(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शॉपिंग कार्ट अर्थात ट्रॉली

    goldman-shopping-trolleyमॉलमध्ये गेल्यानंतर ट्रॉली ढकलत शॉपिंग करणं, हे आपल्यापैकी अनेकांना आवडतं. परंतु कोणे एके काळी या ट्रॉलींचा वापर करणं ग्राहकांना अपमान वाटत होता. चातुर्याने केलेलं प्रमोशन आणि बदल यांच्यामुळे ट्रॉली अर्थात शापिंग कार्ट आज कमालीच्या लोकप्रिय आहेत. अमेरिकेतील एका सुपरमार्केटच्या मालकाने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी तयार केलेली ही कार्ट आता सर्वसामान्यांच्या हाती जाऊन विसावली आहे.

    अमेरिकेतील ओक्लोहोमा शहरात असलेल्या ' पिग्गली विग्गली ' या सुपरमार्केटचा मालक सिल्यान गोल्डमन आपल्या ग्राहकांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्न करत असे. ग्राहकांना खरेदीचा पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात तो नेहमीच पुढाकार घ्यायचा. ग्राहकांनी जास्त सामान घेतल्यानंतर ते सांभाळता येत नसल्याने एका क्षमतेपलीकडे ते खरेदीच करत नसल्याचं गोल्डमनच्या लक्षात आले. त्यासाठी काय उपाय करता येईल, याचा तो विचार करू लागला. बास्केट उपलब्ध करुन दिलं तरीही तीच समस्या कायम राहत असल्याचं त्याला माहिती होते.

    एके रात्री तो ऑफिसमध्ये बसून याच विषयावर विचार करत होता. त्यावेळी त्याच्या सुपरमार्केटमधील मेकॅनिक क्रेड यंग त्याच्या केबिनमध्ये आला. त्याचक्षणी गोल्डमनला एक युक्ती सुचली. त्याने त्याच्या केबिनमधील लाकडी खुर्चीला बास्केट लावण्यास सांगितलं. त्यानंतर त्या खुर्चीच्या चारही पायांना चाकं लावण्यास सांगितलं. ही चालतीफिरती खुर्ची पाहून गोल्डमन खूश झाला. त्याने अशाप्रकारच्या काही खुर्च्या तयार करुन सुपरमार्केटमध्ये ठेवण्यास सांगितलं.

    उत्साहाने दुसर्‍या दिवशी गोल्डमन आल्यानंतर त्यानं पाहिलं, तर एकही ग्राहक या खुर्च्या वापरत नसल्याचे त्याला दिसून आलं. आम्ही खरेदी केलेलं सामान अशा खुर्च्यावर ठेवून आम्ही फिरायचं का, असा प्रश्न ते विचारु लागले. गोल्डमनने मग वेगळा मार्ग अनुसरला. त्याने या खुर्च्या ओढण्यासाठी काही माणसं ठेवली. हळूहळू लोकांना ही सुविधा आवडू लागली. तोपर्यंत त्यात बरेच बदल होत गेले. ४ जून १९३७ साली गोल्डमनने सुरू केलेली ही फिरती खुर्ची नंतर शॉपिंग कार्ट म्हणून लोकप्रिय पावली.

    आज संपूर्ण जगात या कार्टचा वापर केला जातो. आता तर लहान मुलांना त्यावर बसवण्याची सोयही करण्यात आली आहे.

    कधी एके काळी खूळ म्हणून ज्याकडे पाहिलं जात होते, आता त्याकडे खरेदी करतानाची महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहिलं जात आहे.

      October 9, 2016


  • ४०, के. दुभाष मार्ग – रॅम्पार्ट रो, फोर्ट, मुंबई

    ४०, के. दुभाष मार्ग – रॅम्पार्ट रो, फोर्ट, मुंबई

    हा पत्ता रोज या ठिकाणाहून जा-ये करणार्‍यालाही लक्षात येणार नाही. पण ‘ र्‍हिदम हाऊस’ म्हटलं की चटकन, ‘च्यायला हा ऱ्हिदम हाऊसचा पत्ताय होय’ असे उद्गार ऐकू येतील..!

      November 11, 2016


  • अयोध्या – कोण जिंकलं, कोण हरलं ?

    अयोध्येतील राम-जन्मभूमी आणि बाबरी मशीद हा वाद कित्येक वर्षे न्यायालयात आहे. नुकताच त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. आता अंतिम सुनावणी आणि निकालाची प्रतिक्षा आहे. याच मुद्द्यावर काही वर्षापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेला हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत. निमित्त आहे केवळ यामागची पार्श्वभूमी समजावून घेण्याचे !!

      October 9, 2018


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ५

    स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं पूजार्थं वा कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि ।
    नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥५॥

    भगवान श्री भोलेनाथांची क्षमायाचना करतांना आज पर्यंत मी कोण कोणत्या गोष्टी केल्या नाहीत? याची एक सूची आचार्य देत आहेत. त्यातून खरेतर, वेगळ्या शब्दात आपण सगळ्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेस्तव काय काय करायला पाहिजे? ही सांगण्याची आचार्यांची ही सुंदर पद्धती आहे.
    आचार्यश्री म्हणतात,
    स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं
    पूजार्थं वा - हे भगवंता मी कधीही प्रातःकाळी स्नान करून आपल्या अभिषेक विधी साठी किंवा पूजेसाठी कधी गंगेचे जल आणले नाही
    कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि - किंवा कधीही अत्यंत गहन जंगलात जाऊन बिल्वपत्रे खुडून आणली नाहीत.
    नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं- हे भगवंता मी सरोवरामध्ये विकसित झालेली सुगंधाने युक्त अशी कमल फुलांची माला तुझ्याकरता कधी आणली नाही.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान शंकरा! माझे अपराध क्षमा कर.
    येथे आचार्यश्री आपल्याला भगवान शंकरांच्या पूजेसाठी निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीदेखील किती पर्याप्त आहेत ते सांगत आहेत.
    सदैव वाहणाऱ्या गंगेचे जल, सहज मिळणारी बिल्वपत्र, जलाशयात आपोआप येणारी कमलपुष्पे या गोष्टी निसर्गात परस्पर उपलब्ध आहेत. निदान त्या तर आपण सहज जाणू शकतो ना?

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 24, 2020


  • गूढ संख्यांचे..जन्मतारखांचे !

    आपली जन्मतारीख हे एक गुढ ( कोड लँग्वेज) आहे. आपण विशिष्ट तारखेलाच का जन्म घेतला यामागे काही संकेत आहेत. ही जन्मतारीख व त्यातील महिना व वर्षाचे आकडे आपल्या आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार आहे त्याचा अंदाज देतात..

      January 10, 2015


  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) : एक अप्रतिम शिल्प

    बोरीबंदर स्टेशन पाहताना लंडन शहरातील सेंट पॅनक्रॉस रेल्वेस्टेशन सारखा भास होतो. ही भव्य देखणी वास्तू बांधण्यास २.६ लाख पौंड खर्च आला होता, पैकी फ्रेडरिक यांनी आपली फी रुपयांत १८ लाख इतकी स्वीकारली होती. हे स्टेशन जागतिक वास्तुशिल्पांमधील एक जागतिक वारसा (World Heritage Structure) बनून राहिलं आहे. ३६५ दिवस, २४ तास अखंड कार्यरत असणारं हे रेल्वेस्टेशन आहे आणि म्हणून ‘वारसा यादी’त त्याचं महत्त्व

      April 26, 2022


  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 11

    "आम्हाला हे असं लवकर जेवणं अजिबात शक्य नाही, हो!" असं सांगणाऱ्या करीता खास टीप....

    सक्काळी सकाळी उठायचं, भराभरा आवरायचं डब्बा बनवायचा, पोरांना शाळेत हाकलायचं, नवरा कामाला पाठवलं की कसाबसा चहात पाव बुचकळून खायचा, म्हणजे झाला नाश्ता. वर पाणी ढोसायचं, आपला डबा करायचा, धावधाव करीत ऑफीस गाठायचं, बाॅसची बोलणी खायची, परत घरी येताना मार्केट मार्गे खरेदी करून, येऊन कंबर कसून परत कामाला लागायचं, टीव्ही समोर बसलेल्यांना तिथे नेऊन चहा बिस्कीट खायला द्यायची, कपबशासुद्धा आपणच घरात न्यायच्या. रात्रीच्या जेवणाचं बघायचं, हे करत असताना, तू आज कशी चुकलीस, हे समोर खुर्चीवर ढेंग टाकून निवांत बसलेल्याकडून निमूटपणे ऐकून घ्यायचं. तोंडातून एकही अवाक्षर न काढता, जेवणाचा कार्यक्रम पार पाडायचा, आपणच डाॅक्टरकडे जाऊन आणलेल्या गोळ्या आपणच घ्यायच्या आणि कधी एकदा पडता येतंय याची वाट बघायची ......
    हे सर्व कशासाठी करताय ?

    दोन घास सुखानं खाता यावेत म्हणून ना.....
    खाल्लेलं अंगाला लागण्यासाठीच ना.....

    पण जरं या व्यस्त दिनचर्येतून जर शेवटच्या दोन ओळी साध्य होणार नसतील तर ? सगळा खटाटोप कशासाठी करताय ?
    कशासाठी ? पोटासाठी !

    एकच बदल करून पहा,
    फक्त जेवणाची वेळ बदला...

    आता असं करता येतं का बघा.
    सकाळचा नाश्ता कॅन्सल.
    नाश्त्याऐवजी थेट पोटभर जेवण.
    दुपारचं जेवण / डबा कॅन्सल.
    सायंकाळी घरी आल्यावर पोटभर जेवण.
    ( जे सातला घरी पोचू शकत नाहीत, त्यांनी सायंकाळचा डबा सोबत न्यावा.)
    दोन वेळा जेवण बनवायचंच नाही. फक्त सकाळी एकदाच जेवण बनवण्यात वेळ खर्च करायचा. एक पदार्थ फक्त सायंकाळी नवीन करायचा. बाकीचे तीन प्रकार सकाळचेच.

    सूर्य असल्यामुळे सकाळचे तयार अन्न सायंकाळ पर्यंत नासत नाही. सायंकाळी बनवलेले मात्र सकाळी फुकट जाते.

    दुपारचा डबा अगदी भुकेपुरताच. सायंकाळच्या भूकेची जाणीव ठेवणारा.
    दुसरे मुख्य जेवण सायंकाळी सात वाजता.

    बाकी जेवणात कोणतेही पथ्य करायचे नाही.
    सूर्योदय ते सूर्यास्त सगळं खायचं, पोटभर खायचं, मनसोक्त खायचं.... कावळ्यासारखं !

    पथ्य एकच ....
    खाताना भीती न बाळगता खायचं. आणि खाल्ल्यानंतर खाल्लेलं सगळं विसरून जायचं. खाल्लेलं आठवायचं नाही, मनात साठवायचं नाही.

    बायकांचा स्वयंपाकघरात जाणारा आणि "रांधा वाढा उष्टी काढा" मधे खर्च होणारा वेळ वाचेल.
    सायंकाळी साडेसातनंतर स्वयंपाकघर बंद.
    सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी शाॅपिंग, देऊळ, बाग.... थोडं मोकळे वाटेल.
    स्वयंपाकघरातला वेळ वाचेल,
    फॅमिली लाईफ एन्जाॅय करता येईल, हौस, मौज करता येईल.... आणि बरंच काही...
    मुख्य म्हणजे निरर्थक औषधांशिवाय, निरामय जीवन जगत सगळं जेवण घेता येईल.

    नाहीतर......
    डोंबिवली फास्ट पकडत, दिवसभर धांगड धिंगा करत, ज्या पोटात आहार टाकल्यानंतर त्याचे रूपांतर उर्जेमधे होते, त्याऐवजी, त्याच पोटात रोज न चुकता, जन्मभर पुरणारी औषधं टाकायची आहेतच...
    आणि डाॅक्टरच लिहून देतात हल्ली...
    वरील सर्व औषधे पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत सुरू ठेवावीत......

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    06.03.2017

      March 6, 2017


  • अशी असेल २०२५ ची “ई-दिवाळी”

    आजच आपण पोस्टात फिरकत नाही. पण २०२५ मध्ये पोस्ट ऑफिस अस्तित्वात नसल्याचीही आपल्याला सवय झाली असेल. बँकांचे बरेच व्यवहार ऑनलाईन होत आहेत. आगामी काळात तर धनादेशही इतिहासजमा होतील. ब्रिटनमध्ये २०१८ पर्यंत धनादेशांचा वापर बंद करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

      January 26, 2024


  • निरंजन – भाग १६ – गुरुपौर्णिमा

    गुरु म्हणजे जीवनाचे मांगल्य, जीवनाचे कल्याण, साक्षात जीवनाचे व्यवस्थापन, जीवनाला दिलेला अर्थ, गुरुविना जीवन म्हणजे दिशेविणा मार्ग , जीवनामध्ये गुरु असणं हे खुप महत्त्वाचे आहे. जन्मापासुन ते मॄत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु हे लागतातच. ज्ञान देणं हे गुरुंचे परम कर्तव्य…आणि या कर्तव्याला धारण करणारी व्यक्ती म्हणजे गुरु…

      July 5, 2020


  • आपली संस्कृती….

    बसू नये देहाला थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का म्हणुन मैत्रिणींनो मंगळसूत्र व बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का
    मणक्याच्या आजारापासून रहायचे असेल जर लांब, तर मग घाला ना कंबरपट्टा, वाचवायला तुमच्या पाठिचा खांब !!

    सायनस हा आजार आहे नाकाच्या हाडाचा म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा
    कोकीळा गातांना लागते वसंत ऋतूची चाहूल, उष्णतेचा दाह कमी करते पैजण घातलेले पाऊल.

    बांगड्या घातल्याने वाढते हाताच्या सौंदर्याची शान ,त्याच बांगड्यांमुळे होते गर्भाशय सुरक्षित असल्या ची जाण.
    शारीरिक व मानसीक बदल.हा आहे एक भाग, म्हणून जोडवि बीरोदी घालुन सूहासिनी सारखी बाई तू वाग !!

    शरीरातील रक्तप्रवाहासाठी टोचतात लहानपणीच कान ,
    भारतीय संस्कृतीने दिला आहे, स्त्रियांना " कानातले " घालायचा मान.

      December 13, 2016