांना ‘फ्लाईंग फोर्ट्रेस’ असे म्हणत. या विमानांचा धसका जपानी वैमानिकांनीही घेतला होता. फोर्ड आयलंडवर ॲडमिरल बेलिंगरची टेहळणी करणारी फक्त दोन तीनच विमानेच उड्डाण करण्याच्या परिस्थितीत होती.

    तंत्रज्ञ जिवावर उदार हो़ऊन विमाने दुरुस्त करायची पराकाष्ठा करत होते पण त्यांच्या कामात नियमांचा व कार्यप्रणालीचा प्रचंड अडथळा येत होता. हल्ल्याच्या दुसऱ्या फेरीत "बॅटलशिप रो" वर हल्ला चढविण्यात आला. हा हल्ला बाँबर, उंचावरुन हल्ला करण्यार्याि विमानांनी व लढाऊ विमानांनीच केला कारण सावध झालेल्या शत्रूवर टॉरपेडो डागणार्यां विमानांनी हल्ला चढविणे आता मुष्कील होते. या हल्ल्यात जपानी विमानांचे लक्ष्य होते तोडमोड झालेल्या युद्धनौकांचा पुरता नाश करणे. इतका की त्यांची दुरुस्ती नजिकच्या काळात हो़ऊ शकणार नाही. जपानच्या वैमानिकांच्या दुर्दैवाने काळ्या धुराचा इतका जाड थर तयार झाला होता की त्यांना खालचे काही दिसेनासे झाले होते. त्यांनी नाईलाजाने त्यांचे लक्ष मग इतर नौकांकडे वळविले. याच हल्ल्यादरम्यान जपानी वैमानिकांच्या नजरेस पळून जाणारी नेव्हाडा नावाची २९००० टनी युद्धनौका पडली. एखाद्या कोकरावर वाघ झडप घालतो त्याप्रमाणे जपानी विमानांनी नेव्हाडाला घेरले व तिची लंगडतोड चालवली. ९ वाजून ४५ मिनिटांनी दुसरा हल्ला संपुष्टात आला. हा हल्लाही यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही. अर्थात या हल्ल्यात अमेरिकेच्या विमानतळांचा नाश करण्यात जपानला जास्त यश मिळाले. दोन्ही हल्ल्यात जास्त परिणामकारक कुठला झाला हे सांगणे तसे कठीण आहे. पहिल्यात नौका नष्ट झाल्या तर दुसर्याजत अमेरिकेचे हवाई सामर्थ्य खच्ची करण्यात जपानला यश मिळाले.

    थोड्याच वेळात त्या दोन हल्ल्यांमधे झालेल्या नुकसानीचे चित्र स्पष्ट होत गेले. फारच मोठा विध्वंस घडवून आणला होता त्या हल्ल्यांनी! कल्पनेच्या पलिकडे! एका तासाच्या आत अमेरिकेतील सर्व वृत्तपत्रातील रकाने या बातमीने भरुन गेले. ‘नौकांचे प्रचंड नुकसान’ ‘जपानच्या नौदलाचा हल्ला’ ‘फोर्ड आयलंडवर आगीचे थैमान’ ‘प्रतिकार झाला नाही’ ‘पर्ल हार्बरच्या सर्व नौकांचे पलायन’ अशा अनेक खर्याम खोट्या बातम्या छापून आल्या.
    आठच महिन्यापूर्वी (३१ मार्च १९४१) त्या दोघांनी म्हणजे बेलिंगर व मार्टीन यांनी एक गोपनीय अहवाल वर पाठवला होता., त्यात त्यांनी जपान हवाईपासून ३०० मैलाच्या आत आपल्या विमानवाहू नौका उभ्या करुन पर्ल हार्बरवर हल्ला चढवू शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यावर त्यांनीच एक उपायही सुचवला होता. त्यांच्या मते लांब पल्ल्याची विमाने वापरुन समुद्रात खोलवर टेहळणी केल्यास हा धोका टळू शकत होता. दुर्दैवाने त्यासाठी लागणाऱ्या विमानांची संख्या जास्त होती व जी काही थोडीफार होती ती या कामासाठी उपलब्धही करुन देण्यात आली नव्हती. हा अहवाल इतका अचूक होता की जणू काही त्या दोघांनी भविष्यच वर्तवले होते. त्यांचे नशीब की ते दोघे त्याच योजनेच्या तडाख्यात सापडले.

    जपानने यूएस पॅसिफिक फ्लीटचा प्रभाव कमी करण्यासाठी पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. या बॉम्ब हल्ल्याद्वारेच जपानने अमेरिका आणि ब्रिटनच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्क्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी ७ डिसेंबर १९४१ हा काळा दिवस असल्याचे म्हटले होते. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच अमेरिकाही दुसऱ्या महायुद्धात उतरला होता. त्यांनीही जपानच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. जपानला हिरोशिमा आणि नागासाकी अणुहल्ल्याच्या रुपात या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागले.

    -- जयंत कुलकर्णी
    संकलन : संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      December 7, 2021