वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
महादेव शंभो गिरीश त्रिशूलिंस्त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् |
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३६ ‖
भक्तीचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे एकनिष्ठता. जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीशिवाय अन्य कोणाचाही विचार करीत नाही तशी पूर्ण समर्पित वृत्ती भक्तीच्या क्षेत्रात अभिप्रेत असते.
आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात तेच वर्णन सादर करीत आहेत. त्यांची शब्दकळा आहे,
महादेव - हे महादेवा ! आपण सर्व देवांचे ही देव आहात.
शंभो - हे शंभो आपण सर्वांचे कल्याण करणारे आहात.
गिरीश-हे गिरिजापती ! त्रिशूलि: - हे त्रिशूलधारी ! या त्रिशुला च्या स्वरूपात आपण सत्व,रज,तम या तीनही गुणांचे संचालक आहात.
त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् - आपल्याच अधिष्ठानावर हे संपूर्ण विश्व प्रकाशित होत आहे. त्यात आपल्या चैतन्याचे प्रतिबिंब विलसत आहे.
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने- भगवान शंकरांना सोडूनी अन्य कोणतेही दैवत जाणत नाही.
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् - मी शिव आहे.मी शिव आहे.मी शिव आहे.
हा शेवटचा उल्लेख फार महत्वाचा आहे. केवळ भगवान कसे आहेत? याचे वर्णन करून उपयोग नाही. त्यांच्याशी एकरूप होण्यासाठी मी देखील तसाच असायला हवे. मी स्वतःला भगवंता पेक्षा वेगळा समजत असेल तर ईश्वरीय परमानंदाची प्राप्ती मला कदापि होणार नाही. मी त्याच ईश्वरी शक्तीचा अंश आहे ही वास्तव अनुभूतीच सर्व साधनेचे ध्येय आहे.
आचार्यश्री स्वतःच्या त्या भूमिकेचे वर्णन करून आपल्याला त्यासाठी प्रेरणा देत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 15, 2020
आपल्याकडे निष्क्रियता हा अपराध नाही, उलट त्याचे कौतुकच होते. एखाद्याने काही कल्पकता दाखवून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो अपराध ठरतो. सव्वाशे कोटींचा हा देश आहे.
May 18, 2008
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाःमातस्त्रिकॊणनिलयॆ त्रिपुरॆ त्रिनॆत्रॆ ।
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः ॥ ५ ॥
कोणत्याही देवतेच्या उपासनेत तंत्र, मंत्र आणि यंत्र अशा तीन गोष्टी असतात. त्या उपासनेचे जे शास्त्रशुद्ध नियम, पद्धती, परंपरा त्यांना तंत्र असे म्हणतात.
या देवतेचे निर्गुण-निराकार स्वरूप ज्याच्या चिंतन-मननातून व्यवस्थित समजून घेता येते त्याला मंत्र असे म्हणतात.
तर त्या देवतेच्या अधिष्ठान स्वरूपात ज्या आकृती तयार केलेल्या असतात, त्यांना यंत्र असे म्हणतात.
आई जगदंबेच्या उपासनेत सर्व श्रेष्ठ यंत्र म्हणजे श्री यंत्र. त्यात सगळ्यात मध्यभागी असतो एक त्रिकोण. त्या त्रिकोणात असणारा जो बिंदू ते आदिशक्तीचे मूळ पीठ.
कोणत्याही देवतेच्या मंत्रात सर्वाधिक प्रभावशाली मंत्र म्हणजे बीजमंत्र. आई जगदंबेच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपां करिता अनुक्रमे ऐं, ह्रीं आणि क्लीं हे बीजमंत्र शास्त्राने सांगितले आहेत.
येथे आचार्य श्री त्या यंत्र आणि बीजमंत्राचा विचार मांडत आहेत. ते म्हणतात,
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाः- हे आई जगदंबे वेद तुझे नाव म्हणून ह्रीं काराचेच कथन करतात. अर्थात तेच तुझे नाव आहे. तोच तुझा सर्वोच्च मंत्र आहे.
मातस्त्रिकॊणनिलयॆ- हे आई श्री यंत्राच्या मध्यभागी असणारा त्रिकोण हे तुझे निवासस्थान आहे.
त्रिपुरॆ- हे त्रि-कोण जणूकाही त्रि-पूर आहेत. अर्थात स्थूल, सूक्ष्म ,कारण आहेत. तू त्यांच्या आत राहून त्यांचे संचालन करणारी चैतन्य शक्ती आहेस.
त्रिनॆत्रॆ - महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपातील तीन गुणांनी काम करणे हे जणू तुझे तीन नेत्र आहेत.
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः - अशा तुझ्या स्वरूपाचे स्मरण करतात, ते यमाचे भट अर्थात दूतांचे भय सोडून नंदनवनामध्ये लोकपाल अर्थात देवतांसह विहार करतात.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 16, 2020
प्रत्येक बोलीभाषेत एक वेगळे सौंदर्य असते, ती बोलण्याची खुबी असते, आपला असा एक बाज असतो, गोडी असते ती सारी कोकणातील या बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत पुरेपूर आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरात राहणारे लोक आपसात बोलताना सर्रास बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत बोलत असतात ते ऐकणाऱ्यांनाही गोड वाटते. थोडे फार कोळी-आगरी बोलीबाबत असेच बोलता येईल. एकूणच कोकण ही निसर्गसौंदर्याची खाण आहे
November 29, 2022
गेल्या दोन दशकांमध्ये चरबी कमी करण्याबद्दलचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यालाच लायपोसक्शन म्हणतात. यामध्ये चरबी कायमची कमी करता येते व शरीरालापण सुडौल बनवता येते. समाजात वावरताना स्वाभिमानाने, आत्मविश्वाासाने वागता येते. सुडौल व तंदुरुस्त शरीर हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. नियमित व्यायाम करूनही काही व्यक्तींमध्ये जास्त चरबी असते. ती कुठेही असू शकते, तर काही विशिष्ट ठिकाणीही असू शकते. बराच व्यायाम आणि डाएटिंग करूनही ही चरबी घालवता येत नाही. आनुवंशिकता हे बऱ्याच वेळा कारण असू शकते. गेल्या दोन दशकांमध्ये चरबी कमी करण्याबद्दलचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यालाच "लायपोसक्शेन' म्हणतात. यामध्ये चरबी कायमची कमी करता येते व शरीरालापण सुडौल बनवता येते. समाजात वावरताना स्वाभिमानाने, आत्मविश्वाीसाने वागता येते.
लायपोसक्शन म्हणजे काय?
कातडीखाली असलेली चरबी छोटीशी जखम करून त्यातून विशिष्ट नळीवाटे काढतात. हे दोन प्रकाराने केले जाते.
पॉवर असिस्टेड लायपोसक्सन
यात इलक्ट्रिकच्या साहाय्याने किंवा हवेच्या दाबाने विशिष्ट नळी सतत हलवत ठेवतात. त्यामुळे चरबी पातळ होते व बाहेर काढण्यास सोपे जाते.
अल्ट्रासाऊंड असिस्टेड लायपोसक्शेन
यात अल्ट्रासाऊंडच्या साहाय्याने चरबी काढली दाते. चरबी काढण्याअगोदर प्रथम सलाईन व त्याचबरोबर अड्रेनलीन टोचले जाते, ज्यामुळे रक्तस्राव कमी होतो. या प्रकाराने गाल, हनुवटी, मान, दंड, स्तन, पाठ, छाती, पोट, कंबर, बसण्याची जागा, मांडी, पायाचा खालचा भाग, घोट्याजवळची वगैरे ठिकाणची चरबी काढता येते. याच वेळी जरूर असेल तर फेसलिफ्ट, स्तनांचा आकार कमी करणे किंवा पोटाची चरबी कमी करता येते.
अपेक्षा
लायपोसक्शन हे वजन कमी करण्यासाठी ट्रीटमेंट म्हणून केले जात नाही. त्यासाठी व्यायाम व खाण्यावर बंधन हेच योग्य आहे. लायपोसक्शनमुळे चरबी कायमची कमी करता येते. जिथे ती जास्त आहे किंवा इतर शरीराच्या मानाने बेडौल दिसते आहे, अशा जागांमधून ती कायमची कमी करता येते.
योग्य व्यक्ती कोण?
ज्यांच्यात कातडीची स्थिती उत्तम आहे, स्नायू चांगले आहेत, एकूण आरोग्य ठीक आहे, जखम भरण्याची क्रिया उत्तम आहे, विडी, सिगारेट ओढत नाही किंवा कुठला आजार नसेल अशी तरुण व्यक्ती लायपोसक्शन करून घेऊ शकते.
ज्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे, ज्यांच्यापुढे विशिष्ट ध्येय आहे अशा व्यक्ती.
ब्लड प्रेशर, डायबेटिस किंवा हार्टडिसीझेस असलेल्या व्यक्तींचा वेगळा विचार करावा लागतो. तसेच ज्या जागेतून चरबी काढायची त्या जागेची जर काही शस्त्रक्रिया आधी झाली असेल तरीही विचार करावा लागतो.
प्रथम सुरुवात कुठे करणार?
प्रथम अस्थेटिक सर्जनबरोबर विचारविनिमय करा. लायपोसक्शीनमुळे शरीर कसे सुडौल करता येईल याबद्दल माहिती करून घ्या. त्याचे परिणाम, करण्याचे वेगवेगळे मार्ग समजावून घ्या व मगच विचार करा. त्याचप्रमाणे करण्याअगोदर तुमची खरीखुरी आरोग्याबद्दल माहिती तसेच चालू असलेली औषधी, ऍलर्जी, स्मोकिंग वगैरेबद्दल सर्जनला सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. आशीष दावलभक्त, ऍस्थेटिक प्लास्टिक सर्जन, पुणे.
January 12, 2017
निवडणुका येतात, निवडणुका जातात ! राजकीय पक्षांची ध्येयधोरणे, भूमिका ठरलेल्या असल्या तरी त्या भूमिका वठविणारे कलाकार आपल्या दिशा सतत बदलवत राहतात. यंदाही नियमानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या भूमिका घेऊन लोकांसमोर येत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना स्वतःवर खूप अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन टोप्या बदलाव्या तसे पक्ष बदलत आहेत. त्यामुळे सध्याच्या वातावरणात “निष्ठा” नावाची गोष्ट उरली नाही.
October 20, 2019
सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. इंटरनेटवर चक्क वस्तूंचा बाजारही भरतो, त्यात तुम्ही मागणी नोंदवता किंवा बुकिंग करता. पण यात पैशांचे व्यवहार कसे होतात, हवी तेवढी रक्कम हव्या त्या व्यक्ती किंवा संस्थेपर्यंत कशी पोहोचते, आपल्याला माहिती नसलेल्या माणसांशी आपण असे व्यवहार एका साखळीमार्फत कसे करू शकतो, याला इलेक्ट्रॉनिक व्यवहार असे म्हणतात.
October 10, 2023
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 3, 2018
मराठी वाङ्मय मंडळ हे विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्य आणि संस्कृतिविषयी प्रेम निर्माण करणारे एक सशक्त साधन आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन अभिरुची निर्माण करणे, या अभिरुचीला वाङ्मयीन जडण-घडण करण्याचे फार मोठे सामर्थ्य वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात असते. पण सर्वच महाविद्यालयांत हे कार्य घडताना दिसत नाही. त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत.
April 28, 2022
भक्तांनी त्यांच्या अवतारी देवतेचे भव्य मंदिर उभारले. मंदिराचा कळस सोन्याचा होता. मंदिरात भव्य सभामंडप होते. सभामंडपाच्या भिंतींवर बारीक कोरीव काम हि होते. गर्भगृहात माणिक-मोती धारण केलेली त्या देवतेची सुवर्ण मूर्ती होती. मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी होती. सर्वांचा मनात देव दर्शनाची अभिलाषा.
April 8, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti