(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ८

    माझ्यासाठी विंडो सीट बुक कराल का प्लिज एरेटॉसथिनिस काका? सायलीने पटकन आपला क्लेम लावला. मला पण ... चिंट्याने सूर मिसळला. नेहा आणि सॅमीच्या मनातही हेच होत, पण स्वभावामुळे बोलले नाही इतकेच.

    **************************

    आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर... एरेटॉसथिनिस काकाबरोबर समद्वीभुज खंडाकडे जायला निघाले...

    गोष्टीचा आधीचा भाग.... इथे टिचकी मारा

    **************************

    आकाशातून समद्विभुज खंड दिसू लागला. वैमानिकांनी अनौन्समेंट करत माहिती दिली. सम्पूर्ण खंड दिसावा म्हणून मुद्दाम विमान कमी उंचीवरून आणले आहे. पण थोड्याच वेळात वादळी वारं सुरू होईल असे कन्ट्रोल टॉवर कडून अंदाज कळला आहे. तेव्हा 2 मिनिटांनी आपण परत 50,000 फूट उंचावर जाणार आहोत. वादळी वारं थांबे पर्यंत खाली उतरू शकणार नाही...

    ****** खाली शहरात भटकताना...

    एरेटॉसथिनिस काका माहिती देत होते...

    वादळी वारं हे अजून न सुटलेलं कोड आहे. त्याचा परिणाम तुम्हाला दिसलेच. या बेटावर मोठ झाड नाही. शेती करणे पण अवघडच आहे कारण वाऱ्याने शेत भुई सपाट होते. धान्य नासुन जाते. त्यामुळे इथल्या झाडांना लागणारी बोरासारखे बी असलेले लहान फळं इथलं मुख्य उत्पादन. बिया उन्हात वाळवून त्याचे पीठ केले जाते. गर काढून जॅम, लोणची केले जातात... अनेक वनस्पतींची पाने भाजी कऱण्यासाठी वापरली जातात... समुद्रात मासळी भरपूर, त्यामुळे ते मुख्य आहारात नित्यनेमाने वापरली जातात. इथले मसाले वेगळे पण चविष्ट आहेत...

    ग्रहावर जमिनीत बीळ करून राहणारे मूषक, साप खूपच आहेत. थोड्याफार प्रमाणात मोठे मासभक्षी प्राणी आहेत, पण त्यांना दाट झाडी झुडपांमुळे फारशी शिकार मिळत नाही. त्यामुळे संख्या कमीच... मनुष्य हाच सर्वात मोठा मासभक्षक प्राणी. मुषकांच्या बऱ्याच प्रजातींचे मास खाल्लं जात. साप बहुतेक विषारी आहेत, पण मनुष्याला त्यांचे विष मारू शकत नाही. पीडा मात्र खूप होते. पण सगळं विष तोंडाजवळच्या भागात असतं, त्यामुळे शरीराचा मागचा भाग खाण्यासाठी वापरला जातो.

    म्हणजे आपल्याला उंदीर आणि साप खावा लागेल... चिंट्या कुजबूजला. एरेटॉसथिनिस काकांना बहुतेक ऐकू गेलं असावं, पण तसं न दाखवता ते म्हणले, तुमच्यासाठी शाकाहारी जेवणाची सोय आहे. एक गवता सारखी दिसणारी पाले भाजी आहे, अगदी तुमच्या शेपू सारखी... इइईई शेपू!!!! सायलीने किंचाळी दाबली... तेव्हड्यात विमानाला समद्विभूज बेटावर उतरण्यांची परवानगी मिळाल्याची अनौन्समेंट झाली.

    राहण्याची सोय बेटाच्या बरोबर मध्यभागी असलेल्या पायथोगोरसच्या पुतळ्याच्या जवळच होती. हा मध्य बेटाचा अंत:मध्य आहे, म्हणजे तिनही कोनांचे द्विभाजक इथे मिळतात अशी माहिती मिळाली. मुख्य शहराचाही हा मध्य बिंदू आहे. शहर अष्टकोनी आहे. मध्य पासून आठ समद्विभुज त्रिकोन बाहेरच्या बाजूस पसरले आहेत असे वाटते. गमतीची गोष्ट म्हणजे इथे एकही "चौक" चार रस्त्यांच्या नाही – तीनच रस्ते चौकात मिळतात!

    शहराची रचना मधमाश्याच्या पोळा सारखीच, पण प्रत्येक विभाग अष्टकोनी आहे. प्रत्येक विभागात एक मोठ्ठी इमारत, ती सुद्धा अष्टकोनी. दोन मजले जमिनीवर आणि बाकी खाली! सर्वात खाली रहाण्याची घरं. वरच्या बाजूला शाळा, कॉलेज, दवाखाने आणि इतर सोयी. त्याचा वरती दुकाने, मॉल, हॉटेल इतर व्यावसायिक सेवा. सर्वात वरती, जमिनीच्यावर ग्रीनहाऊस बागा, जॉगिंग ट्रॅक आणि खेळांसाठी ग्राउंड, ओपन एअर थिएटर वगैरे. पण सगळे अष्टकोनी बांधकामाच्याच्या आतमधे!

    त्यामुळे बाहेरच्या रस्त्यांवर फिरणारी माणसे दिसणार नाहीत. पण जमिनी खालून तिसऱ्या मजल्यावर भुयारी मार्गाने सर्व विभाग जोडलेले आहेत. लांब जायचे असेल तर वर येऊन मेट्रो घ्यायची. जवळच्या विभागात जाण्यासाठी भुयारी मार्गातून चालत किंवा एसकलेटर आहेत. नुसते उभा राहून पुढे जाऊ शकता...

    घरं खाली खोलवर असल्यामुळे भूगर्भातील उष्णतेचा चांगला वापर होतो. मोठे सौर ऊर्जेवर चालणारे पंखे वरची गार आणि ताजी हवा खाली नेतात. एअर कंडिशनिंग लागतच नाही. पाणीसुद्धा भूगर्भातून येणाऱ्या गरम आणि गार झऱ्यातून येत. हवे तसे, पण जपून वापरा.

    उजेडासाठी दिव्यांच्या बरोबर आरशांची योजना केली आहे. सूर्यकिरण हवे तसे आणि हवे तेव्हडे अरश्यानी वळवता येतात. दिवसाचा उजेड जमिनीखाली सहज नेता येतो. त्याच किरणांनी सोलर बाटरी चार्ज होतात ज्या रात्रभर पुरतात...

    ग्रहावरच्या अचानक सुरू होणाऱ्या वादळी वाऱ्यावर असा मार्ग काढलाय माणसाच्या बुद्धीने.

    एरेटॉसथिनिस काकांना कामासाठी आता कुठेतरी जायचं होतं. तुम्ही आता हवं तिकडे फिरून या. ट्रायकोन मॅप्स अँप इन्स्टॉल करा. ते तुम्हाला कुठे कसे जायचे सांगेल. परत हॉटेलवर येण्यासाठी टेक मी होम वर टिचकी मारा. अँप सांगेल कसे यायचे ते... पण तुम्हालाही काम दिले आहे हे विसरू नका.

    कामचुकारपणा आणि आळस, दोन्ही कुणालाच चालत नाही...

    *********** संध्याकाळी हॉटेल वर...

    काका येण्याची वाट पाहत मुलं थांबली होती. त्यांचा बरोबरच जेवण करू असा विचार होता. चिंट्या चेष्टेचा मुड मधे होता –उंदराच्या आणि सापाच्या डिश नेहा ट्राय करती आहे, सायली शेपूची भाजी कशी खाते याची नक्कल करून दाखवत होता.

    अँ हँ रे! तुझा काय उपास आहे का? का आळ्यांची उसळ ट्राय करायची आहे... गप्प बस जरा! जेवणाची इच्छाच घालवली... गप्पांच्या ओघात कामाची आठवण झाली. मिळालेली माहिती पुन्हा एकदा बघितली.

    बेटाची 1200 X 1000 X 1000 km आहे. तिन्ही किनार्‍याला स्पर्श करून रिंग रेल्वे धावली पाहिजे. रूळ टाकणे 1 लाख रुपये प्रति km. 40 लाख प्रत्येक बाजूला 3 मुख्य स्टेशनसाठी आणि 20 लाख मधल्या 3 स्टेशनसाठी. 10 टक्के अवांतर खर्च. अंदाजपत्रक (एस्टीमेट) द्यायचा आहे.

    ही माहिती फारच कमी आहे. किनाऱ्याला स्पर्श म्हणजे काय? एकदाच कुठेतरी करायचा का? तीनही बाजूच्या किनाऱ्याला समांतर धावली तर चालेल का? सॅमीने कुरकुर केली. सॅमी, हे प्रश्न काकांना विचारले पाहिजेत. अंदाजपत्रक देताना गृहितं स्पष्टपणे मांडली पाहिजेत – नेहा म्हणाली. गृहातांमुळे मोठा फरक येणार असेल तर ते स्पष्टपणे मांडून तीन ते चार वेगवेगळ्या योजना देता येतात का पाहू.

    थोडं फार आपलंही डोकं चालव्हायला हवं. नकाशा बघून आडाखे बांधून सुरवात करू. हा फक्त एस्टीमेट आहे. प्रत्यक्ष करतील तेव्हा जास्त डिटेल पहातीलच ना?

    वा! भूगोल शिकताना दुर्लक्ष केलं नाही ते बर झाले.

    रिसेप्शन मधे भिंतीवर बेटाचा एक एरियल फोटो नकाशा लावला आहे. मी स्नॅप घेऊन येते नेहा म्हणाली आणि घेऊन आली. फोटो पाहताच चिंट्याने टाळी वाजवत, एलिमेंटरी माय डिअर नेहा वॉटसन! यु सी बट यु डू नॉट सी, डू यु? चिंट्याने हर्क्युल पोयरॉ बरोबर शेरलॉक होम्सही सुरू केलं होतं. सोल्यूशन डोळे वटारून आपल्याकडे बघते आहे.

    जरा आमच्या सारख्या अज्ञानी पामरांच्या टाळक्यावर तुमच्या आगाध ज्ञानाचा आघात कराल का शेरलॉक महाराज? – सॅमी.

    आपल्या चेष्टेकडे दुर्लक्ष करून चिंट्याने नकाशाकडे बोट दाखवले आणि पेपर नॅपकिन वर एक समद्विभुज त्रिकोन काढला. बहुतेक सर्वच गाव शहरं मध्यभागी कोंडाळे करून आहेत हे तुमच्या चाणाक्ष नजरेने हेरलेच असेल.

    चिंट्याने त्रिकोनाच्या मध्यावर खूप ठिपके काढले. आता या सर्वांना रिंगण घालणारी रेल्वे, तीनही किनाऱ्याना स्पर्श करणारी म्हणजे त्रिकोनाच्या भुजांचे मध्य बिंदू जोडले की झाले! चिंट्याने त्रिकोनात एक उलटा अंतःस्थ त्रिकोन काढला. (चित्र बघा) खरोखरच तो अनेक गावामधून जात होता आणि बेटाच्या मुख्य वसाहती भागाला रिंगणही घालत होता. चिंट्याच्या निरीक्षण चांगलेच होते हे सर्वांनी कौतुकानी मान्य केले.

    पुढचं प्रॉब्लेम आहे या अंतःस्थ त्रिकोनाचा परीघ काढणे! त्यातून रूळ टाकण्याचा खर्च मिळेल. बाकी 3 मोठी आणि 3 छोटी स्टेशन बांधण्याचा खर्च सरळ हिशोब आहे.

    वा चिंट्या, खरच किती सोपं केलेस तू सगळं, आता हातासरशी परीघ किती ते सांग म्हणजे काम संपले! चिंट्या थोडा गडबडला, पण विचार करू लागला.

    सॅमी काही बोलणार, तेव्हड्यात नेहाने त्याला थांबवले. गप्प राहण्यास सांगितले.

    एलिमेंटरी पेक्षाही एलिमेंटरी, माय डोअर सॅमी, सायली अँड आंटी नेहा! त्रिकोनाचा मध्य बिंदु प्रमेय आठवा! “त्रिकोनाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड तिसर्‍या बाजूस समांतर असतो आणि तिसर्‍या बाजूच्या निम्मा असतो.” म्हणजे 1200 X 1000 X 1000 km त्रिकोनाचा अंतःस्थ त्रिकोन 600 X 500 X 500 km असेल.

    परीघ 1600 km. गुणिले 1 लाख प्रति km.

    3 मोठे स्टेशन 40 X 3 = 120 लाख

    3 लहान स्टेशन 20 X 3 = 60 लाख

    रूळ घालणे = 1600 लाख

    10 टक्के अवांतर = 178 लाख

    अजून 10 टक्के जोडायला हवे कारण रस्ता फुटपट्टीसारखा सरळ कधीच नसतो, तेव्हा,

    एकूण खर्च अंदाजे 1958 + 195.8 = 2153.8 लाख

    22 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरता येईल.

    वा चिंट्या, सुरेख, बेस्टच! सर्वांनी त्याचे कौतुक केले.

    *********** दुसऱ्या दिवशी

    काका दुपारी सर्वांना मॉल मध्ये घेऊन जाणार होते. तिथले खेळ खेळायला देणार होते. संध्याकाळी, एक पिक्चर आणि नंतर रात्रीच्या जेवणाचा बेत एका प्रसिद्ध हॉटेल मधे होता. तिथे त्यांची ओळख काही मुलामुलींशी करून देणार होते... तिसऱ्या दिवशी ती मुलं त्यांना शहरात फिरायला नेणार होती...

    त्यामुळे काकांनी सल्ला दिला की सकाळी तुम्हाला दिलेलं काम पूर्ण करा. चिंट्या काही बोलणार एव्हड्यात नेहा म्हणाली, चिंट्याने एक एस्टीमेट केल आहे पण अजून दोन योजना देण्याचा आमचा विचार आहे. ओके अस म्हणून काका कामाला निघून गेले.

    काय गरज होती अजून डोक्याला त्रास लावून घ्यायची? चिंट्या घुसफूसला. तुझी योजना उत्कृष्ट आहे चिंट्या, फक्त त्यातल्या एका प्रॅक्टिकल अडचणींवर उपाय आहे का बघायचे आहे. जमलं तर ठीक, नाही तर तुझं सोल्युशन आहेच की, नेहाने समजूत काढली. काय अडचण आहे सांग तरी. तू काढलेला मार्ग बऱ्याच वसती, गाव, शहरं छेदून जातो. त्यामुळे डायवर्झन खूप होतील आणि अंदाजपत्रक चुकू शकेल. रेल्वे पण हळू धावेल. म्हणून थोडा विचार करू इतकंच म्हणने आहे माझे.

    रात्री मी, नेहा आणि सायली बरोबर बसलो होतो तेव्हा अंतःस्थ त्रिकोनाच्या ऐवजी वर्तुळाकार केले तर? असा विचार आला होता. पण वर्तुळाचा परीघ कसा काढणार? मी रात्री उशिरा थोडावेळ काम केले आणि मला उत्तर मिळाले आहे.

    समद्विभुज त्रिकोनामधे अंतःस्थ वर्तुळ कसे बसवावे?

    त्रिकोनाच्या तीनही कोनाचे द्विभाजक जिथे मिळतात, तिथेच वर्तुळाचा मध्य असतो हा सिद्ध प्रमेय आहे. मध्यापासून काटकोनात कुठल्याही भुजे पर्यंतचे अंतर सारखेच असते असाही प्रमेय आपण शिकलो आहे. हेच अंतर अंतःस्थ वर्तुळाचा त्रिज्या!

    मी गणित अस केले. आधी 1000 आणि 1200 ला 100 नी स्केल करून आकडे आवाक्यात आणले. त्यामुळे त्रिकोन 10 X 10 X 12 चा झाला. आता सॅमीने चित्र काढले.

    प्रथम, या त्रिकोनाच्या उंची किती?

    या कोना पासूनच्या रेषेने समोरची 12ची बाजू विभागली जाते हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे 10, H आणि 6 असा काटकोन त्रिकोन मिळतो. पायथागोरस प्रमेयने उंची H सहज सापडते 10चा वर्ग वजा 6चा वर्ग! म्हणजे 64 चा वर्गमूळ! उंची H = 8 आहे.

    आता पुढे. बेटाचे एकूण क्षेत्रफळ 12 X 8 X 0.5 = 48 (गुणिले 100 km).

    वर्तुळाचा मध्य आपण कोनांच्या द्विभाजकाने काढला होत. तेव्हा त्यातून आपल्याला तीन त्रिकोन मिळतात. प्रत्येक त्रिकोनाची उंची वर्तुळाचा त्रिज्या इतकी आहे. तेव्हा तिन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ काढता येतें. आणि त्याची बेरीज 48 असली पाहिजे! तेव्हा असे समीकरण मिळते,

    (0.5 × 10 × R) + (0.5 × 10 × R) + (0.5 × 12 × R) = 48

    10R + 6R = 48,

    R = 3

    (खरतर नकाशावर त्रिज्या मोजणं सोपं आहे पण ते मला नंतर सुचलं – सॅमी!)

    परीघ 2 × 3.14 × 3 = 18.84 किंवा 1884 km.

    त्रिकोनी रिंग रेलसाठी काढले तसेच,

    3 मोठे स्टेशन 40 X 3 = 120 लाख

    3 लहान स्टेशन 20 X 3 = 60 लाख

    रूळ घालणे = 1884 लाख

    10 टक्के अवांतर = 206.4 लाख

    अजून 10 टक्के जोडायला हवे कारण रस्ता फुटपट्टीसारखा सरळ कधीच नसतो, तेव्हा,

    एकूण खर्च अंदाजे 2270.4 + 227.04 = 2497.44 लाख

    25 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरता येईल.

    याच वर्तुळा ऐवजी अष्टकोन घेतला तर काय होईल हा विचार मी आणि नेहाने केला रात्री. कारण अष्टकोन म्हणजे आठ समद्विभुज त्रिकोन! सायली म्हणाली. त्यांच्या कल्चर मधे चांगले बसेल.

    अष्टकोनाच्या त्रिज्या पण 3 असेल आणि 8 त्रिकोनांचा मधला कोन 45 असतो. बाजूची लांबी काढण्यासाठी अष्टकोनातल्या एक त्रिकोनाला विभागले की समोरच्या बाजूचे समीकरण मिळते.

    Sin(22.5) = AX / R

    AX = 0.38 X 3

    याचा दुप्पट म्हणजे अष्टकोनाची एक बाजू = 2.28.

    100ची स्केल वापरली, म्हणजे बाजू 228 km. परीघ = 1824 km

    6 च्या ऐवजी 8 स्टेशन, 4 मोठी आणि 4 लहान केली तर

    160 + 80 + 1824 + 206.40 + 227.04 = 2497.44

    25 कोटीच्या बजेट मध्ये 4 मोठी आणि चार लहान स्टेशन होतील. दर 228 km ला एक स्टेशन!

    चौघांनी बसून आता 3 एस्टीमेट लिहून काढले. रिसेप्शन कडून कागद पेन आणि एनव्हलोप मागून घेतली. एस्टीमेट, गृहीत आणि विचार मांडले. आणि काकासाठी रिपोर्ट तयार ठेवला.

    प्रत्येकाला आपण चांगले काम केल्याच्या आनंदाची फिलिंग येत होती...

    काका येण्याची ते अतुरतेने वाट बघत होते...

    ************* क्रमशः

      May 25, 2021


  • गुणवत्तेची भाषा – quality language

    “एकदा या ना आमच्याकडे.” “उद्या भेटूया.” “बरे वाटत नाही आहे.” “गाडी उशीरा पोहोचणार आहे. न्यायला पाठवा कोणालातरी.” “तुला ना शिस्तच नाही” “आपल्या कंपनीचे उत्पादन वाढवायला पाहिजे.” अशी भोंगळ भाषा फारतर साधारण इच्छा किंवा एखादे मत प्रदर्शित करतात. पण ऐकणाऱ्याने नक्की काय करायचे आहे किंवा बोलणाऱ्याची नक्की काय अपेक्षा आहे, हे देवच जाणे. अशी वाक्ये सर्रास कानावर पडतात.

      August 12, 2026


  • मोरया माझा – ११ : श्री गणेश खरेच शिवपुत्र आहेत का?

    दचकलात ना प्रश्न वाचून? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? तर त्याचे उत्तर, होय हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर, नाही हेच आहे. श्री गणेश शिवपुत्र नाहीत. भगवान श्री गणेशांनी शंकर-पार्वतीच्या घरी अनेक अवतार घेतले असल्याने तसा उल्लेख आपल्याला सापडेल पण ते पूर्णवास्तव नाही.

      September 12, 2019


  • फ्रेश वॉटर

    दुपारी बारा वाजल्यानंतर जहाजावरुन कंपनीला नून रिपोर्ट पाठवला जातो. मागील चोवीस तासात जहाजावर वापरलेले इंधन ,पाणी आणि जहाजाने कापलेले अंतर अशा बऱ्याच गोष्टींची माहिती कंपनीला दिली जाते. दुपारी दोन वाजता चीफ इंजिनियर ने शिप्स ऑफिस मधून खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन केला.

      November 14, 2019


  • किचन क्लिनीक – जवस

    किचन क्लिनीक – जवस

    जवस हे तेल बीज चवीला गोड,कडू,उष्ण असते.हे स्निग्ध,पचायला जड असते.हे शरीरातील कफ व पित्त दोषाचा नाश करतात व वातदोष वाढवितात. जवसाचे बी हे डोळ्यांच्या आरोग्यास अहितकर असते.तसेच ते शुक्रधातूचा नाश करते.

    ह्या जवसामधील ओमेगा ३ फॅटी अॅसीड्स हे हृदयाचे आरोग्य उत्तम राखायला मदत करतात.तसेच शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर ती देखील जवस वाढायला मदत करतात.

    जवसाची चटणी करतात किंवा त्याचे तेल ही काढले जाते.आता आपण ह्या दोन व्यंजनांचा शरीरावर होणारा परिणाम पाहूया:

    १) जवस चटणी:

    तिखट,गोड,कडू,स्निग्ध,भुकवाढविते,उष्ण,
    वात,कफनाशक,पित्तकर,शुक्रधातू नाशक,हृदयविकार नाशक आहे.

    २) जवस तेल:
    गोड,उष्ण,पचायला जड,स्निग्ध,कफ पित्तकर,वातनाशक,बल्य,संडासला साफ करविणारे,त्वचारोग नाशक,चरबी कमी करणारे,आहे.

    जवस व मोहरीचे तेल हे जरी स्निग्ध असले तरी अन्य तेलांपेक्षा हि दोन्ही तेलं थोडी रूक्षच असतात.

    जवसाचे अतिसेवन केल्यास अशक्तपणा येऊ शकतो.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      January 8, 2017


  • कोकणात कृषी पर्यटनाला चालना !

    पर्यटन या विषयाच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत. काँक्रिटच्या जंगलाला कंटाळून प्रत्येकाला सुटीच्या दिवशी निसर्गरम्य शांत परिसरात जाण्याची ओढ लागली आहे. सुखवस्तूंच्या सोबतच आता मध्यमवर्गीय माणूसही मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडू लागला आहे. पर्यटनासाठी चार पैसे खर्च करण्याची सर्वसामान्यांचीही मानसिक तयारी झाली आहे. यामुळेच पर्यटन हा आता जगभरात व्यवसाय बनला आहे.

      May 18, 2025


  • कांजिण्यांवरील उपचार

    कांजिण्यांचा सामना करताना फोडांच्या जागेवर येणा-या खाजेवर व तापावर नियंत्रण ठेवणे हे एक महत्वाचे आव्हानच असते. कोमट पाण्याने आंघॊळ करताना अंगाला लावण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा डाळीचे पिठ वापरावे. हे उपायकारक व फायदेशिर असते. थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा थंड वातावरणाने खाज वाढण्याची शक्यता अधिक असते.

    खाजखुजलीवर उपाय म्हणून डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) किंवा हायड्रोक्सिझेन (ऍटारॅक्स) सारख्या गुणकारी औषधांचा वापर केला जाऊ शकतो. त्या त्या परिस्थितीशी अनुकुल असणारी गुणकारी लोशनही आपण वापरु शकतो. पण लहान मुलांनकडून तोंडावाटे डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) व लोशनचा अतिसेवन किंवा अतिवापर होणार नाही याची दक्षता घेणे फार महत्वाचे आहे. स्टेरॉईडचा समावेश असलेल्या औषधांचा वापर करु नये.

    लहान व तरुण मुलांसाठी ऍसप्रिन य औषधाचा वापर टाळावा कारण त्यामुळे Reye's syndrome सारखा जीवनाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता काही प्रमाणात असते. तापावर नियंत्रण आणण्यासाठी ऍसेटामाय्नोफेन औषधाचा वापर करावा. घातक आजार टाळण्यासाठी आय्ब्रुफेनचा वापर टाळावा. कांजिण्या या आजारात त्वचेला वारंवार खाज येत असते अशावेळेस हाताच्या बोटांची नखे कापावी किंवा हातमोजे वापरावे जेणेकरुन त्वचेला ईजा होणार नाही. तोंडातील जखमासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. शरिरास थंड असणा-या द्रव पदार्थाचे सेवन करावे व गरम, तिखट आणि आंबट पदार्थ (संत्र्याचा रस) टाळावेत.

    हात वारंवार धुवावे व शरिरास स्वच्छ ठेवावे जेणेकरुन संसर्ग होणार नाही. जर शरिराला हानीकारक असलेल्या किटाणुंचा संसर्ग झाला असेल आणि तो वाढून ताप पुन्हा येत असेल तर डॉक्टरांना त्वरीत दाखवावे. लहान मुलांना कांजिण्या झाल्या असतील त कुटुंबातील इतर सदस्यांना दक्षता घेण्याबद्दल सांगायला विसरु नका.

    त्वचेला चरे पडणे किंवा संसर्ग होणे आयुष्यभराचे दुखणे ठरु शकते. डॉक्टरांना जाऊ दाखवणे गरजेचे नाही हा दृष्टिकोन पुढे आपल्याला पेचात अडकवू शकतो.

    ऍसिक्लोविर (झोविरॅक्स), हे संसर्ग रोखणारे औषध आहे. त्वचेला चरे पडण्याच्या पहिल्या दिवसापासून वापरल्याने उपयोगी ठरु शकते. लहान मुलांना या औषधाच्या वपराची आवशक्ता नसते. हे औषध बराच वाढलेल्या आजारासाठी दिले जाते. कारण कांजिण्या हा संसर्गजन्य रोग आहे. अशा संसर्गजन्य वातावरणाचा प्रभाव कमी होईपर्यंत लहान मुलांना शाळापेक्षा घरातच शक्यतो ठेवावे.

    कांजिण्यांपासून बचाव.
    वॅक्सिनपद्धतीने कांजिण्यापासून बचाव केला जाऊ शकतो (हे राष्टीय आरोग्य व जनता आरोग्य समुहांनी प्रमाणित केले आहे).

    लहान व तरुण मुलांसाठी: १२ ते १८ महिन्याच्या मुलांपासून १२ वर्षाच्या सुदृढ बालकांवर (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर) वॅक्सिनपद्धतीने उपचार केले जाऊ शकतात. १३ वर्षे व त्याहुन अधिक वयाच्या बालकांना (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर)चार ते पाच आठवडे वॅक्सिनच्या औषधाच्या दोन मात्रा दिल्या जातात. वॅक्सिनेशन नंतर रोग प्रतिकार शक्तीची पुर्ण कल्पना येत नाही. पुन्हा दिलेल्या वॅक्सिनेशनमुळे पौढत्वाकडे वाटचाल करणा-या मुलांमधे रोग प्रतिकार शक्ती वाढते असे मानले जाते.
    पौढत्वासाठी: वरिसेल्लिया वॅक्सिन औषधाच्या दोन मात्रा चार ते आठ आठवड्यांसाठी सुदृढ पौढांना प्रमाणित केल्या जातात. सामाजिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, दिवसा काळजी घेणारे कर्मचारी विद्यालयाचे कर्मचारी, एकत्रित निवास करणा-यांना व संसर्ग होईल अशा जागेत काम करणा-यांना वॅक्सिनेशनसाठी प्रवृत्त करण्यात आले आहे.
    ज्या पौढांना आपल्या रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती नाही अशांसाठी रक्ताचे परिक्षण व निदान करणा-या पद्धती उपलब्ध आहेत. रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती असणे फार गरजेचे असते.

    वॅक्सिन ह्या पद्धतीची घातक आजारापासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनाने निर्मिती करण्यात आलेली आहे आणि हीपद्धत खुपच प्रभावी आहे. वॅक्सिनपद्धतीचा वापर केल्यानंतर क्वचितच कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते. कधी कधी वॅक्सिनपद्धतीनेसुद्धा कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते.

    वॅक्सिनचा प्रॉफेलॅक्सिस झाल्यानंतरही बचावासाठी वापर केला जाऊ शकतो. त्याची लक्षणे दिसायला लागल्यानंतर तिन दिवसात द्यायला हवे. तसेच लक्षणे दिसल्यानंतर चार दिवसात VZIG दिले जाऊ शकते जे अधिक संसर्गापासून बचाव करते.

    हे स्थायी संरक्षण देणारे औषध आहे. म्हणूनच काही काळाने पण वेळीच त्याव्यक्तीची आजारातून सुटका होणे गरजेचे आहे
    .कांजण्यासाठी
    कडुनिंबाची २०० Gm पान +
    मिरे 5 gm एकत्र करुन वाटुन चण्या एवढ्या गोळ्या करा
    1 गोळी 1 कप दुध
    ( ७ दिवस)

    @ १ चमचा कडुनिंबाचा रस +
    ४ चमचे खडीसाखर

    @ घरातल्या दारात कडुनिंबाची पाने बांधुन ठेवा

    @ कुडुनिंबाच्या पानाचा बिस्तरा बनवा वर सफेद चादर किंवा कापड टाकून त्याच्या वर आजारी व्यक्ती ला झोपवा
    प्रसारणःराजयोग ग्रुपचे

    -- आरोग्यदूत WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने

      July 14, 2017


  • हव्या असतील, तर अजून हजार जाती देऊ !

    एक बाब स्पष्ट आहे आणि ती म्हणजे विकासाचे कोणतेही मुद्दे सरकारकडे नाहीत. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याच्या कोणत्याही योजना नाहीत आणि या गोष्टींकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून जातीच्या अस्मितांना फुंकर घालण्याचे काम सरकार करीत असते. भावनिक प्रश्नांवर लोकांना गुंतवून त्यांना वस्तुस्थितीची जाणीवच होऊ द्यायची नाही, ही सरकारची नीती आहे. लोकांनीच हे आता समजून घ्यायला हवे!

      November 27, 2011


  • हनुमान जन्मोत्सव’ – भगवान हनुमानाच्या उत्सवाचा दिवस

    २१ व्या शतकातही हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व पूर्वीसारखेच आहे. गेल्या काही शतकांमध्ये जग आमुलाग्र बदलले असताना, भगवान हनुमानाचे गुण, जसे की शक्ती, धैर्य, भक्ती आणि निस्वार्थीपणा, हे अजूनही महत्त्वाचे आहेत. हे गुण आपल्यात बाणवण्याचा श्रद्धाळू लोक प्रयत्न करतात.

      April 6, 2023


  • आहारसार भाग १

    आरोग्यटीप बर्‍याच जणाकडे फिरते आहे, माझ्या एका **कडे तर सात आठ गटातून येते, तीपण बाकीच्यांना पुढे पाठवते. पण स्वतः न वाचताच ! कृपया असे होऊ नये. पुढे पाठवावीशी वाटली तर स्वतः वाचून नंतरच पुढे पाठवावी. नाहीतर इकडून तिकडून गेले वारे

      August 19, 2016