(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नोटबंदीनंतरच्या गावगप्पा

    येथे फक्त ज्या वैध नोटा बॅंकेत परत आल्यात त्याचाच विचार केला आहे. ज्या नोटा वैध नव्हत्या व बॅंकेत आल्या नाहीत त्याचा विचार केलेला नाही. अशा नोटांची संख्या ही कोणत्याही वेळी १० टक्के पेक्षा जास्त होती हेही विसरून चालणार नाही.

      September 4, 2018


  • मंगलाय सुमनो हरि:

    मंडळी सप्रे म नमस्कार !

    शनिवार २० एप्रिल २०२४ रोजी रात्री गडकरी रंगायतन —ठाणे येथे सुमन सुगंध हा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या गीतांचा कार्यक्रम बघण्याचा अभुतपूर्व योग जुळून आला !

    मुळात सुमनजींची गाणी म्हणजे बासुंदी ! त्यात साखर म्हणजे मंगला खाडिलकर यांचं निवेदन ! आणि यावर केशराची अनुभूति म्हणजे स्वत: सुमनताईंची उपस्थिती !असंही आमच्या सद्गुरुमाउली परमपूज्य कलावती आईंच्या यांच्या नात्यातील असल्याने सुमनताईंबद्धल अधिकच आदर व आपुलकी होतीच , काल मंगलाताईंच्या आग्रहामुळे वर वर्णन केलेला केशरयुक्त बासुंदीचा योग जुळून आला आणि म्हणून लेखाचं शीर्षक आहे.

    मंगलाय सुमनो हरि:

    २७ नक्षत्रांप्रमाणे २७ मराठी—हिंदी गाणी सादर केली गेली.मंदार आपटे , विद्या करलगीकर आणि माधुरी करमरकर असे सुरेल गायक असणार होते परंतू माधुरीजींना प्रकृति अस्वास्थ्यामुळे येता आलं नाही म्हणून निवेदक राजेंद्र पाटणकर यांच्या Timely Impact Punch प्रमाणे Impact Player म्हणून संगीतकार बाळ बर्वे यांच्या कन्या सुचित्रा भागवत या मंदार व विद्यासह गायनसेवेला उपस्थित होत्या.....

    मराठीचे वाल्मिकी ग.दि.माडगूळकर यांच्या शब्दांना स्नेहल भाटकरजींच्या संगीताने सजलेल्या गणेशस्तुतीने विद्यांनी सुरुवात केली : तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्वदिशे फडकती आणि मन पार ४५—५० वर्ष मागे गेले.....माझं माहेर — मुंबईतील एक उपनगर गोरेगांव पूर्व येथील टिळक नगर आणि आसपास चा सार्वजनिक गणेशोत्सव .....नगरातील रहिवाशी दत्त निवासमधील रमेश डेकोरेटर्सचे कदम यांच्या रेकाॅर्डमधे हमखास गणेश चतुर्थीच्या पहाटेला सुरु होणारी ही गणेशस्तुती.....किती वर्षं झाली हा मधाळ स्वर ऐकून , मला तर कधी कधी वाटतं की खरोखरंच गणपतीबाप्पाही एखाद्या रविवारी पार्वतीकडे हटून बसत असावा की सुमन कल्याणपूरचं "तुझ्या कांतीसम रक्तपताका" ऐकव तरंच मी झोपेतून उठून मुखमार्जन करीन! १९६८ सालचं गाणं अब तक ५६ झाले तरी तितकंच सुश्राव्य आहे आणि येणार्‍या कित्येक पिढ्यांमधेही सुखेनैव नांदेल हे निश्चित् !

    यानंतर १९६९ चा कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचा सल्ला विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केला व सुमनजींनी आपल्याला ऐकवला तो शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी — बकुळीच्या फुलांसारखाच नाजुक गोड मोहक आवाजात सुचित्रा मय झाला !

    दोन महिलांच्या आवाजाने वातावरण भारलेलं असताना मधुकर जोशींचे शब्द जे दशरथ पुजारींनी संगीतबद्ध केले ते आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे , घेऊन एकतारी गातो कबीर दोहे मंदारजींनी सादर केलं.

    मग जिथ्थे तिथ्थे च्या मंगलाजींच्या गमतीशीर टिपणीनंतर १९६१ च्या पुत्र व्हावा ऐसा मधील जनकवी ठाण्याचे पी.सावळाराम यांचे शब्द वसंत प्रभूंनी अजरामर चालीत बांधले ती सलज्ज तारुण्यातील तरल भावना विद्याजींनी सादर केली जिथ्थे सागरा धरणी मिळते , तिथ्थे तुझी मी वाट पहाते , वाट पहाते! यातल्या Waltz चा ( दादरा ठेका ) मंगलाताईंनी आवर्जून उल्लेख केला.

    यानंतर मजरूह सुलतानपुरींचे शब्द सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले बात एक रात की मधील गाणं देव आनंदच्या जन्मशताब्दीचं निमित्त साधत सुचित्रा मय झाले — न तुम हमें जानों.....

    १९६३ च्या सुभद्राहरण चित्रपटातील शांतारामजींचे शब्द आठवले जे प्रभाकर जोग यांनी संगीतमय केलेले आर्जव बघत राहूदे तुझ्याकडे सुचित्रा व मंदार यांनी सादर केले ! हल्ली नेहमी (लग्नाआधीपासूनंच) गुढगे टेकून अंगठीची लालूच दाखवत पुढे पुढे करणार्‍या ठोंब्या प्रियकराच्या त्या पाश्चात्य नाटकी मागणीपेक्षा प्रियेचं ( तेही जयश्री गडकरसारख्या सौंदर्यवती सुभद्रे चं ! )हे मराठमोळं गोड आर्जव हळुवार मोरपीस फिरवल्यासारखं मनाला स्पर्शून जातं.....

    ज्या काळात काकाचं ( पक्षी : जतिन ऊर्फ राजेश खन्ना ) मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू? गाजत होतं ( १९६९ ) त्याच काळात मराठमोळा रमेश देव सीमा ला पडद्यावर मधुसूदन कालेलकरांच्या शब्दांना एन.दत्तांच्या सुरावटीत विचारता झाला सांग कधी कळणार तुला , भाव माझ्या मनातला? आणि आपलंही प्रेम असल्याची कबुली असलेला पलटवार करते सीमा :रंग कधी दिसणार तुला लाजणार्‍या फुलातला? आणि हे भांव जिवंत केले मंदार —विद्या यांनी !

    प्रियेच्या आर्जवाने संमोहित प्रियकर मग मराठी सोडून हिंदीमधे प्रियेला हसरत जयपुरी यांचे शब्द शंकर जयकिशनच्या चालीमधे घोळवत राजकुमार धर्तीवर सांगू लागला तुमने पुकारा और हम चले आए , दिल हथेलीपर ले आए रे आणि हे प्रियकर प्रेयसीचे कबुलीजबाब सादर केले मंदार—सुचित्रा यांनी.

    सूफ़ी संगीतातील एक प्रकार मुनाजात याबद्धल भाष्य करत ( अल्लाह करम करना मौला तू रहम करना — या सुमनमय मधुर गीताचा उल्लेख करत ) मंगलाजींनी जानवर मधील एक अशीच मुनाजात ( पक्षी : प्रार्थना , स्तुति ज्यात स्वत:साठीही काही प्रार्थना असते ) जी मूलत: हसरत जयपुरींची होती व शंकर जयकिशनने त्यात उत्कट रंग भरून सुमनजींकडून गाऊन घेतली होती मेरे संग गा , गुनगुना कोई गीत सुहाना ती सादर केली विद्यांनी ...

    यानंतर मंत्रमुग्ध श्रोत्यांना परत मराठी भावविश्वात आणलं मंगलाताईंनी , अशोक जी. परांजपे यांच्या शब्दांना नादमय माधुर्यता देणार्‍या अशोक पत्की नामक अवलिया जादुगार संगीतकाराच्या गाण्याने केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर आणि हा गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर सुचित्रा यांनी व्यक्त केला... संचारी या बंगाली संगीत प्रकारावरून हे संगीत आल्याचं मंगलाताईंनी नमूद केलं.....

    समुद्राच्या लाटांवर मनाला तरंगत ठेवणार्‍या अशोक जी. परांजपे यांच्या शब्दांना तितकीच प्रवाही माधुर्यता देणार्‍या अशोक पत्की नामक अवलिया जादुगार संगीतकाराच्या गाण्याने श्रोत्यांना संगीताच्या लाटांवर आरूढ केलं नाविका रे वारा वाहे रे , डौलानं हाक जरा आज नांव रे म्हणत विद्या यांनी. भटियाली संगीत प्रकारापैकी एक संगीत असं मंगलाताईंनी आवर्जून नमूद केलं.....

    यानंतर कलाकारांनी एक दृतगतीतील चौकार खेळला : सुचित्रा — अरे संसार संसार मोलकरीण , विद्या — असावे घरटे अपुले छान, मंदार विद्या — आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही , विद्या या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार विंगेमधे बसलेल्या सुमनताईंना उद्देशून मुंबईचा जावई मधील गदिमा—सुधीर फडके यांचे कशी करू स्वागता? सादर केलं विद्या यांनी.....

    आणि या स्वागतगीतानंतर मंगलाताई रंगमंचावर घेऊन आल्या वात्सल्यमूर्ती , पद्मभूषण , यंदाच्या म.टा.गौरवप्राप्त सु रांचा म नमोहक न जराणा अर्थात् सुमन कल्याणपूर यांना ! वय वर्षे ८७ फक्त ! पण मंगलाताईंनी त्यांना बोलतं केलं आणि त्यांनीही तितक्याच मार्मिक आणि मिश्किलपणे श्रोत्यांशी सुसंवाद साधला ! आनंद मनी माईना , केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर , जिथ्थे सागरा धरणी मिळते..... अशी गाणी गायल्या..... यानंतर ॠतुरंग तर्फे त्यांना एक मानपत्र अर्पण करण्यात आलं ज्याचं वाचन अतिशय छान निवेदन करणार्‍या राजेंद्र पाटणकर यांनी आधी केलं , शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम एक लक्ष एक हजार एक यासह सुमनताईंचा सत्कार करण्यात आला ! ज्यांनी कित्येक दशकं आपले अष्टौप्रहर सुश्राव्य केले अशा एका थोर व्यक्तीमत्वाचा सत्कार होताना आपण त्याचे साक्षीदार होणं ही एक परमभाग्याची गोष्ट आहे महाराजा !

    यानंतर ( फक्त पाचच मिनिटं सांगून पंधरा मिनिटांचं ! )मध्यंतर झालं.

    मध्यंतरानंतर.....

    १९६३ च्या दिल एक मंदिर मधील जानेवाले कभी नहीं आते या मंदारजींच्या आर्त टाहोनंतर हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन यांचं दिल एक मंदिर है ~ असं विद्या यांनी विदित केलं.....

    १९६८ चं रमेश आणावकर यांचं दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं मृदुल करांनी छेडित तारा ऐकवत विद्या यांनी भाव विभोर केलं.....

    यानंतर मधुकर जोशी यांचं गीत जे मूलत: रिमझिम झरती श्रावणधारा असं होतं , ते सुमनजींनी पावसाच्या झिमझिम झरती श्रावणधारा असतात ना? असं म्हटल्यावर मधुकरजींनी पण "बरं , झिमझिम तर झिमझिम !" असं मान्य केल्याचा किस्सा मंगलाताईंनी सांगितला आणि श्रोत्यांमधे खसखस पिकली आणि त्या पार्श्वभूमीवर दशरथ पुजारींचे नादमय स्वर सुचित्रामय झाले.....

    कुठल्याही स्त्रीच्या ह्रृदयाचा एक कोपरा ज्या माहेराने व्यापलेला असतो , त्या माहेरी जाऊन सुवासाची बरसात करणारे आणि डोळ्यांत पाणी आणणारे कृ.ब निकुंब यांचे शब्द कमलाकर भागवत यांच्या सुमधुर संगीताने नटलेले — घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात हे आर्त भाव सुचित्राजींनी गाऊन श्रोत्यांना हेलावून सोडलं.....

    हे गाणं जसं सुमनजींनी गायलंय तसंच , ए.पी.नारायणगांवकर यांच्या संगीतात कालिंदी केसकर यांनी आणि वसंत देसाई यांच्या संगीतात फैय्याज यांनीही गायलं आहे ! एकाच गाण्याला ३ वेगवेगळ्या संगीतकारांच्या चाली आणि तीन वेगवेगळ्या सुश्राव्य गायिकांनी अजरामर केलेलं हे मराठीतील पहिलंवहिलं भावगीत असावं आणि तेही या जगातील सर्वश्रेष्ठ अशा स्त्री च्या भावनांना वाट करून देणारं ! आपण मराठी असल्याचा अभिमान वाटत ऊर भरून येतो महाराजा !

    १९६५ साली मजरूह सुलतानपुरींचे जादुई आर्जव संगीतकार ख़य्याम यांनी स्वरबद्ध करत मुहब्बत इसको कहते हैं चित्रपटातील माझ्या माहेरच्या गोरेगांवातील छोटा काश्मिर ऊर्फ Observation Post ( O.P. ) येथे चित्रिकरण झालेलं ठहरिये होशमें आ लूँ तो चले जाइयेगा हे गाणं रफ़ी आणि सुमनजींच्या त्या लाडिक ऊँ हूँ सहित मंदार सुचित्रा यांनी सादर केलं.आणि पडद्यावर मास्टर विनायक कन्या नंदा आणि कपूर कुलोत्पन्न तेहेत्तीस दातांचा देखणा शशी कपूर ! एक दात डाव्या बाजूच्या वरच्या जबड्यात अधिक असताना फारच देखणा दिसणारा शशी कपूर हे हिंदी सिनेसृष्टीला पडलेलं ३३ दातांचं पहिलं स्वप्न ( आणि तसंच दुसरं स्वप्न म्हणजे मौशुमी चटर्जी ! )

    यानंतर विद्या यांनी दिल एक मंदिर मधील शैलेंद्र यांचं जूहीकी कली मेरी लाडली हे शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं लडिवाळ नटखट गाणं सादर केलं.....

    १९५१ साली मल्हार चित्रपटात इंदिवर यांच्या शब्दांना रोशन यांनी संगीतबद्ध करत एक गाणं राग गौड मल्हार मधे लताकडून गाऊन घेतलं होतं गरजत बरसत भीजत आईलो पुढे ९ वर्षांनी अब्दुल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांनी लिहिले गाणं रोशन यांनी याच चालीत बरसातकी रात चित्रपटात कमल बारोट आणि सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेतलं गरजत बरसत सावन आयो रे जे विद्या—सुचित्रा यांनी सादर केलं.....

    १९६५ साली एक चित्रपट आला नूरमहल ज्यात एक गूढ वाटणारं गाणं होतं सबा अफ़गाणी यांचं , जे संगीतबद्ध केलं होतं जानी बाबू क़व्वाल यांनी सुमनजींच्या आवाजातील मेरे मेहेबूब न जा ( पडद्यावर चित्रा आणि जगदीप ) — विद्या यांनी सादर केलं.

    १९६५ सालीच ३३ दातांच्या देखण्या शशी कपूरचा नंदासोबत एक सिनेमा आला होता जब जब फूल खिले आणि आनंद बक्षींच्या गीतांना कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध करून अजरामर केलं.यातलं कबूलीजबाब धाटणीचं गाणं सादर केलं मंदार विद्या यांनी : ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे यानंतर १९६८ च्या ब्रह्मचारी मधील हसरत जयपुरी—शंकर जयकिशन यांचं आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जबानपर सादर केलं मंदार—सुचित्रा यांनी ! ( अख्ख्या दृष्ट लागण्यासारख्या कार्यक्रमात या गाण्यातील सॅक्सोफोनची धून नीट न वाजण्याची दृष्ट लागलेलं हे एकमेव गाणं महाराजा ! )

    १९६१ च्या माॅडर्न गर्ल मधे आपल्या अजागळ पेहेरावावरून हिंदी सिनेसृष्टीमधे उपाधी लाभलेल्या गुलशन बावरा च्या गीताला स्वरबद्ध केलं रवी यांनी आणि ते ये मौसम रंगीन समाँ सादर केलं मंदार—विद्या यांनी.

    मराठी चित्रपटसृष्टीमधे चंद्राला निंबोणीच्या झाडामागे झोपवण्याची किमया करत अजरामर अंगाईगीत लिहिणार्‍या मधुसूदन कालेलकर यांच्या शब्दांना एन.दत्ता यांनी स्वरबद्ध केलं आणि निंबोणीच्या झाडामागे सादर केलं विद्या यांनी.....

    गदिमा—बाबूजी यांच्या एकटी मधील मातृह्रृदयाने मुलाची काढलेली काल्पनीक दृष्ट सुचित्रा यांनी काढली : लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू १९६४ च्या साँज और सवेरा मधील नायक—नायिकेची खंत हसरत जयपुरींनी मांडली व शंकर जयकिशन यांनी स्वरबद्ध केली अजहु न आए बालमा , सावन बीता जाय सादर केलं मंदार आणि विद्या यांनी !

    मंडळी , काही काही कार्यक्रम संपूच नयेत असं वाटतं , पण कालमर्यादा असते त्यामुळे साँज और सवेरा ने सुमधुर केलेली बेला सावन बीता जाय या सुरेल तक्रारीवर संपली आणि कार्यक्रम संपला मंगलाय सुमनो हरि: आणि अस्मादिक् आणि सौभाग्यवती संगीताय रमत: घरी: आलो !

    असा "हा सुमन सुगंध आमच्या जीवनात दरवळला तसा येणारी अनेक वर्षे हा लेख वाचणार्‍या रसिक वाचकांच्या जीवनातही दरवळो !" ~ हीच पाचां उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण ! जाणिजे ,

    लेखनालंकार ,
    मर्यादेयं विराजते !
    © उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
    सोमवार २२ एप्रिल २०२४ दु.१.१७ वा.

      June 4, 2024


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ४

    वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगतिमतिश्चाधिदैवादितापैः
    पापै रोगैर्वियोगैस्त्वनवसितवपुः प्रौढिहीनं च दीनम् ।
    मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धूर्जटेर्ध्यानशून्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥४॥

    बरे पुढे वय वाढत गेल्यानंतर तरी हे त्रास कमी झाले का? तर नाहीच. उलट त्यात वार्धक्यामुळे आलेल्या नवनवीन त्रासांनी भरच घातली.
    कोणते त्रास?तर आचार्य श्री म्हणतात,
    वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगति - म्हातारपणामुळे इंद्रियांची गती क्षीण झाली. आता त्यांना हालचाल करणेही कठीण झाले आहे.
    मतिश्च- मती अर्थात स्मरणशक्तीची देखील तीच अवस्था आहे. काही वेळापूर्वी केलेले कार्यही आठवत नाही.
    आधिदैवादितापैः - आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक अशा त्रिविध प्रकारच्या तापांनी,
    पापै - आज वर जीवनात केलेल्या विविध पापांनी,
    रोगै:- त्यांचा परिणाम होऊन झालेल्या विविध रोगांनी,
    वियोगै:- उपयुक्तता कमी झाल्यामुळे नातलगांनी देखील तोंड फिरवल्यामुळे आलेल्या वियोगानी,
    त्वनवसितवपुः- अस्थिर झालेल्या शरीरानी,
    प्रौढिहीनं च दीनम् - माझी सगळी प्रौढी गळून गेली आहे. आता मी हीन-दीन अवस्थेला पोहचलो आहे.
    मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो- मात्र अद्यापी माझे मन त्या खोट्या मोहांमध्ये,अभिलाषा मध्येच भ्रमण करीत आहे. धूर्जटेर्ध्यानशून्यं - ते मन भगवान शंकरांच्या ध्यानाने अजूनही शून्यच आहे.
    भगवंताचे ध्यान करीत नाहीच आहे.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझे हे अपराध क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 23, 2020


  • जागतिक पियानो दिवस

    दी चित्रपटांतील सुमधुर संगीतातून ठसा उमटविलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकार जोडगोळीतील शंकर यांचा पियानो पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात तयार करण्यात आलेला हा पियानो सुमारे ९० वर्षांपूर्वीचा आहे. स्कीडमायर कंपनीच्या या अप्राइट पियानोमध्ये साडेसात सप्तकातील ८८ पट्ट्या आहेत. संगीतकार नौशाद हे स्वत: उत्तम पियानोवादक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या अनेक गाण्यांत पियानोचा वापर केला आहे. ‘अनमोल घडी’ या चित्रपटात ‘जवाँ है मुहब्बत हसीं है जमाना..’ या नूरजहाँने गायलेल्या गाण्यात पियानोचे दर्शन घडते.

      March 29, 2022


  • रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

    जगातले शीतयुध्द आता संपले. झपाट्याने बदलत असलेल्या शासकीय नीतीनुसार झांझीबारला जगभरच्या व्यापार-शर्यतीत बेधडक उडी घेण्यासाठी सज्ज राहावे लागेल याची जाणीव या अहवालात प्रकर्षाने सादर होते. तसे पाहिले तर आफ्रिकेच्या पंचावन्न देशातही लोकांची निदर्शने, संघर्ष होत असतात. मात्र विकास आराखड्यांना होणाऱ्या विरोधाचे प्रमाण जवळजवळ नाहीच. आता झांझीबारमध्ये आहे प्रतिक्षा समृध्दीची. सध्या चालू आहे आराखड्याची कार्यवाही. यामुळे जागतीकीकरणाबरोबर व्यापार-अर्थ नीतीच्या उदारीकरणाची तयारीही देशाला करावी लागणार आहे. झांझीबार मसुद्यात संगणक जाळ्याच्या विस्ताराला विशेष महत्व दिले आहे. अंमलदारांचा व सामान्य माणसाचा आता एकच ध्यास आहे - आमचे दारिद्र्य लवकर संपावे आणि दहा लाख लोकवस्तीच्या या सुंदर बेटावर सुखाचे दिवस यावेत.

    – अरुण मोकाशी

    परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.

    हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.

    हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
    https://marathibooks.com/books/zanzibar-diary/

    किंमत : रु.२००/
    सवलत किंमत : रु.५०/-

      January 4, 2025


  • चला करू स्वातंत्र दिन Meaningful

    नुकताच आपण ऑगस्ट 2015 रोजी भारत 69 वा स्वातंत्र दिन साजरा केला. स्वातंत्र मग ते कशाचेही मिळो आपण ते नेहमीच एनजाॅय करतो. मी आहारतज्ञ असल्याने मला असे वाटते की ह्या स्वातंत्र दिन पासून आपण रोगांपासून फ्रीडम (Freedom from Illness - Lifestyle Diseases) एनजाॅय करू या. आजार दोन प्रकारचे असतात – कम्यूनिकेबल आणि नाॅन कम्यूनिकेबल. सध्या प्रौढांमध्ये आणि लहान मुलांमध्ये सुद्धा लाईफ स्टाईल डिसीजेस (जीवनशैली रोग) वाढताना दिसत आहे. मुले ही आपल्या देशाचं भविष्य असल्याने मुलांच्या आरोग्या विषयी काळजी घेणे अत्यंत मोलाचे ठरेल.

    लाईफ स्टाईल डिसीजेस म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?
    लाईफ स्टाईल डिसीजेस हे नाॅन कम्यूनिकेबल डिसीजेस म्हणून ही ओळखले जातात. व्यक्तीची स्वत:ची अशी जगण्याची एक जीवनशैली असते. अशा काही जीवनशैली असतात की त्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो किंवा एखाद्या रोगाचा त्रास होऊ शकतो. आहारात, जीवनशैलीत बदल केल्यास वाढलेला धोका कमी होऊ शकतो अशा रोगांना नाॅन कम्यूनिकेबल डिसीजेस म्हणून संबोधले जाते. लठ्ठपणा, टाईप 2 डायबेटिस, कॅन्सर, हायपरटेंशन, स्ट्रोक, ह्रदय रोग, COPD, आणि Atherosclerosis ह्या रोगांना लाईफ स्टाईल डिसीजेस म्हणून संबोधले जाते.

    हे रोग बरे करण्यासाठी पैशाचा अपव्यय तर होतोच पण ह्या रोगामुळे होणारी "Disability adjusted life years" पण जास्त असते आणि ही 44 ते 59 ह्या वयोगटात जास्त प्रमाणात दिसते. तसेच ह्या आजारामुळे प्रेझेंटीझम आणि अॅबसेंटीझम वाढताना दिसत आहे. ह्या आजारांचे ओझे किती जास्त आहे हे खालील आकडेवारी वरून लक्षात येईल.

    • साधारणतः 40% हाॅस्पीटल मध्ये दाखल केलेले रूग्ण,आणि 35% आऊट पेशंट्स व्हिजिट ह्या लाईफ स्टाईल डिसीजेस साठी आढळतात
    • भारतीय व्यक्तींमध्ये रोगाचे निदान लहान वयातच होते - डायबेटिस 51 व्या वर्षी तर US मधे 58 व्या वर्षी; स्ट्रोक ने बाधीत झालेल्या 8 पैकी 1 व्यक्ती 40 वर्षा खालील आढळते; ह्रदय रोगाचा आस 50 वर्षा एवजी 20-30 वर्षातच दिसू लागला आहे; 40 वर्षा वरील रूग्णांचे प्रमाण 10% वरून 35 - 40% पर्यंत वाढले आहे.

    स्image-1त्रीया आणि मुख्यत्वे कामावर जाणार्या स्त्रिया ही अशा आजारांमधे मागे नाहीत असे सर्वेक्षणा वरून आढळले आहे. Associate Chember of Commerce and Industry (ASSOCHAM) ह्यांनी गेल्या वर्षी कामावर जाणार्या स्त्रियांच्या आरोग्याची तपासणी केली तेव्हा त्यांना

    • 32 - 58 ह्या वयोगटातील स्त्रियांमध्ये आरोग्याची समस्या जास्त आढळल्या
    • 4 पैकी 3 स्त्रियांमध्ये आरोग्याच्या काही ना काही तक्रारी असल्याचे निष्पन्न झाले.
    • 78% स्त्रियांमध्ये लठ्ठपणा, डिप्रेशन, डायबेटिस, हाय कोलेस्टरॉल, ह्रदय रोग आणि किडनीच्या समस्या आढळल्या
    • 42% स्त्रीया लाईफ स्टाईल डिसीजेस मुळे त्रस्त होत्या तर 22% स्त्रियांना क्रॉनिक आजार होते.

    हे वाढणारे ओझे कमी करायचे असल्यास आपण सर्वांनाच हेल्दी प्रॅक्टीस आणि मुख्यत्वे करून योग्य आहार, दररोज व्यायाम आणि कामाच्या ठिकाणी वेलनेस प्रोग्रॅमचे आयोजन करावे लागेल. प्री डायबेटिस, प्री हायपरटेंशन असलेल्या व्यक्ती आणि लठ्ठ लहान मुले व तरूण पिढी ह्यांची विशेष करून काळजी घ्यावी लागेल म्हणजे आपोआपच ओझे कमी होण्यास मदत होईल.

    प्रीहाइपरटेंशन - ब्लडप्रेशर नाॅर्मल पेक्षा जास्त पण हायपरटेंशनच्या रेंज पेक्षा कमी

    प्री डायबेटिस - नाॅर्मल साखरे पेक्षा जास्त पण डायबेटीक व्हॅल्यू पेक्षा कमी जर आपण प्रीव्हेंटीव प्रॅक्टीस अंगीकारली तर

    •image-2 होणार्या त्रासा पासून मुक्ती
    • आयुष्याची कालमर्यादा तर वाढतेच पण आरोग्यदायी वयोमान ही वाढ होते.
    • हाॅस्पीटल मध्ये भरती होणे, अचानक मृत्यू येणे, आणि रोगांपासून होणारे त्रास कमी होतात किंवा टाळता ही येऊ शकतात
    • औषधांवरील खर्चावर नियंत्रण येते. प्रयोग असे दाखवतात कि रोग टाळण्यासाठीच्या उपाययोजने वर फक्त 1/3 पर्यंतचा खर्च होतो तसेच उपाय योजना उशीरा सुरू केल्यास खर्चात 10% - 20% वाढ होऊ शकते.
    • 60% पर्यंत डायबेटिस व ह्रदय रोगाचा आस कमी होऊ शकतो
    • ह्रदय रोगामुळे होणार्या मृत्यू मध्ये वर्षाला फक्त 1% घट झाली तर 2030 साला पर्यंत 87% पर्यंत पर कॉपीटा इनकम मध्ये वाढ होईल ह्या वरून हेच सिद्ध होते की आपण आजपासून प्रीव्हेंटीव प्रॅक्टीस सूरू केली तर लाईफ

    स्टाईल डिसीजेस पासून फ्रीडम मिळवणे सहज शक्य होईल.

      August 18, 2015


  • शक्तिपात योगमार्गातील अधिकारी प.पू. श्री नारायणकाका

    ११ सप्टेंबर २००७ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे संपन्न झालेल्या विश्व शांती संमेलनांत (World Peace Conference) त्यांनी जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींसमोर विश्वाच्या कल्याणासाठी भारतीय तत्वज्ञान आणि शक्तिपातयोग यांची कास धरणे किती अत्यावश्यक आहे हे पटवून दिले. त्यावेळी उपस्थित सर्वांकडून पूर्वाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून घेतले. उपस्थित मान्यवरांना पूर्वाभ्यासामुळे विलक्षण शांतीचा अनुभव आल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आणि पत्राद्वारे प्रशंसा केली.

      November 6, 2020


  • आॅडी

    रस्त्यावर, बस-ट्रेनमधे आपल्याला भेटणारी सर्वसामान्य माणसं आपल्याला त्यांच्या नकळत काय ‘दृष्टी’ देऊन जातात..! अट एकच, आपण त्यांच्याशी बोलायचं किंवा त्यानी बोलायचा प्रयत्न केला तर प्रतिसाद द्यायचा..

      August 8, 2016


  • मदर टेरेसा – दीनदुबळ्यांची आई

    ती तिच्या नावाप्रमाणे दीनदुबळ्यांची ‘ आई’ होती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे दीनदुबळे लोक कोणत्याही एका विशिष्ट भागाचे, देशाचे वा खंडाचे नव्हते तर संपूर्ण जगातील होते. मानवसेवेचे एवढे मोठे कार्य तिने केले होते म्हणूनच तिला १२७९ सालचे शांततेचे नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आले आणि हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिल्याबद्दल सार्‍या जगातून स्वागत करण्यात आले. ही दीनदुबळ्यांची आई म्हणजेच मदर टेरेसा.

      August 24, 2023


  • राखेतून सोन्याचा धूर!

    तार्किकदृष्ट्या या आगींमागील कारणांचा वेध घेतल्यास अशा घटनांमागे मोठे अर्थकारण असल्याचे सहज स्पष्ट होते. कापूस खरेदी आटोपलेली असते, कापसाच्या गठाणी बांधून तयार झालेल्या असतात. बाकी असते ती केवळ प्रतवारी आणि मूल्यांकन.

      April 24, 2005