वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.
रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तयस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते. शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.
कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.
संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते. याप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
February 9, 2017
स्त्री यांना संधी मिळाली की त्या तिचे सोने करतात. स्त्रीशक्तीने आज आपली ताकद दाखविली आहे. आधुनिक स्त्रीचा विचार करताना ती आज लाचार नाही हे सहज दिसते. तिला शिक्षण मिळाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात, विश्वाच्या प्रांगणात तिने पाऊल टाकले. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांनी तर अवकाशाचा वेध घेतला.
July 29, 2023
प्रकाशन दिनांक :- 23/01/2005
ऐहिक सुखासाठी पैसा लागतो, तो कमवायचा आणि तो कमवण्याच्या नादात मात्र सुख भोगायला वेळच शिल्लक ठेवायचा नाही, अशी बहुतेकांची परिस्थिती असते. अलीकडील काळात सुख आणि प्रतिष्ठा या दोन्ही संकल्पना इतक्या उथळ झाल्या आहेत की, चार पैसे फेकून त्या सहज प्राप्त होऊ शकतात असाच सगळ्यांचा समज झाला आहे.
जगण्याच्या गणितातला फोलपणा स्पष्ट करताना एका तत्त्ववेत्त्याने मांडलेले त्रैराशिक सर्वविदित आहे.
January 23, 2005
मी अजूनही मोबाईल फोन वापरत नाही.मोबाईल या विषयावर आता उलटसुलट बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. ती एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे यात वादच नाही. पण तरी मी अजूनही मोबाईल वापरीत नाही आणि त्यामुळे माझे फारसे काही अडतही नाही.
पण माल याचे फायदे असे की प्रवासात एखादे पुस्तक वाचू शकतो. मित्र असला आणि त्याचा मोबाईल मध्येच नाही वाजला तर कितीही वेळ गप्पा मारू शकतो.प्रवासात आजूबाजूला किती सुधारणा झाल्या आहेत, किती विविध प्रकारचे सहप्रवासी आहेत,फेरीवाले आणि निरनिराळी माणसे कशी वागतात अशा अनेक गोष्टींचा आस्वाद घेत घेत माझा प्रवास पूर्ण होतो.अगदी झोप जरी लागली तरी फोन वाजला म्हणून किंवा वाजला नसेल ना या भीतीने मला जाग येत नाही. मस्त ताणून देता येते.कितीतरी गंमती … सगळ्याच देत येत नाहीत.
पण मित्र,नातेवाईक, सहप्रवासी यंच्या मोबाईल वापरातील वैविध्यातून मला सुचलेल्या काही नवीन मोबाईल म्हणी---
१) स्वामी तिन्ही जगाचा , चार्जरविना भिकारी
२) बुडत्या बँटरीला , चार्जरचा आधार
३) चेहेऱ्यातच नाही तर सेल्फीत कुठून येणार ?
४) नाय ते app आणि डोक्याला ताप
५) फोन वितभर आणि एक्सेसरीज हातभर
६) आला मेसेज, केला फॉरवर्ड
७) एक न धड आणि भाराभर चार्जर
८) खाली मुंडी आणि contact धुंडी
९) मुंबईचा पाउस आणि मोबाईलवरचा DP, कधी बदलेल सांगता येत नाही
१०) बायकोचा नसेलना म्हणून सतत स्क्रीन बघतो आणि म्हणे बायकोला कोण भितो !
-- मकरंद करंदीकर.
April 26, 2017
या तपासामध्ये अल्ट्रासाऊंड (ध्वनीलहरी) यांचा वापर मुख्यत्वे पोटातील व स्त्रियांच्या गर्भाशय व गर्भामध्ये होणार्या रोगामध्ये होतो व ध्वनिलहरी, क्ष किरणांपेक्षा खूपच सौम्य असल्याने यांचा त्रास गर्भाला अजिबात होत नाही.
October 23, 2010
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग सात
ज्यांची प्रतिकारशक्ती जास्ती, त्यांना औषधांची गरज रहात नाही. ही प्रतिकार क्षमता येते कुठुन ?
अनेक गोष्टींवर ही क्षमता अवलंबून आहे. जसे, खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराचे नैसर्गिक नियम पाळणे, व्यायाम करणे, इ. इ. गोष्टीवर अवलंबून असते.
एक श्लोक आपण बघितला होता...
दूष्य देश बल काल वय ......
...... अवस्थाश्च पृथक्विधः ।।
या श्लोकाचा पूर्ण सविस्तर अर्थ यापूर्वी बघितला असल्याने पुनरूक्ती दोष टाळण्यासाठी, पुढे जाऊया.
आपण जे औषध घेतोय त्याची गरज भासू नये, यासाठी आपला आहार संतुलीत असावा. सहा चवींचा समावेश नेहेमीच्या जेवणात असावा. खाताना, भीती बाळगून, फार चिकित्सक बुद्धीने खाऊ नये. आणि खाल्ल्यानंतर आठवत बसू नये. खाल्लेलं अन्न पचवायला पुरेसा वेळ द्यावा. म्हणजे शरीराला आवश्यक असलेले सर्व घटकपदार्थ आतल्या आत तयार करता येतील. आणि बाहेरून काही भरावे लागणार नाही. म्हणजेच औषधांची गरज उरणार नाही.
यासाठी जेवणाची वेळ बदलावी. सर्व साधारणपणे सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत खावे, नंतर शक्यतो काही खाऊ पिऊ नये. म्हणजे शरीराला आवश्यक ते घटकपदार्थ तयार पुरेसा वेळ मिळेल, आणि सगळी ए टू झेड द्रव्ये आतल्या आतच तयार होतील. हा विषय देखील सविस्तर यापूर्वी लिहून झालेलाच आहे.
विचारांचा गोंधळ होतोय ना !
आपण काय करतोय, दोन परस्पर विरूद्ध विचार एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे गोंधळ होतोय. पाश्चात्य पद्धतीने आरोग्य आणि भारतीय पद्धतीने आरोग्य अभ्यासले तर ठीक आहे, पण दोन्ही पद्धतींना "काळाची गरज" या गोंडस नावाखाली एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून वैचारिक गोंधळ होतोय. एकाच बाजूला येऊन विचार केला तर विचारांना स्थिरता येईल. मग आयुर्वेदात कॅल्शियम वाढण्यासाठी काय आहे ? थायराॅईडसाठी काय औषध सांगितले आहे? कॅन्सर वर काही आहे काहो उपाय ? असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत.
दोन भिन्न विचार प्रवाह एकत्र करणं खूप कठीण गोष्ट आहे. आपल्या जीवनपद्धती मधे होत असलेला हा बदल एका मधल्या पिढीने आपल्या डोळ्यादेखत बघितला आहे.
औषधांशिवाय आरोग्य ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याला भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून आयुर्वेद शिकणं, जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतं.
कुछ पाने केलिए कुछ तो खोना पडता है ।
और यहा तो जिंदगी का सवाल है ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
25.04.2017
April 25, 2017
श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्राचे दिवशी करावयाच्या वैदिक विधीला श्रावणी म्हणतात. यालाच उपाकर्म असेही म्हणतात. श्रवण नक्षत्र श्रावण पौर्णिमेच्या जवळपास येते, त्या दिवशी किंवा पंचमीला, हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी श्रावणी करावी. श्रावण पौर्णिमा यजुर्वेद्यांचा मुख्य काळ, भाद्रपद महिन्यातले हस्त नक्षत्रावर सामवेदी श्रावणी करावी. हे सामान्य नियम आहेत. यांत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा धर्मशास्त्रानुसार निर्णय करावा लागतो.
श्रावणी कशाकरिता करावी? सांप्रत या दिवशी यज्ञोपवित फक्त बदलतात. हे योग्य नाही. यज्ञोपवित (जानवे) बदलल्याने श्रावणी होत नाही. जे वेदांचे अध्ययन केले आहे त्याचा शिळेपणा नष्ट करणे, तसेच म्हणताना काही दोष झाले असतील तर ते नाहीसे करण्यासाठी हा विधी आहे. नूतन उपनयन झालेल्यांची प्रथम श्रावणी गुरु-शुक्रास्त, सिंहस्थ गुरु असता, करू नये असा शास्त्र संकेत आहे.
-- विद्याधर करंदीकर
August 3, 2016
कोणत्याही देवतेच्या स्तोत्रांना जेव्हा आपण एकत्रित पाहतो त्यावेळी आपल्याला त्यात वारंवार पुनरुक्ती होत असल्याचे लक्षात येते.
August 22, 2020
पूर्वी प्रत्येक घरातून श्री रामरक्षा संध्याकाळी म्हंटली जायची . कधी कधी वडीलधारी मंडळी सोप्यावर संध्याकाळी फे-या मारत आणि रामरक्षा मोठ्या आवाजात म्हणत. ती ऐकत असताना लहान मुलांची आपोआप पाठ होत असे.
संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणणे हे हिंदू घर असल्याची एक खूण होती.घराचा सुसंस्कृतपणा या स्तोत्रावरून ओळखला जायचा.संध्याकाळी तुळशी वृंदावना जवळ दिवा लावणे.घरात देवाजवळ दिवा लावणे . शुभंकरोती कल्याणं ....म्हणणे आणि त्या नंतर रामरक्षा हे नित्योपचार असायचे .
रामरक्षा अत्यंत गुणकारी असून घरात सौख्य , आरोग्य , आणि ऐश्वर्य प्रदान करणारे स्तोत्र आहे. मार्कंडेय ऋषींनी रचलेल्या महामृत्युंजय मंत्रा मध्ये जी ताकद आहे तेव्हडीच ताकद या स्तोत्रात आहे.ज्या घरात हे स्तोत्र लहान मुलांना शिकवले जाते त्या घरात सदैव नितीमत्ता आणि त्यातून येणारे धैर्य घरातील लोकांमध्ये वास करून असते .हल्ली मुले रामरक्षा म्हणत नाहीत . ती पुन्हा परत म्हणणे सुरु करणे हि काळाची गरज आहे.सोबत एक यु ट्यूब ची लिंक दिलेली आहे. रामरक्षा कशी म्हणावी हे ती लिंक उघडल्यावर कळेल !!!
श्री राम ....
https://www.youtube.com/watch?v=TIbijIE0Om4
--चिंतामणी कारखानीस
April 22, 2016
मुल्यांमुळेच व्यक्तीला आणि समाजाला मूल्यं आहे. संतांनी दिलेल्या जीवन मूल्यावरंच आज समाजाच्या उरलासुरला डोलारा उभा आहे. देवाच्या अनुपस्थितीत संतांनी समाज घडविला.मूल्य रुजवली ती आजतागायत समाजाचं भलं करत आहेत.संतांनी देवाच्या अस्तित्वाबद्दल ही प्रश्न उपस्थित केले व त्यामुळे पसरणाऱ्या अंधश्रद्धे वरही प्रहार केलेला आहे. संतांचे कोणतेच मूल्य, कोणती शिकवण आजही कालबाह्य झालेली नाही.
June 22, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti