वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

आता मूळ प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी थोडी प्राथमिक माहिती समजून घेणं जरूरी आहे.
थोडक्यात सांगतो.थायरॉइड नावाची ग्रंथी गळ्यात असते फुलपाखराच्या आकाराची अणि ती ‘टी3’ व ‘टी4 ‘ अशा नावाची दोन हार्मोन्स किंवा संप्रेरके बनवते. आता या दोन हॉर्मोनचे रिसेप्टर्स (receptors) शरीरातील बहुतांश अवयवांवर असतात. या हार्मोन्सचे प्रमुख काम आहे की, आपल्या खाण्यातून आलेल्या ऊर्जेचा वाटप करण्याचे प्रमाण (BMR कंट्रोल) नियंत्रणात ठेवणे (चयापचय क्रिया नियंत्रण).
असं समजा की, एखाद्या गाडीत जसं एक्सेलटर काम करतं तसं ही हार्मोन्स काम करतात. म्हणजे एक्सेलेटर जास्त झाली की गाडी जोरात पळते आणि कमी झाली की गाडी संथ होते.
अगदी तसेच टी 3 टी 4 जास्त झाल की हायपरथायरोडिझम (hyperthyroidism) म्हणजे हृदय हे ठोके वाढणे (धड धड), हाता पायाला कपकपी (tremors), वजन कमी होणे, जुलाब इत्यादी.
आणि टी 3 टी 4 कमी झाले की हायपोथायरोडिझम (hypothyroidism) म्हणजे वजन वाढणे, केस गळणे, सूज येणे, पोट साफ न होणे, थकावट, अंग दुखी, कमज़ोरी, उदासीनता, महीना पुढे जाणे इत्यादी. हा प्रकार खूप जास्त सामान्य (कॉमन) आहे.
हे झाले टी 3 आणि टी 4 कमी जास्त झाले की पण आता लक्षात घ्या की ही थायरॉइड ग्रंथी ही पिट्युटॅरी (pituitary) ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असते.ही pituitary ग्रंथी थायरोड स्टीमयूलेटिंग हॉर्मोन अथवा टी एस एच (TSH) बनवते अणि ह्याची मात्रा टी 3 टी 4 च नियंत्रण करते.जेव्हा टी 3 टी 4 कमी होते तेव्हा (टी एस एच) वाढते जेणेकरुन ग्रंथी ला चालना मिळेल.
आता मूळ उत्तराकडे येतो.टी 3 आनि टी 4 हार्मोन्स ही आयोडीनने बनतात.जेवणात आयोडीन फक्त दोन गोष्टीतून मिळते आणि ते म्हणजे टाटा मीठ म्हणजे आयोडीन युक्त मीठ (iodine fortified salt) आणि दुसरे म्हणजे जी गोष्ट समुद्रातून येते म्हणजे मासे.
(याशिवाय आयोडीन काही कफ सिरप, MRI CT स्कॅन चि कॉन्ट्रॅस्ट (contrast) डाय, हृदयविकार याच्या गोळ्या amiodarone यात देखील असते) आयोडीन हा मूळ घटक आहे ज्याने थायरोड हार्मोन्स बनतात म्हणजे आपल्याला जेवणात तेच पुरेश्या मात्रेत घेणे गरजेचे आहे.
याचा अर्थ जास्त मीठ खा असा मुळीच नाही. आपण नेहमीच्या आहारात जेवढे मीठ घेतो ते पुरेसे आहे. मासे खाणे आरोग्याला चांगले आहे.
अगोदर हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या बहुतांश भारतीयांना गोयटर (goiter) म्हणजे गळा मोठा असणे कॉमन होते. कारण भारतीय मातीत आयोडीन चि कमतरता होती म्हणूनच सरकारने मीठात आयोडीन घालणे बंधनकारक केले.
तुम्ही बर्याचदा इंटरनेट वर वाचलं असेल की सोयाबीन, ब्रूसेल्स मोड़, पालक, गोबी वगैर वगैरे खाण्याने थायरोइड होतो. मुळात ह्या सर्व गोष्टी रक्तातून आयोडीन पकडतात आणि ग्रंथी पर्यंत जाऊ देत नाहीत. परंतु हे प्रमाण फार कमी असत आणि योग्य प्रमाणात जेवणात आयोडीन असेल तर ह्याचा काहीच परिणाम दिसुन येत नाही.
शिवाय सोयाबीन वगैरे गोष्टी शरीराला आवश्यक असतात आणि आयोडीन ब्लॉक करण्यासाठी ह्यांची लागणारी मात्रा खूपच जास्त आहे जी नेहमीच्या जेवणातून पोहोचू शकत नाही. त्यामुळे ते खाणं टाळू नये व आहारात यांचा समावेश असावा.
तुम्हाला जर माझा लेख आवडला असेल तर हा लेख तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.अशाच प्रकारच्या नवीन माहिती साठी ब्लॉग ला बुकमार्क करून ठेवा.
धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र
डॉ निखिल प्रभु
मधुमेह स्पेशलिस्ट मुंबई
August 21, 2020
मधुमेह किंवा डायबिटीस, अगदी शाळकरी मुलांनाही परिचित असे हे शब्द. ह्याविषयी शास्त्रीय आणि किचकट भाषेत अनेक लेख किंवा पुस्तके आपल्याला वाचायला मिळतात. मात्र साध्या-सोप्या, कोणालाही समजेल-उमजेल अशा भाषेत मधुमेहविषयक महत्वाची माहिती ह्याठिकाणी आपल्यासाठी सादर करीत आहोत. ही माहिती फक्त औषधांबद्दलच नव्हे तर रोग, रोगाची कारणे, उपद्रव, संरक्षणाचे उपाय ह्यांसह दैनंदिन व्यवहारात आहार, विहार, आचरण, सवयी ह्यांविषयी देखील आहे.
April 7, 2015
जेव्हा एखादी वस्तू आरशासमोर उभी केली जाते तेव्हा त्या वस्तूपासून निघणारे असंख्य किरण त्या आरशाच्या पृष्ठभागावर जाऊन पडतात. प्रत्येक किरण त्या पृष्ठभागाशी वेगवेगळा कोन करत असतो. त्यामुळं अर्थातच तिथून परावर्तित होणारे किरणही वेगवेगळ्या कोनातून परत फिरतात. अर्थात ते सर्वच किरण एका विशिष्ट नियमाच्या चौकटीतच आपली दिशा ठरवतात.
June 24, 2011
डोळ्यांनी बोलणारी फक्त दोन माणसं मला या चित्रपटसृष्टीत आवडली – एक तो “निळ्या डोळ्यांचा जादूगार “(राज कपूर )आणि दुसरा हा! मराठीतला आपला चपखल शब्द वापरायचा तर हा “भोकरडोळ्या ” होता. पण इतकी बोलकी नजर अपवादात्मक ! त्याचे सारे संवाद ओठातून नंतर उमटायचे पण ते काम आधी डोळ्यांनी केलेलं असायचं.
May 7, 2022
अनेक संगीत-संबद्ध क्षेत्रात सहज विहार करणारा आणखी एक बंगाली संगीतकार म्हणून अभिमानाने उदाहरण देण्यासारख्या कलांकारात हेमंतकुमार यांचा नक्कीच समावेश करावा लागेल. इथे आपण गायक आणि संगीतकार, या दोन्ही पातळ्यांवर वावरताना दाखवलेली सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता, यांचे विश्लेषण करणार आहोत.
August 25, 2018
आडनावांच्या नवलकथा आणि गमतीजमती
February 24, 2011
१९६१ मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ, नागपूर अशा चार घटक संस्था मिळून महामंडळ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी, समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते.
May 27, 2022
चैत्र महिना रखरखत्या उन्हात एक नवी बहार घेऊन येतो.पान गळती होऊन आलेली चैत्रपालवी मनाला आल्हाद देते. लाडक्या माहेरवाशिणीच्या रुपाने चैत्र गौरीचे महिन्याभरासाठी घरोघरी आगमन होते. पुजेमधील अन्नपूर्णा निराळ्या आसनावर बसवून तिची मनोभावे पूजा केली जाते. तिला गोड नैवेद्य दाखवून नातेवाईक, आप्तेष्ट, आजुबाजूच्या सुवासिनींना हळदीकुंकवासाठी निमंत्रण केलं जातं.
अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वतीच असून तिचा वास महिनाभर आपल्या घरी असतो. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी घरापुढील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. त्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण म्हणतात.
पार्वतीच्या रुपाला शोभेल अशी तिची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत.
तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतिके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय.
गौरीचा लाडका पुत्र म्हणजे गणराय! त्याचे पण चित्र काढतात, कारण तो आपल्या आईला घरी नेण्यासाठी आलेला असतो.
अशी ही छान कल्पना या चैत्रांगण रांगोळीमागे आहे. ही रांगोळी काढणाऱ्याचे कौशल्य आहे खरे, पण ही रांगोळी काढल्यानंतर अतिशय सुरेख दिसते.
April 4, 2016
सध्या पाऊस जोरदार पडत आहे. दररोज वेगवेगळी धरणे भरल्याच्या आणि वाहून जात असल्याच्या बातम्याही येत आहेत. या बातम्यात अनेकदा काही वेगवेगळे शब्दप्रयोग केलेले दिसतात. ते असतात पाण्याच्या साठ्याच्या मोजमापाचे....
याबद्दलची थोडी माहिती घेउ या ?
1) TMC म्हणजे काय ?
2) Cusec म्हणजे काय ?
3) Cumec म्हणजे काय ?
इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. याचा नेमका अर्थ काय?
आपणास फक्त "लिटर" संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.
१) 01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.
01 tmc = 28,316,846,592 litres
२) 01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.
३) 01 Cumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.
उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.
म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.
याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.
महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ५ धरणे
१) उजनी ११७.२७ tmc
२) कोयना १०५.२७ tmc
३) जायकवाडी ७६.६५ tmc ( पैठण )*
४) पेंच तोतलाडोह ३५.९० tmc
५) पूर्णा येलदरी २८.५६ tmc
August 4, 2016
रुई किवा आक हे वृक्ष भारतात सर्वत्र आढळते.याच्या औषधी उपयोगाबाबत भारतीय आयुर्वेद शास्त्रात प्राचीन काळापासून उपयोग सांगितले आहेत.रुद्रावतार हनुमानाच्या पुजानामध्ये ह्या वृक्षाची फुले व पाने वापरण्याच्या पद्धतीवरूनही लक्षात येईल कि,बहुउपयोगी असल्यामुळेच हे झाड नष्ट होऊ नये म्हणून त्याला पूजनात स्थान दिले आहे.
March 20, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti